आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 12, 2013

तिखट मीठ पुरी व ताक याची कडी

तिखट मीठ पुरी व ताक याची कडी

अंदाजे कणिक घेतली अंदाजे हरबरा डाळीचे पीठ घेतले.
त्यात कच्चा तेल मोहन घातले. तिखट व कोल्हापूर चटणी चे
तिखट घातले हळद भाजलेले तिळ कूट घातले सर्व पाणी ह्यात एकत्र
मिश्रण कालविले ग्यास पेटवून कढई व तेल तापवून घेतले पुऱ्या
पोळपाट -लाटन यांनी लाटून तेल तापलेल्या कढई  तं   तळून काढले

हरबरा डाळी चे पीठ घातल्याने कुरकुरीत व चविष्ठ चविष्ट झाल्या.

कडी – दही रवीने हलवून घेतले त्यात हरबरा डाळी चे पीठ घातले हळद
व हिरवी मिरची कडीपत्ता आल थोडसं मीठ मिक्सर मध्ये बारीक केलेले
घातले. तुप जिरे याची फोडणी पातेल्यात केली त्यात कडी चे पाणी सार घातले.
मस्त मसाला वाटून घेतल्याने चव चांगली आली हळद घातल्याने रंग पण
चांगला  कडी ला आला.

रोज पोळी भाजी च्या ऐवजी तिखट मीठ पुऱ्या व  ताक   आंबट कडी जेवण चांगले
वाटले.
बरोबर चिकू फळ शेंगदाने भाजलेले थोडसं गोड टोस्ट बरे वाटले खायला व बघायला !

IMG_0384[1] IMG_0383[1]

IMG_0381[2] IMG_0139[1]

%d bloggers like this: