संत्र व केळ व मेरी ख्रिसमस
ॐ
फळं संत्र व केळ
नोव्हेंबर डिसेंबर महिना तं संत्र व ईतर फळ चांगली मिळतात.
मी दहा १० / 10 रुपये ला तीन केळी व दहा रुपये ला एक संत्र आणले
एकूण विस २० / 20 रुपये झाले एका वेळेला एवढा खर्च व खाणे पुरते.
फळ बाऊल घेतला केळं याची साल काढले. संत्र साल सोलले ते बाजूला ठेवले.
केळ हाताच्या बोटा ने चं बारीक कुस्करले सुरी वापरली नाही संत्र सोलू सोलून आतील
गर बाऊल मध्ये घातला दही घातले मीठ घातले हिरवी मिरची एक बारीक करून घातली
आल थोडस चवी पुरते घातले दुध साय घातली सर्व चमचा ने हलविले
मस्त आंबट तिखट खारट आल याची चव आली टोस्ट ठेवले पण त्यात घातले नाही
दुध साखर याचे फ्रुट स्यालेड सर्वजन करतात साखर न खाणारे व कोशिंबीर साठी
बरे बाटले करायला पेरू चे असेच ठेचून करतात. मस्त चव येते.
कोणतेही फळ घेतली तरी चालतात.
मराठी टायपिंग करतांना काळजी पूर्वक करावे लागते नाहीतर एकदम सर्व पुसले जाते.
मी कित्ती कित्ती मराठी टायपिंग केले आहे. मला चं मस्त अभिमान वाटतं
ॐ
दिनांक तारिख 24. 12. ( डिसेंबर ) 2013 साल ला
डॉ शरद यशंवत देशपांडे यांचा वाढ दिवस आहे ७५ वर्ष पूर्ण होतं आहेत त्यांना शुभेच्छा !
ॐ
मेरी ख्रिसमस
रांगोळी पांढरी स्वच्छ आहे घंटा आहे घुंगरू आहेत मी विणलेल्या टोप्या आहेत
फुगे आहेत काचेच्या डिश मध्ये टोस्ट बेकरी चे आहेत आणि मेणबत्ती दिवा आहे