माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी
ॐ
– ओम् श्रीअरविंद मीरा – दिनांक
१७ – ९ – २०१४
माननीय पंतप्रधान – श्री नरेंद्र मोदी – सादर प्रणाम
१७ सप्टेंबर आपला – जन्म – दिवस – या शुभ समयी आपले
सहर्ष हार्दिक अभिनंदन . अनेक शुभेच्छा .
निवडणुकी नंतर – आपला विजय झाला त्यावेळे पासून
आपल्याला पत्र लिहिण्याची इच्छा होती पण वेळ किंवा
मुहूर्त आला तो आपल्या जन्म दिनी .
मी pondicheery येथे राहणारी एक सामान्य मामुली व्यक्ती
आहे श्री अरविंद आश्रम याची एक भक्त आहे योगी अरविंद यांच्या
जन्म भारत मातेच्या स्वतंत्र ते साठी झाला हे जगात विख्यात आहे
माझे माझ्या मातृभूमी वर प्रेम आहे अखंड भारतावर प्रेम आहे
आपण एक मोठे कवी आहात मी तुमचे पुस्तक पाहिले आहे
मी पण छोट्या मोठ्या कविता करते
माझा देश सारा माझा अखमद भारत प्यारा
जेथे ठेवीन पाय मी तेथे माझी माती
जेथे घेईन पाणी ओंजळीत अर्धे तेथे हाती
भटकत जाईन दाही दिशांना माळराना सारा
माझा देश सारा माझा अखंड भारत प्यारा
आपण एक अनोखी व्यक्ती आहात आपल्या सारखा
सुपुत्र प्राप्त झाल्या बद्दल आपली जन्मदात्री आई
धन्य झाली आहे आणि भारत माता प्रसन्न जाली आहे
राम अवताराने – रामाने समाजाला खूप खूप दिलेले आहे
नायक किंवा नेता प्रजाव छल असावा . जनसमुहाला एकत्र घेऊन –
एकात्म होवून चालणारा असावा आपण हे गुण घेऊन चं जन्माला
आलेले आहात आपला सदैव विजय च असो हीच माझी शुभकामनाय –
शुभ जन्म दिनी पुन : एकदा निनम्र हार्दिक अभिनंदन
विनम्र – सौ सुनीती रे . देशपांडे
१७. ९. २०१४