आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 11, 2014

मलाला =कैलाश यांचा सन्मान

मलालासह   कैलाश सत्यार्थी यांचा सन्मान
ओस्लो : गेली अनेक वर्षे भारतातील बालकामगार पद्धत आणि लहान मुलांच्या तस्करीविरुद्ध लढा देणारे कैलाश सत्यार्थी (वय 60) आणि स्त्री शिक्षणासाठी लढा देत दहशतवाद्यांशीही सामना करणारी पाकिस्तानची मलाला युसूफझाई (वय 17) यांना 2014 चा प्रतिष्ठेचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. या दोघांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे भारत- पाक आणि हिंदू – मुस्लिम असा अनोखा संयोग झाला असल्याचे नोबेल निवड समितीने म्हटले आहे. 

लहान मुलांची तस्करी रोखण्यासाठी आणि त्यांना बालकामगार पद्धतीतून मुक्त करण्यासाठी “बचपन बचाओ आंदोलन‘ या संस्थेच्या माध्यमातून सत्यार्थी 1983 पासून कार्यरत आहेत. इलेक्‍ट्रिक इंजिनिअर असलेल्या सत्यार्थी यांनी यासाठी करिअरवरही पाणी सोडले. महात्मा गांधींच्या विचारांवर चालणाऱ्या सत्यार्थी यांनी लहान मुलांच्या हक्कांसाठी अनेक शांततापूर्ण निदर्शने केली आहेत. सत्यार्थी यांनी आतापर्यंत तब्बल 80 हजार मुलांना बालकामगार पद्धतीच्या विळख्यातून मुक्त केले आहे. “आर्थिक लाभासाठी लहान मुलांच्या केल्या जात असलेल्या शोषणा विरुद्ध‘ आवाज उठविल्याबद्दल आणि कार्य केल्याबद्दल सत्यार्थी यांना हा सन्मान दिला जात असल्याचे नोबेल पुरस्काराच्या निवड समितीने म्हटले आहे. सत्यार्थी यांच्या निमित्ताने भारताला तब्बल 35 वर्षांनंतर हा पुरस्कार मिळाला आहे. याआधी मदत तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. 

मलाला हिला गेल्या वर्षीही नोबेलसाठी नामांकन मिळाले होते. पाकिस्तानमध्ये स्त्री शिक्षणासाठी आवाज उठविल्याबद्दल दहशतवाद्यांनी हल्ला करूनही आपल्या उद्दिष्टापासून जराही न डगमगता लढा कायम ठेवत तिने धैर्याचे प्रदर्शन केल्याचे समितीने म्हटले आहे. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर तिला उपचारासाठी ब्रिटनमध्ये हलविण्यात आले होते. मृत्यूशी यशस्वी झुंज दिल्यानंतरही तिने स्त्री शिक्षणासाठीची आपली चळवळ सुरूच ठेवली. मलाला आतापर्यंतची सर्वांत तरुण नोबेल विजेती ठरली आहे. मलालाने गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघातही भाषण केले होते. तसेच, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतली होती. “टाइम‘ नियतकालिकाच्या जगातील सर्वांत प्रभावशाली शंभर व्यक्तींमध्ये गणना झालेल्या मलालाने “आय ऍम मलाला‘ हे पुस्तकही प्रकाशित केले आहे. मलालाचे वय लहान असूनही तिने अनेक वर्षे स्त्रीशिक्षणासाठी लढा दिला असून, आपल्या कृतीतून सर्वांसमोर आदर्श उभा केला आहे, असे निवड समितीने म्हटले आहे.

शिक्षणासाठी आणि कट्टरपंथियांविरुद्ध लढण्याच्या समान उद्दिष्टासाठी एकत्र येणे हा हिंदू आणि मुस्लिम तसेच भारत आणि पाकिस्तानसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, असे या दोघांना मिळालेल्या पुरस्कारावर भाष्य करताना नोबेल निवड समितीने म्हटले आहे. शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी यंदा विक्रमी 278 नामांकने होती. यामध्ये ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचेही नाव होते. 11 लाख डॉलरचा हा पुरस्कार सत्यार्थी आणि मलाला यांना संयुक्तपणे तो 10 डिसेंबरला प्रदान करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार मी देशाला अर्पण करत आहे. आता कोट्यवधी मुलांचा आवाज ऐकला जाईल. आम्हाला नवी ऊर्जा मिळाली असून, आमचे काम जगभरात वाढवून लहान बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
– कैलाश सत्यार्थी

696

7

फोटो गॅलरी

nobel_peace-300x200 4664832245413158841_Org

4727231667393815227_Mid (1) GetAttachment

करक चतुर्थी =जयनाम=२०१४

                                              ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
दक्षिणायन शरद ऋतु नक्षत्र  कृतिका योग सिद्धि करण बव
चंद्र राशिप्रवेश नं वृष संकष्ट चतुर्थी करक चतुर्थी
३ शनि शनिवार
                   ॐ
तसेच दिनांक तारिख Date ११ १० ( अक्टोबर ) २०१४
             शनिवार

                            ॐ

पूरण घातलं केलं करक चतुर्थी

IMG_3518[1] IMG_3521[1]

IMG_3519[1] IMG_2478[1]

IMG_3511[1] IMG_3512[1]

IMG_3491[2] IMG_3473[4]

पंखा=किल्ले

                                  ॐ
पंखा

अक्टोबर महिना चालु आहे चोविस तास गरम होत आहे
पंखा असल्यामुळे बसविले जातं व झोप पण लागते
इले ट्रीक ची सोय झाल्यामुळे पंखा संगणक लाईट सर्व
मिळत आहे

पूर्वी माती ची घर गार असायची पत्रा असला तरी गारवा असायचा
चार बाजूने सिमेंट ची घर फरशी सिमेंट दगड असतो तापतो
हल्ली घर छान दिसतात पण गरम व्हावयाला लागले कि
बसवत नाही रिक्षात सुध्दा गरम हवा येते वार च सुटत नाही

तरी पण कोल्हापूर खूप छान आहे थोडासा गारवा असती

पंखा चा उपयोग चांगला होत आहे आराम वाटतो तेवढा सां
माती चे किल्ले करावे पाणी शिंपडावे गारवा येतो घर जवळील
बाजू गार होते वाळा चे पडदे लावून पाणी शिंपडावे
पूर्वी वाळा चे पडदे होते आमच्या कडे गादी च्या ऐवजी सतरंजी
टाकून झोपावे मी सतरंजी वर व एक चादर घालून झोपते
माठ याचे पाणी प्यावे
फ्रीज चे पाणी दात याला कळ येते
कळशी ला गार पंचा भांधावा पाणी गार होते उत्तम पिण्यास छान

IMG_3494 IMG_3498[1]

IMG_3497[1] IMG_3499[1]

%d bloggers like this: