आपले स्वागत आहे!

नमस्कार

                      ॐ              कोल्हापुर
                                         बुधवार
                                              १५. १० ( अक्टोबर ) २०१४

मनाची ठेवणं

मन एकट येकट असल कि माग च्या वेळेला आपण काय काम केल
याची आठवण येते
नवीन काम करतांना त्यात सुधारणा करावी उन्हात हिंडू नये लिहिले आहे मी
पण उन्हात हिंड ल्याने हाड ठिसूळ होत नाहीत उन्ह लागल्याने त्वचा
स्वच्छ राहते अति उन्ह पण वाईट

देवाची पुस्तक वाचन जरूर करावी त्या बरोबर किल्ला ची माहिती गाव
लायब्ररी ची माहिती हवामहाल चार मिनार याची माहिती वाचावी
प्रत्यक्ष आपण सर्व बघू शकत नाही पण वाचन करून खूप माहिती मिळते
माझ्या ब्लॉग मध्ये भरपूर माहिती आहे

परत परत वाचले कि छान वाटतं

कविता पण छान लिहिलेल्या आहेत त्या परत वाचते मी माझावेळ
वाचन व लिखाण दोनही मध्ये जातो

काही चं लिहिण्यास सापडले नाहीतर धान्य याचे महादेव तयार करून दाखविते
धान्य आणायचे महादेव करायचा फोटो काढायचा तिथी तारिख लिहायची व
कशा चा महादेव आहे लिहायचे
साध काम वेळ व काम करण्यास उच्छाह येतो

दिवा ची माळ फूलं याची माळ किल्ला त छान वेळ जातो
दुपारी पंखा लावून आराम करावा लहान पणी नव्हते आता कशाला असे करू नये

पूर्वी पाटा वरवंटा वर पुरण वाटत पण आता पुरण यंत्र ने पुरण वाटतात
जस असेल तसे काम करणे
पूर्वी पाटीवर वही वर लिखाण असे आता संगणक शिकून लिखाण करावे
छान वाटत खूप जन समुदाय वाचतात लिखाण

पाच वाजता धान्य भाजी आणायला बाहेर जावे पडावे
पाय व सर्व शरीर पिशव्या धरून व्यायाम चं होत

संगीत काही शिकले असल्याने त्याचा उपयोग मेंदूला चालना मिळण्या साठी करावा
स्वच्छ व प्रसन्न वाटत मी सतार शिकल्याने मला अनुभव आहे
सतार खराब झाली साठी सतार रियाज बंद आहे माझा
पण माझे सातारी चे फोटो पाहून  माझे मला चं  छान वाटत

वर्तमान पत्र हातात जमिनी वर पसरून वाचणे मला आवडते
हल्ली पटकन साठी संगणक मध्ये थोड फार वाचते व
ब्लॉग करते

घरात थोर लोक याची मूर्ती ठेवावी आमच्या कडे छत्रपती शाहू राजे यांची आहे
सहज नजर जाते छान वाटतं

वय झाले संगणक काय शिकायचे असे करू नये
मला तर रोज काहीतरी संगणक मध्ये लिहावे वाटत असते
आणि तेही मराठी तून लिहिते मी

कागद वर लिहिल्या सारखे संगणक मध्ये लिहिते मी
दिनांक १५ . १० ( अक्टोबर ) २०१४ साल
विधानसभा चे मतदान आहे मी मतदान करून येणार एणार

                                            नमस्कार

                        बाकी ठिक

                                                         वसुधालय

         IMG_3543  dscf0771                                            nobel_peace-300x200 GetAttachment

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: