श्रीमद् भागवत महापुराण महात्म्य||5
ॐ कोल्हापुर
31. 1 ( जानेवारी ) 2015.
शनिवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
मुंबई येथून लिखाण आले आहे ते मी लिहित आहे.
‘श्री ‘
____________________
श्रीमद् भागवत महापुराण महात्म्य ||
भगवंताचे पारायण करण्यासाठी सनकादि ऋषि व नारद मुनी
इतर सर्व ऋषि गणांसह हरीव्दार क्षेत्रीं गंगेच्या काठी आनंद
घाटावर गेलें. भक्ति मुला सह तेथे आली तेथें सनकादि ऋषीं नी
भागवत पुराण सप्ताहाचें पारायण केले. इतरांनीं त्याचे श्रवण केलें.
पारायण मुळें वैराग्य – ज्ञान दोन्हीं पुत्र व भक्तिहीं तरुण , धुष्ट पुष्ट
झाली. अशा या वेदज्ञ , ब्रह्मतेजयुक्त असून धनवान होता.
त्याला धुन्घुली नावाची कुलीन व सुंदर पत्नी होती. अशीं असूनही ती
स्वभावाने हट्टी होती. भांडखोर , कुटिल होती . त्या दाम्पत्याला
बराच काळ निघून गेला. तरी मुल बाळ झाले नाही.
संतान प्राप्तिसाठी त्या ब्राह्मणाने घर्म कार्यात पुण्यकर्मासाठी
जवळ जवळ अर्धी संपत्ती खर्च केली तरीही त्याला मुलबाळ
झाले नाही म्हणून तो फार चिंतातूर झाला ,व उदास राहू लागला.
अखेर एक दिवशी तो दुखी होऊन वनात निघून गेला, तेथे
त्याला एक संन्यासी महात्मा भेटला. त्यांना नमस्कार करून ,
आपणाला मुल बाळ नसल्याची दु:ख द कथा ढसा ढसा रडून सांगितली –
तो संन्यासी योगनिष्ठ होता , त्यांना त्या आत्मदेव ब्राह्मणाची दया आली.
ब्राह्मणाच्या चेहरा वरून यांनी याचे प्रारब्ध ओळखले.
व ते म्हाणातेले आत्मदेवा !तुला सातजन्म मुल बाळ होणार नाही. तेव्हा तू
संतानाची आशा सोडून दे. तेव्हा आत्मदेव ब्राह्मण व्याकुळतेने
सामन्यासाला म्हणतो, मी संतान अभागी असेल तर मी तुमच्या
समोर प्राण त्याग करीन तुम्हीं महात्मा आहात तर मला
संतान होईल असे काहीतरी उपाय करा. महात्म्याने
ब्राह्मणाला भरपूर बोध करून समजावले तरी ब्राह्मणाने
ऐकले नाही म्हणून महात्म्याने शेवटी ब्राह्मणाला एक
फळ दिले ते फळ पत्नीला खाण्यास देम्हणून सांगितले
म्हणजे तुला पुत्र होईल. असे सांगून ते संन्यासी चालले गेले.
पुढील भाग उद्या
सौ मेधा शरद देशपांडे
वसुधालय