आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 28, 2015

दिलीप तिवारी मुख्य संपादक

                    ॐ कोल्हापुर
                    जळगाव

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक
मधील प्रस्थावना

 

 

 

वयाला हरवणारी माणसं संगणकावर आणि अॅण्ड्राईड मोबाईलवर इंटरनेटचा वापर करणे आज प्रत्येक व्यक्तिसाठी गरजेचे झाले आहे. ही दोन्ही माध्यमे व्यक्ती आणि समुह संपर्काची गतिमान साधने आहेत. आजकालची मुले आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणारे तरुण या साधनांचा लिलया वापर करतात. प्रौढत्वाच्या उंबरठ्यावर असणाऱ्यांच्या मनांत गोंधळ सुरु असतो, शिकावे की न शिकावे ? आयुष्याच्या उतारावरील मंडळी या साधनांच्या वाटेला जात नाहीत. मात्र, कुटुंबाची साथ-आग्रह आणि स्वतःचा शिकण्याचा दृढ संकल्प असेल तर श्रीमती वसुधाताई चिवटे यांच्या सारखे उदाहरण आणि कार्य समोर येते. वसुधाताईंची कहाणी तशी छोटीच आहे. गरजेतून त्या साधनांचा वापर शिकल्या, त्यातून त्यांनी आवड जोपासली आणि ब्लाॅग तयार झाला. त्यांचे आज “सायबर आयुष्य” तयार झाले आहे. इंटरनेटच्या अभासी पोकळीत वसुधाताईंचे आस्तित्व अजरामर झाले आहे. मला वसुधाताईंचे वेगळेपण दिसते ते येथे. वाढत्या वयाशी स्पर्धा करणारी वसुधाताईंसारखी मंडळी वयाला सुध्दा हरवतात. त्यांनी गिरवलेला हा कित्ता इतरांना मार्गदर्शक आहे. माध्यमांच्या आशयांच्या भाषेत ही “सक्सेस स्टोरी” आहे. आता ही स्टोरी पुस्तिका रुपाने सर्वत्र पोहचणार आहे. वसुधाताईंच्या या छोट्या पुस्तिकेला, जळगावच्या कृपा प्रकाशनला आणि हा विषय “तरुण भारत” च्या वाचकांपर्यत सर्व प्रथम नेणार्‍या किशोर कुळकर्णी यांना मी धन्यवाद देतो. वसुधाताईंच्या हातून अजून छान-छान पाककृतींचे लेखन व्हावे ही अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना दीर्घायुष्य लाभावे अशी मनःपूर्वक शुभेच्छा देतो !!! दिलीप तिवारी, मुख्य संपादक, तरुण भारत – जळगाव (९५५२५८५०८८)                                                           
                                 

10931303_390929557750487_317078576698530922_n                                   img_29283

वसुधालय वसुधा

                   ॐ              कोल्हापुर
वसुधालय वसुधा
कन्या यशंवत राधाबाई चि

आर्या श्री श्रीकांत चिवटे यांची
केली तिने प्रगती संगणकात केली
कात निर्मिले पुस्तक मराठी चे

शिक्षण फक्त s . s . c . चे
ज्ञान फार नाही इंग्रजी चे पण

जिद्द मनी काही करण्याचे
उचलली लेखणी हातात

लिहिले पदार्थ साधे आणि
चविष्ट कृती करून दाखविले

छायाचित्रात भाकरी भाजी आणि
धिरडी पुरण पोळी आणि साटोरी

रांगोळ्या अनेक तऱ्हेच्या आकाश दिवे
आणि शिंकाळी सणावाराची देऊन माहिती

थोरामोठ्याचां लिहिल्या कथा एक नां दोन
विषय अनेक घेतले मन त्यात छान रामाविले

सोसून साऱ्या अडचणी अन् वथ्या

घदविली स्वत : ची एक वेगळी
संगणक कथा

तिला लाभो महालक्ष्मी चे आशिर्वाद
होऊ प्रगती संगणक क्षेत्रात
हिच प्रार्थना जग् मातेस

हिच प्रार्थना जग् मातेस
                                 सौ . सुनुती रे. देशपांडे

                              PONDICHERRY

श्रीराम नवमी श्रीमन्मथनाम

                                          ॐ                 कोल्हापुर
                                                                 28. 3 ( मार्च ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

स्वस्ति श्रीमन्मथनाम संवत्सर
विक्रम संवत् २०७१  – ७२ इसवी सन २०१५ – १६
उत्तरायण वसंतऋतु नक्षत्र पुनर्वसु योग शोभन करण बालव
चंद्र राशिप्रवेस नं कर्क श्रीराम नवमी देवीला दवणा वाहणे
देवी नवरात्र समाप्ति दग्ध २७ ।१० प
९ शनिवार चैत्र शुक्लपक्ष
बाकि ठिक छान
वसुधालय

 

 

DSCF1528IMG_5355

%d bloggers like this: