आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल, 2015

ब्लॉग पोस्ट २,५५५. 2, 555 वां

                                  ॐ              अमेरिका
                                               30. 4 ( एप्रिल ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश

वसुधालय ब्लॉग पोस्ट २,५५५. 2, 555 वां
दोन हजार पाचशे पंच्चावन्न वा होत आहे

भेटी 248,752 ,२४८, ७५२
दोन लाख अठ्ठे चाळीस हजार , सातशे बावन्न.

एवढं मराठी लिखाण माझ्या कडून झाले आहे.
नुसत पदार्थ किंवा रांगोळ्या नसून गाव ची माहिती
थोर व्यक्ती चिं माहिती देव दर्शन माझं जगणं
नाते परिवार अमेरिका बद्दल माहिती सर्व लिखाण आहे
एवढ लिखाण मराठी त आहे साठी
सर्व ब्लॉग वाचक प्रतिक्रिया देऊन माझ कौतुक करतात
मला उच्छाह येतो व नवीन वर्तमान पत्र पुस्तक मधील माहिती
लिहिली आहे.
थोड्या चुका होतात असे म्हणतात पेस्ट मध्ये तसे होते
दुरुस्त करता येत नाही
आपण ब्लॉग वाचन करता प्रतिक्रिया कॉमेंट देता मी खूश असते
आता काय लिहावे सर्व विषय भरपूर लिहिले आहेत
बाकि ठिक छान
वसुधालय

चहा

                                           ॐ                   अमेरिका
                                                                      30. 4 ( एप्रिल ) 2015

ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विशेष
चहा
मी सकाळ दुपारी चहा पिते साखर घालत नाही.
दुध भरपूर घालते दुधाचा गोड पणा येतो . छान वाटतं .
दुध मूळे ताकद वाढते . पोट साफ होते. मला साखर म्हटलं कि
भीती च वाटते चुकून गोड खात नाही पथ्य भरपूर पाळते
त्यामुळे तब्येत चांगली आहे लिंबू सरबत घेतले तरी साखर घालत नाही .
येथे आल्या मूळे फळ मात्र भरपूर खाते कोल्हापूर येथे केळ खात असे संत्र
खात असे लिंबू पाणी पीत असे येथे फळ मूळे ताकद जास्त य़ेते.
स्वंयपाक मध्ये पण साखर गूळ घालत नाही.
शुगर साठी सर्वांनी साखर कमी खावी
बाकि ठिक छान
वसुधालय 

ब्लॉगवाल्या आजीबाई

                                 ॐ              अमेरिका
                                                     29. 4 ( एप्रिल ) 2015
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
दोन वर्षा पूर्वी मी अमेरिका येथे आलेली भरपूर माहिती लिहिली आहे.
सध्या माझ्या कडे विषय नाहीत पाककृती रांगोळ्या पण भरपूर काढल्या आहेत
कथा कविता मला येत नाहीत

काल बिट ची भाजी केलेली राहामा ची उसळ आमटी केलेली

काल मुंबईत माझे भाऊ डॉ शरद देशपांडे यांच्या कडे
ब्लॉग वाल्या आजीबाई वसुधा श्रीकांत चिवटे
नावाची पुस्तक
किशोर कुलकर्णी यांनी पाठविलेली मोलालीत
ते आता अमेरिका येथे पुष्कर कडे पाठवतील
मला पाहण्यास मिळेल
मी भारत मध्ये असते तर जळगाव येथे जाणार होते
माझा सत्कार केला असता पण मी तब्येती मूळे अमेरिका येथे आले
असो

विभाकर पुरण भट्टी व किशोर कुलकर्णी यांची मी आभारी आहे
त्यांनी कांही पैसे न घेता माझे पुस्तक छापले आहे
ब्लॉगवाल्या आजीबाई ! वसुधा श्रीकांत चिवटे
मस्त कव्हर आहे माझा फोटो छान आहे आजीबाई सारखा चं !
पुस्तक याचे कव्हर संगणक काम्पुटर मध्ये पाठविले आहे
साठी मला माहित आहे
बाकी ठिक छान
ब्लॉगवाल्या आजीबाई
वसुधालय

फिरणे

                                       ॐ             अमेरिका
                                                    28. 4 ( एप्रिल ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
फिरणे

काल आम्ही कॉलनीत फिरलो मोठे मोठे रस्ते आहेत.
डांबरी करण छान आहे चढ उतार रस्ते आहेत. घरापुढे गुलाब व
इतर फुल आहेत. आमच्या घरात बागेत गुलाब ची फुल आहेत.
पाऊस भरपूर असल्यामुळे फार पाणी घालावे लागत नाही.
अंगण भर गवत आहे गाडी बाहेर काढण्यासाठी डांबरीकरण आहे.
ग्यारेज आहे ग्यारेज मध्ये गाडीत बसून गाडी बाहेर काढतात. ग्यारेज मध्ये व गाडीत
मशीन सारखे बटन आहे त्याने ग्यारेज चे दार उघडते.
येथे आरामात गाडीत बसून फिरते पट्टा लावता येतो.
कोल्हापूर येथे थोडी रिक्षा थोड चालन असे वेगळा चालण्या साठी वेगळे फिरावे
लागत नाही. मशीन मध्ये भांडी स्वच्छ व वाळवून निघतात. स्टील पेक्षा
काच डिश वापरले जातात. उरलेले अन्न पण काचेच्या भांड्यात ठेवले जाते.
जपून सर्व काम करावे लागते.
बाकि ठिक छान
वसुधालय 
 1385451_354930318017078_4089414954825879198_n

मसूर डाळ आमटी

                               ॐ             अमेरिका
                                             27.4 ( एप्रिल ) 2015.
                                               सोमवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
मसूर डाळ
मसूर डाळ पाण्यात भिजविली चार तास भिजविली.
कुकर मध्ये मसूर डाळ धुवून घातली पाणी घातले.
ग्यास पेटवून चार शिट्ट्या दिल्या. ट म्या टो कांदा हिरवी मिरची .
आल लसुन मिक्सर मधून काढले तेल जिरे ची फोडणी केली.
सारण घालून शिजविले. मसूर डाळ मध्ये घातले.
लाल तिखट हळद मीठ घातले. परत मसूर डाळ मध्ये घातले.
एक शिट्टी दिली मस्त मसूर डाळ याची आमटी केली .
पोळी गिरवा रवा चा उपमा याचा बरोबर मसूर डाळ आमटी खाल्ली .
लांब हिरवी मिरची त डाळीचे पीठ घालून मीठ घालून प्यान मध्ये
तेल घालून वाफ आणली. मस्त मऊ झाली . कार्ले ची भाजी पण
केलेली होती मस्त जेवण झालं . भारत मधील पिवळ लाल सर खरबूज
फोडी करून खाल्ले
सर्व भरपूर मी खाल्ले आता पोट दुखत नाही . मला बर वाटत
पण सकाळी सकाळी झोपेतून उठतांना अंग गरम होत . जाग येते .
सकाळी शुगर कमी झाली असेल त्यामुळे होत असेल म्हणतात ह्या
वयाला काहीतरी चालू चालूच राहणारं ! बागेत फिरून आलो .
बाकी ठिक छान
वसुधालय

 

DSCF2992

रूपक पंडित कुलकर्णी बासरी

                              ॐ          अमेरिका
                                              26.4 ( एप्रिल ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष

शनिवार २५. तारीख ला संध्याकाळी  सहा वाजता आम्ही
बासरी चा कार्यक्रम ऐकायला गेलो होतो युन्हरसिटीत होता
पंडित रूपक कुलकर्णी भारत मधील अमेरिका येथे आले आहे
न्यूयार्क मध्ये पण त्यांचे कार्यक्रम झाले आहेत
त्यांनी काल श्याम कल्याण राग वाजविला खूप छान वाटले ऐकायला.
तीन तास कार्यक्रम चालू होता.
इतक्या वेळ बसून वाजविणे सोप नाही पण रियाज व मनाची तयारी असली
कि व्यक्ती माणूस काही पण करू शकतो याला च प्रगती म्हणतात .
आपल्या जवळ कोणता हि अभ्यास असला कि माणूस जगभर फिरू शकतो.
त्यासाठी खूप मेहनत करावी लागते.
मी सतार शिकले बेळगाव येथे माझी सतार हॉल मध्ये झाली त्यावेळा
मला वाटलं नाही आपण बेळगाव येथे सतार वाजवू शकू
सर ह्यांनी खूप छान शिकविले मी रियाज केला त्यामुळे
भारत मध्ये च बेळगाव येथे सतार वाजवीन सोप नाहि.
माणसांनी नवीन शिकून त्यात अभ्यास करण जरूर आहे आपोआप प्रगती होते.
भारत मधून अमेरिका येथे पंडित रूपक कुलकर्णी यांनी छान बासरी वाजविली
त्यांना स्वत : ला हि त्याचा आंनद मिळाला असेल . आपण देशभर जाऊन
आपली बासरी लोकांना ऐकवू शकतो

वसुधालय

अननस

                                       ॐ अमेरिका
                                            26.4 ( एप्रिल ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
अननस
अननस चे साल काढले . बारीक फोडी केल्या मिक्सर मध्ये घातले .
दुध घातले साखर घातली नाही.
मस्त शेख ज्यूस काचेच्या मोठ्ठ्या ग्लास भर पिले छान वाटलं
येथे येथे हिरव खरबूज मिळते गोड असते.
सर्व व्यवस्थीत चालू आहे.
बाकी ठिक छान
वसुधालय

प्रगती

                            ॐ    अमेरिका
                                  25. 4 ( एप्रिल ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
शाळेत कॉलेज मध्ये शिक्षक सर्व मुलांना सारख शिकवितात
पण काही मुले पहिले येतात तर काही मुले नापास होतात
असे का होते नापास वाली मुल पण अभ्यास करतात
नापास होऊ नये अशा प्रकारे शिक्षण द्यावयाला हवे नापास झाली कि
गुंड बनतात त्यांना उध्योग मिळेल पोटा पुरते पैसे मिळविण्या साठी शिक्षण
दिले पाहिजे

तसे फळ भाजी याचा धंदा करतात भरपूर पैसे मिळवितात
कमी शिकलेले मुल त्याना तोही धंदा करता येत नाही
थोड्या पैसा त काही होत नाही साठी मीन संसार चे राहतात
नाराज होतात हल्ली शेती पण नाही भाऊ भाऊ वाटून संसार करतात .
अशा प्रकारे जीवन जगले तर लोक संख्या कमी होईल
चांगल्या मुलाची लोक संख्या कमी होईल
व अगदी वेगळ्या जातीची लोक संख्या वाढते
प्रगती शील देश भावायाला हवा नुसता पैसा मिळवून
देश मोठा होणार नाही
बाकी ठीक
वसुधालय

पोट

                    ॐ         अमेरिका
                             24. 4 ( एप्रिल ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
पोट
काल सकाळी आठ ८ वाजता जेवले होते तीन पर्यंत पाणी पण घेतले नाही.
१२बारा वाजता थोडस थकल्या सारखं झाल. झोपले बर वाटलं.
मी पुष्कर गाडीने हॉस्पिटल मध्ये गेलो तीन ३ वाजता टेस्ट केली काहीही
दोष नाही सर्व नॉर्मल आहे.
चार वाजता गाडीत च सौ सुनबाई ने डबा दिला होता तो खाल्ला एकदम बरं वाटलं
आता गोळ्या चालू आहेत पोट थांबेल. झोप पण चांगली लागते. अंग गरम होत नाही.
रात्री ची शुगर ची गोळी बंद केली आहे.
मी व्यवस्थित आहे
लोकरचे विणकाम करते पुष्कर साठी थंडी चे मांडी वर घेण्या साठी व ते बासरी वाजवतात
बसून मांडीवर घेण्या साठी विणकाम करत आहे जांभळा रंग आहे.
व्यवस्थित जेवण फळ आहार चालू आहे मी आता नेहमी सारखी झाले आहे.
बाकी ठिक
वसुधालय

इटलीत प्राणी

ॐ          अमेरिका
              23. 4 ( एप्रिल ) 2015.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंती विशेष इटली त पक्षी आहे
सध्या माझे भाऊ R . Y . देशपांडे इटली त आहेत.
त्यांना हा पक्षी प्रत्यक्ष पाहण्यास मिळेल
मी सकाळ वाचून पक्षी चा फोटो घेतला आहे .
वसुधालय

 

इटलीत नव्यानेच सुरु करण्यात आलेल्या प्राण्यांच्या बागेतील गिधाडाची मुद्रा. कोणत्याही बंधनाशिवाय मुक्तपणे विहार करणारे प्राणी हे या बागेचे वैशिष्ट्य आहे.

 

तब्येत

                                   ॐ       अमेरिका
                                                 23. 4 ( एप्रिल ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
तब्येत
रात्रीची शुगर ची गोळी बंद केली त्यामुळे अंग गरम मुंग्या येणे थांबले आहे.
आज पोट दुखणे थांबले आहे तरी टेस्ट साठी बोलाविले आहे सकाळी आठ वाजता जेवण
करायचे तीन वाजे पर्यंत पाणी पण प्यायचे नाही. शुगर च्या गोळी मुळे थकल्या सारखे वाटते .
बघू कसे राहता येईल ते
पण सर्व टेस्ट केल्या कि मोकळ वाटेल. मन पण मोकळ होईल
आरे असा होत काय करावे धास्ती राहणार नाही
कोल्हापूर येथे एवढ जमल नसत पोटाच्या डॉक्टर कडे गेलेली त्यांनी नुसत्या गोळ्या दिल्या
शुगर ची गोळी कमी करा मी म्हटलं होत केली नाही घेत बसले असते
येथे मला बरे वाटत आहे फळ पण चांगली खाल्ली जातात स्ट्रो बेरी चा शेख पपई
संत्र खरबूज खाल्ले जाते कोल्हापूर येथे केली संत्री चिकू खात असे .
केळी ने पण साखर वाढते पोट दुखते पपई मोठी मिळत असे गोड पण नसे
खूप ताकद आली आहे. काल मुग भिजवून मिक्सर मधून काढले त्याचे डोसे केले .
मी तीन खाल्ले पोट दुखले नाही बटाटा भाजी खाल्ली बरे वाटले .
बाकि ठिक छान
वसुधालय
ह्या वयाला तब्येत सुधारणे कठीण पण मला बरे वाटत आहे.

IMG_5354

नारळ खोबर याचे सारण

                                                ॐ              अमेरिका
                                                               22. 4 ( एप्रिल ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश

नारळ खोबर याचे सारण
नारळ कोबर साल सगट पातळ पातळ फोडी केल्या .
मिक्सर मध्ये दुध घालून बारीक केले मस्त बारीक
खवण्या पेक्षा एकजीव झाले.
ग्यास पेटवून पातेले ठेवले त्यात नारळ दुध केलेले घातले.
साखर घातली वाटीभर साखर घातली.
अटू दिले
छान घट्ट झाले . तूप घातले . बदाम घातले सारण च खाण्यास ठेवले
पुष्कर म्हणाले नारळी भात करा
त्यातील सारण घेतले भात घेतला दुध घातले. साखर अर्धी वाटी घातली.
मस्त नारळी भात केला. बदाम घातले. सौ सुनबाई ने पण भात नारळ सारण खाल्ले .
येथे पण भारतीय पध्दतीचे जेवण आवडते .
बाकि ठिक छान
वसुधालय

कार्ले ची भाजी

                                   ॐ            अमेरिका
                                                   21. 4 ( एप्रिल ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
कार्ले ची भाजी
येथे पण हिरवी गार कार्ले मिळतात.
धुवून गोल गोल चिरले. मीठ लावले अर्धा तास तसेच ठेवले.
पाणी काढले नाही तेल मोहरी ची फोडणी केली.
त्यात कार्ले घालून शिजविले. हळद लाल तिखट घातले.
पाणी घालून वाफ आणली मस्त कार्ले ची भाजी तयार केली.
बाकि ठिक छान
वसुधालय

अक्षय्य तृतीया

                                                  ॐ   अमेरिका
                                                             21 . 4 ( एप्रिल ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष                                                               मंगळवार
अक्षय्य तृतीया
वैशाख शुक्लपक्ष मंगळवार ३ तिसरी तिज
अक्षय्य तृतीया
आज अमेरिका तेथे हरबरा डाळ भिजत घालून मिक्सर मधून बारीककेलि.
येथे हिरवा गार पांढऱ्या घट्ट कैऱ्या मिळाल्या . कैरी कुसून हिरवी मरिच घालून
तेल मोहरीची फोडणी दिली मीठ हळद घातली
अचानक अक्षय्य तृतीया ला कैरी डाळ केली मला छान वाटत आहे
सर्वांनी आवडीने खाल्ली
वसुधालय

IMG_1941[1]img_19661_thumb_thumb

पातळ पोहे याचा चिवडा!

                               ॐ              अमेरिका
                                             20. 4 ( एप्रिल ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
पातळ पोहे याचा चिवडा !
येथे पण स्टील ची चाळणी आहे त्याने पातळ पोहे चालून घेतले.
येथे मला ग्यास पेटविता येतो. ग्यास पेटवून निर्लेप चे पातेले ठेवले.
पोहे गरम केले. कुरकुरीत झाले. दुसऱ्या पातेल्यात काढले. नेर्लेप
पातेल्यात तेल मोहरीची फोडणी केली हिरवी मिरची घातली.
शेंगदाणे लालसर केले डाळ घातले त्याच थोड लाल तिखट घातले हळद मीठ
घालून हलविले. परत पोहे घातले सर्व हलविले
मस्त पातळ पोहे चा चिवडा केला
घरी सर्वांना आवडला
बाकी ठीक
आता माझे पोट दुखणे थांबले आहे.
वसुधालय 

वाघ

                                   ॐ अमेरिका
                                           19. 4 ( एप्रिल ) 2015
ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंती विशेष
अमेरिका येथे पण मी संगणक काम्पुटर मध्ये सकाळ वाचते भरपूर
चांगला वेळ जातो माहिती मिळते कोकण मध्ये पाऊस पडला
अमेरिका येथे आमच्या शहर मध्ये पण पाऊस पडला .

 

नागपूर – महाराज बाग प्राणीसंग्रहालयातील वाघ आज (रविवार) ऊन्हापासून वाचण्यासाठी तलावात जाऊन बसला होता.

भारतीय मॉल

                               ॐ       अमेरिका
                                       19. 4 ( एप्रिल ) 2015.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विशेष

काल भारतीय मॉल मध्ये गेलो होतो . आपल्याला हव ते घ्यावयाचे
कंट्रोल वर बिल द्यावयाचे असे मॉल कोल्हापूर येथे पण आहेत

नंतर भारतीय हॉटेल मध्ये गेलो. पाव भाजी दही वडा घेतला.
कंट्रोल वर पैसे भरायचे ते नंबर देतात आणून देतात. सर्व भारतीय लोक
असल्यामुळे आपापले बसतात हात वगेरे करत नाहीत.
पोट दुखते नादात मी बेतानेच खाते. अजून पोट साफ होत नाही.
फिरते तरीपण अस्वस्थ वाटतं
येथे घरी पण डबा देतात कागदी डबे असतात आपण ऑर्डर केलेली
घरी आणता येते .
पोट दुखत असलेतरी खात राहते नाहीतर ताकद राहणार नाही
सुगर ची गोळी अजून जड आहे पचत नाही
शुगर कमी आहे पण अस्वथ आहे .

देशात आपल स्थान

                                 ॐ            अमेरिका
                                                  18. 4 ( एप्रिल ) 2015
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
येथे सौ सुनबाई पुष्कर माझी चांगली काळजी घेतात.
पोट साफ होत नाही म्हटलं कि करवंद याचा ज्यूस दिला बरं वाटलं
कोल्हापूर येथे पण प्रणव ने पोटा साठी बाटली आणली पाणी घालून पीत असे.
येथे मायक्रोव्ह चालविता येत नाही पुष्कर सौ सुनबाई गरम करून देतात.
थोड थोड सर्व खा सांगतात पोट भरायला पाहिजे ताकद यावयाला पाहिजे
पोटाच्या डॉक्टर कडे नेऊन आणले झोप लागली का विचारतात पोट कसे आहे विचारतात
भरपूर काळजी घेतात
वाटत अमेरका येथे राहणारी पण खूप जीव लावतात .
मुलाचे सौ सुनबाई चे वर्तमान पत्र मध्ये वाचले कि आई तू जेवण करून घे आई म्हणते
मला ग्यास पेटविता येत नाही देऊळ येथे जाउन जेव .
असे किती दिवस चालणार !
समाजात चांगली मुल सौ सुना आहेत .
प्रणव पण कोल्हापूर येथे माझी काळजी घेतली.
शुगर ची गोळी पचत नाही मधून मधून पोट दुखते अस्वस्थ होते
तरी पुष्कर सौ सुनबाई काळजी घेऊन गोळी देतात .
अमेरिका येथे फिरतांना कशा आहात विचार पूस येथील लोक करतात
वयस्कर आई आहे लक्षात येते त्यांच्या . हात करतात .
आणि काय मिळवावयाच आहे कोणताही देशात आपल स्थान आपण आपल टिकवाव याचे असते
पु. ल देशपांडे यांची पुस्तक वाचते अमेरिका येथे सुद्धा घरात पु ल .चि पुस्तक आहेत
अमेरिका बद्दल बर्कले क्यालिफोर्निया बद्दल चांगली भरपूर माहिती लिहिली आहे
आशिया खंड बद्दल पण छान माहिती आहे नाच अगत्य बद्दल छान माहिती आहे त्या काळात
एवढ पाहन सोप नाहि. सौ सुनीता देशपांडे पण होत्या
बोलावण खर्च कसे जमले असणार !
बाकी ठिक
वसुधालय

IMG_5354

हरबरा डाळीचे वरण आमटी

                            ॐ             अमेरिका
                                         18. 4 ( एप्रिल ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
हरबरा डाळीचे वरण आमटी
आपण हरबरा डाळ म्हटलं कि गोड पुरण घालतो
पण येथे हरबरा डाळ भिजत ठेवली कुकर मधून चार पाच शिट्ट्या दिल्या .
तेल जिरे याची फोडणी दिली . थोड्या भाज्या घातल्या कांदा ट म्या टो
परतून घातले मस्त आमटी हरबरा डाळीची केली . फुलके बरोबर खाल्ली .
वसुधालय

 

 

IMG_5354

ब्लॉग पोष्ट२, ५३६ ./ 2, 536वा !

                                      ॐ                अमेरिका
                                                        18. 4 ( एप्रिल ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंती विशेष
वसुधालय ब्लॉग पोष्ट २, ५३६ ./ 2, 536वा होत आहे .
दोन हजार पाचशे छत्तिस वा होत आहे.

भेटी 247, 681 / २४७,६८१
दोन लाख सत्तेचाळीस हजार , सहाशे एक्क्यांशी

मी अमेरिका येथे पण ब्लॉग करण्याचा प्रयत्न करीत आहे
फोटो नसले तरी माहिती लिहित आहे
एक प्रकारे आवड निर्माण झाली आहे काही तरी लिहिल्याची
साध रोजच जेवण तब्येत लिहिली जाते .
आपण आवडीने वाचन करून प्रतिक्रिया देता मला खूप चांगल वाटतं !
आपली सर्वांची आभारी आहे ब्लॉग वाचन करता साठी !नमस्कार !
बाकी ठिक छान
वसुधालय

thumb6

मनापासून काम करावे

                        ॐ                   अमेरिका
                                    17. 4 ( एप्रिल ) 2015
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश

हुषार मुले

भरपूर अभ्यास केला प्रयत्न केले कि खर अभ्यास च चिज होत.
मनापासून वाचन बुद्धी चा उपयोग केला कि कोणी काही करूशकत नाही.
घरात देश जग याचा फायदा होतो.
आपल्याला त्रास देतील अशा प्रकारे भीती बाळगू नाही
मना पासून प्रयत्न केले कि यश आपोआप मिळते
कोणी तरी त्याची दखल घेतात
मी वेळ जाण्या साठी संगणक काम्पुटर शिकले
ब्लॉग वाचक ब्लॉग वाचून वर्तमान पत्र मध्ये ब्लॉग वाल्या आजीबाई
लिहून काढले मला कल्पना पण नव्हती कोणी ब्लॉग बद्दल लिहितील
आता त्याचे पुस्तक झाले आहे थोडे दिवसात हातात मिळेल
मी फार अभ्यासू नाही पण रोजचे जेवण सणा वार माहिती
रांगोळी स्वत : काढलेली आहेत कामाचे यश मिळाले मिळते
मनापासून कोणतेही काम केले कि त्याचा उपयोग लोकांना पण होतो
व त्यांच्या बद्दल काहीतरी लिहावे वाटते
मुख्य आपण जे काम करतो ते मनापासून समजून करावे
बाकि ठिक
वसुधालय

 

 

 

img_29283

श्रावण घेवडा भाजी

                                      ॐ                    अमेरिका
                                                                 17. 4 ( एप्रिल ) 2014.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
श्रावण घेवडा ची भाजी
अमेरिका येथे पण छान श्रावण घेवडा मिळतो.
प्रथम धुवून घेतला कोवळा होता शिरा निघाल्या नाहीत .
सुरीने बारीक बारीक चिरला. हिरवी मिरची बारीक चिरली.
येथील लायटर बंदुकी सारखं आहे त्याने ग्यास पेटविला.
स्टील चे पातेले ठेवले तेल इकडे कमी खातात थोड तेल जिरे ची
फोडणी केली. पाणी घातले झाकण ठेवून शिजवू दिले. हिरवी मिरची
शिजवित असतांना घातली थोड लाल तिखट घातले . मीठ घातले
मस्त भाजी शिजली साली सगट शेंगदाणा कूट घातला. वाफ आणली
मस्त फुलके बरोबर सर्वांनी खाल्ली
मी क्यामेरा आणला आहे पण फोटो घेतले नाहीत
छान श्रावण घेवडा ची भाजी तयार केली
बाकि ठिक छान
वसुधालय

पोटाला आराम करायचा

                           ॐ                   अमेरिका
                                           16. 4 ( एप्रिल ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंती विशेष
येथे पोटाचे डॉक्टर याच्या कडे जाऊन आले. भारतीय असल्यामुळे
पासपोर्ट दाखवावा लागलां.
छान हॉस्पिटल आहे प्रथम वजन तपासले BI. PI तपासली ,
भारत मध्ये पण वजन BI . PI तपासतात नंतर डॉक्टर च्या रूम मध्ये गेले .
माझ्या जवळ च्या डोळ्या दाखविल्या . ह्यांनी वेळ लागेल साठी .
स्वत : डॉक्टर यांनी त्याच्या जवळ च्या गोळ्या दिल्या. रात्री एक
जेवणाआधी अर्धा तास घेतली आज मला खूप चांगल वाटत आहे .
सकाळी चहा घेतला . फळ खाल्ली इकडे रवा सारखं सत्व मिळत ते
पाण्यात घालून मीठ तिखट घातले कि त्याने ताकद येते ते थोड खाल्ल
आतां दोन तास पोटाला आराम करायचा .
बाकी ठिक
वसुधालय

10885475_385763498267093_6165323314836719226_n

ताकाची कढी

                                      ॐ                      अमेरिका
                                                                  15. 4 ( एप्रिल ) 2015
ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विशेष
ताकाची कढी
ताक पातळ करावे हिरवी मिरची आल मेथीचे दाणे याची फोडणी करावी.
पोळी बरोबर खावी पोट छान राहते चवीला बदल होतो बेसन लावुनये .
मेथीच्या दाणे आल ह्यामुळे पोट दुखणे थांबते.
वसुधालय

 

 

img_29283

भात

                     ॐ                  अमेरिका
                                     14.4 ( एप्रिल )
                                    
ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विशेष
भात भात खाला कि शुगर वाढती. भात खाऊ नाही
पोळी मुग आमटी तूर डाळ आमटी पाले भाजी खावी
शुगर वाढली असल्यास एक गोळी पूर्ण घ्यावी
गोळी ने पोट दुखते काही करता नाही
stroberi चा ज्युस प्यावा कलिंगड ज्युस प्यावा.
वसुधालय

आहार

                                         ॐ      अमेरिका
                                                    13. 4 (एप्रिल ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
आहार
पूर्वी मी स्नान करून देव पूजा केल्या नंतर खात असे.
शुगर गोळी लागल्या पासून सकाळी सहा वाजता सकाळी गव्हाचा उपमा आमटी
तूप खाते बिन साखर चा चहा घेते. अंगणात फिरते साखर तयार होते.
थकल्या सारखे वाटत नाही.
अकरा वाजता पोळी बाजी खाते. पपई स्ट्रोबेरी फळ खाते
फळ मध्ये साखर असते नुसती साखर पदार्थ व चहा घालत नाही.
शुगर कमी झाली आहे अर्धी गोळी घेते.
चार वाजता ब्रेड खाते. रात्री पोळी आमटी खाते .
शुगर ची गोळी आठ वाजत घेते साडे आठ ला जेवते.
थोड घरातच फिरते T . V . पाहते प्रणव नां फोन करते .
बर वाटून जात .
तशी तब्येत चांगली आहे
रात्री थोडी कसकस वाटते ती शुगर च्या गोळी ने होते म्हणतात
पोट याचा व्यायाम केल्या मुळे कमी दुखते.
वय ७३ असल्यामुळे सर्व पचनास त्रास होत आहे
येथे भरपूर खाणे फिरणे झोप होते
सर्वजन भरपूर काळजी घेतात
वसुधालय

पोटातील वात

                                           ॐ                   अमेरिका
                                                               12. 4 ( एप्रिल ) 2015
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
पोटातील वात
पोट दुखत असेल तर पोटात वात असतो.
पालथे पाठीवर झोपून दोनही पाय लांब करणे .
जवळ उंच घेणे हळू हळू खाली सोडणे.
पाच सहा वेळा केले तरी पोट मोकळे वाटते
डॉक्टर च्या सल्याने गोळ्या घेणे एकदम बरे वाटते.
पोट दुखणे थांबते .
वसुधालय

करवंद ज्यूस!

                                      ॐ                     अमेरिका
                                                             11.4 ( एप्रिल ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष

करवंद ज्यूस !

ग्लास मध्ये चार चमचे करवंद पाव ग्लास करवंद ज्यूस घ्यावा.

त्यात साधे पाणी ग्लास भर घालावे पटकन प्यावे.
एक तास मध्ये पोट साफ होत व तरतरी वाटते मी काल च
करवंद ज्यूस घेतला आहे पोट साफ झाल्या मुळे मला बर वाटत आहे.

बाकी ठिक
छान
                  वसुधालय

शुगरची गोळी

                         ॐ                   अमेरिका
                                              10.4 ( एप्रिल ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
शुगर ची गोळी घेतांना आधी एक तास काही तरी पोट भर खावयाला पाहिजे .
साखर तयार होते गोळी पचण्यास सोप जात अशक्त पणा गळाल्या सारख वाटत नाही .
दिवस भर आपण काम करू शकतो
झोपतांना पण पोट भर खावे ताकद राहते गोळी पचते .
मध्य रात्री मुंग्या आले सारख वाटत असेल तर फिरून काही तरी खावे .
पाणी भरपूर प्यावे वय च्या मानाने पोट साफं होत नसल्यास पोट याची गोळी घ्यावी .
भरपूर फिरावे म्हणजे पोट साफं होत साखर खाऊ नाही अन्न फळ ह्यातील साखर पुरते
ताकद राहते
बाकी ठीक छान
वसुधालय 

ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक

ॐ               अमेरिका
9.4 (एप्रिल ) 2015
ब्लॉग वाचक नमस्कार
विनंति विशेष
दिव्य मराठी वर्तमान पत्र मध्ये ६एप्रिल २०१५ तारीख माझा
फोन वर interview घेऊन जळगाव तेथील वर्तमान पत्र मध्यर झापून आले आहे
ते वर्तमान पत्र व लिक आपणास वाचण्यास देत आहे आपण जरूर वाचावी विनंति
वसुधालय


दिव्य मराठीच्या ह्या लिंक वर खाली बातमी आहे


loading...

नमस्कार

                                 ॐ             अमेरिका
                                                  9.4 (एप्रिल ) 2015
                                                        गुरुवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
मी आता अमेरिका येथे पुष्कर सौ सुनबाई कडे आली आहे
मध्यंतरी ब्लॉग लिखाण केले नाही
माझी शुगर खप वाढली होती अशक्त पणा आला आहे
अजून हि मला ब्लॉग करणे जमत नाही हळू हळू
काही तरी लिखाण करणे सुरु करीन
ब्लॉग ची वाट पाहू नाही
बाकि ठिक छान
                                  वसुधालय

10931303_390929557750487_317078576698530922_n

ब्लॉगवाल्याआजीबाई

                                    ॐ
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
ब्लॉग वाल्या आजी बाई वसुधा चिवटे पुस्तक होत आहे त्यावाद्दल तरुन भारत मध्ये
किशोर कुलकर्णी या नि माहिती लिहिली आहे ती आपण वाचावी विनंती
बाकि ठिक छान
वसुधालय

15 - 1

10885475_385763498267093_6165323314836719226_n

%d bloggers like this: