आहार
ॐ अमेरिका
13. 4 (एप्रिल ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
आहार
पूर्वी मी स्नान करून देव पूजा केल्या नंतर खात असे.
शुगर गोळी लागल्या पासून सकाळी सहा वाजता सकाळी गव्हाचा उपमा आमटी
तूप खाते बिन साखर चा चहा घेते. अंगणात फिरते साखर तयार होते.
थकल्या सारखे वाटत नाही.
अकरा वाजता पोळी बाजी खाते. पपई स्ट्रोबेरी फळ खाते
फळ मध्ये साखर असते नुसती साखर पदार्थ व चहा घालत नाही.
शुगर कमी झाली आहे अर्धी गोळी घेते.
चार वाजता ब्रेड खाते. रात्री पोळी आमटी खाते .
शुगर ची गोळी आठ वाजत घेते साडे आठ ला जेवते.
थोड घरातच फिरते T . V . पाहते प्रणव नां फोन करते .
बर वाटून जात .
तशी तब्येत चांगली आहे
रात्री थोडी कसकस वाटते ती शुगर च्या गोळी ने होते म्हणतात
पोट याचा व्यायाम केल्या मुळे कमी दुखते.
वय ७३ असल्यामुळे सर्व पचनास त्रास होत आहे
येथे भरपूर खाणे फिरणे झोप होते
सर्वजन भरपूर काळजी घेतात
वसुधालय