देशात आपल स्थान
ॐ अमेरिका
18. 4 ( एप्रिल ) 2015
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
येथे सौ सुनबाई पुष्कर माझी चांगली काळजी घेतात.
पोट साफ होत नाही म्हटलं कि करवंद याचा ज्यूस दिला बरं वाटलं
कोल्हापूर येथे पण प्रणव ने पोटा साठी बाटली आणली पाणी घालून पीत असे.
येथे मायक्रोव्ह चालविता येत नाही पुष्कर सौ सुनबाई गरम करून देतात.
थोड थोड सर्व खा सांगतात पोट भरायला पाहिजे ताकद यावयाला पाहिजे
पोटाच्या डॉक्टर कडे नेऊन आणले झोप लागली का विचारतात पोट कसे आहे विचारतात
भरपूर काळजी घेतात
वाटत अमेरका येथे राहणारी पण खूप जीव लावतात .
मुलाचे सौ सुनबाई चे वर्तमान पत्र मध्ये वाचले कि आई तू जेवण करून घे आई म्हणते
मला ग्यास पेटविता येत नाही देऊळ येथे जाउन जेव .
असे किती दिवस चालणार !
समाजात चांगली मुल सौ सुना आहेत .
प्रणव पण कोल्हापूर येथे माझी काळजी घेतली.
शुगर ची गोळी पचत नाही मधून मधून पोट दुखते अस्वस्थ होते
तरी पुष्कर सौ सुनबाई काळजी घेऊन गोळी देतात .
अमेरिका येथे फिरतांना कशा आहात विचार पूस येथील लोक करतात
वयस्कर आई आहे लक्षात येते त्यांच्या . हात करतात .
आणि काय मिळवावयाच आहे कोणताही देशात आपल स्थान आपण आपल टिकवाव याचे असते
पु. ल देशपांडे यांची पुस्तक वाचते अमेरिका येथे सुद्धा घरात पु ल .चि पुस्तक आहेत
अमेरिका बद्दल बर्कले क्यालिफोर्निया बद्दल चांगली भरपूर माहिती लिहिली आहे
आशिया खंड बद्दल पण छान माहिती आहे नाच अगत्य बद्दल छान माहिती आहे त्या काळात
एवढ पाहन सोप नाहि. सौ सुनीता देशपांडे पण होत्या
बोलावण खर्च कसे जमले असणार !
बाकी ठिक
वसुधालय