आपले स्वागत आहे!

Archive for मे, 2015

प्रदोष इच्छा पूर्ण करतो !

                                   ॐ                     अमेरिका
                                                            31. 5 ( मे ) 2015.
                                                                रविवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर.
विक्रम संवत् २०७१ – ७२. इसवी सन २०१५ -१६.
उत्तरायण ग्रीष्मऋतु. १३ रविवार.
नक्षत्र स्वाती. योग वरीया. करण कौलव. चंद्र राशिप्रवेश तुला.
प्रदोष मराठी महिना मध्ये दोनदा येतात. शुक्लपक्ष व कृष्णपक्ष
एकादशी नंतर त्रयोदशीला प्रदोष येतो. सूर्य व महादेव याची भक्त प्रदोष
करतात सकाळी सूर्योदय पासून उपवास सुरु होतो सूर्य मावळण्या सुर्यास्ता च्या
आधी हा उपवास सोडतात.

ॐ  सौ देवकी ने एक जन्म आधी प्रदोष व्रत केलेले आहे
देवकी कृष्ण मुलगा झाला आहे.
प्रदोष च्या दिवस ला रुद्र अभिषेक करावा.

 

प्रदोष केला तर मुलगा होतो शनिवार चा शनिप्रदोष जास्त महत्व तो उपवास केला
तर घरात मुलगा होतो मुलगा होण्यासाठी प्रदोष करावा सूर्य याचा प्रदोष असल्यामुळे
सूर्य नक्की प्रदोष मानून इच्छा पूर्ण करतो.
मला का हि उपवास न करता मुलगा झाला आहे आमच लग्न झाल्या नंतर
मला आम्हाला नऊ महिना त मुलगा झाला आहे.

माझे भाऊ डॉ शरद देशपांडे शनिप्रदोष करतात त्यांच्या घरात नातू झाला आहे.
अशा वेळेला सर्व पटत कथा सूर्य याची भक्ती केली कि फळ मिळते मनाला पटत
असो सूर्य व महादेव यांना माझा नमस्कार.
बाकि ठिक
वसुधालय.

 

मारुतीला माझा नमस्कार !

                                 ॐ      अमेरिका
                                              30. 5 ( मे ) 2015.
                                                 शनिवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार.
विनंति विषेश.
शनिवार असल्यामुळे आम्ही देऊळ येथे गेलो होतो.
दोन वर्षा पूर्वी पांढरे कळस असलेले कन्नड देऊळ मध्ये
दर शनिवार ला एक नारळ प्रसाद नैवेद्द दिला आहे सात शनिवार
अमेरिका येथे दर शनिवार ला नारळ दिले आहे. बाकीचे चार
शनिवार कोल्हापूर येथे शनिवार ला नारळ नैवेद्द दिला आहे
असे अकरा शनिवार केले आहेत. अडीच महिने लागतात.
लागोपाठ जमले आहे आजारी न पडता काही अडचण न येता घडले आहेत.

आज येथील कन्नड मदिर मध्ये शनिवार ला चा मारुती चे दर्शन केले आहे
योग कसा येतो बघा कोणतेही काम मन लावून केले तर मानस च काय
देव पण परत दिसतो .
मला आज खूप बर ,हलक तृप्तता वाटत आहे आपण कोल्हापूर येथून येऊन
परत त्याच देऊळ मध्ये शनिवार ला च मारुती चे दर्शन घेतले आहे साठी
मारुतीला माझा नमस्कार सर्व जन सुखाने राहो सदिच्छा !

जेष्ठ शुक्लपक्ष निर्जला एकादशी

ॐ                    अमेरिका
29. 5 ( मे ) 2015.
शुक्रवार.शुक्रवार

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर.
विक्रम संवत् २०७१ – ७२. इसवी सन २०१५ – १६.
उत्तरायण ग्रीष्मऋतु ११ निर्जला एकादशी.
नक्षत्र हस्त, योग सिद्धि, करण वणिज, चंद्रराशिप्रवेश नं. तुला.
जेष्ठ शुक्लपक्ष निर्जला एकादशी.

दरवर्षी जेष्ठ शुक्लपक्ष ला येणाऱ्या निर्जला एकादशी ला
पाणी फळ व इतर उपासाचे धान्य खात नाहीत त्याला निर्जला एकादशी
करतात.
त्याची गोष्ट आहे एक राजा होता त्याचे   अंबरेश राजाचे राजाचे नाव आहे.
पाणी न पिता एकादशी करत असे. दशहरा दशमी प्रात्री पासून हा उपवास
करतात. एकादशी झाली व्दादशी ला दुर्वास ऋषी यांना राजाने बोलाविले.
ते थोडे उशिरा आले. राजा याने जेवण याचे नैवेद्द देवा पुढे ठेवला.
तिर्थ पाणी प्याला. थोड्या वेळाने दुर्वास ऋषी आले. ते म्हणाले तू
माझ्या साठी थांबला नाही पाणी प्यायला आहे. तिर्थ घेतलेले दुर्वास ऋषी नाम कळले.
रागीट दुर्वास ऋषी असल्यामुळे त्यांनी शाप दिला तू दहा जन्म घ्यावे लागतील तेव्हा तुला
फळ मिळेल.शाप विष्णूने घेतला.  दहा जन्म विष्णूने घेतले. व राजाला मुक्त केले.
दहा जन्माच फळ जेष्ठ शुक्लपक्ष निर्जला एकादशीला मिळते.
त्यासाठी निर्जला एकादशी पाणी न पिता काही न खाता करावी.

मुख्य उपदेश वर्षा तून पोट याला न खाऊन आराम द्यावा. शरीर तील सर्व अवयव
स्वच्छ होतात रोज भारावूर खाणे असते त्यासाठी न खाऊन राहणे जास्त उपयोग होत आहे
ह्या एकादशीला दान करतात. साखर. सोन , जलकुंभ काही एक दान करावे. मन शांत राहते.
दहा जन्म याचे फळ जेष्ठ शुक्लपक्ष निर्जला एकादशी मध्ये आहे. विष्णू श्रीकृष्ण याचा अवतार आहे.
विठ्ठल  पण एकादशी चे भक्त मानतात. विठ्ठल यांना तुळस आवडते विष्णू ला पण तुळस आवडते.
बाकि ठिक छान
वसुधालय

dscf3813

तिखट बुंदी

                              ॐ                  अमेरिका
                                                 28. 5 ( मे ) 2015.
                                                      गुरुवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
तिखट बुंदी .
दुकानात तिखट बुंदी पाकीट मिळते.
भारत मध्ये आपण १० रुपये किंवा २९ रुपये पर्यंत सुटी
तिखट बुंदी ल्याष्टीक पिशवीतून बांधून देतात.
ती तिखट बुंदी नुसती खाण्यास पण चांगली लागते.
दही मध्ये घालून फुलके बरोबर पण चांगली लागते.
तिखट आंबट चव चांगली येते. कोशिंबीर सारखी खावी.
छान थंड वाटत खाण्यास.
बाकि ठिक
छान
वसुधालय

कागदस्केचपेनने काढलेला गणपती

                                        ॐ               अमेरिका
                                                           27. 5 ( मे ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
कागद व स्केच पेन ने काढलेला गणपती !
अमेरिका येथे मी कागद व बॉलपेन , स्केचपेन ने रांगोळ्या काढत आहे.
खूप छान उच्छाह ने रांगोळ्या व ईतर काम करत आहे. देश खंड गाव
बदलले तरी आपल्या मध्ये उच्छाह हवा. कि माणूस असेल तिथे काही हि
काम करतो. मध्यतंरी माझे भाऊ आर . वाय देशपांडे इटली त जाऊन भारत
मध्ये आले आहेत त्यांचा पण त्यांचा वेळ इटलीत उच्छाह ने काम करून वेळ
चांगला गेला आहे
मी येथे कागद व स्केच पेन लाल याने गणपती काढला आहे.
कोल्हापूर येथे लाल रांगोळी पसरून पांढऱ्या रांगोळी ने गणपती काढला आहे.
तसेच पोपटी रांगोळी पसरून पांढऱ्या रांगोळी ने गणपती काढला
मस्त वेळ व मन भरून येते. आपण काम करतो याचा उच्छाह मनात राहतो.
बाकि ठीक छान
वसुधालय. 

 

 

उच्छाहने काम चांगले होते!

                                  ॐ                       अमेरिका
                                                          26. 5 ( मे ) 2015.
                                                               मंगळवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

उच्छाह !
लहान पणी अभ्यास करतांना लक्षात राहण्यासाठी उच्छाह यांनी अभ्यास केला
तर लगेच लक्षात राहतो. राहू दे बाबा झाला अभ्यास असे केले तर मन निट
नसल्यामुळे लक्षात राहत नाही.
ऑफिस काम आपण मन लावून उच्छाह याने केले तर जास्त मनाला चांगल वाटत असतं
साहेब सांगतात साठी केले तर पुढील काम राहून जाते उद्या काय काम करावे असा प्रश्र्न
मनात राहत नाही.
भाजी , आमटी ची फोडणी देतांना  ती जाळू नाही साठी उच्छाह ने फोडणी केली
तर जळत नाही. कुकर लावतांना कुकर कडे लक्ष असून उच्छाह लक्ष दिले तर
उसळ, डाळ जळत नाही. भाकरी करतांना मन लावून उच्छाह ने थापून केली
तर पातळ चांगली होते भाजतांना पण भाकरी फुगते. उच्छाह आणून काम
केले तर चांगले होते.
पैसे तर लागतात च. पण रस्ता दुरीस्ती चे काम करतांना रस्ता रोड चांगला झाला
कोल निट चालायला हवे खड्यात पाय जाऊन पडू नये याची काळजी रस्ता करण्यारे यांनी
उच्छाह आणून काम केले पाहिजे.
नुसती भाषण देण्या पेक्षा आपला देश सुखी संबृध्द आहे सुखी आहे असे बघावे.
सर्व वस्तू जनतेला सर्व जनतेला मिळाल्या पाहिजे असे काम उच्छाह आणून
करायला हवे.
मी वसुधालय ब्लॉग मराठी भाषा मधून लिहित आहे उच्छाह आणून लिहित आहे
विणकाम आहे. पदार्थ आहेत. रांगोळ्या आहेत. दगड व धान्य वापरून अक्षर आहेत
सर वाचक उच्छाह ने वाचतात. प्रतिक्रिया देतात किशोर कुलकर्णी यांनी तर
सर्व ब्लॉग वाचून उच्छाह यांनी ब्लॉगवाल्या आजीबाई !वसुधा श्रीकांत चिवटे
मस्त पुस्तक तयार केले आहे
सर्व काम उच्छाह ने केले तर चांगले होते
बाकि ठिक छान
वसुधालय
मनाला व लोकांना आवडते.

जमीन! माती आई आहे!

                          ॐ             अमेरिका
                                         25. 5 ( मे ) 2015.
                                            सोमवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

माती ! जमीन !
आई व वडील यांच्या पासून मुलगा व मुली जन्माला येतात.
आई नऊ महिने पोटात बाळ सांभाळते. एकदा नाल कापली कि
बाळ आई पासून लांब होते. काही दिवस आई चे दुध बाळ पिते.

नंतर बाळ मोठे झाले कि भाताची पेस्ट वरण सूप पिते.
आणि मिथे झाले कि जेवण , फळ खाण्यास सुरुवात करते

सर्व धन्य व फळ खाऊन बाळ माणूस ३०. वर्ष ५०वर्ष ८०वर्ष जगतो.
मातीतून उगविलेले धान्य व फळ खाऊन माणूस मोठ्ठा होतो शरीर
डोक अभ्यास सर्व भरपूर मोठ्ठे होत जात असते. माती जमीन
आपल्याला धन्य व फळ देते साठी माती जमीन आई आहे. जमीन
मातीला नमस्कार आई प्रमाणे करावा. मना पासून नमस्कार मातीला केला
तर मन तृप्त होत असते. माती जमीन आई . आपण आपल्या आई ला जसे मानतो
मोठे करते त्याप्रमाणे जमीन मधून उगविलेले धान्य फळ आपण खाऊन मोठे होत
असतो. जमीन आई आहे.

कोल्हापूर येथे जमीन माती काळी आहे मातीला काळी आई असे बोलतात नमस्कार करतात.
बाकि ठिक छान

फूल !

ॐ                                               अमेरिका
                                            24. 5 (मे ) 2015.
                                                 रविवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
फूल !
काल मी सौ सुनबाई कार ने दुकानात गेलो होतो. 
सौ सुनबाई मस्त  मोटार चालविते.
ड्राव्हिंग मस्त करते.
येथे गाडी चौकातून जाण्यासाठी  क्रॉस करण्यासाठी,  केसरी ,लाल , हिरवे दिवे असतात.

 

क्यामेरा पण आहे. कार असेल तर  कोणी केसरी दिवा असतांना  चौकात गाडी पट्टयात असेल तर जाऊ देतात.
पणचौकात  पट्टा च्या आत असेल आणि रस्ता रोड क्रॉस केला तर क्यामेरा मध्ये फोटोयेतो.
घरी दंड साठी पत्र येते.
भारत मध्ये लाल , हिरवे दिवे आहेत केशरी दिवा नाही पूर्ण
लाल चा हिरवा दिवा होई पर्यंत रिक्षा व इतर वाहन थांबतात. रिक्षा चे बिल वाढत असते .
आम्ही पब्लिक मॉल मध्ये गेलो . तेथे बरेच सामान घेतले . फुल घेतली.
फुल फुल मध्ये एक पाकीट पावडर चे असते ते पाणी मध्ये घालून फ्लावर पाट
मध्ये फुल ठेवायची. आम्ही फुल देवपूजा गुरु पूजा साठी पण घेतो. फुलां चा वास घर भर
असतो. ताजी फुल असल्यामुळे छान वाटतं !
बाकि ठिक छान

वसुधालय

 

मन्मथनाम संवत्सर जेष्ठ शुक्लपक्ष

                                       ॐ                     अमेरिका
                                                            23. 5 ( मे ) 2015.
                                                                शनिवार

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर.
विक्रम संवत् २०७१ – ७२. / इसवी सन २०१५ – १६.
उत्तरायण ग्रीष्मऋतु जेष्ठ शुक्लपक्ष.
५ शनिवार, नक्षत्र पुष्य, योग वृद्धि, करण कौलव,
चंद्रराशिप्रवेश कर्क घबाड.
साधा दिवस आहे.
बाकि ठिक छान
वसुधालय

 

कडवेवाल याची उसळ !

                            ॐ             अमेरिका
                                         22. 5 (मे ) 2015.
                                               शुक्रवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
कडवे वाल याची उसळ !
प्रथम कडवे वाल रात्री भिजत घातले. सकाळी कुकर मधून साल
सगट पाणी घालून चार शिट्ट्या दिल्या. मऊ वाल शिजले.
त्यात ट म्या टो कांदा लसून आल याची मिक्सर मधून काढून पेस्ट केली.
फोडणी केली थोडी पेस्ट शिजवू दिली. सर्व मसाला कडवे वाल शिजलेले त्यात घातले.
थोड लाल तिखट, मिठ हळद घातले परत उकळू दिले.
मस्त कडवे वाल याची उसळ केली येथे पण भाकरी खातात भाकरी बरोबर कडवे उसळ खाल्ली
आहे इतर जेवण केले सर्व यम यम जेवण भाकरी मूळे केले आहे .
बाकि ठिक छान
वसुधालय

ऊसाचा रस!

                                  ॐ                  अमेरिका
                                                  21. 5 ( मे ) 2015.
                                                                गुरुवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

ऊसाचा रस !

भारत मध्ये थंडी संपली कि गाळा याचे दुकान आहेत. तेथे
ऊसाचा रस आपल्या समोर मशीन ने काढून देतात मशीन ला
घुंगर लावलेली असतात रस काढतांना घुंगरू चा आवाज ऐकत बसण्यास चांगले
वाटत. लीम्बुरास घालून बर्फ घालून काचेच्या ग्लास मध्ये रस देतात .
एक १० दहा ते पंधरा १५ रुपये प्रमाणे देतात.
राजारामपुरी , देवीच्या देऊळ तेथे रंकाळा असे गाळा याचे ऊसाच्या रस याचे
दुकान आहेत
मुंबई येथे पण ऊसाच्या सर याचे दुकान आहेत आम्ही मागे वणी देवी ला
त्राम्ब्केश्र्वर देवी च्या येथे पण असे ऊसाचे रस याचे दुकान आहेत.
पावसाळा मध्ये दुकान बंद करतात. धंदा चालत नाही म्हणतात.
नवीन ऊस पण यावयाचा असतो. मी पूर्वी खूप वेळा ऊसाचा रस पिले आहे .
आता मात्र पित नाही साखर असते साठी .
अमेरिका येथे असा ऊसाचा रस मिळत नाही पण उस पाहिला आहे मॉल मध्ये .

सध्या कलिंगड भरपूर येतात. गाडीवाले कलिंगड याच्या फोडी करून
बर्फ वर ठेवतात व मिठ मिरे पूड घालून डिश मध्ये काटा याने खाण्यास भारत मध्ये
देतात . कोठेही फळ याची डिश मिळते दहा रुपये पर्यंत असते भारत मध्ये
मोठे कलिंगड आणले कि त्यात चोकलेटी बिया काढून वाळवून सोलून खातात
अमेरिका येथे घरीच मोठ्ठे कलिंगड आणतो . मिक्सर मधून काढून ज्यूस करतो अथवा
फोडी खातो. सध्या भारत मध्ये जांभळ छान मिळतात जीभ जांभळी होते
अमेरिका येथे जांभळ फळ मिळत नाही आंबा मात्र अमेरिका येथे मिळतो
आम्ही आंबे आणतो .
बाकि ठिक छान
वसुधालय

 

मी विणलेली शाल!

                                    ॐ               अमेरिका
                                                   20. 5 ( मे ) 2015.
                                                          बुधवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
मी विणलेली शाल !
अमेरिका येथे कपडे धुणं, केर काढणे घर पुसणे काम मला नाही.
येथे सर्व मशीन ने काम करतात. स्वंयपाक सौ सुनबाई करतात.
मी थोड मदत करते.
वेळ कसा जाणार !सौ सुनबाई म्हणाल्या. मी मला बसवता येणार नाही.
विणकाम केले कि हात दुखेल. थोड थोड विणा असे सांगून सौ सुनबाई ने
लोकर विकत आणली. डिझाईन शिकविले.
प्रथम एकशे एक्यांषि साखळ्य़ा घातल्या. त्यात डिझाईन करून विणले.
रंग रंगीत लोकर वापरली आहे बाजूने पांढरी लोकर याची बॉर्डर केली आहे.
कोल्हापूर येथे फार थंडी नसते पण अमेरिका येथे भरपूर थंडी असते.
यंदा थंडी अमेरिका येथे होईल शाल वापरली जाईल.
सोफावर पण विणकाम घालतात चांगले दिसते . थ्रो म्हणतात त्याला
पाहुणे आले कि विणकाम बघून कौतुक करतात व घर मध्ये आपण
काही स्वत: विणकाम चित्र काढलेले असले कि घर एक प्रकारे प्रसन्न तृप्तता आणणारे
असते मी येथे कागद वर भरपूर रांगोळ्या काढल्या आहेत गणपती पण काढला आहे .
गणपती दिसेल असा ठेवला आहे.

अमेरिका येथे वेगळ्या पद्दत तिने काम चालू आहे माझे. कोल्हापूर येथे
रांगोळी ने रांगोळ्या काढून दिवे लावून काम केले आहे.
मन कोणता हि कामात गुंतले कि एक प्रकारे स्वत : वेगळे विचार येत नाही.
आपण काही चांगले काम करतो याचे समाधान स्वाभिमान तृप्तता मला आहे
बाकि ठिक छान
वसुधालय

 

IMG_20150519_223858 IMG_20150519_222927 3

बनारस पान

                                      ॐ           अमेरिका
                                                 19. 5 ( मे ) 2015.
                                                          मंगळवार .

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
बनारस पान !
भारत मध्ये कोपरा कोपरा वर पान गाडी आहे. खाण्याचा चुना मिळतो
सुटी पान मिळतात. साधे पान तयार करून मिळते .
राजारापुरी येथे मेन रोड मध्ये ‘बाळ राजा मंदिर असे मोठ्ठे दुकान आहे .
संगम रवरी आहे. तेथे T . V . आहे क्रिकेट म्याच असली कि लोक
उभे राहून बघत असतात. गोविंदा विडा पण असतो. हॉटेल मघ्ये गेलो कि
शेजारी पान याचे दुकान असते. मुंबई रस्यावर टेबल ठेवून चकचकीत
पितळी भांडे ह्यात विडा पान याचे साहित्य असते. मस्त तयार करून देतात.
मुंबई हॉटेल मध्ये खाणे झाले कि पैसे देती तेथे काउंवर तयार पान याचे तबक असते
ओल खोबर घातलेले पण असते.
पान खाणे चांगले असते चुना काथ पान याचा अर्क पोटाला चांगले असते पोट साफ
होते आम्ही कधी तरी खात होतो आता दात नसल्यामुळे नवीन दात रंगीत होतील साठी मी
पान खात नाही.

अमेरिका येथे कोठेच पान प्रकार दिसत नाही. मॉल मध्ये , हॉटेल मध्ये नाही येथे तर
रस्यावर काही च नसते सिगारेट पण कमी दिसते ह्या खेपेला.
बनारस पान
बाकि ठिक छान
वसुधालय

 

 

 

 

सोमवती अमावस्या

                              ॐ               अमेरिका
                                            18. 5 ( मे ) 2015.
                                                सोमवार .

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर
विक्रम संवत् २०७१ – ७२ इसवी सन २०१५ – १६
उत्तरायण वसंतऋतु वैशाख कृष्णपक्ष नक्षत्र कृतिका योग शोभन करण किंस्तु
चंद्र राशी प्रवेश वृषभ सोमवती अमावस्या. भायुका अमावस्या . इष्टि
वैशाख कृष्णपक्ष.
बाकि ठिक छान
वसुधालय

देऊळ

                           ॐ                 अमेरिका
                                           17. 5 ( मे ) 2015.
                                                 रविवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

देऊळ !
काल आम्ही देऊळ मध्ये गेलो होतो. घरापासून जवळ आहे. तरी कर मध्ये बसून
तेथे मोटार लावून देऊळ मध्ये गेलो. घरा सारखे बांधकाम आहे काही देऊळ
यांना कळस आहेत. जिना चढून देऊळ मध्ये गेलो घंटा लावलेली आहे.
खाली बसण्यासाठी गालीच्छे सारखे घातलेले आहेत खुर्च्या पण आहेत.
देव दर्शन केले प्रदक्षिणा घातली. मांडी घालून बसलो.
सात ७ वाजता आरती ची वेळ झाली. पंडित गुरुजी आले तबक मध्ये निरांजन मध्ये
वात तेल होते ते दिवे पंडित यांनी लावले. आरती ची टेप लावली.
२० / २५ विस  पंचविस जन आम्ही होतो. प्रत्येकाच्या हातात वेग वेगळ्या थोड्या वेळ
दिवा याचे तबक देऊन आरती करण्याची येथे पद्दत आहे मी पण दिवा याचे तबक पकडून
आरती केली. मन भरून शांत वाटल. सर्वांची आरती झाल्या नंतर पंडित गुरुजी यांनी आरती केली .
शंख पकडून त्याची आरती केली पंखा याने वारा घालून आरती केली. टेप बंद केले. सर्वांनी
नमस्कार केला. नतंर गुरुजीं चांदी चा मुकुट डोक्यावर ठेवला. मला खेळ प्रसाद मिळाला.
पुष्कर यांना पेढा प्रसाद मिळाला.

देऊळ येथे संगम रवरी देवाच्या मूर्ती आहेत राधा कृष्ण आहेत.  महादेव पार्वती आहे.  गणपती आहे .
देवी ची मूर्ती आहे. बालाजी ची काळी मूर्ती आहे पांढरे सिल्क चे वस्र घातलेले ड्रेस आहेत.
त्याच्या पुढे पिटली छोटी छोटी मूर्ती आहेत देव बघून मन शांत तृप्तता होत.

पोलीस पाहारा नाही ईलेट्रिक खांब नाहीत पिशवी तपासत नाहीत.

भारत मध्ये भक्त यांची खूप गर्दी असते. देऊळ मध्ये जाण्या आधी ईलेट्रिक खांब मधून
जावे लागते. पोलीस पसलेले असतात पिशव्या तपासतात. सर्व उच्छाह येथे कमी होतो
४९ चाळीस वर्षा पूर्वी देऊळ मध्ये देवी च्या देऊळ मध्ये एवढी गर्दी नव्हती सहज आम्ही आत जाऊन
देवी दर्शन घेतलेले आहे बसत पण होतो. देवी च्या अंगावर पडलेले सूर्य किरण पाहिले आहेत .
आता मात्र पोलीस व ईलेट्रिक खांब मुळे सुरक्षा वाढली असली तरी मनाला खटकते आरे देवा
च्या येथे पण दर्शन साठी पोलीस बंद आहे .
असो. आमचा काळ होऊन गेला बाकी चे भक्त यांना सवय होईल.
कोणता हि देश मधील देव असो माझा नमस्कार !
बाकि ठिक छान
वसुधालय

 

वैशाख कृष्णपक्ष

                            ॐ                    अमेरिका
                                              16. 5 (मे ) 2015 .
                                                     शनिवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर.
विक्रम संवत् २०७१- ७२.  इसवी सन २०१५ – १६
वैशाख कृष्णपक्ष
उत्तरायण, वसंतऋतु नक्षत्र अश्र्विनी, योग आयुष्मा,  करण विष्टि,
चंद्र राशिप्रवेश मेष १३ शनिवार , शिवरात्रि त्रयोदशी
वैशाख कृष्णपक्ष
मी अमेरिका येथे पण पंचांग आणले आहे काही माहिती
लिहिण्यास चांगले वाटत आहे.
बाकि ठिक छान
वसुधालय

कार! गाडी!मोटार

                                          ॐ           अमेरिका
                                                      15. 5 ( मे ) 2015.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

कार ! गाडी !मोटार !
अमेरिका येथे घरात दोन दोन गाड्या असतात महिला पण कार चालवितात.
येथे मॉल , बाग खूप लांब लांब आहेत रिक्षा किंवा बस ची सोय नाही. गाडी
घेऊन न च सगळी कडे जावे लागते
भारत मध्ये कोल्हापूर येथे अजून हि दारा वर भाजी वाले येतात, वाणी
घरपोच समान आणून देतात. त्रास होत नाही. खूप लांब जावयाचे असेल तर बस ची सोय आहे स्वतंत्र रिक्षा
व वडाप च्या रिक्षा आहेत तरुण  महिला श्कुटर चालवून बाझार करतात मुलांना शाळेत पोहचवितात.
अमेरिका येथे शाळेत जाण्यासाठी बस आहेत भरपूर वयस्कर लोक पण गाडी चालवितात.
भारत एका कुटुंब मध्ये एक गाडी असते वयस्कर लोक चालवत नाही बदली झाली कि
किंवा ऑफिस ची बस असली कि गाडी घरीच असते
मात्र भारत मध्ये मोटर सायकल फटफटी बाईक वॉच मन कडे पण असते नळ,
लाईट दुरुस्त करणारे मोटर सायकल ने येतात ऑफिस मध्ये जातांना गाडी सारखे मोटर
सायकल वापरतात. भारत मध्ये अमेरिका येथील विमानतळ वर   मित्र गाडीतून
विमानतळ वर पोहचवितात. गाडी ठेवण्याच्या जागेला भाड द्यावे लागते.
सर्व काम आपण च घरी करतात बाई पुरुष काम वाले लावत नाही
भारत अजून बाई कामाला येतात. काही ठिकाणी तर पोळ्या पण करून देण्यासाठी भारत
मध्ये बाई येतात.
अमेरिका येथे स्वत : काम करण्याची सवय आहे भारत मध्ये अजून तसे नाही.
बाकि ठिक छान
वसुधालय

                                      OM RIKSHAA

ब्लॉग पोष्ट २, ५ ७ , / 2, 5 7 0 वा हो

                       ॐ             अमेरिका
                                    14. 5 (मे ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंती विशेष.

ब्लॉग पोष्ट २, ५ ७ , / 2, 5 7 0 वा होत आहे.
दोन , हजार , पाचशे सत्तर वा ब्लॉग पोष्ट होत आहे.
भेटी २ ५ ० , १ ० ९ / 2 5 0 , 1 0 9 आहेत .
दोन लाख पन्नास हजार , एकशे नऊ आहेत.
अजून हि मागील विणकाम , हलवा याचे दागिने , पदार्थ यांना
कॉमेंट .प्रतिक्रिया येतात . मागील साल मधील पण वाचक
ब्लॉग बघून वाचून प्रतिक्रिया देतात . याचे कारण लिखाण
छान माहिती पूर्वक आवडणारे आहे याचा मला उच्छाह वाटत आहे .
मी त्या ब्लॉग ना प्रतिक्रिया याना पण उत्तर देते . ते ब्लॉग वाचून
माहिती माझी वाचत असतील.

मला माझ्या लिखाण बद्दल व संगणक मध्ये पसरले आहे सर्व जगभर
माझे लिखाण वाचले जाते खेडे गाव असो परदेश असो मला तेथून प्रतिक्रिया
येतात मी पण उच्छाह याने उत्तर देत आहे . याचा एक प्रकारे आनंद आहे
आपण असेच ब्लॉग वाचून प्रतिक्रिया कॉमेंट करा द्या मी जरून त्यांना उत्तर
देईन आपली मी आभारी आहे धन्यवाद !धंय वाद ! अभिनंदन ब्लॉग वाचता
त्या बद्दल !
बाकि ठिक छान
वसुधालय

दिनक्रम

                                       ॐ      अमेरिका
                                                  13. 5 ( मे ) 2015.
                        
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंती विशेष.
टोष्ट
सकाळी बिन साखर चा बरोबर टोष्ट दोन तीन खाते
कुरकुरीत व थोडासा गोड पणा चांगला लागतो.
नऊ वाजता ओट मिल एक धान्य आहे ते पाण्यात शिजवून तिखट मीठ घालायचे
ताकद साठी चांगले आहे जेवतांना कधीपोळ्या तर कधी किनवा किंवा धालिया
यांची खिचडी खाते तोंडली कार्ले शेपू पालक याच्या भाज्या कधी असतात.
फळ येथे बारा महिने सगळे मिळतात खरबूज कधी पपई सफरचंद दुध घालून
मिक्सर मधुन काढून पिले जाते. संत्र , येथे पण मद्रास चा मोठ्ठा अंबा मिळतो
फोडी करून खाल्ला जातो.
सर्व आहार व्यवस्थित आहे शुगर पण चांगली आहे पोट दुखणे पण थांबले आहे.
हवामान गरम नाही उष्ण नाही बिन पंखा लावून बसता येते.
पूर्वी स्नान केल्या शिवाय काही खात नसे फक्त चहा असे.
आता मात्र टोष्ट , बिस्कीट खाते.
आहार फिरणे चालू आहे गाडी असली तरी आम्ही फिरायला बाग मध्ये किंवा कॉलनी
मध्ये फिरतो. पुष्कर व्यायाम करायला जातो सध्या लोकर चे विणकाम घेतले
आहे त्यात मन गुंतते देव पूजा ॐ म्हणते ध्यान करते.
दिवस कसा संपतो ते च समजत नाही सकाळी येथे सात वाजता उठते.
कोल्हापूर येथे सहा वाजता उठते दहा वाजता झोपतो .
मस्त दिनक्रम चालू आहे ह्या वय मध्ये सुध्दा.
बाकि ठिक
वसुधालय

अमेरिका येथील झेंडा ध्वज!

                                  ॐ                   अमेरिका
                                                          12. 5 ( मे ) 2015.
                                                              मंगळवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंती विशेष.

अमेरिका येथील झेंडा ध्वज !

इसवी सन १७७६ / 1776 साली अमेरिका येथे
13 / १३ कॉलनी होत्या. त्यासाठी त्यांनी ध्वज झेंडा मध्ये
लाल पांढरे १३ / 13 पट्टे केले आहेत.
नंतर नंतर 50 / ५० राज्य केली आहेत आता पण ५० पन्नास राज्य आहेत.
त्यासाठी निळा चौकोन मध्ये ५० / 50 पांढऱ्या चांदण्या आहेत.
सर्व एकत्र असा कापड मध्ये सगळी कडे ध्वज  लावलेले आहेत.

अमेरिका झेंडा ध्वज यांना माझा नामाकार !
बाकि ठीक छान
वसुधालय

 

बटाटा वडा !

                                             ॐ       अमेरिका
                                                      11. 5 ( मे ) 2015.
                                                          सोमवार

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

बटाटा वडा !

काल MOTHER ‘S DAY ! आई चा दिवस असल्यामुळे
मी सौ सुनबाई पुष्कर गोकुळ हॉटेल मध्ये गेलो होतो.
कोल्हापूर येथे पण मोठ्ठे काच लावलेले  व स्वच्छ गोकुळ हॉटेल आहे.
आम्ही बटाटा वडा पनीर तळलेले कांदा ट म्या टो घातलेले घेतले .
गरम होते. दही शेव पुरी घेतली. घरी गुलाब जांब आणले.
बटाटा वडा चांगला होता भरपूर भाजी व पापुद्रा पण पातळ चांगला होता.
कोल्हापूर येथे भाजी कमी असते लसून कोथिंबीर जास्त असते सोडा घालून
पापुद्रा जाड करतात. मला बटाटा भाजी भरपूर असल्यामुळे येथील बटाटा वडा
आवडला.
घरी आल्यानंतर माझा पुष्कर चा घरातील बागेतील व्हरांडा येथे फोटो काढला.
प्रणव यांना फेस बुक मध्ये गुगल मध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.
आणि काय हवं MOTHER ‘S DAY घर खुष उच्छाह आणणार असल कि
पूर्ण घर शांत प्रसन्न राहत सौ सुनबाई मी अगदी हसत मुख बोलतो. काम करतो.
मी माझ्या आठवणी सौ सुनबाई यांना सांगत असते. ती मन लावून ऐकत असते
माझ आयुष्य जीवन फार चांगल गेल आहे. असो
बाकी ठिक छान
वसुधालय

MOTHER’S DAY !

                            ॐ            अमेरिका
                                       10 .5 ( मे ) 2015.
                                          रविवार

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंती विशेष

मदर ‘S  डे ! MOTHER ‘S  DAY ! आई चा दिवस

आई व वडील मुल जन्माला आणतात.
लहान पण असतांना आई मुलांना थोडा फार शाळेचा अभ्यास घेतात.
घरी कोणी पाहुणे आले कि कसे वागावे शिकवितात. खेळ , संगीत
शिकवितात. मुल मोठी होतात डिग्री मिळवतात. कोणी देशात राहतात. कोणी
परदेशी जातात.
त्यांना जास्त ज्ञान मिळते. ते ज्ञान ते आई ला शिकवितात.
फोन चालविणे , काम्पुटर . संगणक मध्ये भाषा वापर करणे .
घरातिल इलेट्रीक मशीन ची माहिती देणे. नवीन देश दाखविणे
भरपूर ज्ञान मुल मुली पण देतात आईला

त्यामुळे आई नवीन नवीन शिकत असते वेळ अभ्यास ज्ञान आई ला मिळते.
आई त्यावर लिखाण करते जगभर माहिती पसरविते .
लोक ह्या वय ला आई अभ्यास करते याचे कौतुक करून
वर्तमान पत्र , पुस्तक तयार करतात .
सांगायचे कारण मुल मुली
आपण आई ने केलेले संस्कार मुला वर डिंबतात राहतात. त्यामुळे
मुल मुली मोठे झाले कि त्यात सुधारणा व अभ्यास करून ज्ञान पसरवितात
ह्यात च आईला तृप्तता समाधान आहे असते
मुल अभ्यास ज्ञान मिळवून मोठे होणे ह्यात आनंद आई आनंद मानते .

 

पोष्ट ऑफिस !

                               ॐ            अमेरिका
                                             10. 5 ( मे ) 2015.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष

पोष्ट ऑफिस !

अमेरिका येथे मला एका ठिकाणी माझे पुस्तक
ब्लॉगवाल्या आजीबाई ! वसुधा श्रीकांत चिवटे
अस पुस्तक भेट द्यावयाची होती आधी पत्ता विचारून घेतला
त्यांचे जरूर पुस्तक पाठवा उत्तर आले आहे सौ सुनबाई ने घरातील
मस्त गुलाबी लाल रंगाचे पाकीट काढले त्यात पुस्तक घातले.
मी नाव लिहून भेट असे पुस्तक च्या कोरड्या पानावर सही केली.
पुष्कर यांनी पत्ता लिहिला.
आम्ही आधी बागेत गेलो. तेथून मी पुष्कर गाडीने पोष्ट ऑफिस मध्ये गेलो.
तेथे पाकीट याचे वजन केले. पुष्कर यांनी डॉलर देऊन तिकीट विकत घेतले.
त्यांना पुस्तक याचे पाकीट दिले.

मी सात पुस्तक भेट दिली आहे पण अमेरिका येथे पोष्ट याने पुस्तक आवडेल
भेट पाठवा असे उत्तर आल्याने मन उच्छाह प्रफुल्लित झाले.
हे महत्व पूर्वक आहेत आता माझ्या कडे तीन पुस्तक आहेत एक पुष्कर सौ सुनबाई यांना
व मला दोन आणि कोणी मागितल्यास देईन !
पुस्तक ब्लॉग ची दखल घेऊन किशोर कुलकर्णी यांनी छापले आहे याला फार महत्व आहे .
वाचक वर्ग पत्रकार पण ब्लॉग वाचतात याचे मला तृप्तता आहे

बाकि ठिक छान
वसुधालय

मी काम केल्याचा आनंद

                                ॐ                 अमेरिका
                                                     9. 5 ( मे ) 2015.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
फार्मर मार्केट !
भाजी दुध ब्रेड याचे आहे नेहमी जातो मी त्याबद्दल लिहिले पण आहे
काल मी काल तेथील ल्यास्टीक च्या पिशव्या घेऊन कोणती भाजी किती
घ्यावयाची सर्व केले टम्याटो, लाल व हिरवी ढोबळी मिरची . पालक
फ्लावर सर्व एकेका पिशवीत घातले तेथील गाडी मध्ये घातले.
काउंटर वर गाडी नेली.
सौ सूनबाई डॉलर चे कार्ड फिरविले नंतर सौ सुनबाई ने सही केली
कार मध्ये सर्व पिशव्या भरल्या. गाडी त पट्टा बांधला घरी आल्यावर सर्व
सामान मी सौ सुनबाई ने घरात ठेवले पुष्कर व सौ सुनबाई ने सर्व फीज मध्ये ठेवले.
सांगायचे कारण नुसत मॉल मध्ये फिरले नाही तर येथे बाजार कसा करावा शिकले .
कोल्हापूर येथे भाजी ची मंडई असते आपण भाज्या मागतो ते वजन करून देतात
नंतर रोख पैसे देतो येथे तसे नाही पाहिजे ती भाजी पाहिजे तेवढी घ्यावयाची \व
कोंटर वर कार्डां ने पैसे द्यावयाचे रोख काही नाही
पैसे कमी पडले हि भाजी कमी करा नाही तर नंतर पैसे देते असा प्रकार नाही
मी काम केल्याचा आनंद !

 

10931303_390929557750487_317078576698530922_n

अंड आमलेट

                         ॐ                 अमेरिका
                                           8. 5 ( मे ) 2015

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष

अंड आमलेट
येथे आता तवा अंड आमलेट साठी तवा दुसरा वापरतात पोळी चा तवा वेगळा आहे.
तवा कोणता घ्यावयाचा उलथन कोणते घ्यावयाचे ग्यास पद्दत पण वेगळी चार शेगडी ची आहे.
कोणता ग्यास वापरायचा माहित झाल आहे.

दोन अंडे बाउल मध्ये घेतले लाल बलक पिवळा बलक पण घेतला. कांदा अर्धा घेतला.
येथे मोठे मोठे कांदे असतात. ढोबळी मिरची हिरवी लाल दोन्ही थोडी घेतली. मीठ
घातले सर्व चमचा याने हलविले. ग्यास पेटवून तवा तापवू दिला. थोड तेल घातले.
मस्त फसफसलेले अंड घातले. छान तांबुस केले दुसऱ्या बाजूने पण केले.
पोळी बरोबर पुष्कर यांनी खाल्ले.
मी कोल्हापूर येथे पण अंड आमलेट करते. जागा साहित्य नवीन असल्यामुळे
अंड आमलेट किंवा स्वंयपाक करण्यास वेगळे पण व छान वाटत आहे.

बाकी ठिक छान
वसुधालय

 

मीआणिमाझेपुस्तक! ब्लॉगवाल्या आजीबाई

                                      ॐ               अमेरिका
                                                    7. 5 ( मे ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंती विशेष
मी आणि माझे पुस्तक ब्लॉगवाल्या आजीबाई
वसुधा श्रीकांत चिवटे

नुकतेच अमेरिका येथे मला पुस्तक मिळाले आहे.
मी वाचून काढले आहे.

ब्लॉग मध्ये भरपूर विषय आहेत २००० दोन हजार ब्लॉग मधून
निवड करणे अवघड काम आहे

तरी किशोर कुलकर्णी व विभाकर पूरम भट्टी त्यांच्या सौ नि
छान निवड केली आहे.
पाककृती , घंटा , सतार . शिंकाळी , जात कविता असे विषय घेतले आहेत .
प्रस्तावना दिलीप तिवारी मुख्य संपादक तरुण भारत यांची आहे.
वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई !किशोर कुलकर्णी यांचा लेख आहे.
मी कसा ब्लॉग तयार करते याची माहिती आहे. अर्पण पत्रिका आहे
रंगपंचमी मध्ये माझे मनोगत आहे सर्व पुस्तक चांगले केले आहे.

ब्लॉग रंगीत फोटो घालता येत नाही साठी ब्ल्याक व्हाईट पुस्तक आहे.
पण छान पुस्तक आहे
आपण खर्च करून सुध्दा एवढे लेख मिळाले नसते
पत्रकार , संपादक प्रकाशक सर्व जन लेख आहेत आणि काय पाहिजे .
पुस्तक मधील फोटो घालता येत नाहीत छोटे पुस्तक व फोटो आहेत
साक्षरता व्हा हा संदेश आहे.

बाकि ठिक छान
वसुधालय

 

सौ अनामिका पोळ

ॐ                   अमेरिका
                                                       3 .5 ( मे ) 2015

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष

सौ अनामिका पोळ

काल आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो
खाली हॉल स्वंयापक घर वर जिना चढून खोल्या असे बंगले आहेत इकडे
मोठी घर आहेत इकडे. गाड्या ठेवण्यास जागा .

तेथे श्री गोंदवलेकर ब्रह्मचैतन्य महाराज यांचे प्रवचन आहेत त्यांनी आम्हाला दाखविले आहे .
आम्ही म्हटलं आम्ही पण ब्रह्मचैतन्य  महाराज याचे भक्त आहोत
सर्वजन जपमाळ करतात मी मनातल्या मनात खूप वेळा श्री राम जय राम जयजय राम म्हणत असते.
व ब्लॉग मध्ये पण प्रवचन लिहिली आहेत.
त्यांनी पावभाजी ब्रेड केले होते पण आम्ही लवकर निघालो
सौ अनामिका आणि सौ मैत्रीण यांच्या बरोबर माझा फोटो काढला आहे
ब्लॉग सर्वजन वाचतात त्यामुळे मला भेटण्यासाठी सर्वांना आवडते

दोन वर्षापूर्वी बागेत त्यांची ओळख झाली सौ अनामिका च्या सासूबाई पण आता अमरिका येथे
आल्या आहेत बागेत परत भेटल्या ओळखले .
त्यांनी मला ब्लॉग मध्ये फोन नंबर दिला आम्ही फोन केला व घरी बोलाविले
आम्ही पण अगत्य पूर्वक मान ठेवून त्यांच्या घरी गेलो
दोन वर्षा पूर्वी बागेत त्यांच्या बरोबर तबकडी खेळलो होतो
आता खेळ जमणार नाही पोट दुखते नुसते फिरतो
मुख्य अमेरिका येथे सुध्दा श्री गोंदवलेकर ब्रह्मचैतन्य महाराज यांचे भक्त आहेत
पाहून मन भरून आले

मी गोंदवलेकर ब्रह्मचैतन्य यांची भक्त १९६६ साल पासून आहे त्या वेळेला आम्ही दोघ
तेथे गेलोलो पूर्वी ताट वाट्या आपण घसायाच्या सेवा केल्याचे मन भरून येत असे
पूर्वी वाढत असत आता ताट घेऊन जायचे प्रसाद देतात.
श्री राम जय राम जय जय राम
श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांना नमस्कार

पोळ कुटुंब यांना पण नमस्कार
बाकि ठिक
वसुधालय

DSCF2182

बाग

                             ॐ                 अमेरिका
                                          6. 5 ( मे ) 2015.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंती विशेष.
बाग !
काल मंगळवार असल्यामुळे सुट्या असल्यामुळे बागेत खूप गर्दी होती.
गाडी लावण्यास पण दुसरी जागा होती.
आम्ही दोन फिऱ्या केल्या. सुट्टी असल्यामुळे खाण्याचे पदार्थ याचे ट्रक आलेले.
सर्व इंग्रजी तून बोलणे. दहा बारा ट्रक असतील चिकन स्यांडविच आयास्क्रीन
कोकाकोला. इतर भारत मध्ये भेळ आयस्क्रीम हल्ली पाणीपुरी चाट याच्या गाड्या
असतात.
आम्ही सामोसे कोकाकोला घेतले. किनवा भाजी घालून पण घेतले. घरी आल्या नंतर खाल्ले.
तेथे भारत मधील लोक पण होते. माझ्या सारख्या आई पाच वारी साडी नेसून आलेल्या.
आम्ही एक मेका कडे हसून ओळख दाखविली .
तेथे गाणी पण म्हणतात.
मी ॐ कार प्रधान रुप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान म्हणणार होते.
पण तेथे नाव नोंदणी फोन करावा लागतो.
नुसत फिरत पिरत मी म्हटले आमच्यात च.

काल बागेत मजा आली

बाकि ठिक छान
वसुधालय

आकाश

ॐ                  अमेरिका
5. 5. ( मे ) 2015.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश

आकाश

अकाश पंचमहाभूत मधील एक आहे उंच असले तरी कोठेही दिसते.
आपण नमस्कार करतो. चार वेळा नमस्कार कारावा अकाश व आपण शांत राहतो.
पिडा त्रास होत नाही.
मी तर सकाळी सुर्यास्ता च्या वेळेला बाहेर फिरतांना व रात्री अंधार झाला कि चंद्र दिसला कि
नमस्कार करते.

पंच महाभूतापैकी पाणी आपण पिण्यास सडा टाकण्यास तवा थंड करण्यास वापरतो
पाणी त्यामुळे शांतता देते. आग जेवण करून नैवेद्द करतो शांतता देतो.
वारा सुटला कि आपण छत घर दार लावून व थोड्या वेळ वाऱ्यात बसू शकतो गारवा मिळतो.
जमीन वर आपण चालू शकतो वाहन चालवितांना नमस्कार करतो.
त्यामुळे सर्व पंच महाभूते शांत राहतात सजीव प्राणी मानस झाड छान जगतात.

अकाश याची सेवा आपण फार करू शकत नाही साठी

चार वेळा सकाळी दुपारी १२ बारा वाजता सुर्यास्ता वेळी अंधार झाला कि अकाश याला नमस्कार
करावा. स्वच्छ अकाश आहे आकाशात ग्रह असल्यामुळे आपल्याला उजेड अंधार मिळतो.
अकाश मध्ये विमान हेलिकॉपटर फिरू शकतात छान रहावे साठी
अकाश याला चार वेळा नमस्कार करावा आपले मन शरीर पण स्वच्छ उच्छाह आणतो
नमस्कार मूळे
अकाश याला नमस्कार !

IMG_50411.jpg

 

Best Buy

ॐ                            अमेरिका
5. 5 ( मे ) 2015.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष

काल आम्ही Best Buy च्या मॉल मध्ये गेलो होतो . छान खरेदी
असा अर्थ आहे.  सहा मैल मॉल लांब आहे
तेथे हल्ली पातळ हलके छोटे काम्पुटर आहेत. मी हातात घेऊन बघितला आहे.
खूप हलका आहे पांढरे रंग याचे आहेत.
तसेच तेथे T . V . आहेत आता चपटे सपाट  T . V . आहेत काही दिवस नंतर
परत गोल व पातळ T . V . येणार आहेत. मोबाईल फोन पण आहेत .
फ्रीज कपडे धुण्याचे मशीन मोठे मोठे आहेत.
स्वच्छ मॉल आहे. बघायला छान वाटलं !
कोल्हापूर येथे अजून स्वतंत्र फोन T . V . धंदा करतात छोटे छोटे  दुकान असतात.
मालक  च पैसे घेतात येथे कांऊटर येथे पैसे देतात.

वेळ

                                 ॐ                     अमेरिका
                                                  2..5 ( मे ) 2015.

    ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
    विनंती विशेष
कोल्हापूर येथे राजारामपुरी येथे आम्ही राहतो.
शाहूपुरी लक्ष्मीपुरी रंकाळा आरे नगर असे भाग आहेत.
तसे येथे स्मरणा कॉलनीत आम्ही राहतो

येथे सुट्ट्या असल्यामुळे मुलं मुली कॉलनीत
विक्री साठी टेबल ठेवून ऑरेम्ज ज्यूस चॉकलेट क्रीम रोल विकायला असतात. बरोबर
टिचर असतात गाड्या थांबवून हाय करून आपण मराठी जसं बोलतो तसं ते इंग्रजी बोलतात.
काल आम्ही चालत ऑरेम्ज व चॉकलेट घेतले.
लहान पणा पासून मुलांना काम करण्याची विक्री करण्याची सवय लागली जाते.

भारत मध्ये पण घरातील मसाले भात , इडली करून मुलांना दुकाना पुढे टेबल मांडून
विक्री करण्यास देतात. धंदा कसा करावा व वेळ लोका बरोबर कसे बोलावे याची शिकवण मिळते.
कोल्हापूर येथे वयस्कर पुरुष व स्त्रिया पापड पुस्तक साबण विकायला येतात.
वेळ जातो बोलणे होते. पैसे मिळतात.
कांही करून वेळ मजेत घालवावा हा हेतू व पैसे पण लागतात चं !
मी सध्या येथे पियानो शिकत आहे . शाल विणायला घेतली आहे
मस्त वेळ व मन मोकळ पणाने आहे.
वेळ
बाकि ठिक छान
वसुधालय

IMG_2572[1]

कामगार दिन महाराष्ट्र

                               ॐ              अमेरिका
                                                 1.5 ( मार्च ) 2015.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विशेष

इसवी सन 1960 / १९६० साली महाराष्ट्र स्वतंत्र झाला
त्या दिवस ला महाराष्ट्र दिन कामगार दिन म्हणतात .

कामगार दिन

महाराष्ट्र स्वतंत्र झाला गुजराथ व महाराष्ट्र एकत्र होते
त्यावेळेचे मुख्यमंत्री यशवंत राव चव्हाण होते.
एक १ मे कामगार दिन साजरा करण्याचे ठरविले
सुट्टी असते ब्यांक यांना पण सुट्टी असते.
काम केल्याचे मोल कामगार दिन मूळे दिसते.

%d bloggers like this: