आपले स्वागत आहे!

Archive for मे 7, 2015

मीआणिमाझेपुस्तक! ब्लॉगवाल्या आजीबाई

                                      ॐ               अमेरिका
                                                    7. 5 ( मे ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंती विशेष
मी आणि माझे पुस्तक ब्लॉगवाल्या आजीबाई
वसुधा श्रीकांत चिवटे

नुकतेच अमेरिका येथे मला पुस्तक मिळाले आहे.
मी वाचून काढले आहे.

ब्लॉग मध्ये भरपूर विषय आहेत २००० दोन हजार ब्लॉग मधून
निवड करणे अवघड काम आहे

तरी किशोर कुलकर्णी व विभाकर पूरम भट्टी त्यांच्या सौ नि
छान निवड केली आहे.
पाककृती , घंटा , सतार . शिंकाळी , जात कविता असे विषय घेतले आहेत .
प्रस्तावना दिलीप तिवारी मुख्य संपादक तरुण भारत यांची आहे.
वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई !किशोर कुलकर्णी यांचा लेख आहे.
मी कसा ब्लॉग तयार करते याची माहिती आहे. अर्पण पत्रिका आहे
रंगपंचमी मध्ये माझे मनोगत आहे सर्व पुस्तक चांगले केले आहे.

ब्लॉग रंगीत फोटो घालता येत नाही साठी ब्ल्याक व्हाईट पुस्तक आहे.
पण छान पुस्तक आहे
आपण खर्च करून सुध्दा एवढे लेख मिळाले नसते
पत्रकार , संपादक प्रकाशक सर्व जन लेख आहेत आणि काय पाहिजे .
पुस्तक मधील फोटो घालता येत नाहीत छोटे पुस्तक व फोटो आहेत
साक्षरता व्हा हा संदेश आहे.

बाकि ठिक छान
वसुधालय

 

सौ अनामिका पोळ

ॐ                   अमेरिका
                                                       3 .5 ( मे ) 2015

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष

सौ अनामिका पोळ

काल आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो
खाली हॉल स्वंयापक घर वर जिना चढून खोल्या असे बंगले आहेत इकडे
मोठी घर आहेत इकडे. गाड्या ठेवण्यास जागा .

तेथे श्री गोंदवलेकर ब्रह्मचैतन्य महाराज यांचे प्रवचन आहेत त्यांनी आम्हाला दाखविले आहे .
आम्ही म्हटलं आम्ही पण ब्रह्मचैतन्य  महाराज याचे भक्त आहोत
सर्वजन जपमाळ करतात मी मनातल्या मनात खूप वेळा श्री राम जय राम जयजय राम म्हणत असते.
व ब्लॉग मध्ये पण प्रवचन लिहिली आहेत.
त्यांनी पावभाजी ब्रेड केले होते पण आम्ही लवकर निघालो
सौ अनामिका आणि सौ मैत्रीण यांच्या बरोबर माझा फोटो काढला आहे
ब्लॉग सर्वजन वाचतात त्यामुळे मला भेटण्यासाठी सर्वांना आवडते

दोन वर्षापूर्वी बागेत त्यांची ओळख झाली सौ अनामिका च्या सासूबाई पण आता अमरिका येथे
आल्या आहेत बागेत परत भेटल्या ओळखले .
त्यांनी मला ब्लॉग मध्ये फोन नंबर दिला आम्ही फोन केला व घरी बोलाविले
आम्ही पण अगत्य पूर्वक मान ठेवून त्यांच्या घरी गेलो
दोन वर्षा पूर्वी बागेत त्यांच्या बरोबर तबकडी खेळलो होतो
आता खेळ जमणार नाही पोट दुखते नुसते फिरतो
मुख्य अमेरिका येथे सुध्दा श्री गोंदवलेकर ब्रह्मचैतन्य महाराज यांचे भक्त आहेत
पाहून मन भरून आले

मी गोंदवलेकर ब्रह्मचैतन्य यांची भक्त १९६६ साल पासून आहे त्या वेळेला आम्ही दोघ
तेथे गेलोलो पूर्वी ताट वाट्या आपण घसायाच्या सेवा केल्याचे मन भरून येत असे
पूर्वी वाढत असत आता ताट घेऊन जायचे प्रसाद देतात.
श्री राम जय राम जय जय राम
श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांना नमस्कार

पोळ कुटुंब यांना पण नमस्कार
बाकि ठिक
वसुधालय

DSCF2182

%d bloggers like this: