आपले स्वागत आहे!

Archive for मे 13, 2015

दिनक्रम

                                       ॐ      अमेरिका
                                                  13. 5 ( मे ) 2015.
                        
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंती विशेष.
टोष्ट
सकाळी बिन साखर चा बरोबर टोष्ट दोन तीन खाते
कुरकुरीत व थोडासा गोड पणा चांगला लागतो.
नऊ वाजता ओट मिल एक धान्य आहे ते पाण्यात शिजवून तिखट मीठ घालायचे
ताकद साठी चांगले आहे जेवतांना कधीपोळ्या तर कधी किनवा किंवा धालिया
यांची खिचडी खाते तोंडली कार्ले शेपू पालक याच्या भाज्या कधी असतात.
फळ येथे बारा महिने सगळे मिळतात खरबूज कधी पपई सफरचंद दुध घालून
मिक्सर मधुन काढून पिले जाते. संत्र , येथे पण मद्रास चा मोठ्ठा अंबा मिळतो
फोडी करून खाल्ला जातो.
सर्व आहार व्यवस्थित आहे शुगर पण चांगली आहे पोट दुखणे पण थांबले आहे.
हवामान गरम नाही उष्ण नाही बिन पंखा लावून बसता येते.
पूर्वी स्नान केल्या शिवाय काही खात नसे फक्त चहा असे.
आता मात्र टोष्ट , बिस्कीट खाते.
आहार फिरणे चालू आहे गाडी असली तरी आम्ही फिरायला बाग मध्ये किंवा कॉलनी
मध्ये फिरतो. पुष्कर व्यायाम करायला जातो सध्या लोकर चे विणकाम घेतले
आहे त्यात मन गुंतते देव पूजा ॐ म्हणते ध्यान करते.
दिवस कसा संपतो ते च समजत नाही सकाळी येथे सात वाजता उठते.
कोल्हापूर येथे सहा वाजता उठते दहा वाजता झोपतो .
मस्त दिनक्रम चालू आहे ह्या वय मध्ये सुध्दा.
बाकि ठिक
वसुधालय

%d bloggers like this: