आपले स्वागत आहे!

Archive for मे 17, 2015

देऊळ

                           ॐ                 अमेरिका
                                           17. 5 ( मे ) 2015.
                                                 रविवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

देऊळ !
काल आम्ही देऊळ मध्ये गेलो होतो. घरापासून जवळ आहे. तरी कर मध्ये बसून
तेथे मोटार लावून देऊळ मध्ये गेलो. घरा सारखे बांधकाम आहे काही देऊळ
यांना कळस आहेत. जिना चढून देऊळ मध्ये गेलो घंटा लावलेली आहे.
खाली बसण्यासाठी गालीच्छे सारखे घातलेले आहेत खुर्च्या पण आहेत.
देव दर्शन केले प्रदक्षिणा घातली. मांडी घालून बसलो.
सात ७ वाजता आरती ची वेळ झाली. पंडित गुरुजी आले तबक मध्ये निरांजन मध्ये
वात तेल होते ते दिवे पंडित यांनी लावले. आरती ची टेप लावली.
२० / २५ विस  पंचविस जन आम्ही होतो. प्रत्येकाच्या हातात वेग वेगळ्या थोड्या वेळ
दिवा याचे तबक देऊन आरती करण्याची येथे पद्दत आहे मी पण दिवा याचे तबक पकडून
आरती केली. मन भरून शांत वाटल. सर्वांची आरती झाल्या नंतर पंडित गुरुजी यांनी आरती केली .
शंख पकडून त्याची आरती केली पंखा याने वारा घालून आरती केली. टेप बंद केले. सर्वांनी
नमस्कार केला. नतंर गुरुजीं चांदी चा मुकुट डोक्यावर ठेवला. मला खेळ प्रसाद मिळाला.
पुष्कर यांना पेढा प्रसाद मिळाला.

देऊळ येथे संगम रवरी देवाच्या मूर्ती आहेत राधा कृष्ण आहेत.  महादेव पार्वती आहे.  गणपती आहे .
देवी ची मूर्ती आहे. बालाजी ची काळी मूर्ती आहे पांढरे सिल्क चे वस्र घातलेले ड्रेस आहेत.
त्याच्या पुढे पिटली छोटी छोटी मूर्ती आहेत देव बघून मन शांत तृप्तता होत.

पोलीस पाहारा नाही ईलेट्रिक खांब नाहीत पिशवी तपासत नाहीत.

भारत मध्ये भक्त यांची खूप गर्दी असते. देऊळ मध्ये जाण्या आधी ईलेट्रिक खांब मधून
जावे लागते. पोलीस पसलेले असतात पिशव्या तपासतात. सर्व उच्छाह येथे कमी होतो
४९ चाळीस वर्षा पूर्वी देऊळ मध्ये देवी च्या देऊळ मध्ये एवढी गर्दी नव्हती सहज आम्ही आत जाऊन
देवी दर्शन घेतलेले आहे बसत पण होतो. देवी च्या अंगावर पडलेले सूर्य किरण पाहिले आहेत .
आता मात्र पोलीस व ईलेट्रिक खांब मुळे सुरक्षा वाढली असली तरी मनाला खटकते आरे देवा
च्या येथे पण दर्शन साठी पोलीस बंद आहे .
असो. आमचा काळ होऊन गेला बाकी चे भक्त यांना सवय होईल.
कोणता हि देश मधील देव असो माझा नमस्कार !
बाकि ठिक छान
वसुधालय

 

%d bloggers like this: