आपले स्वागत आहे!

Archive for मे 20, 2015

मी विणलेली शाल!

                                    ॐ               अमेरिका
                                                   20. 5 ( मे ) 2015.
                                                          बुधवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
मी विणलेली शाल !
अमेरिका येथे कपडे धुणं, केर काढणे घर पुसणे काम मला नाही.
येथे सर्व मशीन ने काम करतात. स्वंयपाक सौ सुनबाई करतात.
मी थोड मदत करते.
वेळ कसा जाणार !सौ सुनबाई म्हणाल्या. मी मला बसवता येणार नाही.
विणकाम केले कि हात दुखेल. थोड थोड विणा असे सांगून सौ सुनबाई ने
लोकर विकत आणली. डिझाईन शिकविले.
प्रथम एकशे एक्यांषि साखळ्य़ा घातल्या. त्यात डिझाईन करून विणले.
रंग रंगीत लोकर वापरली आहे बाजूने पांढरी लोकर याची बॉर्डर केली आहे.
कोल्हापूर येथे फार थंडी नसते पण अमेरिका येथे भरपूर थंडी असते.
यंदा थंडी अमेरिका येथे होईल शाल वापरली जाईल.
सोफावर पण विणकाम घालतात चांगले दिसते . थ्रो म्हणतात त्याला
पाहुणे आले कि विणकाम बघून कौतुक करतात व घर मध्ये आपण
काही स्वत: विणकाम चित्र काढलेले असले कि घर एक प्रकारे प्रसन्न तृप्तता आणणारे
असते मी येथे कागद वर भरपूर रांगोळ्या काढल्या आहेत गणपती पण काढला आहे .
गणपती दिसेल असा ठेवला आहे.

अमेरिका येथे वेगळ्या पद्दत तिने काम चालू आहे माझे. कोल्हापूर येथे
रांगोळी ने रांगोळ्या काढून दिवे लावून काम केले आहे.
मन कोणता हि कामात गुंतले कि एक प्रकारे स्वत : वेगळे विचार येत नाही.
आपण काही चांगले काम करतो याचे समाधान स्वाभिमान तृप्तता मला आहे
बाकि ठिक छान
वसुधालय

 

IMG_20150519_223858 IMG_20150519_222927 3

%d bloggers like this: