आपले स्वागत आहे!

Archive for जून, 2015

पत्र लिखाण!

                                          ॐ                अमेरिका
                                                          29. 6 ( जून ) 2015.
                                                               सोमवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

पत्र लिखाण !

पत्र लिहितांना प्रथम मध्य भागी
श्री अथवा ॐ  अथवा देव याचे नाव लिहितात.
उजव्या बाजूस तारीख पत्ता अथवा गाव याचे नाव
लिहितात. हल्ली टेलिफोन नंबर लिहितात.
नंतर मित्र,  सौ आई व वडील यांना
मित्र असेल तर प्रिय व मोठे कोणी असेल तर
राजमान्य राजश्री साष्टांग नमस्कार.

विनंति विषेश.
नंतर आपला मजकूर लिहायचा
बाकि ठिक, मजेत, क्षेम असे काहीतरी शब्द लिहितात.
नंतर प्रिय मित्र अथवा आपला मुलाचे नाव
अथवा सौ मुली चे नाव लिहितात
पत्र पूर्ण करतात.
बाकि ठिक छान
वसुधालय.
               
                ॐ             अमेरिका
                                २९.६ ( जून ) २०१५.
                                        सोमवार

चिरंजीव राजमान्य राजश्री  प्रणव यांना आशीर्वाद.
माझी तब्येत छान आहे. मी रोज फिरायला जाते.
लोकरीचे  टोपी चे विणकाम करते.
आज बिनिस श्रावण घेवडा याची शेंगदाणा कुट
घालून व पांढरा कांदा बारिक चिरून शिजवून भाजी केली आहे.
रामरक्षा म्हणते.
आपण कसे आहात !
बाकि ठिक छान
                               आपली आई.

IMG_20150506_192038

अन्न पचन!

                                        ॐ        अमेरिका
                                                   28. 6 ( जून ) 2015.
                                                       रविवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

अन्न पचन !

रोजचे जेवण पोळी , एकाधी भाजी , आमटी,
कोशिंबीर. चटणी. लिंबू जेवले तर अन्न हलक असत.
जेवला नंतर झोप येत नाही.

पुरी श्रीखंड गोड कांही खाल्ले कि व बटाटा भाजी
म्यागी, आयस्क्रीम ब्रेड पिस्ता असे पदार्थ खळे कि झोप येते
अन्न जड असते. झोपावे वाटते. शरीर म्हणते तू झोप
मी झोपेत सर्व अन्न पचवितो.
थालिपीठ खाल्ले तर झोप येत नाही ज्वारी बेसन मसाला असतो.
पिठ हलके असतात. तेल याची शरीराला हाडा साठी गरज असते.
झोप येत नाही. सागाम्याच हलके पदार्थ खावे पचण्यास चांगले असते.
पोट दुखत नाही. जड पदार्थ यांनी पोट दुखते. वय लहान असले तरी
पोट दुखते.
मी ७३ वय याची आहे. भात खात नाही ब्रेड खात नाही. एकाद्या वेळेला खाल्ले
तर पोट दुखते. माझे. डाळी आमटी खाते. दही खाते. फळ पूर्वी खात असे.
शुगर वाढते साठी फळ खाणे बंद केले. अननस आंबट असते ज्यूस करून पिते.
येथे ओटमील तिखट मिठ पाणी शिजवून खाते. फुलक्या भाकरी खाते. भाजी
थोडी खाते. दही भरपूर खाते. फिरायला जाते व्यायाम मूळे झोप येते.

कोणत वय असल तरी हलका आहार करावा.
पूर्वी साधा स्वंयपाक घरात असे. आता ब्रेड व ईतर पदार्थ याची सवय लागली आहे.
दशमी करून ठेवत ती चहा बरोबर खात असत.
शक्यतोवर स्नान करून पूजा करून जेवत असत. १० वाजता किंवा लवकर ऑफिस असेल
तर ९ वाजता सर्व जेवण जेवत असत. घरी आले कि चुरमुरे खात रात्री जेवत.
मस्त आहार असे.

तरी पण वय परत्वे मला दुपारी थोडी झोप येते. अन्न झोपेत पचते.

बाकि ठिक छान.
वसुधालय.

                                                       GetAttachment (2)

बारावी ला मार्क!

                             ॐ                  अमेरिका
                                          27. 6 ( जून ) 2015.
                                              शनिवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

बारावी १२ ला १००टक्के मार्क पाहिजे.
तर च डॉक्टर व इंजिनीयर ला याडमीशन मिळणार !
असे मी वाचले आहे.
एवढे मार्क मध्यम मुल मिळवू शकणार नाहीत.
एक विषय नसून बरेच विषय बारावी ला असतात.
अभ्यास करणार म्हणजे किती करणार. पाठ करून हि
वेळेवर येत नाही लिहिता.
व फी पण भरपूर घेतात. पालक पण कोठून एवढी फी आणणार.
हल्ली काका मामा कोणी मदत करत नाहीत.

तरी ठराविक मार्क ठेवून पास विध्यार्थी यांना याडमिशन द्यावी.
तर चं मुल अभ्यास करून पास होऊन डॉक्टर व इंजिनीयार होतील.

नाहीतर डॉक्टर झाले नाहीतर डॉक्टर संख्या कमी होईल.
वैदकीय उपचार मिळणार नाहीत.
६० / ७० टक्के मार्क असणारे विध्यार्थी यांना याडमीशन द्यावी.
भरपूर डॉक्टर व्हावयाला पाहिजेत. जनसमुदाय यांना
वैध्याकीय उपचार साठी काळजी वाटणार नाही.
मुलांना पण अभ्यास याची गोडी लागून अभ्यास करतील

बाकि ठीक. छान.
वसुधालय.

बृहस्पतिम्!

                                         ॐ            अमेरिका
                                                       26. 6 ( जून ) 2015.
                                                           शुक्रवार

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

पंचांग मधील श्र्लोक पाहून  लिहित आहे.
जपमंत्र –

देवानंच ऋषीणांच गुरुं कांचनसन्निभम् |
बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् ||

गुरु प्रतिमेचा पुजनचा व दानाचा संकल्प

मम जन्माराशे शकाशात् अनिष्टस्यानस्थितगुरो :
पिदापरिहारार्थ एकादशस्थानवच्छुभफलाप्रात्यर्थ
सुवर्ण प्रतिमाया बृहस्पतिपूजन|

तत्प्रितिकरं ( अमुक ) दानंच करिण्ये |

हा श्र्लोक मी व प्रणव यांनी पण जप माळ घेऊन खूप वेळा
म्हणाला म्हंटला आहे.

ॐ  श्र्लोक स्वत : च मन शांत  राहाव साठि म्हणायचा.
व्रत साठी  असे काही नाही.

 

नमस्कार !

 

श्री ब्रह्मचैतन्य!

                                     ॐ        अमेरिका
                                                 25. 6 ( जून ) 2015.
                                                       गुरुवार.

ब्लॉग वाचक याना नमस्कार !
विनंति विषेश.

आज गुरुवार !
माझ्या सासरी गुरुवार सकाळी जेवून संध्याकाळी साबुदाणा खिचडी करतात.
उपवास करतात.
मी काही दिवस शुक्रवार करत असे आता कोणते च उपवास करत नाही.
गुरुवार  श्री  ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर महाराज यांचा दिवस
मानतात. तसेच दत्तगुरू यांचा दिवस मानतात.

मी  श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांचा श्र्लोक लिहित आहे.

जयाच्या जनी जन्म नामात झाला !
जयाने सदा वास नामात केला !!
जयाच्या मुखीं सर्वदा नामकीर्ति ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमुर्ति !!

     ॐ

श्री दत्त यांचा श्र्लोक
श्री गुरु देव दत्त ||

दिंगबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !1

 

 

DSCF2182

नमस्कार!

                ॐ                 अमेरिका
                                    24. 6 ( जून ) 2015.
                                        बुधवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

नमस्कार !
चेहरा कडून हात जोडून नमस्कार करतात.
पायावर डोक ठेवून नमस्कार करतात.
गुढगे वाकून नमस्कार करतात.
पाय व हात लांबून नमस्कार करतात.
समुद्र नदी मध्ये उभेराहून सूर्य व नदी समुद्र ला
नमस्कार करतात. देवा पुढे कंबर मध्ये वाकून
डोके ठेवून नमस्कार करतात
असे नमस्कार चेहरा छाती वर हात ठेवून केले जातात.

पाठीला मागील बाजूने हात नेऊन नमस्कार करतात.
थोडे अवघड आहे. पण आपले हात किती उंच व जुळले
पाठीवर व्हावयाला पाहिजे जास्त चांगल आहे.

मला पाठीवर हात उंच ठेवून जुळले कि छान वाटत.
मला ते ७३ वय ला पण पाठीला हात जुळवून नमस्कार
करता येतो. हा एक व्यायाम प्रकार आहे.

मी कोल्हापूर येथे जिना चढणे करते. झाडू केर काढणे करते.
कपडे धुणे करते सर्व व्याव्याम होतो शरीर याची हाल चाल
होते. फिरायला जाते. योग किंवा सूर्य नमस्कार करत
नसले तरी मी व माझे आरोग्य व्यवस्थित आहे.
देव पूजा साठी रामरक्षा व अर्थवशीर्ष म्हणते.
मनात श्री राम जय राम जय जय राम म्हणते.
मी पाठीला !पाठीमागून केलेला नमस्कार दाखवीत आहे.

बाकि ठिक
वसुधालय.

GetAttachment (1)

शाळा!

                         ॐ          अमेरिका
                                     23. 6 ( जून ) 2015.
                                        मंगळवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

शाळा !
भारत मध्ये इंग्रजी येण्या करता खाजगी शाळा आहेत.
त्या शाळेत आई व वडील मुलांना शाळेत घालतात.
भरपूर फी देतात. पुस्तक ईतर साहित्य पालक च खर्च करतात.
पुस्तक त्याची दुकान पण स्वत: मालक यांची असतात.
त्यांना पण पैसे मिळतात. दर वर्षी नवीन पुस्तक घेतात.
पुस्तक दुकान यांचा धंदा चालतो. स्वस्त:पालक सर्व खर्च
करत असल्या मुळे ते पुस्तक तसेच ठेवतात रध्दि त घालतात.

हिच पुस्तक मागील वर्ष असलेली मुलांना दिली तर किति तरी मूल
यांना फायदा होइल. सर्वांन नवीन सर्व आवदत असल्या मुळे
जुन कोणी घेत नाहीत.

नऊ ९ नंबर च्या सरकारी शाळेत पुस्तक व YUNIPHORM फुकट देतात.
फुकट मिळाले म्हणून ते पण एवढे मनावर घेत नाहीत तसेच रध्दि त घालतात.

अमेरिका येथे सरकार शाळा चलविते. प्रथम पुस्तक देतात.
वर्ष संपले कि पुस्तक काढून तेच पुस्तक दुसरा वर्ग यांना देतात.
पैसे वाचतात मूल शिकतात. एक च इंग्रजी असल्यामुळे इतर भाषा
शिकण्याची वेळ येत नाही.इंग्रजी यावयाला पाहिजे हट्टाहास नाही.

मी सरकारी शाळेत शिकले आहे. फक्त इंग्रजी एक विषय असायचा.
कसे तरी मार्क मिळून पास झाले. मी दहावी पास आहे.
आमच्या वेळेला H. S. C. होती.

मी शाळेत असतांना GYAMDARIMG मध्ये शिवाजी यांचे काम
केले आहे. काळी नाक सरळ त्यावेळेला छान दिसत आता वय परत्वे जाड आहे.
शिवाजी यांचा ड्रेस घातलेला मेकप केलेले छान दिसले.
कलेक्टर GYADARIMG बघायला आलेले.

आणि हो माझी आई पण बघायला आलेली.
मला वाटल मेकप घरी आवडणार नाही मी पुसू लागले.
तेवढ्यात माझी आई तेथे आली असू दे पुसू नको म्हाणाली मला
खूप बर वाटल.

सरकारी शाळा असल्या तरी अभ्यास व इतर बाबतीत प्रोच्छाहन देतात.

बाकि ठिक .
वसुधालय.

स्वागत!

                                   ॐ                 अमेरिका
                                                           22. 6 ( जून ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
कविता  !
तारिख २१. ६ ( जून ) २०१५ ला FATHER.S DAY झाला.
त्यानिमित्त पुष्कर व प्रणव यांचे वडील श्रीकांत चिवटे.
म्हणजे माझे हे नवरा यांची आठवण आली.
ते कविता चांगले लिहित असत. त्यांचे पुस्तक पण
तयार आहेत १) तुळस पाणी २ वसुधालय.
कवि संभेलन मध्ये त्यांनी स्वागत कविता लिहिली होती.
जरी पटका अंक मध्ये पण छापली आहे.
ती कविता आपणास वाचण्यास आवडेल
ह्यांची आठवण आली साठी कविता दाखवित आहे.
बाकि ठिक छान
वसुधालय.

स्वागत

शारदेच्या प्रांगणात | माय मराठीचा तोरा
पंचगंगा थबकली | झुले कळस साजिरा
महालक्ष्मी निवासिनी | थोर क्षेत्र करवीर
मराठीच्या सारस्वता | गवसले गं माहेर
अष्टविद्दा चारी कला | कष्ट हाच सामवेद
रंगताना दरबार | सान थोर नाही भेद
शारदेच्या पालखीचे | सारे ऋणाईत भोई
स्वेदगंगा शिकविते | वापरावी कशी शाई
काही लिहू गाऊ गीत | चित्र अक्षर कहाणी
जीवनाचा अनुभव | शब्द ब्रह्म ये अंगणी
राजर्षीच्या स्मरणाने | आवाहन दरबारा
पासष्टाव्या संमेलना | करु मानाचा मुजरा

Happy Father’s Day!

                                 ॐ             अमेरिका
                                                 21. 6 ( जून ) 2015.
                                                      रविवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

                      
                                                           

Happy Father’s Day !!!

जून महिना दुसरा रविवार Happy Father’s Day !!! असतो.
मी चं आता ७३ वर्ष याची आहे.
माझे वडील जरी आता नसले तरी मला
माझ्या वडील यांची आठवण येते. उंच होते. सडपातळ होते.
मला वडील यांनी कधी मारले नाही. अभ्यास करतांना काही
प्रश्र्न विचारले कि सांगत असतं. शेती बघत असे. आमची आंबराई व
गहू अशा प्रकारे शेती होती.

मी सासरी आले कि मला पत्र लिहित असत.
ते पत्र आजही मी जपून ठेवले आहे. कोल्हापूर येथे आहे.
अन मी ब्लॉग मध्ये भरपूर वेळा माझे वडील यांचे अक्षर
पत्र साठी दाखविले आहे.
आज Happy Father’s Day !!!साठि
माझ्या वडील यांचे अक्षर पत्र दाखवित आहे.
माझे वडील याचे नाव यशंवत होते
माझे वडील यांना माझा नमस्कार !

बाकि ठिक छान.
वसुधालय.

IMG_0433[2]

 

योग साधना!

              ॐ           अमेरिका
                            21. 6 ( जून ) 2015.
                                 रविवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

योग साधना !
आज २१जून आहे. आता सूर्य दक्षिणायन कडे फिरत आहे.
दक्षिणायन सुरु झाले आहे. योग पण आज च  पहिला दां
चं सर्व जग भर त्याचे प्रचार माध्यम सुरु होत आहे.
रोज योग करणारे आहेत चं

गुरु पातांजली यांनी आठ ८ सूत्र सांगितली आहेत.

१) यम – सत्य बोलावे लोकांना मनाला लागेल असे बोलू नये.
कोणाला मारू नये. खुशीने ने राहावे.
२) नियम –  कस काम कराव. स्वच्छता व निटनिटके राहायला पाहिजे.
स्वत: निट राहयला पाहिजे.
३) आसन – योगासन शारीरिक योगासन व्यायाम. 
४)  प्राणायाम –  श्र्वास कसा घ्यावयाचा श्र्वास वर ताबा ठेवायचा.
५) प्रत्यहार – वासनावर हाव याच्या पासून दूर राहणे.
शुगर असेल तर साखर न खाणे ताबा ठेवणे साखर मध्ये वासना न ठेवणे.
६) धारणा लक्ष केंद्रित करणे सर्व इंद्रिय एका ठिकाणी ठेवणे.
आपण जर वाहत पाणी पाहत असेल तर त्या कारंज कडे खूप वेळ पाहत
राहणे. शरीर भर पाणी दिसणे.
७) ध्यान – भक्ती गुरु बद्दल वाटणारी भक्ती. जो देव आवडेल तो मनात
आणून मग्न होणे सतार वाजविणे ह्यात तास तास बसने ध्यान आहे.
भाकरी निट करणे भाजणे. विणकाम करणे. सर्व ध्यान मध्ये येते.
८) समाधि – ब्रह्मांड बरोबर एकजीव होणे.

सर्व ८ सूत्र आली तरच योग साधना मिळते.

बाकि ठिक छान.
वसुधालय.

 

 

स्वस्तिक!

                                 ॐ        अमेरिका
                                            20. 6 ( जून ) 2015.
                                                     शुक्रवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
स्वस्तिक !
स्वस्तिक शुभ चिन्ह आहे.
शुभ कार्य मध्ये कुंकू पाणी घालून त्याचे स्वस्तिक करतात.
वाणी दुकान, सोन दुकानं भांडी दुकानं मध्ये स्वस्तिक चिन्ह
असते. वास्तू, व लग्न, मुंज मध्ये घरात स्वस्तिक काढतात.
जो पूजेला बसतो त्यांच्या पायावर पण स्वस्तिक काढतात.

ऑफिस मध्ये पण स्वस्तिक चिन्ह असते.

प्रणव यांच्या ऑफिस मध्ये स्वस्तिक चिन्ह आहे.
तेथे उभेराहून प्रणव चिवटे यांनी आपले छायाचित्र काढले आहे.
किती आपुलकी ऑफिस बद्दल. माझं ऑफिस आहे.
मी येथे मन लावून काम करतो सर मला मानतात याचे मनाला
स्वाभिमान आहे.

मी पण धने यांनी स्वस्तिक काढले आहे.
मी धने याचे श्री, ॐ असे चिन्ह काढले आहेत.
मनाला हलक व घर भरल्या सारखं वाटत असतं.

बाकि ठिक छान.

 

वसुधालय.

 

img_22701

मुस्लिम रमजान मासारंभ!

                         ॐ                     कोल्हापुर
                                               19. 6 ( जून ) 2015.
                                                      शुक्रवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

मुस्लिम रमजान मासारंभ !
तारिख १९ जून १०१५ साल ला रमजान मासारंभ सुरु होत आहे.
त्यांचे चंद्र पाहून रमजान मासारंभ सुरु होत असतो.
मराठी महिना मध्ये पण चंद्र पाहून महिने सुरु होत असले तरी
अधिक महिना येत असतो.
त्या प्रमाणे रमजान मासारंभ लवकर आला असे वाटत आहे.

कोल्हापूर येथे आमच्या कॉलनीत मुस्लिम यांचे वाणी याचे दुकान आहे.
इतके छान बोलतात कि मुस्लिम आहेत वाटत नाही. मला मावशी म्हणतात.

महिना नंतर शेवया ची खीर करतात. सर्वांना घरपोच देतात. मला पण देतात.

हा सन सूर्य उगवावायाच्या आधी जेवतात. दिवस भर पाणी पण पित नाहीत.
सुर्यास्ता नंतर जेवतात. एकत्र जेवण महिला पण बसून जेवण करतात.

मुस्लिम लोक मुल यांची संख्या वाढली असे तक्रार करतात.
हिंदू नि पण मुल करून आअलि संख्या वाढवावी.
हिंदू संख्या कमी होत चालली आहे असे मी वाचले आहे.
हिंदू नि पण चार / पाच मुल करून संख्या वाढवावी.

बाकि ठिक छान.
वसुधालय.

कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण!

                         ॐ           अमेरिका
                                        18. 6 ( जून ) 2015.
                                                 गुरुवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

आषाढ अधिक महिना चालू आहे मन्मथनाम संवत्सर.
शक १९३७.
कृष्ण याची पूजा करतात. भक्ती करतात.
मी चार ओळी लिहून काढत आहे कृष्ण कृष्ण !

कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण !
कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण !
कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण !
कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण !
कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण !
कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण !
कृष्ण कृष्ण  कृष्ण हरे हरे कृष्ण !
कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण !
कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण !
कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण !
कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण !

बाकि ठिक छान.
वसुधालय.

 

अधिक आषाढ शुक्लपक्ष मन्मथनाम!

                         ॐ               अमेरिका
                                        17. 6 ( जून ) 2015.
                                               बुधवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर.
विक्रम संवत् २०७१ -७२. इसवी सन २०१५ -१६.
उत्तरायण -दक्षिणायन ग्रीष्मऋतु. 
अधिक आषाढ शुक्लपक्ष.
१बुधवार प्रतिपदा. नक्षत्र आर्दा. योग गंड. करण किस्तु.
चंद्र राशिप्रवेश मिथुन. मलमासारंभ इष्टि.

अधिक महिना तीन वर्ष नंतर येतो.
इंग्रजी महिना त ३६५ दिवस तीन वर्ष नंतर फेब्रुवारी त २९
तारीख येते व ३६६ दिवस होतात. त्याप्रमाणे
मराठी महिना मध्ये पूर्ण अधिक महिना येतो व ३६६ दिवस
होतात.
पृथ्वी प्रदक्षिणा साठी अधिक महिना व दिवस मोजण्यासाठी
अधिक महिना तीन वर्ष नंतर येतो.
ॐ कृष्ण याची भक्ती करतात.

ह्या महिना मध्ये नदी व समुद्र येथे स्नान करतात.
पैसे,तांब भांड, कपडे याचे दान करतात. पोथी वाचन करतात.
मी अधिक महिना याची माहिती ब्लॉग मध्ये लिहिली आहे.
अधिक महिना मध्ये लग्न किंवा वास्तू प्रवेश करत नाहित.
अधिक महिना शुभेच्छा ! बाकि ठिक छान
वसुधालय.

जेष्ठ अमावस्या!मन्मथनाम!

                                  ॐ                 अमेरिका
                                                       16. 6 ( जून ) 2015.
                                                            मंगळवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
स्वस्ति श्रीनन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर.
विक्रम संवत् २०७१ – ७२. इसवी सन २०१५ – १६.
उत्तरायण ग्रीष्मऋतु जेष्ठ कृष्णपक्ष.
नक्षत्र मृग. योग शुल. करण चतुष्पा.
चंद्र राशिप्रवेश नं मिथुन.
मंगळवार. ३० दर्श अमावास्या. अन्वाधान.
दिवस शुभेच्छा.

अमावस्या असली कि कोल्हापूर वाहन
यांना फुल याचा हार घालतात. सूर्य याला नमस्कार करतात.
प्रणव दर अमावास्या ला त्याच्या मोटर सायकल ला हार घालतो.
आपण व आपले वाहन चांगले राहावे साठी. रिक्षा वाले पण दर अमावास्या ला रिक्षा ला
हार घालतात. पूर्वी आज अमावस्या आहे. प्रवास करू नये पद्दत असे.
कोणता हि कामास सुरुवात करत नसत. पण हल्ली वाहन याची पूजा करून
वाहन चालवितात. छान काम आहे.
बाकि ठिक.
वसुधालय

सुपर नानी!

                           ॐ              अमेरिका
                                       15. 6 ( जून ) 2015.
                                              सोमवार.
ब्लॉग वाचक याना नमस्कार !
विनंति विषेश.
अमेरिका येथे घर बसल्या T. V. त सुपर नानी सिनेमा पाहिला.
त्यात इतक मन गुंतल कि आज हि मनात सुपर नानी भरली आहे.

रेखाव कपूर जोडी आहे इतर कलाकार आहेत.
नवरा यांना आपली बायको घर सांभाळणे आपल्या पुढे चहा खाणे देणे आवडते.
सुपर नानी रेखा सर्व करत असते.
पण तिच्यात बदल होतो. घरी ज्यारमाणे राहून हि ती नाच मधील फोटो
तिचा मित्र व नातू काढतात. तिला सिनेमा त बोलावतात. खूप पुढे येते.
पण तिचे लक्ष घरी च असते. रेखा सुपर नानी घरी येते.
मुलगा सर्व पैसे खर्च करतो. मुलाला पोलीस मध्ये शिक्षा होण्यासाठी
ठेवते तरी तिच्या डोळ्यात पाणी येते. शिक्षा दिल्याने मुलाला घर कसे आहे याची जाणीव
होते. षूआऋ नानी रेखा मुलाला सोडवून आणते मुलगा सुधारतो.
मुलगी लग्न झालेल्या मुलाबरोबर प्रेम करते. लग्न करण्याची वेळ येते.
ती मुलीला तो मुलगा खर च तुज्यावर प्रेम करतो का दाखवून देते. व ते लग्न होत नाही.
पण अल्ली असे प्रकार खूप वाचण्यात येतात. मुल असलेल्या मुला बरोबर
लग्न करणे. संसार मोडून मुलीना काय मिळते. पैसे असतात तरुण असतात.
कोणी पण वय प्रमाणे मुलगा मिळू शकतो.
सून सिनेमा मध्ये काम करण्यास जाते. सुपर नानी मुळे तिला
घेतात. नवरा मैत्रीण याचे कौतुक करतो.
एवढ असतांना सुपर नानी ला रेखा ला
आवर्ड बक्षीस मिळते सुपर नानी नवरा यांना तो अवार्ड देते.

सर्व गोष्ट असली तरी समाज मध्ये अजून हि बायका
फार काम करत नाहीत. घर काम जास्त करतात. मी
पण घर काम मध्ये च गुंगते.

काही बायका ऑफिस मध्ये काम करून त्यांना प्रमोशन मिळते.
काही सिनेमा नाटक करून काम करतात. स्वत: सिनेमा काढतात.
भजन म्हणून T. V. येतात.

मी सहज घरी च मला संगणक काम्पुटर शिकविले.
माझी जीध्द मराठी ब्लॉग करते. इंग्रजी स्पेलिंग करून
मराठी करते.
आता माझे ब्लॉग २, ६०० झाले आहेत.
पत्रकार किशोर कुलकर्ण यांनी ब्लॉग वाचून वर्तमान पत्र
मध्ये छापून आणले. आता ब्लॉगवाल्या आजीबाई
वसुधा श्रीकांत चिवटे ह्यांच पण नाव घालून पुस्तक
तयार केले आहे. मी सर्व श्रेय किशोर कुलकर्णी यांना देते.
वाचन करून पुस्तक तयार केले. सोप नाही किशोर कुलकर्णी यांचे  अभिनंदन !

सांगायचं एवढ चं!
घर सांभाळनारी स्त्री महिला पण प्रगती करू शकतात आपली आवड
जोपासतात.
बाकी ठीक छान.
वसुधालय.

 

119221-rekhapti

IMG_20150506_192038

कैरी लोणचं!

                             ॐ             अमेरिका
                                        14. 6 ( जून ) 2015.
                                           रविवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
कैरी लोणचं !
भारत मध्ये जून महिना आला कि कैरी लोणचं करतात.
कैऱ्या कोयत्याने कोई सगट कापून मिळतात.
नाहीतर घरी विळी ने कोय सोडून कैरी साल व गर कापून
लोणचं करतात. केप्र किंवा बेडेकर मसाला वापरतात. मिठ घालून
ठेवतात. कोणी फोडणी देत नाही अगर कोणी फोडणी घालून
लोणचं करतात.

मी अमेरिका येथे पण जून महिना आहे व घट्ट पांढरी कैरी मिळाली आहे.
चार पाच कैऱ्या आणल्या आहेत.
मी घरीच मेथीपूड व मोहरी फूड केली आहे. मिक्सर मध्ये मस्त जाड व बारीक
केली आहे. हिंग, मीठ,  हळद, लाल तिखट सर्व एकत्र केले आहे.
तातपुरते एका कैरी चे लोणच फोडणी देऊन केले आहे.
राहिलेल्या कैऱ्या मध्ये वेळेवर मसाला घालून परत कैरी लोणचं करता
येते. अथवा लिंबू लोणच पण असाच मसाला वापरून लोणचं करता येते.

सांगायचं कि घरी मसाला केला व जून महिना मध्ये कैरी लोणच केले आहे
घरी महत्व पूर्वक आहे.
भारत मधील परंपरा येथे पण जपता येते.
बाकि ठिक छान
वसुधालय.

ब्लॉग पोष्ट २, ६०१ / 2, 601 वां.

                               ॐ             अमेरिका
                                               13. 6 ( जून ) 2015.
                                                   शनिवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
वसुधालय ब्लॉग पोष्ट २, ६०१ / 2, 601 वां.
दोन हजार, सहाशे एक वां होत आहे.
भेटी 252, 853 / २५२, ८५३
दोन लाख बावन्न हजार , आठशे त्रेपन्न भेटी आहेत.
अमेरिका येथे पण माझे लिखाण चालु आहे.
तेच पूर्विचे विषय जो आहे त्यात पूर्वी चे छायाचित्र घातले आहेत.
विषय प्रमाणे छायाचित्र तयार आहेत याचे मला माझेच एक प्रकारे
छान वाटत आहे. बैलगाडी विषय लिहिला व त्यात मातीच्या बैल
याचि पूजा करतात. मातीचे बैल दाखवून ब्लॉग केला आहे.
तसेच म्यागी व पास्ता मध्ये वाळवण साठी कुर्डाया साबुदाणा पापड मी
घरी केलेले दाखविले आहे लगेच सर्व पदार्थ हजार आहेत याचे मला
फार कौतुक व हलक वाटत आहे
येथे ब्लॉग वाचन वाचक करतात व प्रतिक्रिया देतात.
मला खूप मस्त वाटत आहे.
बाकि ठिक छान.
वसुधालय. 

बैलगाडी!

                              ॐ      कोल्हापुर
                                           12. 6 ( जून ) 2015.
                                               शुक्रवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

प्रणव चिवटे यांनी कोल्हापूर येथील
S. T. ष्ट्य़ांड जवळ सह्याद्री हॉटेल व सुरभी हॉटेल
येथील बैलगाडी चा फोटो छायाचित्र घेतले आहे.
कोल्हापूर येथे सर्र्रास गवत ने आण करण्यासाठी बैलगाडी
वापरतात राजारामपुरी येथे पण मी खूप वेळा बैलगाडी पाहिली आहे.
मस्त बैलगाडी आहे.
तसेच जून महिना व थोडा पाऊस असला तरी गुलमोहर
आहे. किती टवटवीत व मोठ्ठा आहे.
छान फोटो आहेत
जेष्ठ महिना मध्ये कोल्हापूर येथे मातीचे बैल मिळतात.
जेष्ठ पौर्णिमा ला मातीच्या बैल याची पूजा करतात
मी कोल्हापूर येथे दरवर्षी नवीन मातीचे बैल विकत घेते व पूजा अजून
पण करते यंदा अमेरिका येथे आहे.
बाकि ठिक छान
वसुधालय. 

पोट दुखणे व वात

                                   ॐ          अमेरिका
                                                11. 6 ( जून ) 2015.
                                                      गुरुवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
पोट दुखणे व वात
साधारण वय  साठ ६० नंतर पोट दुखणे सुरु होते.
आधी च्या वय मध्ये सर्व खाण्याची व पचण्याची ताकद
पोट शरीर याला असते. चालणे केले तरी पंधरा दिवसातून
पोट दुखत असते.
हरबरा डाळ कमी खावी पोळी ऐवजी भाकरी खावी.
फळ भाज्या ऐवजी पालेभाज्या हिरव्या खाव्यात.
बिस्कीट ब्रेड अजिबात खाऊ नाही.
पोट दुखल्यास ग्यास ची गोळी घ्यावी
वात मूळे पोट दुखते एकदम पोट दुखणे
ग्यास च्या गोळी मूळे थांबते.

हरबरा  डाळ परतून केलेली.
वसुधालय

बाकि ठिक छान

 

पाणी! झोप! उपवास!

                    ॐ            अमेरिका
                                      10. 6 ( जून ) 2015.
                                          बुधवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
पाणी !
पूर्वी नदी चे पाणी असायचे तांब याची भांडी अथवा
मातीचा माठ याचे भांडया तून कावडी ने पाणी आणत असतं
मातीच्या अथवा तांब्याच्या भांडया त साठवत असतं.

आता ल्याष्टीक च्या पाईप मधून पाणी नळ याला येते.
ल्याष्टीक नळ मधील पाणी न पिता घरातील तांब भांड ह्यात
रात्र भर किंवा चार पाच तास पाणी साठवून पाणी प्यावे.
तांब मधील घटक शरीर याला स्वच्छ करते. कंळक वाटत असल्यास
मातीचा माठ मध्ये पाणी साठवून पाणी प्यावे.
तसे च

आपण काय काम करतो त्या प्रमाणे झोप घ्यावी.
फार झोपू नये.

उपवास केल्याने शरीराला पोटाला आराम मिळतो उपवास जरूर करावा.
श्रावण महिना त सोमवार व ईतर उपवास येतात जेष्ठ महिना मध्ये
वट पौर्णिमा उपवास येतो. चैत्र महिना मध्ये रामनवमी उपवास येतो असे
उपवास जरूर करावेत मी सर्व उपवास करत असे शुक्रवार आठवडा मधील
करत असे. आता शुगर मूळे उपवास बंद केले आहेत.
बाकि ठिक छान
वसुधालय 

म्यागी! पास्ता!

                                       ॐ       अमेरिका
                                                9. 6 ( जून ) 2015.
                                                      मंगळवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
म्यागी ! पास्ता !
म्यागी खाऊ नाही असे सांगण्यात येत आहे.
भारत मध्ये म्यागी मध्ये काही घटक सापडले आहेत.
त्यासाठी काही प्रांत मध्ये विकण्यास बंदी केली जात आहे.
आता पास्ता याची पण तपासणी होणार आहे. मी
संगणक मध्ये सकाळ वाचत असते.
कोल्हापुर येथे मी व हे व प्रणव संध्याकाळी पाच ५ रुपये ची
म्यागी पाकिट आणत व मसाला घालून शिजवून खात असतं.
मस्त चव व पोटभर वाटत असे. तेंव्हा काही वाटले नाही.
पण वर्तमान पत्र वाचून आरे !आपण तर म्यागी खात होतो.
आता मशिन मध्ये वाळवण करून आकार देतात. विकत घेण्याचा मोह
वयस्कर लोकांना पण होतो. आणि विकत घेऊन चवीने खातात.

पूर्वी कुर्डाया, सांडगे वाळवून त्याची आमटी किंवा कुर्डया याची
म्यागी सारखे शिजवून खात असतं. कापड किंवा सुप लाकडी पाट
वाळवण साठी वापरत असतं हल्ली ल्याष्टीक कागद वर वाळवतात.
ल्याष्टीक गरम मूळे विरघळते. ते ल्याष्टीक पोटात जाते. हाहीकारक
असते. कापड पांढरे स्वच्छ असते. चांगले असते. सूर्य उन्ह मध्ये वाळवण
असते खाण्यास चांगले असते.
घरी च धान्य भिजवून वाटून शिजवून केलेले असते. त्यामुळे
ईतर मिसळ घटक वाळवण यात येत नाहीत खाण्यास निर्धास्त पणा
असतो. सूर्य उन्ह केंव्हाही चांगले आहे.
तरी सर्वांनी म्यागी वा पास्ता खातांना काळजी घेऊन खाणे बंद करावे.
घरातील भाकरी, पोळी थालीपिठ. खावीत. ज्वारी , बाजरी, चणा डाळ
याचे पीठ एकत्र करून थालिपीठ खावे. पिस्ता मैदा चा खाऊ नये.
शंकर पाळी कणिक याची करावी. मैदा व रवा ऐवजी. शेवया गहू दळून
याच्या कराव्या त्याचे म्यागी सारखे किंवा उपमा सारखे खावे. खीर खावी.
ताकद, धान्य घटक व ताकद सर्व मिळते.
मी तर मोठी आहे. स्वंयपाक करणारे यांनी लक्ष देऊन करावे.
बाकि ठिक छान
वसुधालय

 

 

भागवत!

                     ॐ    अमेरिका
                          7. 6 ( जून ) 2015.
                                 रविवार.
लॉग वाचक यांना नमस्कार !
भागवत मधील काही श्र्लोक व मराठी अर्थ. 
केदार देशपांडे यांनी पाठविले आहेत.
आपणास वाचण्याकरता मी कॉपी करून
ब्लॉग तयार केला आहे. बारीक अक्षर आहे.
मोठे होत नाही तरी वाचता आले तर उत्तम.
बाकि ठिक छान
वसुधालय.

 

AhdcD0XPdOcX_C3liuYw7FqCCi4AFI7lIS2uCqBGa_xx

संतूर वाध्य! डॉ. धनंजय दैठंकर‏

                       ॐ                अमेरिका
                                           7. 6 . ( जून ) 2015.
                                               रविवार.

ब्लॉग वाचक याना नमस्कार !
विनंति विषेश.
संतूर वाध्य !
शनिवार ला आम्ही संतूर  ऐकण्यासाठी वाद्य  व्युन्हरसिटी मध्ये
हॉल मध्ये गेलो होतो.
डॉ आयुर्वेदिक धंनजय दैठंकर‏  ह्यांनी संतूर वाध्य वाजविले आहे.
तबला साथीला कानिटकर आहेत.
संतूर मध्ये त्यांनी झपताल कलावती राग वाजविला आहे.
दोन तास संतूर वादन केले आहे.
आम्ही संतूर व तबला ऐकून तृप्त झालो आहोत.

पत्रकार अंजली यांनी व्हिडीओ घेतला आहे.
नंतर नंतर पत्रकार अंजली यांनी प्रेक्षक यांना बोलायला सांगितले आहे.
त्यात मी पण चार शब्द बोलले आहे. माझे इ मेल अंजली यांनी घेतले आहे.
चार पाच दिवस मध्ये ते मला इ मेल करून T . V . कधी कार्यक्रम व माझे
चार शध्द दाखवितील.
मी त्याचा ब्लॉग करते. C . N . L . मध्ये पाहण्यास मिळते का बघू !
संतूर वाध्य तबला आज हि डोक्यात मनात भरला आहे.
बाकि ठिक छान
वसुधालय

GetAttachment

मन काम मध्ये गुंतावे !

                                       ॐ    अमेरिका
                                                 6. 6 ( जून ) 2015.
                                                       शनिवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
स्वत : ! मन काम मध्ये गुंतावे !
ऑफिस मध्ये काम करतो. कॉलेज मध्ये शिकायला जातो.
अगदी लहानपण शाळा असली कि रामरक्षा म्हणायला शिकतो.
नातेवाईक, मित्र मंडळ, शेजार व मार्केट मध्ये बोलणे केले कि
वेळ दिवस कसा निघून जातो ते समजत नाही. आणि आपण
उद्या नक्की काही तरी काम करू. पण
उद्या कारायचे काम आज करायचे.  आजचे काम आता करायचे.
सवय असली कि आयुष्य मध्ये भरपूर काम होत असते.
उद्या , उद्या केले तर काम पण राहते आणि आयुष्य कमी कमी होत
असते
आपण स्वत : काही तरी आवड जपायला हवी ठेवायला हवी.
सतार , बासरी, रोज एक लिखाण, वाचन, ध्यान, व्यायाम एक काही
तरी मन लावून त्यात गुंतणे महत्व पूर्वक आहे.

मी पूर्वी एक एक तास सतार वाजवित असे ध्यान याचा चा प्रकार आहे.
मांडी घालुन बसणे, दोन हात मध्ये सतार वाजविने, डोक मधील स्वर
सतार मध्ये येणे मेंदू ला पण चालना मिळते. शाळेत असतांना रामरक्षा म्हणत असे.
आज पण मला रामरक्षा पाठ आहे. आता रोज एक लिखाण संगणक मध्ये
मराठी भाषा मधून करते. बसने विचार लिहिणे वाचकांना वाचायला आवडणे महत्व
पूर्वक काम माझं चालू आहे.
ईतके लिखाण केले कि वर्तमान पत्र मध्ये लेख छापून पुस्तक तयार झाले.
साधा एक लिखाण मध्ये गुंतणे आपले मन शरीर स्वच्छ मेंदू ला शिकण्याची सवय
लागते महत्व पूर्वक आहे.
तरी उद्या चे काम आज करावे. आजचे काम आता करावे.
बाकि ठिक छान.
वसुधालय.

 

५ जुन जागतिक पर्यावरण दिन ! दिन शुभेच्छा

                     ॐ                अमेरिका
                                        5. 6 ( जुन ) 2015.
                                            शुक्रवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंती विषेश.
५ . ६ ( जुन ) ला जागतिक पर्यावरण दिन !  दिन साजरा करतात.
झाडे लावा !झाडे वाढवा !शुभेच्छा.

कोल्हापुर येथे वर्तमान पत्र यांनी एका राजारामपुरी मध्ये
मुला सगट वेगवेगळी रोप झाड यांची फुकट घेऊन जाण्यासाठी
एका वर्षी ठेवली होती आम्ही कुंडी मध्ये माती घालुन वाढविली होती.
छान मोठी केली नंतर गच्ची मध्ये ठेवली वाढली.
एकदा मी आंबा कोय लावली मस्त पान हिरवी आली.
दरवर्षी रोप लावले जाते. काही टिकतात काही नाही राहत.
बाकि ठिक
वसुधालय.

संकष्ट चतुर्थी !

                              ॐ               अमेरिका
                                                5. 6 ( जून ) 2015.
                                                       शुक्रवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर.
विक्रम संवत् २०७१ – ७२. इसवी सन २०१५ – १६.
उत्तरायण ग्रीष्मऋतु
नक्षत्र पूर्व षाढा. योग शुक्ल. करण वणिज क्षय. चंद्र राशिप्रवेश नं मकर.
३ शुक्रवार संकष्ट चतुर्थी
जेष्ठ कृष्णपक्ष.
शुभेच्छा.
बाकि ठिक छान. 

गुलमोहर!

                                              ॐ             अमेरिका
                                                            4. 6  ( जून ) 2015.
                                                               गुरुवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
छायाचित्र ! फोटो !
भारत मध्ये एप्रिल व मे महिना त फाल्गुन चैत्र महिनात
गुलमोहर ची फुल येतात लाल रंग व केशरी रंग पिवळा रंग याची
असतात.
प्रणव चिवटे यांनी पिवळा गुलमोहर रंग फुल याचा फोटो
घेतला आहे सुंदर पिवळा गुलमोहर फोटो आहे.
तसेच डोंगर व हिरवळ याचा पण छायाचित्र घेतले आहे.
पाहण्यास मन गुंगून जात आहे. आपले पण छायाचित्र
पाहून मन गुंगून जाव साठी प्रणव यांनी काढलेले फोटो
दाखवित आहे.
बाकि ठिक छान
वसुधालय.

 

१) तंत्रज्ञान. २) साधना.

                                    ॐ                 अमेरिका
                                                      3. 6 ( जून ) 2015.
                                                           बुधवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

१) तंत्रज्ञान. २) साधना.

१) तंत्रज्ञान. गुरुं नां शिष्य यांनी विचारले योग व्यायाम यांनी काय मिळते.
गुरुजी खुर्ची वर बसलेले होते. खुर्ची तून उठले. आणि सांगितले कि
खुर्ची खिळे  हाताने काढा. ते खिळे हाताने निघाले नाहित. नंतर
गुरुजीं नि स्क्रू ड्रावर दिले खिळे काढण्याचे साहित्य दिले.
लगेच खिळे स्क्रू निघाले.
योग केल्या मुळे व्यायाम केल्या मूळे शरीर घट्ट होते. साठी योग
व्यायाम करावा.

ॐ योग हे आध्यात्मिक प्रगतिचे तंत्रज्ञान आहे.

२) साधना ध्यान. साठी मन शांती राहते. विचार फरफटत नाहीत.
पुढे काय होणार असं पण दिसतं साठी साधना ध्यान करावे.
मनुष्य बळकट व शांत होतो तंत्रज्ञान आणि साधना ध्यान मूळे
जरूर योग व्यायाम आणि साधना ध्यान करावे
बाकि ठिक छान
वसुधालय

मनुष्यत्म्, मुमुक्षुत्म् ,सद्गुरुकृपा.

                               ॐ             अमेरिका
                                              2. 6  ( जून ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

1) मनुष्यत्म्  . 2) मुमुक्षुत्म्.  3) सद्गुरुकृपा.

ह्या तिन प्रकार गोष्टी मिळण फार अवघड आहे.
१) मनुष्यत्म्  !
म्हणजे मनुष्य याचा जन्म येणे.
फार अवघड आहे. मनुष्य जन्म मध्ये आपण चांगले कार्य करावे.
२) मुमुक्षुत्म् शुक्षम्  !
ज्ञान मिळणे. कोणते हि विचार मनात आले कि
ते घडणे मला पुस्तक तयार करायचे होते. सहज किशोर कुलकर्णी भेटले
व माझे पुस्तक तयार झाले. इच्छा शक्ती. असते अस घडणार आहे.
३) सद्गुरु कृपा !
    गुरु मिळणे फार अवघड आहे. गुरु नां शिष्य अभ्यास साधना च्या कृपा
आवडली तर गुरु स्वत: कोणताही मार्ग दाखवून भेटतात.
मला लग्न च्या आधी गुरु माहित नव्हते पण चिवटे घराण मध्ये
ब्रह्मचैतन्य महाराज गुरु आहेत. मी पण त्यांची भक्ती करू लागले आहे.
माझी काही ईच्छा असली कि मी ब्रह्मचैतन्य महाराज यांना सांगते.
आणि हो !खर चं च माझी ईच्छा पूर्ण होते. मला फॉरीन व्हावयाच होत.
माझा मुलगा अमेरिका येथे आला. त्यानिमित्त मूळे माझे फॉरीन झाले.
मला पुस्तक तयार करायचं होत. किशोर कुलकर्णी भेटले. त्यांच्या मूळे
माझे पुस्तक तयार झाले.
माझा प्रणव यांना अरविंद व माताजीं गुरु भेटले त्याचे आता चांगले
चालले आहे.
सांगायचे असं कि
१ ) मनुष्यत्म् . २) मुमुक्षुत्म् . ३ ) सद्गुरुकृपा.
सर्व तीन ३ मिळण अवघड आहे .
मला सर्व मिळाल आहे.
सर्वांना नमस्कार.
बाकि ठिक छान
वसुधालय.

DSCF2182

कोल्हापुर चप्पल !

                                ॐ                अमेरिका
                                              1. 6 ( जून ) 2015.
                                                  सोमवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

कोल्हापुर चप्पल !
कोल्हापुर येथे पापाची टिक्ति, ताराबाई रोड.
रेल्वे स्टेशन, बस श्यांड सर्व ठिकाणी कोल्हापूर चप्पल विकत मिळते.
पापाची टिक्ति ला तर गाळ याची दुकान आहेत. लाइन न आहे.
कातड याची चप्पल आहे. चिकटवून करतात. हल्ली रबर ला कातड
चिकटवून कोल्हापूर चप्पल तयार करतात. कातडी धागा ने शिवून
पण कोल्हापूर चप्पल तयार करतात. गोंडे लाल रंग याचे लावलेले असतात.

मी खूप कोल्हापूर चप्पल वापरली आहे सध्या येथे अंभ्यकर चप्पल
वापरत आहे. मला बूट आवडत नाही. आंगठा मध्ये चप्पल पकडून
चालण्यास थाठ पणा वाटतो पायाला चप्पल पकडून चालणे
केंव्हाही चांगले आहे. हवा पायाला लागते. घाम येत नाही.
बाकि ठिक छान
वसुधालय

%d bloggers like this: