मन काम मध्ये गुंतावे !
ॐ अमेरिका
6. 6 ( जून ) 2015.
शनिवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
स्वत : ! मन काम मध्ये गुंतावे !
ऑफिस मध्ये काम करतो. कॉलेज मध्ये शिकायला जातो.
अगदी लहानपण शाळा असली कि रामरक्षा म्हणायला शिकतो.
नातेवाईक, मित्र मंडळ, शेजार व मार्केट मध्ये बोलणे केले कि
वेळ दिवस कसा निघून जातो ते समजत नाही. आणि आपण
उद्या नक्की काही तरी काम करू. पण
उद्या कारायचे काम आज करायचे. आजचे काम आता करायचे.
सवय असली कि आयुष्य मध्ये भरपूर काम होत असते.
उद्या , उद्या केले तर काम पण राहते आणि आयुष्य कमी कमी होत
असते
आपण स्वत : काही तरी आवड जपायला हवी ठेवायला हवी.
सतार , बासरी, रोज एक लिखाण, वाचन, ध्यान, व्यायाम एक काही
तरी मन लावून त्यात गुंतणे महत्व पूर्वक आहे.
मी पूर्वी एक एक तास सतार वाजवित असे ध्यान याचा चा प्रकार आहे.
मांडी घालुन बसणे, दोन हात मध्ये सतार वाजविने, डोक मधील स्वर
सतार मध्ये येणे मेंदू ला पण चालना मिळते. शाळेत असतांना रामरक्षा म्हणत असे.
आज पण मला रामरक्षा पाठ आहे. आता रोज एक लिखाण संगणक मध्ये
मराठी भाषा मधून करते. बसने विचार लिहिणे वाचकांना वाचायला आवडणे महत्व
पूर्वक काम माझं चालू आहे.
ईतके लिखाण केले कि वर्तमान पत्र मध्ये लेख छापून पुस्तक तयार झाले.
साधा एक लिखाण मध्ये गुंतणे आपले मन शरीर स्वच्छ मेंदू ला शिकण्याची सवय
लागते महत्व पूर्वक आहे.
तरी उद्या चे काम आज करावे. आजचे काम आता करावे.
बाकि ठिक छान.
वसुधालय.