म्यागी! पास्ता!
ॐ अमेरिका
9. 6 ( जून ) 2015.
मंगळवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
म्यागी ! पास्ता !
म्यागी खाऊ नाही असे सांगण्यात येत आहे.
भारत मध्ये म्यागी मध्ये काही घटक सापडले आहेत.
त्यासाठी काही प्रांत मध्ये विकण्यास बंदी केली जात आहे.
आता पास्ता याची पण तपासणी होणार आहे. मी
संगणक मध्ये सकाळ वाचत असते.
कोल्हापुर येथे मी व हे व प्रणव संध्याकाळी पाच ५ रुपये ची
म्यागी पाकिट आणत व मसाला घालून शिजवून खात असतं.
मस्त चव व पोटभर वाटत असे. तेंव्हा काही वाटले नाही.
पण वर्तमान पत्र वाचून आरे !आपण तर म्यागी खात होतो.
आता मशिन मध्ये वाळवण करून आकार देतात. विकत घेण्याचा मोह
वयस्कर लोकांना पण होतो. आणि विकत घेऊन चवीने खातात.
पूर्वी कुर्डाया, सांडगे वाळवून त्याची आमटी किंवा कुर्डया याची
म्यागी सारखे शिजवून खात असतं. कापड किंवा सुप लाकडी पाट
वाळवण साठी वापरत असतं हल्ली ल्याष्टीक कागद वर वाळवतात.
ल्याष्टीक गरम मूळे विरघळते. ते ल्याष्टीक पोटात जाते. हाहीकारक
असते. कापड पांढरे स्वच्छ असते. चांगले असते. सूर्य उन्ह मध्ये वाळवण
असते खाण्यास चांगले असते.
घरी च धान्य भिजवून वाटून शिजवून केलेले असते. त्यामुळे
ईतर मिसळ घटक वाळवण यात येत नाहीत खाण्यास निर्धास्त पणा
असतो. सूर्य उन्ह केंव्हाही चांगले आहे.
तरी सर्वांनी म्यागी वा पास्ता खातांना काळजी घेऊन खाणे बंद करावे.
घरातील भाकरी, पोळी थालीपिठ. खावीत. ज्वारी , बाजरी, चणा डाळ
याचे पीठ एकत्र करून थालिपीठ खावे. पिस्ता मैदा चा खाऊ नये.
शंकर पाळी कणिक याची करावी. मैदा व रवा ऐवजी. शेवया गहू दळून
याच्या कराव्या त्याचे म्यागी सारखे किंवा उपमा सारखे खावे. खीर खावी.
ताकद, धान्य घटक व ताकद सर्व मिळते.
मी तर मोठी आहे. स्वंयपाक करणारे यांनी लक्ष देऊन करावे.
बाकि ठिक छान
वसुधालय