आपले स्वागत आहे!

Archive for जून 14, 2015

कैरी लोणचं!

                             ॐ             अमेरिका
                                        14. 6 ( जून ) 2015.
                                           रविवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
कैरी लोणचं !
भारत मध्ये जून महिना आला कि कैरी लोणचं करतात.
कैऱ्या कोयत्याने कोई सगट कापून मिळतात.
नाहीतर घरी विळी ने कोय सोडून कैरी साल व गर कापून
लोणचं करतात. केप्र किंवा बेडेकर मसाला वापरतात. मिठ घालून
ठेवतात. कोणी फोडणी देत नाही अगर कोणी फोडणी घालून
लोणचं करतात.

मी अमेरिका येथे पण जून महिना आहे व घट्ट पांढरी कैरी मिळाली आहे.
चार पाच कैऱ्या आणल्या आहेत.
मी घरीच मेथीपूड व मोहरी फूड केली आहे. मिक्सर मध्ये मस्त जाड व बारीक
केली आहे. हिंग, मीठ,  हळद, लाल तिखट सर्व एकत्र केले आहे.
तातपुरते एका कैरी चे लोणच फोडणी देऊन केले आहे.
राहिलेल्या कैऱ्या मध्ये वेळेवर मसाला घालून परत कैरी लोणचं करता
येते. अथवा लिंबू लोणच पण असाच मसाला वापरून लोणचं करता येते.

सांगायचं कि घरी मसाला केला व जून महिना मध्ये कैरी लोणच केले आहे
घरी महत्व पूर्वक आहे.
भारत मधील परंपरा येथे पण जपता येते.
बाकि ठिक छान
वसुधालय.

%d bloggers like this: