आपले स्वागत आहे!

Archive for जून 21, 2015

योग साधना!

              ॐ           अमेरिका
                            21. 6 ( जून ) 2015.
                                 रविवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

योग साधना !
आज २१जून आहे. आता सूर्य दक्षिणायन कडे फिरत आहे.
दक्षिणायन सुरु झाले आहे. योग पण आज च  पहिला दां
चं सर्व जग भर त्याचे प्रचार माध्यम सुरु होत आहे.
रोज योग करणारे आहेत चं

गुरु पातांजली यांनी आठ ८ सूत्र सांगितली आहेत.

१) यम – सत्य बोलावे लोकांना मनाला लागेल असे बोलू नये.
कोणाला मारू नये. खुशीने ने राहावे.
२) नियम –  कस काम कराव. स्वच्छता व निटनिटके राहायला पाहिजे.
स्वत: निट राहयला पाहिजे.
३) आसन – योगासन शारीरिक योगासन व्यायाम. 
४)  प्राणायाम –  श्र्वास कसा घ्यावयाचा श्र्वास वर ताबा ठेवायचा.
५) प्रत्यहार – वासनावर हाव याच्या पासून दूर राहणे.
शुगर असेल तर साखर न खाणे ताबा ठेवणे साखर मध्ये वासना न ठेवणे.
६) धारणा लक्ष केंद्रित करणे सर्व इंद्रिय एका ठिकाणी ठेवणे.
आपण जर वाहत पाणी पाहत असेल तर त्या कारंज कडे खूप वेळ पाहत
राहणे. शरीर भर पाणी दिसणे.
७) ध्यान – भक्ती गुरु बद्दल वाटणारी भक्ती. जो देव आवडेल तो मनात
आणून मग्न होणे सतार वाजविणे ह्यात तास तास बसने ध्यान आहे.
भाकरी निट करणे भाजणे. विणकाम करणे. सर्व ध्यान मध्ये येते.
८) समाधि – ब्रह्मांड बरोबर एकजीव होणे.

सर्व ८ सूत्र आली तरच योग साधना मिळते.

बाकि ठिक छान.
वसुधालय.

 

 

%d bloggers like this: