आपले स्वागत आहे!

Archive for जून 22, 2015

स्वागत!

                                   ॐ                 अमेरिका
                                                           22. 6 ( जून ) 2015.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
कविता  !
तारिख २१. ६ ( जून ) २०१५ ला FATHER.S DAY झाला.
त्यानिमित्त पुष्कर व प्रणव यांचे वडील श्रीकांत चिवटे.
म्हणजे माझे हे नवरा यांची आठवण आली.
ते कविता चांगले लिहित असत. त्यांचे पुस्तक पण
तयार आहेत १) तुळस पाणी २ वसुधालय.
कवि संभेलन मध्ये त्यांनी स्वागत कविता लिहिली होती.
जरी पटका अंक मध्ये पण छापली आहे.
ती कविता आपणास वाचण्यास आवडेल
ह्यांची आठवण आली साठी कविता दाखवित आहे.
बाकि ठिक छान
वसुधालय.

स्वागत

शारदेच्या प्रांगणात | माय मराठीचा तोरा
पंचगंगा थबकली | झुले कळस साजिरा
महालक्ष्मी निवासिनी | थोर क्षेत्र करवीर
मराठीच्या सारस्वता | गवसले गं माहेर
अष्टविद्दा चारी कला | कष्ट हाच सामवेद
रंगताना दरबार | सान थोर नाही भेद
शारदेच्या पालखीचे | सारे ऋणाईत भोई
स्वेदगंगा शिकविते | वापरावी कशी शाई
काही लिहू गाऊ गीत | चित्र अक्षर कहाणी
जीवनाचा अनुभव | शब्द ब्रह्म ये अंगणी
राजर्षीच्या स्मरणाने | आवाहन दरबारा
पासष्टाव्या संमेलना | करु मानाचा मुजरा

Happy Father’s Day!

                                 ॐ             अमेरिका
                                                 21. 6 ( जून ) 2015.
                                                      रविवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

                      
                                                           

Happy Father’s Day !!!

जून महिना दुसरा रविवार Happy Father’s Day !!! असतो.
मी चं आता ७३ वर्ष याची आहे.
माझे वडील जरी आता नसले तरी मला
माझ्या वडील यांची आठवण येते. उंच होते. सडपातळ होते.
मला वडील यांनी कधी मारले नाही. अभ्यास करतांना काही
प्रश्र्न विचारले कि सांगत असतं. शेती बघत असे. आमची आंबराई व
गहू अशा प्रकारे शेती होती.

मी सासरी आले कि मला पत्र लिहित असत.
ते पत्र आजही मी जपून ठेवले आहे. कोल्हापूर येथे आहे.
अन मी ब्लॉग मध्ये भरपूर वेळा माझे वडील यांचे अक्षर
पत्र साठी दाखविले आहे.
आज Happy Father’s Day !!!साठि
माझ्या वडील यांचे अक्षर पत्र दाखवित आहे.
माझे वडील याचे नाव यशंवत होते
माझे वडील यांना माझा नमस्कार !

बाकि ठिक छान.
वसुधालय.

IMG_0433[2]

 

%d bloggers like this: