पत्र लिखाण!
ॐ अमेरिका
29. 6 ( जून ) 2015.
सोमवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.
पत्र लिखाण !
पत्र लिहितांना प्रथम मध्य भागी
श्री अथवा ॐ अथवा देव याचे नाव लिहितात.
उजव्या बाजूस तारीख पत्ता अथवा गाव याचे नाव
लिहितात. हल्ली टेलिफोन नंबर लिहितात.
नंतर मित्र, सौ आई व वडील यांना
मित्र असेल तर प्रिय व मोठे कोणी असेल तर
राजमान्य राजश्री साष्टांग नमस्कार.
विनंति विषेश.
नंतर आपला मजकूर लिहायचा
बाकि ठिक, मजेत, क्षेम असे काहीतरी शब्द लिहितात.
नंतर प्रिय मित्र अथवा आपला मुलाचे नाव
अथवा सौ मुली चे नाव लिहितात
पत्र पूर्ण करतात.
बाकि ठिक छान
वसुधालय.
ॐ अमेरिका
२९.६ ( जून ) २०१५.
सोमवार
चिरंजीव राजमान्य राजश्री प्रणव यांना आशीर्वाद.
माझी तब्येत छान आहे. मी रोज फिरायला जाते.
लोकरीचे टोपी चे विणकाम करते.
आज बिनिस श्रावण घेवडा याची शेंगदाणा कुट
घालून व पांढरा कांदा बारिक चिरून शिजवून भाजी केली आहे.
रामरक्षा म्हणते.
आपण कसे आहात !
बाकि ठिक छान
आपली आई.