आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 3, 2015

भाकरी चा पिज्जा!

                                ॐ             अमेरिका
                                                  3. 7 ( जुलै ) 2015.
                                                         शुक्रवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

बाजरी चा भाकरी चा पिज्जा !
मी प्रथम बाजरीच्या चार पाच भाकरी केल्या.
ओव्हन भांड काढले. त्यात याल्युमिनीयम कागद ठेवला.
त्यात बाजरी ची भाकरी भाजलेली ठेवली.
सॉस टम्याटो लावले. त्यात चिरलेले लाल टम्याटो ठेवले.
कांदा लांब चिरलेला ठेवला. हिरवा फ्लावर चिरून ठेवला.
हिरवी मिरची बारीक घातली खर तर ढोबळी मिरची पण चालते.
अननस फोडी घातल्या.
चीज घातले. ओव्हन मध्ये ठेवले ओव्हन चालू केला.
१२ बारा मिनिट ठेवले. मत सर्व भाज्या शिजल्या.
कापडी हात याने बाहेर काढले.
लोणच मसाला मेथी मोहरी लाल तिखट मीठ
बरोबर बाजरी चा पिज्जा खाल्ला मस्त कडक
अननस गोड आंबट चांगली चव लागली.
मुख्य म्हणजे
बाजरी चा भाकरी चा पिज्जा असल्यामुळे पचण्यास त्रास
झाला नाही. पोट दुखले नाही.
मैदा मूळे पोट दुखते.
मी सर्व पिज्जा केला आहे.
मला भाकरी चा पिज्जा करतांना
उच्छाह व मन भरून येत आले.
घरी पण सर्वांनी बाकरी चा पिज्जा खाल्ला आहे.
त्या साठी एक मन तृप्तता वाटत आहे.
बाकि ठिक छान.
वसुधालय.

%d bloggers like this: