आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 6, 2015

मोबाईल फोन!

                        ॐ             अमेरिका
                                     6. 7 ( जुलै ) 2015.
                                          सोमवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विषेश.

मोबाईल फोन !

मोबाईल फोन वाहन चालवितांना बंद करावा.
मोटर सायकल फास्ट चालविली जाते.
कार पण फास्ट चालविली जाते.
एकदम फोन ची बेल घंटा वाजली कि
माणूस घाबरून फोन कोठे आहे बघतो व
बोलण्यास सुरु करतो. बाकी चे वाहन अन
मागे पुढे असतात. आपण जर मध्ये थांबलो तर
इतर वाहनांना पण त्रास होतो.

हल्ली फिरायला व्यायाम करातांना दंड याला
मोबाईल फोन लावतात.
व्यायाम स्वत: साठी असतो त्या वेळेला तरी आपण
मन लावून शांत चित्त याने फिरायला पाहिजे.
तर च तो व्यायाम शरीर मध्ये घुसतो.
व लाईट वर चार्ज केलेला फोन असल्यामुळे
शरीर व्यायाम करतांना चांगले स्वच्छ होत नाही.
गाणी ऐकत वा कोणाबरोबर बोलत बसणे
व्यायाम होत नाही.
पूर्वी रेडीओ त गाणी अथवा बातम्या ऐकत फिरत असतं.
ते पण चांगल नाही.

एकट्याने फिरणे देव याचे नाव घेणे मन शांत फिरणे.
असा व्यायाम खरा.
घरी पद्मासन घालणे, वज्रासन घालणे. पाठी मागून
नमस्कार करणे एकट्याने मन चित्त ठेवून व्यायाम
ध्यान करणे महत्व पूर्वक आहे. पोथी वाचन करून
इतका वेळ एक चित्त बसणे व्यायाम ध्यान आहे.

बाकि ठिक छान.
वसुधालय.

ॐ कोल्हापुर येथे पाऊस असतांना छत्री घेऊन
मि चालत असतांना मी रोड व पाऊस याचा फोटो घेतला आहे.
मी मोबाईल फोन वापरत नाही,

%d bloggers like this: