आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 11, 2015

स्वत:मनाची साधना!

                             ॐ               अमेरिका
                                             11. 7. (जुलै ) 2015.
                                                     शनिवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

मनाची साधना !
लहान वय मध्ये अभ्यास करून दहावी १० पास होण
केवढा अभ्यास आहे ही पण स्वत: ची मनाची साधना आहे.
M. COM ., M. A. व M. S. C. कॉलेज ची डिग्री मिळविण हि पण मनाची
साधना आहे.
वय याचे साठ ६० वर्ष पूर्ण नोकरी एका ऑफिस मध्ये करणं हि
तर फारच मोठी अध्यान्मिक साधना आहे. शरीर वर्षान वर्ष काम
करू शकत ऑफिस ला जाणे लिहिणे साहेब यांच्या बरोबर विचार मांडणे
लिहिणे फार महत्व पूर्वक काम आहे.
याला च स्वत: ची साधना म्हणतात. इतके काम आपल्या कडून वर्ष न वर्ष
केले आहे याची च मनाची साधना पावती आहे.
तसेच फळ वाले भाजी वाले एका ठिकाणी बसून गिऱ्हाईक बरोबर
गोड बोलून माल विकणे हि पण मनाची साधना आहे.
तसेच गृहिणी वर्षान वर्ष जेवण स्वंयपाक करण आप्त मित्र यांची
देखभाल करण मूल मोठ्ठी करण हि पण मनाची साधना आहे.

आयुष्य हेच मन काम उद्योग याची मनाची साधना आहे
देव पूजा गुरुं पूजा त्यात रमण लिहून काढण हि पण आयुष्य मधील
मनाची साधना आहे.
सर्वजन आयुष्य मध्ये काम करून स्वत: ची साधना मिळवितात.

ॐ भावाचं शिक्षण करतात. बहिण यांच लग्न करून देतात.
आई व वडील यांना सांभाळतात. अशा प्रकारे आयुष्य मधील
साधना चं आहे. पुंडलिक याने आई व वडील यांची सेवा केली.
विठ्ठल भेटायला आले तर विट याच्या वर उभे राहण्यास सांगितले
आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हणतात.
त्या प्रमाणे माणूस सर्व सायुष्य मध्ये सर्वांना सांभाळून
आयुष्य मध्ये साधना स्वत: ची करतो.

बाकि ठिक छान.
वसुधालय.

%d bloggers like this: