आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 12, 2015

विठ्ठल विठ्ठल!

                           ॐ         अमेरिका
                                           12. 7 ( जुलै ) 2015.
                                              रविवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
पंढरपूर ! विठ्ठल !
विठ्ठल विठ्ठल हरी नामाचा गजर !
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल !

मी पंढरपूर पाहिले आहे. विठ्ठल व रखुमाई यांचे दर्शन
करून नमस्कार केलेला आहे. आम्ही गेलो होतो तेंव्हा
गुलाब फुल याचा हार छान मोठ्ठा मिळाला व तुलसी चा
पण हर मिळाला आम्ही विठ्ठल यांना दिला.

मी आषाढ व कार्तिक महिना त वारी बरोबर गेले नाही.
पण आम्ही कोल्हापूर येथेइसवी सन  १९६७ साली आलो
शाहूपुरी येथे भाड देऊन घरात राहत होतो.
असेच वारी च्या दिवसात मी एकटी घरी होते
मुल व्हावयाची होती. हे ऑफिस मध्ये गेलेले.
एक वयस्कर बाई काठी घेऊन आल्या व म्हणाल्या
मी पंढरपुर ला जाणार आहे. मी माझ्या जवळ चे
१० दहा पैसे दिले त्या काळ मध्ये १० पैसे भरपूर असायचे.
एवढ झाल मी विसरून गेले. त्या काळ मध्ये फोन नव्हते.
दोन दिवस झाले व माझी बहिण कमलताई ह्याचे कार्ड आले.
सौ वहिनी ( माआता झी सौ आई व सौ इंदिरा काकू पंढरपूर ला
वारी बरोबर निघाल्या आहेत.
पत्र वाचून मला खूप मन भरून आलं ! दोन दिवस पूर्वी च
मी एका बाई नां वारी साठी दान केले. व लगेच च आपल्या
घर मधून सौ आई व सौ काकू विठ्ठल वारी जात आहेत याच उच्छाह
ने मन भरलं ! सर्व खर आहे. !

आता आई पण नाहित व काकू पण नाहीत पण
त्यांची आठवण विठ्ठल वारी साठी येत आहे.

सध्या दोन चार वर्षा पूर्वी माझे चुलत बहिण भाऊ
केदार देशपांडे व शैलजा धाट विठ्ठल वारी ला जाऊन
आले आहेत.

मी तुळस यांनी विठ्ठल लिहिले आहे.
व पुंडलिक वरदा हरी विठ्ठल रांगोळी ने
कोल्हापूर येथे पूर्वी लिहिले आहे.
ते दाखवित आहे.

 

img_01801

%d bloggers like this: