आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 27, 2015

ॐ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ।।

                                     ॐ                   अमेरिका
                                                           27. 7. ( जुलै ) 2015.
                                                              सोमवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

ॐ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ।।

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल    हरी नामाचा गजर ।।

 

स्वस्ति श्रीमनृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर.
विक्रम संवत् २०७१ – ७२ इसवी सन २०१५ – १६.
दक्षिणायन ग्रीष्मऋतु ११सोमवार. नक्षत्र अनुराधा योग ब्रह्मा
करण वणिज चंद्र राशिप्रवेश वृश्चिक.
शयनी एकादशी चातुर्मास्यारंभ पंढरपूर यात्रा.

एकादशी दर पंधरा दिवस ने येते पण आषाढ व कार्तिक महिना मधील
एकादशी ला फार महत्व आहे आषाढ मध्ये पाऊस पडून पेरणी
केलेली असते. शेतकरी विठ्ठल यांना पंढरपूर येथे पायी दिंडी बरोबर जाऊन
विठ्ठल यांना सांगतात माझे पिक धान्य निट येऊ दे प्रार्थना करतात.
नमस्कार करतात
कार्तिक महिना मध्ये माझं पिक धान्य चांगल आल आहे सांगण्यासाठी
परत पायी दिंडी बरोबर पंढरपूर येथे विठ्ठल यांना सांगतात माझे पिक धान्य
चांगले आले आहे आपल्या कृपेने साठी नमस्कार करतात.
एकूण विठ्ठल भक्त शेतकरी जास्त असतात. पूर्वी शेती हाच व्यवसाय असायचा.
आता भरपूर व्यवसाय आहेत.
विठ्ठल यांना नमस्कार.

 

आपण!

                                     ॐ             अमेरिका
                                                     26. 7 ( जुलै ) 015.
                                                           रविवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

आपण !

आपण स्वत: आयुष्य मध्ये काय पाहिले आहे.
गुरुं आदर का आहे.आई व  वडील नातेवाईक
यांच्या बद्दल आदर कसा वाटतो आपण त्यांच्या बद्दल वागण
कस व्यक्त करतो. देव यांना आपण नमस्कार का करतो
आपल्या ओळखीच्या लोक यांच्या बद्दल वाटणार मन कस व्यक्त करतो.
सर्व मी ब्लॉग मध्ये लिहिले आहे.
अमेरिका येथे इंग्रजी येत नसतांना पण जनसमुदाय हेलो म्हणतात !
मी येशु गुरुं बद्दल बरीच माहिती लिहिली आहे त्या साठी माझ्या मनात
आदर प्रेम निर्माण झाल आहे साठी मी का नमस्कार करते अस लिहील आहे.
विठ्ठल देव यांना तुळस आवडते बद्दल मी मनोभावे तुळस प्रदक्षिणा घालत असे.
तसेच एकादशी पण केलेली आहे वर्षभर व कार्तिक आषाढ महिना मधील साठी
विठ्ठल यांना देव यांना मानून मी तुळस लावून विठ्ठल लिहिले आहे. कोल्हापूर येथे
महालक्ष्मीयंत्र ! चे चित्र विकत मिळते ते मी पाहून काढलेले आहे याचे मनात भरते साठी
मी नमस्कार करते. अमेरिका येथे मी फिरतांना नमस्कार करते. कोणता हि देश असो
भावनिक मन व आपण डोळे यांनी बघतो साठी नमस्कार केला जातो. दुसरा देश बघन
मध्यम स्त्री ला अवघड असत. मला ते मिळाल साठी मी नमस्कार करते.
ब्लॉग वाचक यांना पण मी नमस्कार करते लिहिते. एवढ लिखाण वाचतात सोप नाही. व
प्रतिक्रिया पण लिहितात. कधी कधी मी त्यांचाच ब्लॉग मध्ये आपण प्रतिक्रिया दिली
नाही चौकशी करते छान उत्तर येतात.
आपण म्हणाल नमस्कार करा योग करा पण स्वत: साठी करा. देखावा किंवा
लोकांना दाखविण्यासाठी करू नका.
पण जे घडत ते सहज व निर्मळ असतं व जनासुदाय आदरा पूर्वक बघून विचार पूस करतात.
आपण पण अस योग व देवा च पुस्तक वाचव असा मनात येत
अस वाईट नाही पण
जास्त शो किंवा दाखविणे वाईट आहे असे नाही
असो
बाकि ठिक छान.
वसुधालय

IMG_20150506_192038

%d bloggers like this: