गुरुंपौर्णिमा!
ॐ अमेरिका
31. 7. ( जुलै ) 2015.
शुक्रवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर.
दक्षिणायन ग्रीष्म ऋतु. निज आषाढ शुक्लपक्ष.
आषाढ अधिक महिना आला आहे. साठी
निज आषाढ शुक्लपक्ष म्हणतात.
१५शुक्रवार नक्षत्र उत्तरा षाढा, योग प्रीति, करण बालव.
चंद्र राशिप्रवेश मकर.
व्यासपूजा, गुरुंपौर्णिमा संयासिना चातुर्मासारंभ.
मी माझे सतार शिक्षक नंदा कुलकर्णी व श्रीयंत्र पूर्ण करा
सांगणारे प्रोफेसर भास्करे सर व संगणक सर्व शिकविणारे
माननिय R. Y. DESHPANDE व प्रणव चिवटे व पुष्करचिवटे.
व पुस्तक तयार करणारे किशोर कुलकर्णीयांना मी मना पासून मानते.
मी खूप शिकले. व मोठ्ठी पण जगात मानानं जगत आहे.
आज एवढ काम माझ्या कडून सर्व या गुरु मूळे जमल आहे.
लहान थोर असले तरी ते गुरुं आहेत.
सर्वांना नमस्कार !
तसेच मी श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांना मानते मला काही मनात आल
कि मी ब्रह्मचैतन्य गुरुं नां सांगते ते माझी इच्छा पूर्ण करतात.
जयाच्या जनी जन्म नामात झाला ||
जयाने सदा वास नामात केला ||
जयाच्या मुखी सर्वदा नामकिर्ती ||
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती ||
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुदेर्वो महेश्र्वर: |
गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ||