ॐ अमेरिका
12. 8.( ऑगष्ट ) 2015.
बुधवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विशेष.
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर.
दक्षिणायन ग्रीषऋतु निज आषाढ कृष्णपक्ष.
बुधवार शिवरात्रि.
संतनाम देव पुण्य तिथी.
संत नाम देव यांना नमस्कार.
मी ब्लॉग मध्ये संत नामदेव यांचे खूप अभंग लिहिले आहेत.
त्यातील अभंग लिहित आहे.
बाकि ठिक. छान.
वसुधालय.
ॐ
संत नामदेव
संत नामदेव विठ्ठल भक्त होते
संत नामदेव व संत ज्ञानेश्र्वर ज्ञानेश्वर एकत्र तीर्थ यॆथेला निखाले होते
आणसी गया प्रयाग असे फिरत आवंढा नागनाथ येथे आले शंकर यांचे
स्थान आहे येथे समता नामदेव यांनी कीर्तन करायचे ठरविले ईश्र्वर
चरणी सेवा करायचे ठरविले
महादेव यांना वंदना करून कीर्तन याला सुरुवात केली
पुष्कळ लोक आले होते कीर्तन त लोक ऐकण्यात गुंग न गेले झाले
एवढ्या तकांही ब्राह्मण आत आले व त्यांनी समता नामदेव यांना कीर्तन
करण्यास थांबविले लोक काय हरकत आहे विठ्ठल काय महादेव काय एकच
देव आहे ब्राह्मण म्हणाले विठ्ठल च्या दारी जाऊन विठ्ठल याचे काय गोडवे
गायचे ते गां ब्राह्मण ऐकानात व लोक ऐकेनात
देऊळ याच्या मागच्या बाजूला जाऊन खुशाल कीर्तन करा असे ब्राह्मण यांनी
सांगितले
संत नामदेव यांनी ब्राह्मण यांना नमस्कार केला व संत नामदेव मागच्या बाजूला
देऊळ येथे कीर्तन करू लागले लोक पण तेथे आले
कीर्तन करतां करतां नामदेव इतके तल्लीन झाले !की देऊळ च फिरले विठ्ठल ]
भक्ती
नाआषाढ मदेव यांची वाढली कि नामदेव यांची आर्ततेची हाक ऐकून
देऊळ पूर्व दिशा असलेले नामदेव यांच्या कडे बाजूला झाले देव शंकर यांनी
नामदेव यांच्या कडे समोर येऊन ठाकले राहिले आता सुध्दा फिरलेले देऊळ आहे तसे आहे
ब्राह्मण यांना शंकर यांची पूजा केल्या नंतर कांही गडबड आहे वाटले व शंकर यांचे देऊळ फिरले समजले
नंतर ब्राह्मण पण समता नामदेव यांच्या विठ्ठल भक्त कीर्तन याला बसले .
ॐ
श्री नामदेव गाथा
श्रीज्ञानेस्वरांची आदि
[ ८७२ ]
जगत्रयजीवन अंतर्निष्ठ ज्ञान | तरी संतासीं शरण रीघिजे भावें || १ ||
हेचि भक्ति ज्ञान वैराग्याचे निधी | विवेकेंसीं बुद्धि (बुध्दी) नांदे माझी || २ ||
हे श्रवणाचे श्रवण माननाचे मनन | हेचि निजध्यासन वैरग्याचे || ३ ||
म्हणोनि बैसलों संताचे संगती | गोविंदा विश्रांति गहिनीनाथ || ४ ||
[८७३ ]
बैसोनि एकांतीं गुरुगम्य गोष्टी | वेदांत परिपाठी शास्त्र बोध || १ ||
नित्यशुध्दबुध्द निर्विकार पूर्ण | उमेसी जें ज्ञान शिव सांगे || २ ||
तेचि सच्चिदानंद साकार जीव प्राण | शरीर जाय क्षीण जयापरी || ३ ||
तेंचि हें १सर्व विठोबाचें नाम | निराईस प्रेम गहीनीनाथीं || ४ ||
१ सर्वत्र (बा.)
ॐ
श्री नामदेव गाथा
[४४३ ]
१ विनजापूर (पं .व शि.)
दानें तपें व्रतें बळी | तोही घातला पाताळीं |
अद्दापि राहिला जवळी | चरणतळीं पद देऊनी || ११ ||
रेणापुरीं देवी रेणुका | लाधली जमदग्नीस देखा |
तिचें उदरीं विश्वतारका | परशुराम जन्मला || १२ ||
असुरीं वधीयेली माया | म्हणे धांवे पुत्रराया |
अवचित पातला धांवया | सहत्रार्जुन मारिला || १३ ||
अयोध्या नाम नगरी | जन्म कौसल्ये उदरीं |
देवभक्तांचा कैवारी | दशरथ नंदन राघव || १४ ||
राम त्रिलोक्यीं वीर दारुण | तेणें वधियेला रावण |
अढळपद देऊन | राज्यीं बिभीषण स्थापिला || १५ ||
मथुरा नामें नगरी | वसुदेव देवकी उदरी |
कृष्ण आठवा अवतारी | लीलाविग्रहि जन्मले || १६ ||
कंस चाणूर मदिंले | विमलार्जुन उन्मळिले |
सप्त गर्भांचे सूड घेतले | रक्षियेले गाई गोपाळ || १७ ||
बौध्द श्रीवत्साच्या घरीं | जन्म शांभवीच्या उदरीं |
राजा कांतिये नगरीं | निरंतर रूपें राहिला || १८ ||
ध्यान मुद्रा मांडूनियां | वत्रें शस्त्रें त्यजुनियां |
राहिला पैं निरंजनिया | भक्तीभाव ओळखे तो || १९ ||
१ कल्कि जसरायाचा पुत्र | सावित्री देवीचा कुमर |
२ शंभलापुरीं करील अवतार | दाहीं रूपें प्रगटला || २० ||
ऐसा अमूर्त मूर्ति विटेवर | उभा राहिला निरंतर |
विष्णुदास नाम्याचा दातार | विठ्ठल पंढरीये ||२१ ||
१ कलंकी (शि .) २ सिगलपुरी (शि.) शिंगळापुरी (पं .)
ॐ
श्री नामदेव गाथा
श्रीविठ्ठलस्तुती आणि भक्तवत्सलता
[ ४४३ ]
होसि भक्तांचा कोंवसा | तुझीं ब्रीदें हृषिकेशा |
निवविलें सायासा | कृपासिंधु सुरारी || १ ||
अंबऋषिकारणें | दहा वेळ गर्भवासा येणें |
अवतार धरिला नारायणें | १गजापूर नगरीं || २ ||
अंदुरायाच्या घरीं बाळ जनसेनाच्या कुमरीं |
मत्स्य रूप अवतार धरीं | वेद हरनकैवारी नारायण || ३ ||
विद्दापूर नगरीं | अंधरू राजा राज्य करी ||
श्रियादेवी त्या सुंदरी | उदरी कुमरु जन्मला || ४ ||
पृथ्वी रसातळवटीं | जातां थोर आंदोळली सृष्टी |
धांवण्या धांविन्नले जगजेठी | धरा पृष्ठीं सांवरिली || ५ ||
मर्गजपुरीं पुरपती | हिरण्याक्ष चक्रवर्ती |
अग्नि असे जनवंती | घरी बाळावराह || ६ ||
त्रिदशदेवश्रिया चाडा | हिरण्याक्ष वधिला गाढा |
भूगोल धरूनियां दाढा | केला निवाडा स्वर्गींचा || 7 ||
कर्पूरपूरपाटण | हरिभक्तीचें हें स्थान |
सदयादेवी प्रिया नंदन | उदरीं नृसिंह जन्मला || ८ ||
पित्या पुत्रा जाली कळी | स्तंभी प्रगटला तये वेळीं |
असुर मारिला करकमळीं | भक्त प्रल्हाद रक्षिला || ९ ||
कश्यपनंदनवर्धन | कोवळादशेचा वामन |
खुजट रूप धरून | महेंद्रपुरीसी आला || १० ||

ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
Like this:
Like Loading...