आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 9, 2015

रविवार!

                                ॐ            अमेरिका
                                                9. 8. ( ऑगष्ट ) 201.
                                                        रविवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

आज रविवार.
सूर्य यांचा वार !
सूर्य ला नमस्कार.
रोज सकाळी सूर्य उगवला कि मी सूर्य याला आकाश याला
नमस्कार करते. येथे पण मी सूर्य याला नमस्कार करते.
कोल्हापूर येथे ग्यालरीत उभे राहिले कि सूर्य
याच्या कडे ब उगवता उगवता पाहून नमस्कार करते.
सर्वांना सूर्य याचा मंत्र पाठ असतो. बायका निं म्हणू नाही
असं म्हणतात. पण मी म्हणते.
रांगोळी ने लिहिते कागद वर  स्केच पेन ने लिहिते.
छान मन भरून येतं माझं !

बाकि ठिक. छान.
वसुधालय.

 

अगस्ती ऋषी! नमस्कार.

                                 ॐ                अमेरिका
                                                     8.8. ( ऑगष्ट ) 2015.
                                                          शनिवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विशेष.

अगस्ती ऋषी !
नमस्कार.

अगस्ती ऋषीं चा जन्म कुंभात झाला.
मित्रा – वरुणी त्यांचे वडील.
अग्नी व वायु यांचे अवतार.
अकोला येथे पूर्वाश्रमी च्या दंडकारण्य व
आजचा आदिवासी तालुका च्या ठिकाणी
प्रवरा उर्फ अमृतवाहिनी च्या तीरावर
निसर्गरम्य परिसरावर
अगस्ती ऋषीं नीं आपला आश्रम उभारला.
कावेरी व सुवर्णमुखरी ( प्रवरा ) नद्दा
अगस्ती ऋषीं मूळे भूमी वर अवतरल्या.

ब्रह्मास्त्र बाण रामास भेट याच आश्रम मध्ये
अगस्ती ऋषी नी दिला.
राम व सीता व लक्ष्मण
यांची भेट अगस्ती ऋषी ची भेट झाली.
वैशाख शुध्द चतुर्थी राम व रावण युध्द
पश्र्चात जाते वेळी परत मारुती सोडून
पुष्कक विमान आश्रम मध्ये उतरून
अगस्ती ऋषीं चें दर्शन घेतले.

शंकर व पार्वती यांनी तीन दिवस याच
आश्रम मध्ये वास्तव्य केले होते.

माझा जन्म अगस्ती ऋषी घराणा मध्ये झाला आहे.
माझ्या सौ वहिनी सौ सुनिती देशपांडे अकोला शहर
मधील माहेर घर आहे.
त्या साठी सहज मी आज
अगस्ती ऋषी बद्दल लिहित आहे. सर्व
माहिती संगणक मध्ये मिळाली आहे.

बाकि ठिक. छान.
वसुधालय.
 

agasti aashram

              अगस्ती ऋषी  आश्रम

 

download (1)

%d bloggers like this: