कोल्हापूर महाद्वार रोड
ॐ 29.9. 2015.
भाद्रपद कृष्णपक्ष महिना
कोल्हापूर
गणपति बाप्पा चि मिरवणुक
महाद्वार रोड
गणपति बाप्पा मोरया पुढच्या वार्षि लवकर या.
ॐ 29.9. 2015.
भाद्रपद कृष्णपक्ष महिना
कोल्हापूर
गणपति बाप्पा चि मिरवणुक
महाद्वार रोड
गणपति बाप्पा मोरया पुढच्या वार्षि लवकर या.
ॐ तारिख 27. 9. ( सप्टेबंर ) 2015.
भाद्रपद शुक्लपक्ष
ब्लॉग वाचक यांना नमस्कार
भाद्रपद शुक्लपक्ष प्रोष्ठपदी पौर्णिमा २७ तारीख ला आहे. रविवार आहे
पण चंद्र ग्रहण २८ सप्टेबंर ला सोमवार ला आहे.
मी चंद्र ग्रहण याची रांगोळी काढली आहे ती दाखवित आहे.
बाकि ठिक. छान.
वसुधालय.
ॐ सूर्य चंद्र याच्या मध्ये पृथ्वी येते चंद्र ग्रहण लागते.
चंद्र
ॐ अमेरिका
28.9.( सप्टेबंर ) 2015.
सोमवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
सौ शीतल शिंदे पारिजातक नाव देऊन ब्लॉग लिहित आहेत.
त्या नियमित वसुधालय ब्लॉग वाचन करतात.
मी बरेच दिवस ब्लॉग लिखाण केले नाही तर लिखाण का आले नाही
काळजी ने विचार पूस करतात.
त्यांच्या ब्लॉग मध्ये त्यांनी वसुधालय आजीबाई वसुधा बद्दल
आपुकीने छान लेख लिहिला आहे त्याची कॉपी मी
घेऊन माझ्या वसुधालय ब्लॉग मध्ये लिहित आहे.
बाकि ठिक. छान.
वसुधालय.
ब्लॉग वाल्या आजीबाई…….वसुधा चिवटे ……
थोड्याच दिवसात हे पुस्तक प्रकाशित होवून दुकानामध्ये असेल. आजीबाईंच कौतुक कराव तेवढं कमीच ..वयाच्या सत्तरीत असताना संगणक शिकून स्वतःचा ब्लॉग तयार केला….रोजच्या व्यवहारातले असे काही …रांगोळी, स्वयंपाक , सतार वाजवणे, व्यायाम करणे , न चुकता ह्या सगळ्या गोष्टी त्या ब्लॉगवर लिहायच्या . खरतर त्यांचा ब्लॉग वाचून आणि ते सातत्य पाहूनच मलाही ब्लॉग लिहायची तीव्र इच्छा झाली. तशी ती आधी हि होतीच ….पण …काय लिहायचं ? कसं लिहायचं ह्या विचाराने कधी काही लिहिलं नाही .
वासुधालय हा ब्लॉग वाचला …अतिशय सरळ, साधी सोपी भाषा , अगदी नेहमी बोलतो तसच लिखाण केलं होत. रोज काढलेल्या रांगोळ्या, अगदी साधी आमटी केली असेल तरी सुद्धा त्यात लिहिले होते. पोस्टची संख्या वाढवण्यासाठी हे नक्कीच नव्हतं …सराव …सतत सरावाने परिपूर्णता येते…संगणकाचा सराव होण्यासाठी ….त्या प्रयत्न करत राहिल्या ….म्हणूनच या वायात त्यांनी इतका छान ब्लॉग बनवला ..त्याला साजेसं नाव दिलं …वसुधालाय ….वसुधाच घर …आणि खरोखर त्या नावाला शोभेल असाच ब्लॉग बनवला आहे.
मी रोजच्या रोज घरी ……आज आजी बाईनी अमुक लिहिलं …तमुक लिहिलं असं सांगत असते . कधी कधी त्यांनी लिहिलेल्या पाकृती घरी करून बघते …खास करून ज्वारीच्या पिठाची धिरडी …खूप आवडीने खातात आमच्या घरी. जमेल तसे सणाचे महत्व …त्यादिवशी घरात काय करायचे, पूजा कशी करायची हि माहिती सुद्धा त्यांच्या ब्लॉग मध्ये लिहितात. ऋतू विषयी , जगात कुठे काय घडते याची सुद्धा नोंद ब्लॉग मध्ये तारखेनिशी केलेली आहे. वासुधालय ब्लॉग पुढच्या पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे .. आजींचे खूप खूप धन्यवाद !!!!
त्यांच्या ब्लॉग ची दखल जळगावातील किशोर कुलकर्णी यांनी घेतली आणि ब्लॉग वाल्या आजीबाई हे पुस्तक त्यांनी छापलं . वसुधा आजींच खूप खूप अभिनंदन .
नमस्कार !!
तुम्ही कशा आहात . तब्येत बरी आहे न ? बरेच दिवस काही post नाही लिहिली.
तुम्ही कोल्हापूरला परत जाताना मुंबईत भेटू …पार्लेश्वर मंदिरात ….
मी फोन करीन तुम्हाला …
काळजी घ्या ..
शीतल शिंदे
ॐ सौ शीतल शिंदे पारिजातक नमस्कार वाटलं चं मला आपण माझे लिखाण नाही साठी काळजी करीत असणारं ! पण काय आहे विषय च नाही काही लिहिण्यास काय लिहू रांगोळ्या पण भरपूर काढून झाल्या आहेत माझी तब्येत चांगली आहे काळजी करू नका अगदी घर च्या लेकी सारखी माझी काळजी घेता मला चांगल वाटत मी ठीक आहे आपण व आपले घरचे व मुली यांना नमस्कारआजीबाई
ॐ
. . . जय मंगलमूर्ती
जयदेव जयदेव जय वक्रतुंडा |
सिंदुरमंडित विशाल सरळ भुजदंडा || धृ ||
प्रसन्नभाला विमला करिं घेऊनि कमला |
उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलिला |
रुणझुण रुणझुण करिती घागरिचा घोळा |
सतार सुस्वर गायन शोभित गणलीला || १ ||
जयदेव . . .
सारीगमपधनी सप्तस्वरभेदा |
धिमकट धिमकिट मृदंग वाजतिगति छंदा |
तातक तातक ऐश्या करिसि आंनदा |
ब्रह्मादिक अवलोकिति पदारविंदा | || २ ||
जयदेव . . .
अभयवरदा सुखदा राजिवदलनयना |
परशांकुशलडुडूधर शोभित शुभरदना |
ऊर्ध्वदोंदल उंदिर कार्तिकेश्र्वर रचना |
मुक्तेश्र्वर चरणाबुजिं अभिपरि करि भ्रमणा || ३ ||
जयदेव . . .
मुक्तेश्र्वर
( गणपति गुणपती संग्रहातून )
महाराष्ट्र टाइम्स १ सप्टेबंर २००३ .
३१ ऑगस्ट २००३ .
बुधवारी ३ सप्टेबंर २००३
सांजवात
ॐ
माघ शुक्लपक्ष ला गणपति चा वाढदिवस जन्म दिवस असतो
भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी 4 / ४ ला व्यास मुनि ऋषि ऋषी निं महाभारत
लिहिण्यास सांगितले ते गणपति ने अक्षर मध्ये लिहिले
व्यास ऋषी नीं डोळे मिटून सांगितले दहा / १० / 10 दिवस लागले
दहा वा दिवस ला व्यास मुनि ऋषि निं डोळे उघडले तर
गणपति चे तापमान ताप वाढलेले दिसले
साठि व्यास ऋषि मुनि निं अनंत चतुर्दशी ला गणपति ला नां पाण्यात ठेवले टाकले
साठि 10 / १० दहा दिवस ला गणपति पाण्यात टाकतात विसर्जन करतात
कथा आहे मी नुकते च वाचले भरपूर रूप गणपति चे आहेत शुक्लपक्ष भाद्रपद चतुर्थी ला
पण जन्म दिवस आहे
आणि बाळ गंगाधर टिळक यांनी भारत जागृत करण्या करता उच्छव सुरु करून
भाषण देण्या साठि गणपति उच्छव सुरु केले साजरे केले तं
नमस्कार काही असो सर्व पार १०० / 100 / शंभर वर्ष पासून प्रथा
भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी ते शुक्लपक्ष
अनंत चतुर्दशी पर्यंत देव व
साजरे होतात पार पडतात
ॐ
एकदन्ताय विघ्न्म्ये वक्रतुण्डाय धिमही ।
तन्नोदन्ति प्रचोदयात ।।
ओम ॐ
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ :।
निर्व्हीग्नम कुरमेदेव सर्व कार्येषु सर्वदा ।।
ॐ
ॐ ग गणपते नम : ।।
नमस्कार
ॐ
गणपति
भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी
गणपति चा जन्म दिवस आहे.
शंकर शिव महादेव बाहेर गेले होते.
पार्वति स्नान करण्याच्या आधि आपला मळ याचा
गणपति तयार केला. व मी आंगोळी ला जाते
कोणास आत येऊ देऊ नकोस असे गणपति ला
सांगितले.
शिव महादेव शंकर बाहेर हून आले गणपती ने त्यांना आत
जाण्यास अडविले राग याचा भरात शंकर यांनी गणपती चे
शीर मुंडके उडविले. व आत आले.
पार्वती ने जेवण्यास दोन ताट घेतली दुसरे कोणाचे ताट शंकर यांनी विचारले
गणपती दारात बसले त्यांचे आहे सांगितले आरे आपण तर त्याचे शीर तोडले
पार्वती खूप वाईट वाटून घेत होती नंतर कोण दिसेल त्याचे शीर लावण्यात येईल
असे करून हत्ती चे शीर मुंडके लावले व गणपती जिवंत झाले.
साठी आज चा दिवस आहे तो दिवस भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी चा आहे
साठी गणपति चा वाढ दिवस गणेश जयंती साजरी करतात.
नवीन तयार रूप झाले साठी दहा १० दिवस उच्छव करतात.
बाळ गंगाधर टिळक यांनी हा उच्छव साजरा करण्याचे ठरविले आहे.
तसेच माघ शुक्लपक्ष चतुर्थी ला पण गणेश जयंती साजरी करतात
गणपति यांनी रूप घेतली आहेत.
गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया
बाकि ठिक. छान.
वसुधालय.
ॐ
ॐकार वंदना
भद्र भाद्रात प्रथमईशा लवूनी करतो वंदना
तू शिवांकित गौरीवंदन पूर्ण साकार कामना
दैवभास्करा कमलावरा मी करितो आवाहना
रत्नजडीत किरीटधारी पूर्ण तूं चंद्रानना
सूर्यप्रभा नयाने झरे तोषविसी या मना
स्वरूप सुंदर कर्ण गजसे कर उदार सज्जना
ॐकार उदरा मूषकधारा वर्णनी जो माईना
सकल विद्दा जाणिता तो सकल कला संयोजना
अंतरीचे रूप मोहक सारखे लुचते मना
तूंच इच्छा तूंच कर्ता तूंच साक्षात विश्वना
विश्वातले मांगल्य तूंची साकार व्हावे पूजना
भद्र भाद्रात प्रथम ईशा लवूनी करतो वंदना
२४.८.९० श्रीकांत चिवटे
सर्व ओळीत शेवटी ना आले आहे.
ॐ अमेरिका
17. 9.( सप्टेबंर ) 2015.
गुरुवार.
भाद्रपद महिना.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
भाद्रपद शुक्लपक्ष श्री गणपती गणेश चतुर्थी.
गणपती ची एकशे आठ नाव घेऊन दुर्वा वाहतात.
मी गणपती स्तोत्र लिहिले आहे संगणक मध्ये
संस्कृत लिहिणे आवघड पण मी अथर्वशीर्ष पण लिहिले आहे.
मला माझ्या मनाला खूप छान वाटत आहे आपल्याला
संस्कृत संगणक मध्ये लिहिता आले आहे याचे.
मी गणपती स्तोत्र बारा नाव नारद उवाच लिहिले तर आहेच
पण संगणक मध्ये टेप व्हीडीओ तयार केला आहे.
मला मस्त मन भरून चांगल वाटत आहे.
आपण
व्हीडीओ ऐकावा सदिच्छा !
बाकि ठिक. छान.
वसुधालय.
ॐ
श्रीपाद श्रीवल्लभ
श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी ला झाला.
गणेश चतुर्थी ला झाला.कृष्ण-यजुर्वेद शाखा आपस्तंब सूत्र,
भारव्दाज गोत्रोद् भव ब्रह्मश्री घंडिकोटा अप्पालराज शर्मा आणि
महाराणी सुमतीदेवी यांच्या पोटी झाला. या अवताराची माहिती
गुरुचरित्रात, पाच,आठ,नऊ.व दहा या चार अध्यायात आलेली आहे.
श्रीवल्लभ स्वामींचा काळ इ.स.१३२० ते १३५० असा तीस वर्षाचा आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ यांनी कुरवपूर येथे जरी वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी
कृष्णेत अदृश्य होऊन आपले जीवित कार्य समाप्त केले असलेतरी ते भक्तां ची
आजही काळजी घेतात.त्यांना दर्शन देतात.अशी भक्तांची श्रध्दा आहे.
हि सर्व माहिती तरुण भारत कोल्हापूर दिनांक १९ सप्टेंबर पान नंबर ४ मध्ये आहे.
ॐ
॥ श्री गणपतिस्तोत्रं ॥
॥ श्री गणेशाय नाम: ॥
॥ नारद उवाच ॥
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ॥
भत्त्कावासं स्मरेन्नित्यमायु: कामार्थसिध्दये ॥१॥
प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं व्दितियकमं ॥
तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥
लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ॥
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टममं ॥३॥
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकमं ॥
एकादशं गणपतिं व्दादशं तु गजाननमं ॥४॥
ॐ
व्दादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: ॥
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकरं प्रभो ॥५॥
ॐ
विविद्दार्थी लभते विद्दां धनार्थी लभते धनम् ॥
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थि लभतेगतिमं ॥६॥
जपेद्गणपतिस्तोत्रं षड्र्भिमासै: फलं लभेत् ॥
संवत्सरेण सिध्दि च लभते नात्र संशय: ॥७॥
अष्टभ्यो ब्राःमनेभयश्र्च लिखित्वा य: समर्पयेत
तस्य वि द्द। भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत:॥ ८ ॥
॥ ॐ ॥
॥ ईति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम
श्रीगणपति स्तोत्रं संपुर्णमं ॥
ॐ
ॐ भद्रं कर्णे भी: शृ णुयाम देवा भर्दं
पश्येमाक्षभिर्यजत्रा: ।
स्थिरै रंगै स्तुष्टुवांस्तनु भि र्व्य शे म देवहितं
यदायु: ॥
ॐ स्वस्ति न इन्दो वृ ध्दश्र वा: स्वस्ति न: पूषा
विश्र्ववेदा: ।
स्वस्ति नस्ता र्क्ष्यो s अरिष्टनेमि: स्वस्ति नो
बृहस्पतिर्दधातु ॥
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ॥
अथ श्रीगणे शाथर्व शी र्ष व्याख्यास्याम: ।।
ॐ नमस्ते गणपतये ।
त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि ।।
त्वमेव केवलं कर्ता s सि ।।
त्वमेव केवलं धर्ता s सि ।।
त्वमेव केवलं हर्ता s सि ।।
त्वमेव सर्व खल्विदं ब्रह्मासि ।।
त्वं साक्षादात्मा s सि नित्यमं ।।१।।
ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ॥ २ ॥
अव त्वं मा म् । अव वक्तार म् ।
अव शरोतार म् । अव दातार म् ।
अव धातार म् । अवानूचानमव शिष्य म् ।
अव पश्चात्ता त् । अव पुरस्ता त् ।
अवोत्तरात्ता त् । अव दक्षिणात्ता त् ।
अव चोर्ध्वा त्ता त् । अवाधरात्ता त्
सर्वतो मां पाहि पाहि समंता त् ॥ ३ ॥
त्वं वाड्. मयस्त्वं चिन्मय: ॥
त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममय: ॥
त्वं सच्चि दानंदाव्दितियो s सि ॥
त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासि ॥
त्वं ज्ञानमयो ज्ञानमयो s सि ॥ ४ ॥
सर्व जगदिदं त्वत्तो जायते ॥
सर्व जगदिदं तत्त्वस्तिष्ठति ॥
सर्व जगदिदं त्वयि लयमेष्यति ॥
सर्व जगदिदं त्वयि प्रत्येति ॥
त्वं भूमिरापो s निलो नभ: ॥
त्वं चत्वारि वाकपदानि ॥ ५ ॥
त्वं गुणत्रयातीत: ॥
त्वं अवस्थात्रायातीत: ॥
त्वं देहत्रयातीत: || त्वं कालत्रयातीत: ॥
त्वं मूलाधारस्थतोsसि नित्यं ॥
त्वं शत्कित्रयात्मक: ॥
त्वं योगिनो ध्यायंति नित्यं ॥
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं
रुद्रस्त्वं इ द्रस्त्वं अग्निस्त्वं
वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं
ब्रह्मभूर्भुव: स्वरोमं ॥ ६ ॥
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतर म् ॥
अनुस्वार: परतर: ॥
अर्धैन्दुलसितं ॥ तारेण ऋध्द म् ॥
एतत्तव मनुस्वरूप म् ॥ गकार: पूर्वरूप म् ॥
अकारो मध्यमरूप म् ॥
अनुस्वारश्र्चां त्यरुप म् ॥
बिम्दुरुत्तररुप म् ॥ नाद: संधान म् ॥
संहिता संधि: । सै षा गणेशवि द्या ॥
गणक ऋ षी: ॥ नि चट् द् गाय त्री छंद: ॥
गणपतिर्देवता ॥
ॐ ग गणपतेय नम: ॥ ७ ॥
ॐ
गणपत्यथर्वशीर्ष
एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नो दन्ति: प्रचोदया त् ॥ ८ ॥
ॐ
एकदन्तं चतुर्हस्तं पाशमंकुशधारि ण म् ॥
रदं च वरदं हस्तै र्बि भ्रा णं मु ष कध्वज म् ॥
रत्त्कं लंबोदरं शूर्पकर्णकं रत्त्कवासस म् ॥
रत्त्कगंधानुलि प्तांगं रत्त्कपुष्पै: सुपूजित म् ॥
भक्ता नुकंपिनं देवं जगत्कारणमच्युत म् ॥
आविर्भूतं च स्ट ष्टया दौ प्रकृते: पुरषात्पर म् ॥
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर: ॥९ ॥
ॐ
नमो व्रातपतये नमो ग ण पतये नम:
प्रथमपतये नमस्ते अस्तु लंबोदरायै कदं ताय
विघ्ननासिने शिवसुताय
वरदमूर्तये नम: ॥ १० ॥
ॐ
एतदथर्व शी र्ष यो s धीते ॥
स ब्रह्मभूयाय कल्पते ॥
स सव्रवुघ्नैर्न बाध्यते ॥
स सर्वत: सुखमेधते ॥
स पंचम हापापात्प्रमुच्यते ॥
सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति ॥
सायं प्रात: प्रयुंजानो s अपापो भवति ॥
सर्वत्राधियानो s पविघ्नो भवति ॥
धर्मार्थकाममोक्षं च विंदति ॥
एदमथार्वशी र्षमशी ष्याय न देयं ॥
यो यदि मोहाधास्यति dhya
स पापीया न्
स पापीया न् भवति ॥
सहस्त्रावर्तना त् ॥
यं यं काममधीते
तं तमनेन साधये त् ॥ ११ ॥
ॐ
अनेन गणपतीम भि षिं च ति ॥
स वाग्मी भवति ॥
चतु र्थ्यामनश्रनजपति स वि द्द।वा न् भवति
इ त्यथर्व ण वाक्य म् ॥
ब्रह्माद्द।वर णं विद्द। त् ॥
ण बिभेति कदाचनेति ॥ १२ ॥
ॐ
यो दूर्वांकु रै र्यजति ॥
स वै श्रव णोपमो भवति ॥
यो लाजैर्यजति स यशोवा न् भवति ॥
यो मेघावा न् भवति ॥
यो मोदक सहस्त्रे ण यजति स
वां छितफलमवाप्नोति ॥
य: साज्यसमिध्दिर्यजति स सर्व लभते स
सर्व लभते ॥ १३ ॥
ॐ
अष्टो ब्राह्म णा न् सम मया ग्र्गा हयित्वा
सूर्यवर्चस्वी भवति ॥
सूर्यग्रहे महान द्यां प्रतिमासं निधौ वा जप्त्वा
सधद मंत्रो भवति ॥
महाविघ्ना त्प्र त्मुच्यते ॥
महादोषा त्प्र मुच्यते ॥
महापापात्प्रमुच्यते ॥
स सर्ववि ध्दवति ससर्वविध्दवति
य एवं वेद ॥ १४ ॥ इत्युपनिष त् ॥
ॐ
ॐ सहनाववतु ॥ सहनौ भुनत्कु ॥
स ह वी र्य करवाव है ॥
तेजस्वि ना व धी त म स्तु मा विव्दि षाव है ॥
ॐ
ॐ भद्रं कर्णे भी: शृ णुयाम देवा भर्दं
पश्येमाक्षभिर्यजत्रा: ।
स्थिरै रंगै स्तु ष्टु वां स्तनु भि र्व्य शे म देवहितं
यदायु: ॥
ॐ स्वस्ति न इन्दो वृ ध्दश्र वा: स्वस्ति न: पूषा
विश्र्ववेदा: ।
स्वस्ति नस्ता र्क्ष्यो s अरिष्टनेमि: स्वस्ति नो
बृहस्पतिर्दधातु ॥
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ॥
ॐ इति सार्थ श्रीग णप त्य थ र्व शी र्ष समाप्त म् ॥
ॐ अथर्वशीर्ष मला पाठ आहे.
पोथी वाचल्या मूळे जीभ चांगली वळते उच्चार स्पष्ट होतात.
ॐ
१०८ दूर्वा समर्पण करणे – अष्टोत्तरशतनामावलि म्हणणे –
अस्य श्रीविघ्नेश्र्वराष्टोत्तरशत – दिव्यनामामृत – स्तोत्रमंत्रस्य, गृत्समद ऋषि : गणपतिद्रेवता,
अनुष्टुप् छंद : ग बीजं नं शक्ति :, मं कीलकम्, श्रीसत्यविनायकप्रसादसिध्यर्थं दूर्वाकुरार्पणे विनियोग:
| ॐ विनायकाय नम : | ॐ विघ्नराजाय नम : | ॐ गौरीपुत्राय नम :
| ॐ गणेश्र्वराय नम : | ॐ स्कंदाग्रजाय नम : |ॐ अव्ययाय नम :
| ॐ पूताय नम : | ॐ दयाध्यक्षाय नम : | ॐ व्दिजप्रियाय नम : | ॐ अग्निगर्वच्छदे नम : ||१० ||
ॐ इंद्रश्रीप्रदाय नम : | ॐ वाणीबलप्रदाय नम : | ॐ सर्वसिध्दिमते नम :
|ॐ शर्वतनयाय नम : | ॐ शिवप्रियाय नम : | ॐ सर्वात्मकाय नम : | ॐ सृष्टिकर्त्रे नम :
| ॐ देवानीकार्चिताय नम : | ॐ शीवाय नम : | ॐ शुध्दाय नम : ||२०||
ॐ बुध्दिप्रियाय नम : | ॐ शांताय नम : | ॐ ब्रह्मचारिणे नम : | ॐ गजाननाय नम :
| ॐ व्दैमातुराय नम : | ॐ मुनिस्तुताय नम : | ॐ भक्तविघ्नविनाशनाय नम :
| ॐ एकदंताय नम : | ॐ चतुर्बाहवे नम : | ॐ चतुराय नम : ||३० ||
ॐ शक्तिसंयुताय नम : | ॐ लंबोदराय नम : |ॐ शूर्पकर्णाय नम :
| ॐ हेरंबाय नम : | ॐ ब्रह्मवित्तमाय नम : | ॐ कालाय नम : ॐ ग्रहपतये नम :
|ॐ कामिने नम : | ॐ सोमसूर्याग्निलोचनाय नम : | ॐ पाशांकुशधराय नम : ||४० ||
ॐ चम्दाय नम : | ॐ गुणातीताय नम : | ॐ अकल्मषाय नम :
| ॐ स्वयंबध्दाय नम : | ॐ सिध्दार्चित -पदांबुजाय नम : | ॐ बीजपूरप्रियाय नम : |
ॐ अव्यक्ताय नम : | ॐ वरदाय नम : | ॐ शाश्र्वताय नम : | ॐ कृतिने नम : || ५० ||
ॐ विव्दत् – प्रियाय नम : | ॐ वीतभयाय नम : | ॐ गदिने नम : | ॐ चक्रिणे नम :
| ॐ इक्षुचापघृते नम : | ॐ अजोत्पलकराय नम : | ॐ श्रीशाय नम : | ॐ निरंजनाय नम :
| ॐ श्रीपतिस्तुतिहर्षिताय नम : | ॐ कुलाद्रिभ्रुते नम : ||६० ||
ॐ जटिने नम : | ॐ चंद्रचुडाय नम : | ॐ अमरेश्र्वराय नम : | ॐ नागोपवीतिने नम :
| ॐ श्रीकंठाय नम 😐 ॐ रामार्चितपदाय नम : | ॐ व्रतिने नम : | ॐ स्थुलकंठाय नम :
| ॐ त्रयीकत्रे नम : | ॐ सामधोशप्रियाय नम : ||७० ||
ॐ अग्रगण्याय नम : | ॐ पुरुषोत्तमाय नम : | ॐ स्थूलतुंण्डाय नम :
| ॐ ग्रामण्ये नम 😐 ॐ गणपाय नम : | ॐ स्थिराय नम : | ॐ वृध्दिदाय नम :
| ॐ सुभगाय नम : | ॐ शूराय नम : | ॐ वागीशाय नम : || ८० ||
ॐ सिध्सिदाय नम : | ॐ दुर्वाबिल्वप्रियाय नम : | ॐ काम्ताय नम :
| ॐ पापहारिणे नम : | ॐ कृतागमाय नम : | ॐ समाहिताय नम : | ॐ वक्रतुंडाय नम :
| ॐ श्रीप्रदाय नम : | ॐ सौम्याय नम : | ॐ भक्तकांक्षितदात्रे नम : || ९० ||
ॐ अच्यताय नम : | ॐ केवलाय नम : | ॐ सिध्दिदाय नम :
| ॐ अच्चिदानंदविग्रहाय नम : | ॐ ज्ञानिने नम : | ॐ मायायुताय नम :
| ॐ दांताय नम : | ॐ ब्रह्मिष्ठाय नम : | ॐ भयविर्जिताय नम : | ॐ प्रमत्तदैत्यभयदाय नम : || १०० ||
ॐ व्यक्तमूर्तये नम : | ॐ अमूर्तिकाय नम : | ॐ पार्वतिशंकरोत्संगखेलनोत्सवलालसाय , नम :|ॐ समस्तजगदाधाराय नम 😐 ॐ वरमूषकवाहनाय नम 😐 ॐ हृष्टचित्ताय नम : |
ॐ प्रसन्नात्मने नम : | ॐ सर्वसिध्दिप्रदायकाय नम : || १०८ ||
अनेन अष्टोत्तरशतनामभि: दुर्वांकुरार्पणेन श्रीसत्यविनायक : प्रियताम् न मम |
ॐ
श्रीहरतालिकेची आरती
जय देवी हरतालिके | सखी पार्वती अंबिके ||
आरती ओवाळीते | ज्ञानदिककळीके ||धृ o ||
हरअर्घांगीं वससी | जाशी यज्ञा माहेराशी ||
तेथें अपमान पावसी | यज्ञ कुंडी गुप्त हौसी || जय O ||१||
रिघसी हिमाद्रीच्या पोटीं | कन्या हौसी तुं गोमटी | उग्र तपश्र्चर्यामोठी |
आचरसी उठाउठी ||जय O ||२||
तापपंचाग्री साघनें | घुमृपाने अघोवदने ||
केलीं बहु उपोषणें | शंभु ब्रताराकारणें ||जय O ||३||
लीला दाखाविसी द्दष्टी | हें व्रत करिसी लोकासाठिं ||
पुन्हां वरिसी घुर्जटी | मजा रक्षावें संकटीं ||जय O ||४||
काय वर्णुं तव गुण | अल्पमती नारायण | मातें दाखवी चरण चुकवावें जन्ममरण ||जय देवी O ||५||
मी लग्ना आधी हरतालिका याचा उपवास पाणी न पिता केला आहे. माझं सर्व मनासारखं झाल आहे.
ॐ
ऐका हरतालिके, तुमची कहाणी !
एके दिवशी ईश्र्वरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती.
पार्वतीनं शंकराला विचारलं, ” महाराज, सर्व वृतांत चांगलं असं व्रत कोणतं ?
तेव्हा शंकर म्हणाले,” जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहांत सूर्य श्रेष्ठ, चार वरणात
ब्राह्मण श्रेष्ठ, देवांत विष्णू श्रेष्ठ, नाद्दांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरतालिका हे
व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे.”ते तुला सांगतो.तेंच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस
आणि त्याच पुण्याई नं तूं मला प्राप्त झालीस.ऐक.हे व्रत भाद्रपद महिन्यांतल्या
पहिल्या तृतीयेला करावं . पूर्वी तूं ते कसं केलंस तें मी तुला आतां सांगतो.
” मी तुला प्राप्त व्हावं म्हणून तूं लहानपणी मोठं तप केलंस.
चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस.थंडी,पाऊस, ऊन हीं
तिन्हीं दु:ख सहन केलीस.हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दु:ख झालं,
आणि अशी कन्या कोणास द्दावी ? अशी त्याला चिंता पडली.इतक्यात तिथं
नारदमुनी आले,हिमालया नं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं.
तेव्हा नारद म्हणाले, ” तुझी कन्या उपवर झाली आहे,ती विष्णूला द्दावी.
तो तिच्यायोग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे.
म्हणून इथं मी आलो आहे.”
हिमालयाला मोठा आनंद झाला.त्यानं ही गोष्ट कबूल केली.
नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले.त्यांना ही हकीकत
कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले.
नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली.
ती गोष्ट तुला रुचली नाही.तूं रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं
रागावण्या चं कारण विचारलं. तेव्हा तूं सांगितलंस, ‘महादेवावांचून
मला दुसरा पती करणे नाहीं, असा माझा निश्र्चय आहे.” असं असून माझ्या
बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे.ह्याला काय उपाय करावा ?
मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस
पडली.जवळ च एक गुहा आढळली त्या गुहेंत जाऊन तूं उपवास केलास.तिथं माझं
लिंग पार्वतीसह स्थापिलंस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुध्द तृतीया चा
होता. रात्रीं जागरण केलसं, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं, नंतर मी तिथं आलों.
तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हानालीस,” तुम्ही माझं पती व्हावं,
याशिवाय दुसरी इच्छा नाही,”
नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो.पुढं दुसऱ्या दिवशी ती
व्रतपूजा तूं विसर्जन केलीस.मैत्रीणींसह त्याचं पारणं केलंस. इतक्यांत
तुझा बाप तिथं आला.त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं.
मग तूं सर्व घडलेली हकीकत त्याला सांगितलीस.पुढं त्यानं तुला मलाच
देण्याचं वचन दिलं व तुला घेऊन तो घरी गेला.मग कांही दिवसांनी
चांगला मुहूर्त पाहून त्यानं तुला मला अर्पण केलं.अशी या व्रतानं तुझी
इच्छा पूर्ण झाली.याला हरतालिका-व्रत असं म्हणतात.
याचा विधी असा आहे.
” ज्या ठिकाणी हें व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं.
केळीचे खांब लावून तें स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून
पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारें त्याची पूजा
करावी आणि मनोभावें प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री
जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो.साती जन्माचं
पातक नाहीसं होतं.राज्य मिळतं.स्त्रियांच सौभाग्य वाढतं. या दिवशी
बायकांनी जर कांहीं खाल्लं, तर त्या जन्मावाम्ध्या व विधवा होतात.
दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो.कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण
द्दावं.दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं.”
ही साठां उत्तरांची कहाणी, पांचा उत्तरीं,देवाब्राह्मणाचे
व्दारी, गाईचे गोठी, गोठीम, पिंपळाचे पारीं सुफळ संपूर्ण.
ॐ
भूप – आलाप
( रे ) पं धं सा रे , रे
पं धं सा रे धं s अ रे रे
पं s अ धं , पं s अ सा, धं s रे, रे धं रे s सा
( विलंबीत गत )
ताल – त्रिताल १६ मात्रा
१२ १३ १४ १५ १६
ग s ग रे सा सा ग रे ग सा रे रे सा रे
१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११
प s प s ग रे s रे ग प s प ध प ग रे s रे सा
[ ९ १० ११ ]
ग ध ध प ग ग रे सा
तोडा १ ) ८ मात्रे पासून ध सासा ध सा ध प ग, ग पप ग प ग रे सा
१२ मात्रे गत घेणे
तोडा २ ) ८ मात्रे पासून गत सा सासा ध प ग रे सा , सा सासा ध प ग रे सा
१२ मात्रे पासून गत घेणे
तोडा ३ ) सा रेरे ग प ध सा सासा धप , ग पप ध प ग रेरे सा
सा रेरे ग प ध सा सासा धप , ग पप ध प ग रेरे सा
ग रेरे सा ग रेरे सा ग रेरे सा
१२ मात्रे पासून गत घेणे
तोडा ४ ) समे पासून
प धध सा रे सा ध प , ग पप ध प ग रे सा
प धध सा रे सा ध प , ग पप ध प ग रे सा
रे गग रे ग s रे s ग s प
रे गग रे ग s रे s ग s प
रे गग रे ग s रे s ग s प
समे पासून गत येते घेणे
तोडा ५ ) समे पासून
सा धध सा ध प ध सा प धध सा ध पध सा
ध पप ध प ग प ध ग पप ध प ग प ध
प गग प ग रे ग प रे गग प ग रे ग प
ग रेरे ग रे सा रे ग , सा रे रे ग रे सा रे प
सम येते समे पासून गत घेणे
तोडा ३ ) सम पासून
ग गग रे सा प पप ग रे , सा सासा ध प ग रे सा
सा सासा ध पं ग रे सा / -कालावून गत घेणे
तोडा ४ ) सम पासून घेणे ,
सा रेरे सा रे ग , ग पप ग ध प , ध सासा ध प ग
रे सासा रे सा रे ध सा धध सा ध प . धं पप ध प ग
प गग प ग प ग रे ग रेरे ग रे ग रेरे सा / – कालावून गत घेणे
ॐ
भूप राग मी सतार शिकाले तेंव्हा खूप वेळा वाजविला आहे
रियाज केला आहे आता संगणक मध्ये लिहून काढण्याचा
प्रयत्न केला आहे पेस्ट मध्ये खाली वर झाला आहे तरी समजत तसं !
ॐ अमेरिका
14. 9. 2014.
सोमवार.
भाद्रपद महिना.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विशेष.
तारिख दिनांक १४. ९. ( सप्टेबंर ) २०१५.
हिंदी भाषा दिन ! दिवस आहे.
फेस बुक मध्ये वाचले आहे.
मी चार शब्द हिंदी लिहिण्याचा प्रयंत्न करत आहे.
ॐ
मेरा नाम वसुधा चिवटे है।
मै भारत देश कि नागरिक है।
मुझे मै भारत कि नागरिक है ।
इसलिये मुझे स्वाभिमान ।अभिमान है।
हिंदी भारत देश कि राष्ट्रभाषा है।
हिंदी लिखना और बात करना जरूर आना चाहिये।
किसान और सैनिक जवान जय को मै बहुत मानती हूं ।
आज किसान नही तो धरणी पर पका हुआ धान्य किसान हि देता है।
किसान धान्य पेरकर फल पेरकर जमीन पर उपर लाता है।
और सब देश और दुनिया को खाने के लिये देता है।
लोग खाकर खुश होते है।और शरीर शे बढे होते है।
धरणी पर किसान का सब जीवन चलता है।
जय किसान । जय धरणी । जय भारत । जय दुनिया ।
जय किसान ।जय जवान ।
सब ठिक. अच्छा.
वसुधालय जी ।
ॐ अमेरिका
13. 9.( सप्टेबंर ) 2015.
रविवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
वसुधालय ब्लॉग पोस्ट 2, 701 / २७०१ वां
दोन ,हजार सातशे एक वां ब्लॉग पोस्ट होत आहे.
भेटी 246,028 / २४६,०२८
दोन लाख शेचाळीस हजार , शुण्य अठ्ठाविस आहेत.
मी लिखाण करते मला पटेल व माझ्या वर्तमान पत्र मधील
माहिती पूर्ण वाचून करते. तसेच सण याची माहिती लिहितांना
मी बैल पोळा साठी माती चे बैल याची पूजा केलेली घरातील फोटो
सगट माहिती देते. सर्व श्रावण महिना ची माहिती पूजा घरातील
फोटो सगट माहिती देते. घरातील वाढ दिवस असले कि घरातील
फोटो सगट माहिती देते.
माझे तरुण पण चे व आता वयस्कर चे पण फोटो लावत असते.
माझे आई व वडील काका काकू सौ वहिनी भाऊ बहिण
ईतर नातेवाईक चे पण माझ्या ब्लॉग मध्ये फोटो आहेत.
सासर चे पण फोटो आहेत ब्लॉग मध्ये
एवढा सर्व चित्र सगट ब्लॉग कारण सोप नाही.
जपणूक केलेली आहे ती ब्लॉग निमित्त सर्व लिखाण
होऊन लिहिली जात आहे. साधी जुनी पाटी कशी ठेवली व भिंगरी
पतंग ची याचे च छान वाटत आहे. मी जर संगणक शिकले नसते तर
मी केलेली जपणूक नुसती च राहिली असती लिखाण निमित्त व सर्वांना
आवडणार व जपणूक करावी उच्छाह देणारी असे लिखाण करून
दाखवित आहे.
असे पण म्हणणारे आहेत तुमच्या वस्तू तुमचे जेष्ठ लोक आम्हाला काय
करायचे.
अजून हि इतिहास मध्ये राजे लोक पंतप्रधान यांची नंबर प्रमाणे
यादी असते. तर आपल्या घराण मधील थोर जेष्ठ लोक यांची
माहिती दिली तर काय हरकत आहे.
असो.
बाकि ठिक छान.
वसुधालय
ॐ माझे नागोराव काका सौ सुधा काकू माझी सौ आई व ईतर सर्वजन
हल्ली फोन मध्ये फोटो घेता येतात पूर्वी सोय नव्हती तरी एवढे फोटो
माझ्या कडे आहेत. महत्व पूर्वक आहे.
ॐ मी लग्न च्या आधी चि व अकाश रे देशपाण्डे देशपांडे
ॐ भाच्चा
ॐ अमेरिका
12. 9. ( सप्टेबंर ) 2015.
शनिवार.
श्रावण पोळा
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
श्रावण पोळा
प्रणव श्रीकांत चिवटे
प्रणव यांना शुभेच्छा व छान बैल गाडी चा फोटो घेतला बद्दल अभिनंदन
यांनी बैल गाडी चा कित्ती मस्त फोटो महिना पूर्वी घेतला आहे.
बैल कित्ती प्रकारे उपयोगी पडतात बघा.
बाकि ठिक. छान.
वसुधालय.
साटोरी
ॐ स्वाती खटावकर नमस्कार ! हल्ली साटोरी प्रकार कमी केला जातो साटोरी साठी गहू चा रवा याला गूळ व सुकामेवा घालून थोड्या वेळ ठेवून कणिक अथवा मैदा भिजलेल्या याच्या भरून तुपात तळतात.
ॐ अमेरिका
12. 9. ( सप्टेबंर ) 2015.
शनिवार.
श्रावण पोळा.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
माझी चुलत बहिण सौ ज्योत्स्ना खेरडे
यांनी एका पोळा च्या ब्लॉग ला प्रतिक्रिया दिली आहे.
ती आज मी कॉपी पेस्ट करीत आहे.
बाकि ठिक. छान.
वसुधालय.
ॐajeshwari kherde said: ऑगस्ट 17, 2012 at 10:42 सकाळी
Kaka(aamche vadil) aajji(tyanchee aai) jithe asel tithe ‘vaan’ ghayala jayche…..Nagapurla tar jaychech pan jenva aaji aatyabainkade geleli hotee tenva te Guntur,Karnool (Andhra Pradesh)la gelyachehee aathwate….aani tilahee agdi khaatree asaychee.Anandarao yenarch! ॐ बैल पोळा
ॐ आनंदराव काका व सौ इंदिरा काकू
ॐ अमेरिका
12. 9. ( सप्टेबंर ) 2015.
शनिवार.
श्रावण पोळा.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विशेष.
श्रावण पोळा आई चा दिवस.
माझे आई व वडील यांचा कोल्हापूर घरी काढलेला फोटो आहे.
आई व वडील यांना नमस्कार. व
आईस आम्ही आई ला वहिनी म्हणत होतो
वहिनी ला नमस्कार !
बाकि ठिक. छान
वसुधालय.
ॐ अमेरिका
12.9.(सप्टेबंर ) 2015.
शनिवार.
श्रावण महिना.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विशेष.
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर.
दक्षिणायन वर्षाऋतु श्रावण कृष्णपक्ष.
१४ शनिवार दर्श – पिठोरी अमावास्या पोळा
वृषभपूजन मातृदिन. मातृदिवस
श्रावण अमावास्या ला आई चा दिवस साठी साजरा करतात.
शेवया ची साखर घालून खीर करतात. वाटीत ठेवतात.
त्यावर पुरी ठेवतात. पाच पदरी दोरा घेऊन किंवा जाड दोरा घेतात.
हळद मध्ये घालतात. आठ किंवा सोळा गाठी बांधतात.
आपल्या प्रत्येक मुलगा असो किंवा मुलगी असो.
आई च्या मागे एक एक जन उभे राहून आई मुलांना दोरा पुढून मागे
टाकते. व मुल ते दोरा वाण झेलतात. व सर्वा आधी कोण असे आई विचारते.
मुलगा व मुली म्हणतात मी आणी ते दोरे हातात बांधतात. दुसरे दिवस ला
पूजा करून काढतात.
भारत भर मातृदिन मातृदिवस साजरा करतात.
मी घरी पूर्वी शेवया केल्या आहेत त्याचा फोटो लावत आहे.
बाकि ठिक. छान.
वसुधालय.
शेवया
ताट मध्ये काढल्या आहेत.
ॐ बैल याची पूजा कोल्हापूर येथे मातीचे बैल विकत मिळतात.
शेवयाची खीर
ॐ माझी आई नमस्कार
ॐ अमेरिका
11. 9. ( सप्टेबंर ) 2015.
श्रावण महिना.
शुक्रवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विशेष.
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर.
साक्शिनायन वर्षाऋतु श्रावण कृष्णपक्ष १३शुक्रवार.
श्रावण महिना मधील चौथा शेवट चा शुक्रवार.
शिवरात्रि ! शिवरात्र
बाकि ठिक. छान.
वसुधालय
ॐ शिवरात्र
ॐ हे माझा नवरा चे श्रीकांत चिवटे असतांना माझे रूपं !
ॐ अमेरिका
10. 9.( सप्टेबंर ) 2015.
गुरुवार
श्रावण महिना.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विशेष.
हयाग्रीवोत्पत्ती
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर.
दक्षिणायन वर्षाऋतु श्रावण कृष्णपक्ष
१३ प्रदोष गुरुवार.
ब्रहस्पती ची पूजा करतात.
बाकि ठिक. छान.
वसुधालय.
ॐ
रांगोळी ने नी श्र्लोक लिहीले आहेतं ! मी स्वतः रांगोळीने श्र्लोक लिहिले आहेत. छायाचित्र पण मी स्वतः काढले आहेत.
गुरुवार असल्यामुळे गुरुवार चे सर्व श्र्लोक दाखवित आहे.
उपवास करतात साठी साबुदाणा खिचडी दाखविली आहे.
ॐ ब्रह्मचैतन्न्य महाराज नमस्कार गुरुवार आहे
. . श्री क्षेत्र गाणगापूर
ॐ अमेरिका
9. 9 ( सप्टेबंर ) 2015.
बुधवार.
श्रावण महिना.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
आमचा मुलगा माझा मुलगा पुष्कर चिवटे
यांनी त्याच्या पहिल्या पगार मध्ये दिवाळीत
मला घेतलेली साडी आहे. आज २०वर्ष झाली असणार.
पण कित्ती छान साडी राहिली आहे पहा. मी अजून हि नेसते.
जपणूक कशा प्रकारे करावी मन भरून असतं माझ्या
सौ सुनबाई यांनी फोटो घेतले काढले आहेत.
ॐ
शुभम् करोती कल्याण्यम् आरोग्यम् घनसंपदा |
शत्र बुध्दी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते ||
दिव्या दिव्या दिप्तकार |
काणीकुंडल मोतीहार ||
दिवा लावला देवापाशी |
माझा नमस्कार सर्व देवापाशी ||
बाकि ठिक. छान.
वसुधालय.
ॐ अमेरिका
8. 9( सप्टेबंर ) 2015.
मंगळवार.
श्रावण महिना.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
श्रावण मंगळवार !
नवरा याचे आयुष्य वाढवावे साठी पूजा करतात.
श्रावण मंगळवार ला देवी ची पूजा करतात.
एका भांड मध्ये धातू चा नाग ठेवून चौरंग किंवा
पाट यावर तांदूळ किंवा गहू यांनी आरास करून ते भांड ठेवतात.
त्यावर सर्व पत्री व फुल वाहतात. हळद कुंकू वाहतात. पूजा करतात.
पाच किंवा जास्त सवाष्ण नवीन पाच वर्षा च्या लग्न झालेल्या पूजा साठी
बोलावतात. ईतर सर्वजन पूजा पाहण्यास नैवेद्द साठी बोलावतात.
पाच सवाष्ण यांना ओटी भरून वस्तू दान देतात.
रात्र खेळ करून भाजक खाऊन जागरण करतात. देव प्रसन्न होऊन
आशीर्वाद देतात. व नवरा याचे आयुष्य वाढते.
ईच्छा शक्ती प्रबळ असली कि मन तेथे जाऊन सर्व घडत.
ॐ पाऊस पडलेला पडलेला असतो किंवा चालू पण असतो. .
हवा दमट असते. निसर्ग याची झाडयाची याची पान व व फुल
यांनी घरात हवा शुद्ध होते. . साठी झाड व व फुल घरात पूजा
निमित्त राहतात. . हवा चांगली राहते. घर घर शुध्द राहते.
मी पुणे येथे तेंव्हा राहत होते श्रावण पाच मंगळवार अथवा चार
आले असतील तर चार असे पाच श्रावण वर्ष पूजा केली आहे.
माझे जीवन आयुष्य मध्ये मला कधी कमी पडले नाही अथवा
खूप मिळाले असे पण नाही
मुलगे झाली. ह्यांच शेवट पर्यंत नोकरी व उद्दोग मध्ये काम करून
आयुष्य गेले.
आपण म्हणतो एवढ देव पूजा कशाला करावी प त्या वय मध्यी होऊन जाते
त्याचे कारण
ईच्छा व एकाग्र मन यांनी सर्व घडत व आयुष्य निट होत.
माझ्या आयुष्य याला माझा नमस्कार
बाकि ठिक. छान.
वसुधालय
ॐ अमेरिका
8.9.( सप्टेबंर ) 2015.
मंगळवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
अमेरिका येथे राजगिरा आणला. त्याच्या घरीच लाह्या केल्या आहेत.
थोडा गूळ पाक केला तू घातेले. राजगिरा लाह्या बरोबर थोडे काजू बारीक
केलेले व आक्रोड बारीक केलेले व वेलदोडे फूड घातली आहे.
मस्त पौष्टिक लाडू तयार केले आहेत. थोडे मऊ झाले. सवय नसल्यामुळे
पाक कमी उकळला गेला आहे. पुढच्या वेळेला कडक करू.
बाकि ठिक. छान
वसुधालय.
ॐ अमेरिका
7. 9. ( सप्टेबंर ) 2015.
सोमवार
श्रावण महिना
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष
श्रावण महिना मध्ये प्रत्येक सोमवार ला
वेगवेगळे धान्य घेऊन शिवामूठ वाहतात. घालतात.
मी दर श्रावण महिना मध्ये महालक्ष्मी देऊळ येथे पिवशी त
धान्य घेऊन गुरुजी नां देत असे. शिवामूठ ओळी होते व वाहून
जाते. काहीतरी देव गुरुं यांना दिल्याचे समाधान एवढे चं !
मी प्रत्येक
१ पहिला सोमवार तांदूळ
२ दुसरा सोमवार तीळ
३ तिसरा सोमवार मुग
४ चौथा सोमवार जवस
५ पाचवा सोमवार सातू
एक प्रकारे साळी सारखे धान्य आहे.
कोल्हापूर येथे मिळते.
बाकि. ठिक
वसुधालय.
तांदूळ
तीळ
मुग
जवस
सातू
ॐ अमेरिका
7. 9. ( सप्टेबंर ) 2015.
सोमवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विशेष.
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर.
दक्षिणायन वर्षाऋतु श्रावण कृष्णपक्ष १० दशमी सोमवार.
शिवमुष्टि जवस चौथा / ४/ 4
बाकि ठिक. छान.
वसुधालय.
ॐ अमेरिका
5. 9. ( सप्टेबंर ) 2015.
शनिवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विशेष.
जय कृष्ण हरी ।।
कृष्ण यांना दही खूप आवडत आहे.
कृष्ण यांचा मित्र सुदामा कच्चे पोहे धोतर मध्ये बांधून आणतात.
थोडे पोहे असले तरी सुदामा च्यां बायको ने सौ वहिनी यांनी दिलेले
पोहे श्रीकृष्ण खातात कच्चे चं कित्ती मित्र जवळीक आहे. असं पटतं
बाकि ठिक. छान.
वसुधालय.
OM दही पोहे
OM DAHI POHE
ॐ अमेरिका
5. 9. ( सप्टेबंर ) 2015.
शनिवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विशेष.
ॐ दिनांक ५. ९. ( सप्टेबंर ) २०१५. साल शिक्षक दिवस !
मी माझ्या वय ६८ला संगणक शिकले आहे. मराठी ब्लॉग लिखाण लिहित आहे. चार वर्ष झाली आहेत. ब्लॉग लिखाण वाचून जळगाव येथील तरुण भारत वर्तमान पत्र मध्ये किशोर कुलकर्णी यांनी लेख लिहून छापून आणला आहे. नंतर मी किशोर कुलकर्णी यांना पुस्तक ब्लॉग लिखाण केले तर मला छान वाटेल !किशोर कुलकर्णी यांनी प्रकाशक सौ रेवती बिभाकर कुरंभट्टी कृपा प्रकाशन यांना सांगून ब्लॉगवाल्या आजीबाई !श्रीमती वसुधा श्रीकांत चिवटे पुस्तक दिनांक २१. ३ ( मार्च )२०१५ साल गुढी पाडवा ला पुस्तक पूर्ण छापून तयार केले आहे.
सांगायचं कि खूप वय मध्ये पण शिक्षण केले जाते. शिक्षक दिवस शुभेच्छा !
बाकि ठिक. छान.
वसुधालय.
ॐ अमेरिका
5. 9. ( सप्टेबंर ) 2015.
शनिवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
कालाष्टमी , श्रीकृष्ण जयंती आहे.
ॐ
कृष्ण
भक्ती मार्गा पेक्षा कर्म मार्गा कडे प्रेरित करणारा.
शिकविणारा
दुष्टांचा संहार नाश करणारा सज्जनांचे रक्षण करणारा
असा कृष्ण आहे.
कृष्ण यांना तुळस, मोरपिस,बासरी,गाय दही लोणी हे
त्यांचे आवडणारे प्रतिमा, घटक,वस्तु गोष्ट आहेत.
कृष्ण कमळ हे पण फूल आहे
ॐ
मूल व मूली पण हल्ली गोकुळ अष्टमी ला एकावर एक थर देऊन दहीहंडी फोडतात.एक प्रकारे हा खेळ चं आहे.
बक्षीस पण लावतात. भारतरत्न खेळ म्हणून सामील व्हावयाला पाहिजे ! हवा !
(क्रीडा विभाग)
ॐ अमेरिका
5. 9. ( सप्टेबंर ) 2015.
शनिवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
ॐ
डॉ प्रोफेसर सर्वपल्ली राधाकृष्णन
राधाकृष्णन यांचा जन्म इसवी सन ५. ९ ( सप्टेंबर )१८८८साली झाला
तामिळनाडू येथील तुरुत्तनी येथे तेलगु ब्राह्मण कुटुंब मध्ये झाला
मद्रास ख्रिश्चन कॉलेज मधून पदाव्युत्तर शिक्षण घेतले
इसवी सन १९२१ मध्ये कोलकत्ता विद्दापीठ येथे
तत्वज्ञान याचे प्राध्यापक साठी नेमणूक झाली
१९३१ ते १९३६ या काळात आंध्र विद्दापीठ येथे कुलगुरू चे काम केले
१९३६ ऑक्सफर्ड विद्दापीठ यांचे स्पाल्डींग प्रोफेसर ऑफ रिलीजन्स एंड एथिक्स
म्हणून त्यांची नेमणूक झाली
स्वातंत्र्य मिळाल्या नंतर भारत याचे युनेस्को तील प्रतिनिधी साठी नेमणूक झाली
इसवी सन १९५२ मध्ये भारत याचे पहिले उपराष्ट्रपती बनल्र
दहा वर्ष पद सांभांलले इसवी सन १९६२ मध्ये भारत याचे दुसरे राष्ट्रपती झाले
५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन साठी मानला जातो
प्रोफेसर राधाकृष्णन ! गुरुं नां ! नमस्कार !
ॐ माझे वडील यशवंत रेणूराव देशपांडे यांचे अक्षर
मला लिहिलेले पत्र. खूप मन भरत पत्र पाहून. जपणूक ठेवून
आणि काय हवयं
जवळ !
शिक्षणं याला कित्ती महत्व आहे पहा !
ॐ अमेरिका
4. 9. ( सप्टेबंर ) 2015.
शुक्रवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
मी माझ्या ७१ वय ला खेळ खेळले आहे.
संधी मिळाली तरी उभे राहून ताकद राहणे जास्त
महत्व पूर्वक आहे. तबकडी खेळ खेळला मी
आणि रात्रभर माझ पोट दुखल. आता मला काही व्यायाम
किंवा खेळ खेळतांना भिती वाटते पोट दुखेल का
एवढ खेळले बसं वाटतं !
ॐ आता माझ वय 73 / ७३ आहे.
बाकि ठिक. छान.
वसुधालय
ओम फुट बॉल
ओम तबकडी ओम तबकडी
ॐ अमेरिका
3. 9. ( सप्टेबर ) 2015.
गुरुवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
गुरुं जग्गी वासुदेव !
यांचा तारीख ३. ९. ( सप्टेबंर ) २०१५. साल ला
वाढ दिवस ! जन्म दिवस ! जन्म दिन आहे.
गुरुं नां !
नमस्कार ! व शुभेच्छा ! शुभकामनाय !
गुरुं चां गायत्री मंत्र !
ब्रह्मानंद स्वरूपा ईशा जगदीशा ।
अखिलानंद स्वरूपा ईशा महेशा ।।
गुरुं महादेव देव याचे भक्त आहेत.
कैलास सरोवर येथे दरवर्षी जातात.
यंदा पण जाऊन आले आहेत.
मी एक योग क्लास अमेरिका येथे केला आहे.
प्रत्यक्ष गुरुं नां पाहिलं आहे.
साठी मन भरतं !
बाकि ठिक. छान.
वसुधालय.
ॐ योग क्लास अमेरिका
ॐ अमेरिका
3. 9. ( सप्टेबंर ) 2015.
गुरुवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
सौ. सुनिती रे. देशपांडे
यांचा वाढ दिवस आहे. त्यांना शुभेच्छा !
त्या माझ्या मोठ्ठ्या सौ भावजय आहेत.
आम्ही त्यांना सौ आकाश च्या आई !
असे हाक मारतो !बोलावतो !
सौ आकाश च्या आई नीं
माझ्या ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक साठी कविता
माझ्या बद्दल लिहिली आहे. व ती कविता
किशोर कुलकर्णी यांनी ब्लॉगवाल्या आजीबाई !
श्रीमती वसुधा श्रीकांत चिवटे !पुस्तक मध्ये छापली आहे.
असो सौ आकाश च्या आई यांना नमस्कार व शुभेच्छा !
वाढ दिवस साठी व ईतर दिवस साठी पण !
बाकि ठिक. छान.
वसुधालय.
ॐ कविता
कोल्हापुर
वसुधालय वसुधा
कन्या यशंवत राधाबाई चि
आर्या श्री श्रीकांत चिवटे यांची
केली तिने प्रगती संगणकात केली
कात निर्मिले पुस्तक मराठी चे
शिक्षण फक्त s . s . c . चे
ज्ञान फार नाही इंग्रजी चे पण
जिद्द मनी काही करण्याचे
उचलली लेखणी हातात
लिहिले पदार्थ साधे आणि
चविष्ट कृती करून दाखविले
छायाचित्रात भाकरी भाजी आणि
धिरडी पुरण पोळी आणि साटोरी
रांगोळ्या अनेक तऱ्हेच्या आकाश दिवे
आणि शिंकाळी सणावाराची देऊन माहिती
थोरामोठ्याचां लिहिल्या कथा एक नां दोन
विषय अनेक घेतले मन त्यात छान रामाविले
सोसून साऱ्या अडचणी अन् वथ्या
घदविली स्वत : ची एक वेगळी
संगणक कथा
तिला लाभो महालक्ष्मी चे आशिर्वाद
होऊ प्रगती संगणक क्षेत्रात
हिच प्रार्थना जग् मातेस
हिच प्रार्थना जग् मातेस
सौ . सुनुती रे. देशपांडे
PONDICHERRY
ॐ सौ आकाश च्या आई च्या आई
ॐ ब्लॉगवाल्या आजीबाई ! माझं पुस्तक
ॐ अमेरिका
3. 9. ( सप्टेबंर ) 2015.
गुरुवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
फेस बुक मध्ये मी वाचले कि गणपती ची अक्षर
लिहून अवार्ड मिळाला आहे
मला एकदम आवडलं.
मी कोल्हापूर घरी रांगोळी ने काही अक्षर लिहिली आहेत.
त्याचा ब्लॉग केला आहे.
खूप नाही पण थोड सं का पण गणपती अक्षर लिहिणे याचा
मी प्रयत्न केला आहे. याच मला छान वाटत आहे. तेच फोटो
परत घालून ब्लॉग करत आहे. रांगोळी चे गणपती अक्षर आहेत.
बाकि ठिक. छान.
वसुधालय.
ॐ अमेरिका
1. 9.( सप्टेबंर ) 2015.
मंगळवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर.
दक्षिणायन वर्षाऋतु श्रावण कृष्णपक्ष
३ मंगळवार अंगारक अंगारिका चतुर्थी.
बाकि ठिक. छान.
वसुधालय.
ॐ धने यांनी अक्षर काढली आहेत मी !
ॐ अमेरिका
1.9. ( सप्टेंबर ) 201.
मंगळवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विशेष.
बाकि ठिक. छान
वसुधालय.