आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 16, 2015

श्रीहरतालिकेची आरती

                     ॐ
श्रीहरतालिकेची आरती
जय देवी हरतालिके | सखी पार्वती अंबिके ||
आरती ओवाळीते | ज्ञानदिककळीके ||धृ o ||
हरअर्घांगीं वससी | जाशी यज्ञा माहेराशी ||
तेथें अपमान पावसी | यज्ञ कुंडी गुप्त हौसी || जय O ||१||
रिघसी हिमाद्रीच्या पोटीं | कन्या हौसी तुं गोमटी | उग्र तपश्र्चर्यामोठी |
आचरसी उठाउठी ||जय O ||२||
तापपंचाग्री साघनें | घुमृपाने अघोवदने ||
केलीं बहु उपोषणें | शंभु ब्रताराकारणें ||जय O ||३||
लीला दाखाविसी द्दष्टी | हें व्रत करिसी लोकासाठिं ||
पुन्हां वरिसी घुर्जटी | मजा रक्षावें संकटीं ||जय O ||४||
काय वर्णुं तव गुण | अल्पमती नारायण | मातें दाखवी चरण चुकवावें जन्ममरण ||जय देवी O ||५||

मी लग्ना आधी हरतालिका याचा उपवास पाणी न पिता केला आहे. माझं सर्व मनासारखं झाल आहे.

हरतालिके!

                                  ॐ

ऐका हरतालिके, तुमची कहाणी !
एके दिवशी ईश्र्वरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती.
पार्वतीनं शंकराला विचारलं, ” महाराज, सर्व वृतांत चांगलं असं व्रत कोणतं ?
तेव्हा शंकर म्हणाले,” जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहांत सूर्य श्रेष्ठ, चार वरणात
ब्राह्मण श्रेष्ठ, देवांत विष्णू श्रेष्ठ, नाद्दांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरतालिका हे
व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे.”ते तुला सांगतो.तेंच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस
आणि त्याच पुण्याई नं तूं मला प्राप्त झालीस.ऐक.हे व्रत भाद्रपद महिन्यांतल्या
पहिल्या तृतीयेला करावं . पूर्वी तूं ते कसं केलंस तें मी तुला आतां सांगतो.
” मी तुला प्राप्त व्हावं म्हणून तूं लहानपणी मोठं तप केलंस.
चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस.थंडी,पाऊस, ऊन हीं
तिन्हीं दु:ख सहन केलीस.हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दु:ख झालं,
आणि अशी कन्या कोणास द्दावी ? अशी त्याला चिंता पडली.इतक्यात तिथं
नारदमुनी आले,हिमालया नं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं.
तेव्हा नारद म्हणाले, ” तुझी कन्या उपवर झाली आहे,ती विष्णूला द्दावी.
तो तिच्यायोग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे.
म्हणून इथं मी आलो आहे.”
हिमालयाला मोठा आनंद झाला.त्यानं ही गोष्ट कबूल केली.
नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले.त्यांना ही हकीकत
कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले.
नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली.
ती गोष्ट तुला रुचली नाही.तूं रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं
रागावण्या चं कारण विचारलं. तेव्हा तूं सांगितलंस, ‘महादेवावांचून
मला दुसरा पती करणे नाहीं, असा माझा निश्र्चय आहे.” असं असून माझ्या
बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे.ह्याला काय उपाय करावा ?
मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस
पडली.जवळ च एक गुहा आढळली त्या गुहेंत जाऊन तूं उपवास केलास.तिथं माझं
लिंग पार्वतीसह स्थापिलंस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुध्द तृतीया चा
होता. रात्रीं जागरण केलसं, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं, नंतर मी तिथं आलों.
तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हानालीस,” तुम्ही माझं पती व्हावं,
याशिवाय दुसरी इच्छा नाही,”
नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो.पुढं दुसऱ्या दिवशी ती
व्रतपूजा तूं विसर्जन केलीस.मैत्रीणींसह त्याचं पारणं केलंस. इतक्यांत
तुझा बाप तिथं आला.त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं.
मग तूं सर्व घडलेली हकीकत त्याला सांगितलीस.पुढं त्यानं तुला मलाच
देण्याचं वचन दिलं व तुला घेऊन तो घरी गेला.मग कांही दिवसांनी
चांगला मुहूर्त पाहून त्यानं तुला मला अर्पण केलं.अशी या व्रतानं तुझी
इच्छा पूर्ण झाली.याला हरतालिका-व्रत असं म्हणतात.
याचा विधी असा आहे.
” ज्या ठिकाणी हें व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं.
केळीचे खांब लावून तें स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून
पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारें त्याची पूजा
करावी आणि मनोभावें प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री
जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो.साती जन्माचं
पातक नाहीसं होतं.राज्य मिळतं.स्त्रियांच सौभाग्य वाढतं. या दिवशी
बायकांनी जर कांहीं खाल्लं, तर त्या जन्मावाम्ध्या व विधवा होतात.
दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो.कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण
द्दावं.दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं.”
ही साठां उत्तरांची कहाणी, पांचा उत्तरीं,देवाब्राह्मणाचे
व्दारी, गाईचे गोठी, गोठीम, पिंपळाचे पारीं सुफळ संपूर्ण.

 

 

भूप राग


भूप – आलाप
( रे ) पं धं सा रे , रे
पं धं सा रे धं s अ रे रे
पं s अ धं , पं s अ सा, धं s रे, रे धं रे s सा
( विलंबीत गत )
ताल – त्रिताल १६ मात्रा
१२ १३ १४ १५ १६
ग s ग रे सा सा ग रे ग सा रे रे सा रे
१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११
प s प s ग रे s रे ग प s प ध प ग रे s रे सा
[ ९ १० ११ ]
ग ध ध प ग ग रे सा
तोडा १ ) ८ मात्रे पासून ध सासा ध सा ध प ग, ग पप ग प ग रे सा
१२ मात्रे गत घेणे
तोडा २ ) ८ मात्रे पासून गत सा सासा ध प ग रे सा , सा सासा ध प ग रे सा
१२ मात्रे पासून गत घेणे
तोडा ३ ) सा रेरे ग प ध सा सासा धप , ग पप ध प ग रेरे सा
सा रेरे ग प ध सा सासा धप , ग पप ध प ग रेरे सा
ग रेरे सा ग रेरे सा ग रेरे सा
१२ मात्रे पासून गत घेणे
तोडा ४ ) समे पासून
प धध सा रे सा ध प , ग पप ध प ग रे सा
प धध सा रे सा ध प , ग पप ध प ग रे सा
रे गग रे ग s रे s ग s प
रे गग रे ग s रे s ग s प
रे गग रे ग s रे s ग s प
समे पासून गत येते घेणे
तोडा ५ ) समे पासून
सा धध सा ध प ध सा प धध सा ध पध सा
ध पप ध प ग प ध ग पप ध प ग प ध
प गग प ग रे ग प रे गग प ग रे ग प
ग रेरे ग रे सा रे ग , सा रे रे ग रे सा रे प
सम येते समे पासून गत घेणे
तोडा ३ ) सम पासून
ग गग रे सा प पप ग रे , सा सासा ध प ग रे सा
सा सासा ध पं ग रे सा / -कालावून गत घेणे
तोडा ४ ) सम पासून घेणे ,
सा रेरे सा रे ग , ग पप ग ध प , ध सासा ध प ग
रे सासा रे सा रे ध सा धध सा ध प . धं पप ध प ग
प गग प ग प ग रे ग रेरे ग रे ग रेरे सा / – कालावून गत घेणे

भूप राग मी सतार शिकाले तेंव्हा खूप वेळा वाजविला आहे
रियाज केला आहे आता संगणक मध्ये लिहून काढण्याचा
प्रयत्न केला आहे पेस्ट मध्ये खाली वर झाला आहे तरी समजत तसं !

DSCF0640

%d bloggers like this: