आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 28, 2015

चंद्र ग्रहण

                             ॐ           तारिख 27. 9. ( सप्टेबंर ) 2015.
                                                 भाद्रपद शुक्लपक्ष

ब्लॉग वाचक यांना नमस्कार
भाद्रपद शुक्लपक्ष प्रोष्ठपदी पौर्णिमा २७ तारीख ला आहे. रविवार आहे
पण चंद्र ग्रहण २८ सप्टेबंर ला सोमवार ला आहे.

मी चंद्र ग्रहण याची रांगोळी काढली आहे ती दाखवित आहे.
बाकि ठिक. छान.
वसुधालय.

                              ॐ सूर्य चंद्र याच्या मध्ये पृथ्वी येते चंद्र ग्रहण लागते.

 

Lunar Eclipse                           img_27542_thumb_thumb

                           चंद्र

सौ शीतल शिंदे पारिजातक

                      ॐ                      अमेरिका
                                         28.9.( सप्टेबंर ) 2015.
                                                 सोमवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

सौ शीतल शिंदे पारिजातक नाव देऊन ब्लॉग लिहित आहेत.
त्या नियमित वसुधालय ब्लॉग वाचन करतात.
मी बरेच दिवस ब्लॉग लिखाण केले नाही तर लिखाण का आले नाही
काळजी ने विचार पूस करतात.

त्यांच्या ब्लॉग मध्ये त्यांनी वसुधालय आजीबाई वसुधा बद्दल
आपुकीने छान लेख लिहिला आहे त्याची कॉपी मी
घेऊन माझ्या वसुधालय ब्लॉग मध्ये लिहित आहे.
बाकि ठिक.  छान. 
वसुधालय.
 

 

 

 

ब्लॉग वाल्या आजीबाई…….वसुधा चिवटे ……

थोड्याच दिवसात हे पुस्तक प्रकाशित होवून दुकानामध्ये असेल. आजीबाईंच कौतुक कराव तेवढं कमीच ..वयाच्या सत्तरीत असताना संगणक शिकून स्वतःचा ब्लॉग तयार केला….रोजच्या व्यवहारातले असे काही …रांगोळी, स्वयंपाक , सतार वाजवणे, व्यायाम करणे , न चुकता ह्या सगळ्या गोष्टी त्या ब्लॉगवर लिहायच्या .  खरतर त्यांचा ब्लॉग वाचून आणि ते सातत्य पाहूनच मलाही ब्लॉग लिहायची तीव्र इच्छा झाली. तशी ती आधी हि होतीच ….पण …काय लिहायचं ? कसं  लिहायचं  ह्या विचाराने कधी काही लिहिलं  नाही .

वासुधालय हा ब्लॉग वाचला …अतिशय सरळ, साधी सोपी भाषा , अगदी नेहमी बोलतो तसच लिखाण  केलं होत. रोज काढलेल्या रांगोळ्या, अगदी साधी आमटी केली असेल तरी सुद्धा त्यात लिहिले होते. पोस्टची संख्या वाढवण्यासाठी हे नक्कीच नव्हतं  …सराव …सतत सरावाने परिपूर्णता येते…संगणकाचा सराव होण्यासाठी ….त्या प्रयत्न करत राहिल्या ….म्हणूनच  या वायात त्यांनी इतका छान ब्लॉग बनवला ..त्याला साजेसं नाव दिलं …वसुधालाय ….वसुधाच घर …आणि खरोखर त्या नावाला शोभेल असाच ब्लॉग बनवला आहे.

मी रोजच्या रोज घरी ……आज आजी बाईनी  अमुक लिहिलं …तमुक लिहिलं असं सांगत असते . कधी कधी त्यांनी लिहिलेल्या पाकृती घरी करून बघते …खास करून ज्वारीच्या पिठाची धिरडी …खूप आवडीने खातात आमच्या घरी. जमेल तसे सणाचे महत्व …त्यादिवशी घरात काय करायचे, पूजा कशी करायची  हि माहिती सुद्धा त्यांच्या ब्लॉग मध्ये लिहितात. ऋतू विषयी , जगात कुठे काय घडते याची सुद्धा नोंद ब्लॉग मध्ये तारखेनिशी  केलेली आहे. वासुधालय  ब्लॉग पुढच्या पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे .. आजींचे खूप खूप धन्यवाद !!!!

त्यांच्या  ब्लॉग ची दखल जळगावातील किशोर कुलकर्णी यांनी घेतली आणि ब्लॉग वाल्या आजीबाई हे पुस्तक त्यांनी छापलं .  वसुधा आजींच खूप खूप अभिनंदन .

नमस्कार !!
तुम्ही कशा आहात . तब्येत बरी आहे न ? बरेच दिवस काही post नाही लिहिली.
तुम्ही कोल्हापूरला परत जाताना मुंबईत भेटू …पार्लेश्वर मंदिरात ….
मी फोन करीन तुम्हाला …
काळजी घ्या ..
शीतल शिंदे

ॐ सौ शीतल शिंदे पारिजातक नमस्कार वाटलं चं मला आपण माझे लिखाण नाही साठी काळजी करीत असणारं ! पण काय आहे विषय च नाही काही लिहिण्यास काय लिहू रांगोळ्या पण भरपूर काढून झाल्या आहेत माझी तब्येत चांगली आहे काळजी करू नका अगदी घर च्या लेकी सारखी माझी काळजी घेता मला चांगल वाटत मी ठीक आहे आपण व आपले घरचे व मुली यांना नमस्कारआजीबाई

                                download (4)

%d bloggers like this: