आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 15, 2015

तिसरी माळ नवरात्र

                                     ॐ                  

   इसवी सन 2015 अक्टोबर
श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र नमस्कार

तिसरा दिवस नवरात्र चा तिसरी माळ देवी उच्छव व चा
देवी अंबा आई  नमस्कार !

 

 

पुस्तक

        ॐ                    कोल्हापुर

आमच्या घरात पुस्तक छापून आली आहेत.

श्रीकांत चिवटे याचे कविता संग्रह  १ तुळसपाणी २ वसुधालय
दोनही पुस्तक महाराष्ट्र मंडळ मुंबई यांनी पैसे न घेता छापली आहेत
व १० पुस्तक फुकट दिली आहेत जास्त महत्व आहे. पुस्तक याला.

आणि हो मी वसुधालय मराठी ब्लॉग लिहित आहे त्याचे पुस्तक
किशोर कुलकर्णी जळगाव पत्रकार यांनी
ब्लॉगवाल्या आजीबाई श्रीमती वसुधा श्रीकांत चिवटे पुस्तक
पैसे न घेता छापले आहे फार चांगल पुस्तक छापले आहे
आज का विषय निघाला तर
वसुधालय पुस्तक नवरात्र मध्ये छापून आले त्याची आठवण आली
व सर्व पुस्तक एकत्र करावी साठी सर्व लिहित आहे

मस्त समाधान तृप्तता वाटत आहे पुस्तक बद्दल !
वसुधालय

 

blogwalya-aajibai

आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र

                          ॐ                 अक्टोबर 2015
                                               आश्र्विन शुक्लपक्ष

नवरात्र नवरात्रि चालु आहे.

नवरात्र ! नवरात्रि

नवरात्र मध्ये कुमारी नहान येणारी मुलगी ईला नऊ ९ दिवस जेवायला बोलावतात.
दसरा ला पूर्वी परकर पोलक चे कापड देत असत.
एका गरीब मुली चे पोट भरत असे व वस्र कापड देऊन तिला सांभाळत असे.
दिवा नऊ दिवस लावलेला असे गहू धान्य पेरून गहू आणत.
नऊ दिवस उपवास एकादशी सारखा करत.
माझी आई    वहिनी राधाबाई देशपांडे उपवास करत असे.
नवमी ला होम होत असे अजून हि माझ्या माहेरी अशोक देशपांडे होम करतात.
पुरण पोळी चा नैवेद्द दाखवितात. दसरा ला आपटे याची पान देऊन सन साजरा करतात.
कुमारी का बोलावून एक प्रकारे तिला सांभाळले जाते.
श्रावण महिना मध्ये शनिवार ला मुंजा बोलावून असे दान दिले जाते.
प्रत्येक सण याला कोणाला तरी बोलावून जेवण व दान देतात.
एक प्रकारे सेवा च आहे.

मी हे असतांना नवरात्र मध्ये महालक्ष्मी ला जात असे व एक दिवस जेवण देऊन
गजरे सर्व ओटी  देत असे. दसरा पर्यंत नवरात्र असे.
प्रत्येक सण याला कोणाला तरी जेवायला बोलावून दान करत असे.
आमच्यात गणपती व नवरात्र जास्त करून सण मनान होत असे.
नवरात्र मध्ये लोकर उठणे महालक्ष्मी ला जाणे आल्या नंतर संयपाक करुणे
सर्वजन आप आपल्या कामाला जाणे उच्छाह असे.
नवरात्र साठी कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन साठी पाहुणे आमच्या घरी राहत.
कोणी उपवास करत कोणी जेवत दर्शन चांगले झाले साठी आमच्या बरोबर
छान बोलत असत.
दसरा आला कि नवरात्र पार पडले याचे खूप समाधान असे
एकदा नवरात्र मध्ये ह्यांचे वसुधालय पुस्तक छापून आले मी
देवी दर्शन ला गेले प्रणव ने पुस्तक घेतली व सरळ एक पुस्तक घेऊन
ह्यांच्या ऑफिस मध्ये ह्यांना दाखवावयाला नेली ह्यांना खूप छान वाटलं
नवरात्र मध्ये पुस्तक छापून आले साठी
नवरात्र मस्त सण साजरा करत.

नवरात्र माझा नमस्कार
वसुधालय

%d bloggers like this: