आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर, 2015

कार्तिक कृष्णपक्ष चतुर्थी १९३७मन्मथनाम

                                ॐ

कार्तिक कृष्णपक्ष चतुर्थी

शक १९३७मन्मथनाम संवत्सर.

साल २९ . २०१५ नोवेंबर वार रविवार

. कोल्हापूर येथील महालक्ष्मी देऊळ येथील साक्षी गणपति नमस्कार

ॐ शनैश्चरम्! मारुती!

                               ॐ
शनैश्चरम्

निलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रग्रजम् |
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम् ||

 

                              ॐ सुपारी मारुती औरंगाबाद

 

 


दिनांक २६. ११ ( नोवेंबर )

                          ॐ

 

ओम दिनांक २६. ११ ( नोवेंबर ) २०१५ नमस्कार

 

dscf0578-e1339896487498

ॐ साल २०१५ ची दिवाळी !

                                            ॐ

साल २०१५ ची दिवाळी !

पंडित राहुल देशपांडे यांचे गाण ऐकून सुरुवात केली . मस्त लाडू  शेव व इतर फराळ घरी तयार केला. किल्ला केला. दारात कागद वर रांगोळी काढली पणती दिवा लावला. कागदी आकाश दिवा केले दोन तिन केले. वेगवेगळ्या ठिकाणी लावले. नवीन आणलेले स्वेटर घालून हॉटेल मध्ये जेवण्यास गेलो. देऊळ मध्ये जाऊन देव दर्शन केले. मराठी ब्लॉग लिहिले.
ईन बॉक्स मध्ये इतरांना दिवाळी शुभेच्छा दिल्या.नाते वाईक यांना फोन केले आणि हो काल चं कट्यार काळजात घुसली सिनेमा पाहिला. वां अगदी पूर्वी च सर्व चित्रण पाहायला मिळाल आहे. मिरज शालिनी प्यालेशजरा शाहू चिं देवी चा भाग सारखं पण स्टेज वाटलं राजा यांचा दरबार गणपती चं गाण छोट्या झरिना व उमा व छोटा सदाशिव खां साहेब चं जून घर नमाज मन भरून येत. यश मिळण अवघड असत पण खरी कला असली कि कोणी मित्र भेटतो व माणूस पुढे जातो खां साहेब सचिन यांना पाहून मन तृप्त होत खर खां साहेब बसले आणि आपण त्यांच गाण ऐकत आहोत अस होत पंडित तर कुंकू फेटा उपरण डोळ्यात पाणी आणणार गाण कोण खरा गायक कस ठरविल बघा. सुबोध दादा सदाशिव अगदी राहुल देशपांडे सारखे गाण गातांना हात करतात तसे अगदी बरोबर केलेत काजवे कित्ती छान वाटतात कोणी पण कलाकार संगीत मध्ये असो सा रे ग म प ध नि सा राग आरोह व आवरोह कोमल स्वर व शुद्ध स्वर मध्ये गाण कस गाव फार चांगल असत दाखविल आहे वां उस्ताद खां साहेब नमस्कार व वां पंडित जी नमस्कार याला म्हणतात दिवाळी !

कार्तिक एकादशी

             ॐ                     दिनांक २२. ११.( नोवेंबर ) . २०१५.
                                        कार्तिक शुक्लपक्ष

कार्तिक एकादशी

कोल्हापूर महालक्ष्मी देऊळ येथील
विठ्ठल मंदिर आहे.

येथे पण एकादशी साठी खूप गर्दी असते.
फुल तुळस विकणारे खूप बसलेले असतात.

मी पण एकादशी ला लाईन   रांग असते तरी उभे राहून
विठ्ठल याचे दर्शन केलेले आहे. व शेंगदाणे गूळ व साबुदाणा
खिचडी साठी देत असे. आज पण मला कार्तिक एकादशी चा दिवस
आज पण कोल्हापूर येथील विठ्ठल देऊळ डोळ्या पुढे उभे राहत आहे.
विठ्ठल यांना नमस्कार.

                 IMG_0465[1]

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: |
व्यशेम देवहितं यदायु: || १ ||
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृध्दश्रवा: |
स्वस्ति न: पूषा विश्र्ववेदा: ||
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: |
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु || २ ||
ॐ शान्ति : | शान्ति : | शान्ति : ||

अर्थ :
हे देवांनो ! आम्ही कानांनी शुभ ऐकावे. आम्ही डोळ्यांनी
पवित्र-मंगल पाहावे.स्थिर – उत्तम अवयवांनी व सुदृढ
शरीरांनी युक्त होऊन आम्ही तुमची उपासना व स्तुती करतच
तुम्ही – देवांनी दिलेले हे आयुष्य व्यतीत करावे. ( अशी आमची प्रार्थना आहे.) [ १ ]
तो महाकीर्तिमान इंद्र आमचे कल्याण करो. ज्ञानसंपन्न आणि
वैभवसंपन्न ‘पूषा ‘ देव आमचे कल्याण करो. ज्याच्या गतीला अडथळा नाही
असा तो आकाशात संचार करणारा देव आमचे कल्याण करो आणि तो
तो वाणीला अधिपती देवगुरु आम्हांला श्रेयस् प्राप्त करून देवो. [ २ ]

व्यक्तींमध्ये शांतता नांदो.
समाजात शांतता नांदो.
जगात सर्वत्र शांतता नांदो.
_____________________________

img_486221IMG_4340[2]

ॐ PONDICHERRY च्या माताजी चां

               ॐ
PONDICHERRY च्या माताजी चां
17 (१७ ) नोव्हेंबर हा समाधी चा दिवस आहे.
1973 (१९७३ ) 17 ( १७ ) नोव्हेंबर (११) साल !
ला त्यांची समाधी चा दिवस !
माझा माताजीं ना मना पासून नमस्कार !
हा दिवस ला माताजीं च्या खोलीत माताजीं च्या दर्शन
घेण्यासाठी जाण्यास मिळते. देश – परदेश मधून मुद्दाम
मुध्दाम माताजीं च्या समाधी च दर्शन माताजीं च्या
खोलीत दर्शन घेण्या करीता मुद्दाम येतात.

ॐ राहुल देशपांडे व महेश काळे वां

                                             ॐ

राहुल देशपांडे व महेश काळे वां काय बात आहे!

गाण व उच्छाह ह्यात राहणं !

खूप छान गायक आहेत

पाहून पण डोळे भरून येतात.

काय लिहू सर्वांना त्यांची कीर्ती माहित आहे चं

 

शुभेच्छा !

१४ नोवेंबर

                              ॐ

१४ नोवेंबर

लहान मुलगा फूल लावण्यात व विकण्यात किती गुंतला आहे बघा !

बाल दिन बाल दिवस शुभेच्छा !

 

 

 

दिवाळी पोस्ट

                        ॐ

दिवाळी पोस्ट

दिवाळी त फराळ तयार घरी करून सर्वांना देण्याचा आनंद असतो.
दिवाळी तील फराळ पोस्ट मन पत्र देणारे, ग्यास सिलेंडर दुध वाले,
वर्तमान पत्र देणारे, रस्ता साफ करणारे सरकारी लोक
रोज काम करायला येणारी बाई सर्वांना फराळ याचे पिशवी तून देत असे मी
व ताधी आधी दहा १० रुपये देत असे पण आता पन्नास रुपये देते सर्वांना
वेगवेगळे. सर्व सजन खुश होऊन बाई नमस्कार करतात.

तसेच मारुती देऊळ पुढे लोक बसलेले असतात त्यांना पण मी
दिवाळी फराळ देते. पैसे मात्र देत नाही.

पूर्वी हे ऑफिस मध्ये असतांना सर्वांचे फराळ खात व मला पण म्हणत काही
फराळ नेतो मी पण भरपूर फराळ देत असत. मुलांचे मित्र पण घरी पूर्वी
फराळ साठी येत असतं. मी माझ्या सतार च्या क्लास च्या सर यांना फराळ च
देत असे. आमच्या फराळ याच वैशिष्ठ अनारसा असे आरे अनारसा आहे.
अगदी कौतुक याने म्हणत असतं.
मागच्या वर्षी पण मी मारुती जवळ बसणारे व वर्तमान पत्र देणारे यांना दिवाळी
भेट दिली आहे.
पूर्वी पोस्ट मन घरी पत्र आणून देत ओळखत असत. हसून बोलत बरं वाटत असे.
हल्ली ग्रीटिंग कार्ड बंद झाली दिवाळी अंक घरी य़ेण बंद झाली ह्यांच्या कविता
दिवाळी अंक मध्ये येत व अंक व भेट पण येत असे. किती मस्त उच्छाह असणारी
दिवाळी असे. आता मुले आपआपल्या घरी दिवाळी करतात.

दिवाळी पोस्ट सर्वांची आठवण येते. सर्व दिवाळी पोस्ट नां
दिवाळी शुभेच्छा
बाकि ठिक. छान.
वसुधालय.

ॐ सर्व दिवाळी अंक आहेत. सर्व दिवाळी अंक मध्ये
श्री श्रीकांत चिवटे यांच्या कविता आहे.
आज पण सर्व दिवाळी अंक म्हटलं कि सर्व दिवाळी
अंक डोळ्या पुढे उभे राहतात.

                            ॐ अनारसे मी घरी पिठ करून केलेले पूर्वी चे

 

 

ॐ भाऊ बीज शुभेच्छा!

                                                  ॐ

भाऊ बीज शुभेच्छा

सूर्य याची बायको छाया

. याना जमराज व यमुना मुल झाली

. यमुना यमराज यांना आपल्या घरी जेवण्यास बोलावित असे पण यमराज भीती ने यमुना च्या घरी जेवण्यास जात नसे. पण कार्तिक शुक्लपक्ष यमद्वितीया ला यमुना च्या घरी दारात उभा राहिला. यमुना ला खूप आनंद झाला. तिने स्वागत करून कुंकू तिट लावून ओवाळले जेवण दिले. यमराज भाऊ तृप्त झाला. वर माग म्हणाला यमुना म्हणाली दर वर्षी आज माझ्या कडे ये येत जा. यमराज हो सांगून दर वर्षी कार्तिक शुक्लपक्ष शुक्लपक्ष द्वितीया भाऊ बहिणी कडे जातात व बहिण याची खुषाली पाहून तृप्त होतो साठी यम द्वितीया भाऊबीज यम पूजन करतात.

भाऊ बीज शुभेच्छा

 

बळीराजा कार्तिक प्रतिपदा

                                             ॐ
कार्तिक प्रतिपदा : दिवाळी पाडवा :

बळीराजा अतिशय धार्मिक होता सतत यज्ञ करायचा.एकदा यज्ञ करीत असतांना
वामनाच्या रुपात श्रीविष्णू त्या ठिकाणी आले बळी राजाने स्वागत व पूजन केले.
तीन पावले जमीन मागितली दानाचे संकल्प सोडते वेळी पाण्याच्या झारीतून पाणी
पडत नाही म्हल्यावर दर्भाची काडी घातली शुक्राचार्यांचा डोळा फुटला ते संतापले.विश्वास
डळमळू लागला त्याच बरोबर दया आली.’ वामनाच्या खऱ्या रूपाची ओळख पटली
प्रत्यक्ष भगवान विष्णूच आहेत अशा वेळी मी त्यांना दिलेले दान कसे नाकारू?
जे त्यांचेच आहे ते मी त्यांना देण्यात मी मागे का पाहू?आपल्या संस्कृतीत
पश्चातापला फार महत्व आहे. तीन पावलं भूमी मागतो,पाहिलं पाऊल स्वर्गलोक
दुसरं पाऊल मृत्युलोक तिसर पाऊल च्या वेळी बळी राजा आपल मस्तक खाली
झुकावतो.आणि म्हणतो देवा या इथे ठेवा क्षणभर विचार न करता तो उत्तरतो.
त्याचे दातृत्व पाहून भगवान प्रसन्न होतात त्याला वर देतात ‘ कार्तिक प्रतिपदा
दिवस लोक तुझी पूजा करतील . बलीराजाला पाताळात पाठवून दिले.

ॐ 99 / ९९ यज्ञ केली १०० / 100 शंभर वां
काहि झाला नाहि. कोणत हि काम पूर्ण फळ मिळणे अवघड आहे. 

                                           ॐ

                           

कार्तिक शुक्लपक्ष १ प्रतिपदा  नक्षत्र विशाखा बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा. वहीपूजन पतीस ओवाळणे. काही ठिकाणी वडील यांना पण ओवाळतात. मी लग्ना आधी माझे वडील यांना ओवाळत !

 

DSCF05331471098_374167142760062_1013334411331785931_n

प्रणव चिवटे यांचा वाढदिवस आहे

              ॐ              दिनांक 12. 11 ( नोवेंबर ) 2015.
                                    गुरुवार

ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विशेष

दिनांक १२. ११. ( नोवेंबर ) २०१५ला

प्रणव चिवटे यांचा वाढ दिवस आहे.

प्रणव चिवटे यांना वाढ दिवस च्या
खूप खूप शुभेच्छा !

बाकि ठिक. छान.

वसुधालय

 

ॐ दिवाळी फटाके शुभेच्छा!

                                     ॐ

दिवाळी फटाके शुभेच्छा!

मन वैज्ञानिक प्रफुल्लीत राहण्यासाठी फटाके चांगले असतात गंधक फटाके ग्यास असलेले फटाके चांगले असतात किटक मारतात पाऊस मूळे सगळी कडे किटक किडे असतात फटाके मूळे मारतात तरी फटाके कार्बन डाय ऑक्सइड चे न करता गंधक याचे फटाके करून वापरावे हवा मध्ये दुष्परिणाम होणार नाही मोकळ्या जागा मैदान मध्ये फटाके उडवावेत

ॐ दिवाळी शुभेच्छा आकाश दिवा

दिवाळी शुभेच्छा!

आकाश दिवा 

आश्र्विन कृष्णपक्ष दर्श अमावास्या

                                                 ॐ

इसवी सन २०१५ नोवेंबर ११बुधवार

मन्मथनाम संवत्सर १९३७ संवत्सर
आश्र्विन कृष्णपक्ष दर्श अमावास्या

उल्कादर्शन लक्ष्मी कुबेर पूजन      

ॐ दिवाळी त स्वच्छता साठी लक्ष्मी पूजन च्या दिवस ला

         केरसुणी            ची पूजा करतात दिवाळी शुभेच्छा

 

 

 

दिवाळी शुभेच्छा !

                                                                     

 

                                                                            श्रीयंत्र

                                                            कुबेर यंत्र

                               केरसुणी  पूजन      

दिवाळी फराळ

                       ॐ

दिवाळी शुभेच्छा !

फराळ !

शेव, अनारसा, मका चा चिवडा,
गहू रवा गूळ साटोरी

 

ॐ कागदी आकाश दिवा दिवाळी

                                 ॐ                                           

कागदी आकाश दिवा

दिवाळी शुभेच्छा

 

झेंडू ची फुल रांगोळी

                                ॐ

दिवाळी शुभेच्छा

झेंडू ची फुल रांगोळी

दिवाळी

                                     ॐ

दिवाळी त

माती ची पणती कापूस च्या दोन वाती तेल यांनी दिवा लावून दिवाळी साजरी करतात.

मेणबत्ती नाही

धने गूळ अक्षदा वापरतात

दिवाळी शुभेच्छा

धनत्रयोदशी दिवाळी शुभेच्छा

                               ॐ

इसवी सन २०१५

शक १९३७मन्मथनाम संवत्सर

आश्र्विन कृष्णपक्ष दिवाळी शुभेच्छा

धनत्रयोदशी दिवाळी शुभेच्छा

मन्मथनाम शक १९३७ आश्र्विन कृष्णपक्ष

               ॐ

इसवी सन २०१५

मन्मथनाम शक १९३७ आश्र्विन कृष्णपक्ष

दिवाळी शुभेच्छा !

ॐ दिवाळी फराळ

 

 

 


धनत्रयोदशी मन्मथनाम शक १९३७

                 ॐ

इसवी सन २०१५

मन्मथनाम शक १९३७संवत्सर

आश्र्विन कृष्णपक्ष धनत्रयोदशी

दिवाळी शुभेच्छा

किल्ला

       ॐ

इसवी सन २०१५

दिवाळी शुभेच्छा

किल्ला

दिवाळी किल्ला

     ॐ                    नोवेम्बर 2015
                          आश्र्विन कृष्णपक्ष
                              दिवाळी किल्ला

ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विषेश. 

दिवाळी त किल्ला करण्याची पद्दत आहे.
मुलांना शाळे च्या सुट्ट्या लागलेल्या असतात.
राजे शिवाजी यांनी जे किल्ले जिंकले त्याची आठवण
राहण्या साठी किल्ला यांना नाव देऊन किल्ला बनवतात.
व माती त शुध्द हवा साठी खेळण्या साठी किल्ला बनवतात.
माती त हात किल्ला व झाडे लावणे आरोग्य च्या साठी पण
चांगले असते.
घरा पुढे दिवाळी आहे उच्छाह साठी किल्ला बनवतात.

मी आमच्या घरी ग्यालरीत किल्ला बनविते मस्त ह्या वय मध्ये
पण उच्छाह व मन भरून आनंद मनात असतो.

दिवाळी शुभेच्छा !

dscf1182_thumb1dscf1188_thumb

img_34931IMG_20151106_191341

img_01581_thumbdscf32742

img_3598114img_390811

कोल्हापूर महानगर पालिका

                     ॐ

कोल्हापुर येथील महानगर पालिका चा निकाल

कॉंग्रेस विजयी अभिनंदन!

संगणक मधील सकाळ ची बातमी आहे.

 

कोल्हापूर – कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे

निकाल जाहीर झाल्यानंतर

सोमवारी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असा जल्लोष केला.

फोटो गॅलरी >>

 

दुर्गा सोसायटी वास्तू

                       ॐ                कोल्हापुर
                                             २ नोव्हेबंर

दुर्गा सोसायटी वास्तू

दिनांक 1984 / १९८४ साल ला
कोल्हापूर दुर्गा सोसायटी चा वास्तू चा दिवस.
आम्ही कोल्हापूर येथे ईसवी सन १९६७ साल ला आलो
भाड्याचा घरात राहत होतो. कोल्हापूर तेंव्हा पासून वास्तव्य आहे.
आता ४८ आठ्ठे चाळीस वर्ष झालीत कोल्हापूर मध्ये
खूप फरक बदल झाला आहे.

आह्मी नवरात्र मध्ये च घरात वास्तू पूजा केली व राहण्यास आलो
राहिला आलो अस पोस्ट पत्र याने सर्वांना कळविले.
सर्व सोसायटी ची वास्तू साठी सर्व कोणी राहिला आले नव्हते.
एका  वास्तू  मध्ये सोसायटी वास्तू करण्याचे ठरले.
आम्ही राहिला आल्यामुळे मी पुरण पोळी व सर्व नैवेद्द केला.
दुसऱ्या वास्तू त आरती चालू झाली आणि आमच्या घरात
पुणे येथून बाबा माझे सासरे व आत्या सासुबाई अक्का
अचानक आले. व आम्हाला खूप बरं वाटलं.
न बोलावता मन तेथे जात व आज आपण कोल्हापूर येथे जाव वाटून
सहज दोघ बरोबर वास्तू च्या वेळेला आलेत जास्त महत्व आहे
मन कसं धावत आज अण्णा कडे जाऊ असं वाटणं व जमण
याला शक्ती म्हणतात तेथ पर्यंत पोहचण्याची.
आरती झाली सर्व वास्तू चे लोक पुरण पोळी चा नैवेद्द घेण्यास
आमच्या घरी आले व आमच्या घराची पण वास्तू केली गेली
सोसायटी ची होणार साठी आम्ही होम पूजा केली नव्हती
पुरण पोळी चा नैवेद्द व बाबा सासरे व अक्का आत्या सासूबाई यांचा पण
आशीर्वाद आम्हाला मिळाला त्यांना आज पण नमस्कार !

ॐ आता प्रणव दुर्गा सोसायटी च्या घरात राहतो.
मी पुष्कर कडे किंवा कोल्हापूर येथे असते.

दुर्गा सोसायटी च्या वास्तू ला माझा नमस्कार
बाकि ठिक. छान.
वसुधालय

 

img_01512dscf1562

पंडित राहुल देशपांडे

                       ॐ           

ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विषेश

शनिवार संध्याकाळ
पंडित राहुल देशपांडे यांचं गाण ऐकायला मिळाल.
खूप शात्रोक्त गायन ऐकायला मिळाल विठ्ठल विठ्ठल भजन तर
ऐकून मन व डोक याने भरलं वा.
पंडित राहुल देशपांडे लहान वय मध्ये फार छान व स्वच्छ गातात.
मराठी बोलणारे सर्व मंडळी मध्ये बसण्याचा योग आला.
तेथे जेवण पण केले.
खूप मन उच्छाह याने भरलं
आणि मी फेस बुक मध्ये राहुल देशपांडे यांना म्हटलं
मी गाण ऐकण्यास येत आहे व माझा फोटो लावला
आणि हो कार्यक्रम झाल्या नंतर राहुल देशपांडे यांना भेटले
ते म्हणाले मी आपल्याला ओळखल. मला एकदम मन भरून आलं !
सहज आपण व मी फोटो काढू असे विचारले सहज हो ! बोलून
अगदी घर च्या परिवार सारखं त्यांचा व माझा फोटो आहे.

खूप खूप राहुल देशपांडे यांच गाण व बोलण माझ्या मन मध्ये आहे.

पंडित राहुल देशपांडे यांना खूप खूप शुभेच्छा !
बाकि ठिक. छान.
वसुधालय.

 

%d bloggers like this: