लिप डे २९.२. २०१६शुभेच्छा
ॐ
लिप डे २९.२. २०१६शुभेच्छा
ॐ
मराठी भाषा दिवस शुभेच्छा !
ॐ गं गणपतये नम: ||
ॐ नमस्तस्यै । नमस्तस्यै । नमस्तस्यै । नमो नमः ।।
ॐ
मन्मथनाम शके १९३७ उत्तरायण शिशिरऋतु माघ कृष्णपक्ष
शुक्रवार ४
संकष्ट चतुर्थी
दिनांक २६. २. २०१६.
ॐ
सकाळी उठल्या नंतर चहा घेऊन सर्व आवरून स्नान करून स्वंयपाक करतात. देवाला नमस्कार करून सुरुवात केली कि मन उच्छाह येऊन चवदार जेवण बनतं. तसेच जेवण वाढतांना पण मागील गोष्टी अथवा मनाला टोचेल असे बोलू नये. अन्न पचन चांगले होते. शरीर मन खूप वेळ व काळ शांत व सर्वात मिसळण्याची ताकद येते. काम धंदा उद्योग अभ्यास करण्यास मन शरीर ताज तवान राहतं. साठी देवाला नमस्कार करून कोणत्याही काम याला सुरुवात करावी. आपण व आपले आजूबाजूचे मन भरून राहतात.देवाला नमस्कार करतांना विचार चांगले येतात. ताठ बसणे किंवा उभे राहणे याची सवय होते. विचार चांगले असले कि आपल्याला जे हवं ते मिळतं. ईच्छा शक्ति व काम याने फळ मिळते. सर्वांना ते मिळो साठी नमस्कार करावा. मंत्र म्हणावे..देवाला नैवेद्द दाखवितात सर्व अन्न स्वच्छ खाण्यास मिळो व अन्न पचण्या ची ताकद देऊन छान काम माझ्या कडून करून घे. भावना ईच्छा असते. कोणी कोणी मी तरी जेवण ताटात असले कि सुरु करण्या आधी नमस्कार करून जेवते.
याचा नक्की फायदा होतो.
ॐ
पूर्वी आम्ही राहता होतो तेथे दोन मनी माऊ यावयाच्या. संध्याकाळ झाली कि पायात घुट मळून म्याव म्याव करत तिच्या साठी दुध घालण्या साठी छोट ताट ठेवलेलं त्यात दुध घालेपर्यंत ती आवाज करायची दुध पावयाची बसत पण असे बराच वेळ. घाण करेल साठी तिला पाठवून हाकलून देत आम्ही असं !
मनी माऊ चं जीव प्रेम व स्वच्छता.
ॐ
फुल यांचा वास !
ताजी फुल गजरे विकायला किती वेळ बसावे लागत असणारं व सुकले कि परत कोण घेणार परत दुसरे दिवस ला परत असं काम ह्यात किती पैसे मिळत असतिल तरी पण मन हास्य ठेवून काम धंदा करतात. महत्व पूर्वक आहे. मुंबई पार्ले येथील जागा आहे.
ॐ
पंक्चर !
आमच्या कडे विकी मोपेड होती ती पंक्चर झाली कि किंवा दुरुस्ती करायची असेल तर हे मिस्त्री त्यांच्या कडे घेऊन जात मी पण कधी कधी बरोबर जात मुस्लीम होते आता असणार इतके व्यवस्थित बोलायचे व घरी आणून द्यावयाचे खालून च हाक मारून बोलणे करून जावयाचे खूप चांगली सज्जन लोक असतात. आज पण त्यांची आठवण व चेहरा डोळ्यापुढे आहे
नमस्कार!
ॐ
माघ शुक्लपक्ष द्वादशी
ब्रह्मचैतन्य महाराज!
गोंदवलेकर महाराज यांची जयंती ! नमस्कार
श्रीराम जय राम जयजय राम
ॐ
पोकळापाले भाजी
कोल्हापूर येथे खूप मिळते
देठा सगट भाजी निवडून शिजवितात
परतून किंवा हरबरा डाळ किंवा
कांदा घालून भाजी करतात.
ॐ
सर्व वाचक व संपादक
! सर्व फेस बुक नाते वाईक यांना फ्रेंस डे च्या शुभेच्छा पूर्वी वर्तमान पत्र मधील किशोर कुलकर्णी यांनी छापलेला लेख आहे वर्तमान पत्र म्हंटल तर किती वाचक फ्रेंड्स आहेत बघाब्लॉग भेटी भेटीव व प्रतिक्रिया देणारे सर्वांना नमस्कार
283,435 भेटी
वसुधालय ब्लॉग मधील भेटी
मला मला आज आज खूप छान वाटतं आहे काहीही
डिग्री नसतांना मी सर्वांना माझे लिखाण लिहिणे पसंत आहे. .
मना मना पासून वाचतात व व कधी लिखाण नसले तर विचार पूस पण प्रतिक्रिया देऊन करतात
वां आणि काय हवं यं हवयं! आयुष्य मध्ये
सर्वांना सर्वांना परत शुभेच्छा!
सर्वाना शुभेच्छा
ॐ
रथ सप्तमी सूर्य नमस्कार घालतात.
पण सूर्य नमस्कार ऐवजी वज्रासन पद्मासन
७३ वय मध्ये घालू शकते सूर्य यांना नमस्कार व्यायाम प्रकार आहे
ॐ
वसंत पंचमी च्या दिवस साला सरस्वती चा जन्म झाला.
ह्यासाठि सरस्वती ची पूजा करतात.
ब्रह्म यांनी शृष्टि श्रुष्टि निर्माण केली.झाडांची पाने गळून
नवीन पाने यतात.नवीन पाने व फुले आल्यामुळे बहर श्रुष्टि ला
शृष्टि ला येतो ब्रह्म यांनी नवीन शृष्टि श्रुष्टि झाल्याने सगळी
कडे हिरवे गार दिसते.
श्रुष्टि
ॐ
॥ श्री गणपतिस्तोत्रं ॥
॥ श्री गणेशाय नाम: ॥
॥ नारद उवाच ॥
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ॥
भत्त्कावासं स्मरेन्नित्यमायु: कामार्थसिध्दये ॥१॥
प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं व्दितियकमं ॥
तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥
लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ॥
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टममं ॥३॥
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकमं ॥
एकादशं गणपतिं व्दादशं तु गजाननमं ॥४॥
ॐ
व्दादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: ॥
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकरं प्रभो ॥५॥
ॐ
विविद्दार्थी लभते विद्दां धनार्थी लभते धनम् ॥
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थि लभतेगतिमं ॥६॥
जपेद्गणपतिस्तोत्रं षड्र्भिमासै: फलं लभेत् ॥
संवत्सरेण सिध्दि च लभते नात्र संशय: ॥७॥
अष्टभ्यो ब्राःमनेभयश्र्च लिखित्वा य: समर्पयेत
तस्य वि द्द। भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत:॥ ८ ॥
॥ ॐ ॥
॥ ईति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम
श्रीगणपति स्तोत्रं संपुर्णमं ॥
ॐ
फुल
याची वेणी व गुंफलेली फुल
मी स्वत: गुंफली आहे
. व दोरा मधील वेणी
पण मी चं विणली आहे.
ॐ
कविता क्र . २०-१-८८
१४७ मन
मन पवनाच्या वेगे
कोणा भेटण्या निघाले गे ते ?
लेक लाडका तिचा आहे
साता समींदरा पलिकडे |
आठव त्याचा येता
मनी ती गहिवरे
तोल सांभाळून तिचा ती
तिलाच ती सावरे |
मन देत कधी
हिंमत कणखर
हळवे होते कधी ते
ताण करिते मोरपिसावर |
या मन तरंगाचे
किती निराळे रंग ?
विचार करीताना ते
होवून जाते दंग |
अशी विचारमालिका ओवताना
सर कित्येक जाती ओघळून
मन येते कधि बहरून
कधी जाते ते कोमेजून |
वाट पाहते ती त्या लेकराची
आणून डोळ्यात प्राण
तिचा राजसबाळ येणार परतून
येणार परतून
सौ. सुनीती रे. देशपांडे
सौ. सुनीती रे. देशपांडे
ॐ
माझे फेस बुक !मी वयान ७३ वर्ष याची आहे. इसवी सन २०१० पासून मराठी लिखाण ब्लॉग लिहित आहे. ते कांही ब्लॉग फेस बुक मध्ये लिंक देऊन घालत आहे. काही काही फोटो घालून माहिती लिहित आहे. किती जन वाचतात तसे सांगता येत नाही. पण तरुण मुल व मुली व जेष्ठ पुरुष व महिला पण वाचतात. सांगायचं कि मला कोणी ताई म्हणत कोणी वहिनी म्हणत कोणी आत्या म्हणत कोणी ॐ लिहित कोणी आज्जी म्हणत हि सर्व नाती कसं जुळली आहेत बघा !फ्रेंड शिप पेक्षा पण जास्त आपुलकी ची आहेत ! फेस बुक मधील नाती ! नात !यांना शुभेच्छा ! वसुधालय