आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 8, 2016

मन! सौ. सुनीती रे. देशपांडे

                                                           ॐ

कविता क्र . २०-१-८८

१४७ मन

मन पवनाच्या वेगे

कोणा भेटण्या निघाले गे ते ?

लेक लाडका तिचा आहे

साता समींदरा पलिकडे |

आठव त्याचा येता

मनी ती गहिवरे

तोल सांभाळून तिचा ती

तिलाच ती सावरे |

मन देत कधी

हिंमत कणखर

हळवे होते कधी ते

ताण करिते मोरपिसावर |

या मन तरंगाचे

किती निराळे रंग ?

विचार करीताना ते

होवून जाते दंग |

अशी विचारमालिका ओवताना

सर कित्येक जाती ओघळून

मन येते कधि बहरून

कधी जाते ते कोमेजून |

वाट पाहते ती त्या लेकराची

आणून डोळ्यात प्राण

तिचा राजसबाळ येणार परतून

येणार परतून

सौ. सुनीती रे. देशपांडे

                                                  सौ. सुनीती रे. देशपांडे

माझे फेस बुक!

                                                ॐ

माझे फेस बुक !मी वयान ७३ वर्ष याची आहे. इसवी सन २०१० पासून मराठी लिखाण ब्लॉग लिहित आहे. ते कांही ब्लॉग फेस बुक मध्ये लिंक देऊन घालत आहे. काही काही फोटो घालून माहिती लिहित आहे. किती जन वाचतात तसे सांगता येत नाही. पण तरुण मुल व मुली व जेष्ठ पुरुष व महिला पण वाचतात. सांगायचं कि मला कोणी ताई म्हणत कोणी वहिनी म्हणत कोणी आत्या म्हणत कोणी ॐ लिहित कोणी आज्जी म्हणत हि सर्व नाती कसं जुळली आहेत बघा !फ्रेंड शिप पेक्षा पण जास्त आपुलकी ची आहेत ! फेस बुक मधील नाती ! नात !यांना शुभेच्छा ! वसुधालय

सूप विणकाम

                                             ॐ

कसं विणकाम सूप आहे बघा !

हल्ली ल्याष्टीक व ष्टील ची सूप मिळतात.

%d bloggers like this: