शबरी चा गजरा
ॐ
शबरी चा गजरा
आम्ही आमच्या घरी पुण्यात गेलोलो
नन्तर जिमखान येथे बेदरकर राहत होते
आत्ता ते दुसऱ्या भागात राहतात …
त्यांच्या कडे
गाण तपस्वी हिराबाई बडोदेकर
यांचा नुकताच वाढ दिवस झाला विषय निघाला
हे श्रीकांत चिवटे म्हणाले आपण त्यांना भेटू
आम्ही आनंद यांना घेऊन निघालो
वाटेत कोठे हि फुल दिसेना
काय करावे असं मनात आलं
हे म्हणाले तुझ्या डोक्यातील गजरा काढ
तो देऊ या मी म्हटलं घातलेला आहे नां
असू मी काढला व छान हातात ठेवला
त्याचं घर आलं
त्यांच्या घरातील बेल वाजविली
वयस्कर पांढरी साडी नेसलेल्या बाई आल्या
कोण कुठून आले कशा साठी विचारले
त्यावेळेला माझ राहाण मोठ्ठ कुंकू कोल्हापुर
ऐकून थांबा म्हणाल्या
बराच वेळ थांबलो
आत गेलो
मोठ्ठा हॉल मस्त गालीच्छा व दारा जवळ चं
बसायला कोच
तेथे आम्ही बसलो
थोड्या वेळ नंतर
पांढरी साडी वाकत वाकत हिराबाई आल्या
गालीच्छा वर बसल्या मी पण नतंर त्यांच्या जवळ
गालीच्छा वर बसले
त्यांना गजरा दिला
त्यांनी हातात घेतला व वास घेतला
कित्ती वेळ त्यांच्या हातात गजरा होता
मला खूप बर वाटलं
ह्यांना विचारलं काय करता सांगितलं
मला म्हणाल्या
काय करता
भीत भीत मी सांगितलं नुकतीच
सतार शिकत आहे
एकदम खुश होऊन
नातीला हाक मारली तुझी सतार दे ह्यांना
नात बाहेर गेल्या मुळे त्यांच्या घरी व त्यांच्या
जवळ माझी सतार वाजविण राहील
यांची आज पण मला चुकल्या सारखं वाटत आहे
त्यावेळेला क्यामेरा नव्हता सर्व
खरं असल्या शिवाय लिखाण
होणार चं नाही
मन मध्ये राहत आठवण
हिराबाई नां आज पण आठवून
त्यांना नमस्कार