आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 30, 2017

शुभम् करोति कल्याणम्


तारिख ३० जानेवारी २०१७

शुभम् करोति कल्याणम्
आरोग्यम् घनसंपदा
शत्रबुद्धी विनाशाय
दिपत् ज्योति नमोस्तुते

दिव्या दिव्य दिपत् कार
काणीकुण्डल मोतिहार
दिवा लावला देवापषि
मज्हा माझा नमस्कार
सर्व देवापाषि

img_20140713_162704

महात्मा गांधी


३० जानेवारी २०१७
महात्मा गांधी

गांधी बाप्पा
आत्ता ११ वाजतां
मि व प्रणव देवा पुढे
घरी दोन २ मिनिट उभे राहिलो
पूर्वी शाहू मिल चा भोंगा ऐकू येत असे
आत्ता शाहू मिल बंद आहे

नमस्कार !

मी लहान असतांना हैद्राबाद येथे होतो
तेथे मोठ्ठा मैदान मध्ये
महात्मा गांधी यांची सभा होती
खूप उंच बसलेले दिसले
तसे मी लहान होते पण दिसले नक्की चं
महात्मा गांधी
नमस्कार

मी माझी आई ( सौ वहिनी) गंगा ( सौ काकू )
सौ आत्याबाई व ईतर तेथील बायका
चालत चालत मैदान मध्ये गेलोलो आठवत
खूप लांब मैदान होत
मी त्या मैदान चं नाव विचारून लिहीन नंतर
माझ्या भावांना माहित असणार

येतांना माझ्या गंगा काकू ने निशा ला चुलत बहिण
हिला कडेवर घेतले
तसेच माझ्या आईने पण मला कडेवर घेतले

खूप चालून झाल्या नंतर गंगा म्हणाल्या
निशा कुठे निशा कुठे

तर आत्या बाई म्हणतात आ हो तुमच्या कडेवर चं
निशा आहे नां
कसं असतं बघा आपलं चं आपल्याला जड होत नाही

नंतर आठवत होत तेंव्हा कुणी तरी गोष्ट म्हणा
किंवा सहज अनुभव सांगितला असणार

आज महात्मा गांधी

यांची आठवण

नमस्कार

img_61931

तुरी ची डाळ पिठलं


तारिख ३० जानेवारी २०१७

तुरी चि डाळ याचे पिठलं
रात्री तुरीची डाळ
पाणी घालून भांड मध्ये भिजत घातली
सकाळी मिक्सर मध्ये तुरीची डाळ व पाणी
लाल तिखट मिठ हिंग हळद एकत्र करून
वाटून घातले पातेले मध्ये तेल मोहरी ची
फोडणी केली त्यात सर्व वाटलेले तुरी चे
डाळ याचे मिक्स्र्र घातले वाफ आणली मस्त
नविन चव व मस्त पितळ केल.

 

img_61861

img_61891

 

%d bloggers like this: