मिरची चा खरडा व ठेच्चा
ॐ
तारिख ३१ मे २०१७
जेष्ठ महिना
बुधवार
…
लाल मिरची देठा सगट चा
खरडा
हिरवी मिरची देठा सगट चा
ठेच्चा
ॐ
तारिख ३१ मे २०१७
जेष्ठ महिना
बुधवार
…
लाल मिरची देठा सगट चा
खरडा
हिरवी मिरची देठा सगट चा
ठेच्चा
ॐ
३० मे २०१७
जेष्ठ महिना
मंगळवार
…
मराठवाडा औरंगाबाद येथील
प्रसिध्द पसिद्ध
देठ सगट लाल मिरची चा
खरडा / खर्डा
लाल मिरची देठ सगट पाणी मध्ये
रात्र भर भिजत ठेवली
सकाळी टाटा मिठ बारिक असलेले
घेतले
पाटा वरवंटा मध्ये वाटून घेतले
लाल मिरची चे देठ पण घेतले
मिठ एकत्र करून मस्त वाटले
मी
कोल्हापूर येथील
ब्लॉगवाल्या आजीबाई
चां
ॐ
तारिख २९ मे २०१७
जेष्ठ महिना
सोमवार
शंकर पार्वति
चा दिवस
|| श्री महालक्ष्मि यंत्र ||
शुभेच्छा
ॐ
उडीद पापड व लिज्जत पापड
उडीद पापड मध्ये मुगडाळ व उडीदडाळ असते
पापड खार असतो मिरे मिरची मिठ असते
डाळी असल्या मुळे दोन चार तळून खाल्ले की
पोट भरतं
तसं लिज्जत पापड सिंद्धी पीठ असतं
पापड खार नसतो
चवी ला हलका असतो
पण पोट भरल्या सारखे वाटत नाही
ॐ
तारिख २७ मे २०१७
जेष्ठ महिना
शनिवार
…
कित्ती छान पैसा चं झाड आहे नां
आणितेथे बसली मुल
एक आत्या भाच्चा व शेजार मुलगा
मी लहान पण त्यांना शिकविल
सायकल चालवायला
व ईतर
हि मुलं आत्ता बाप आहे तं
मी तृप्त आहे
आई व बाप तर सर्व करतात चं
पण ईतर यांनी काम व जीव लावला नां
जास्त मुल ऐकतात
व धाक पण असतो
पूर्वी घरी आत्या असे शेजार चे
पण काळजी घेत असे
आत्ता तसे होत नाही
आई व बाप
जवळ राहून त्यांना आई व बाप
ची कदर व धाक राहत नाही
T. V. तिल बातमी वाचून
चर्र झालं
ॐ
तारिख २६ मे २०१७
जेष्ठ महिना
शुक्रवार
…
काल मि घरात नेसयला आणलेल्या
साडी घडी मोडली
धुतलेली साडी नेसून
बाहेर बाजार साठी गेलेली
लांबून चं पाहून मोड आलेली मटकी
कांदा बटाटा व ईतर किरकोळ विकणाऱ्या
आजी बाई निं मला छान
अंगठा व बोट यांनी केलं
मी नेहमी मोड आलेली मटकी व
ईतर भाजी घेत असते
रोज ची चं ओळख कधी कधी
मुलगा आला नाही बरोबर विचारतात
मुस्लीम आहेत
सांगायाच की
कोल्हापुर ठिकाणी आह्मी मी
पन्नास 50 / ५० वर्ष राहत आहोत
मराठा मुस्लीम ब्राह्मण
असं कधी चं विचार केला नाही
पोट पूजा व माणूस की एवढ चं
जवळ आहे
त्यांनी फोटो दिला तर ठेवण ईथं
हि मटकी मी घरी केलेली आहे
ॐ
तारिख २५ मे २०१७
वैशाख अमावस्या
गुरुवार
…
काल तारिख २४ मे २०१७ ला
संध्याकाळी
उमा TOKIJA येथे लक्ष्मिपुरी चा भाग
बस पळत सुटली काही चालक जखमी झाले
काही वाहन मोडून खराब झाले
संध्याकाळी ५ / ६ वाजता प्रणव चिवटे
त्या भागात होते
पोलीस सारखं सांगत डावीकडून जा डावीकडून जा
प्रणव डावी कडून आले
वाहन व प्रणव सुखरूप घरी आले
काही वेळ नतंर मला सांगत
उमा TOKIJ जवळ पोलीस डावी कडून जा डावी कडून जा
मी डावी कडून आलो
तोड्या वेळ नंतर
T. V. त बस ची बातमी पाहिली
घरून बाहेर निघतांना
चिडून भांडून निघू नाही
वास्तू ला नमस्कार करावा
घरी सुखरूप येता येत
ॐ
25 मे मुन्ना चिंतन शहा यांचा वाढ दिवस आहे.
आमच्या शेजारी शहा राहत !
मुन्ना तेंव्हा आठ नऊ महिना चा होता
आता इंजिनियर झाला आहे
आम्ही फोन करून भेटत असतो
चिंतन किरण शहा यांना
त्याला आत्ता दोन मुलं आहेत
खूप खूप शुभेच्छा
ॐ
तारिख २४ मे २०१७
वैशाख महिना
बुधवार
…
कोल्हापुर येथे
आमच्या घरी
तांब
याचि भांडी आहेत
ताम्हण तांब
कोल्हापुर तांब कळशी
तांब गंगाळ
ॐ
तारिख २३ मे २०१७
वैशाख महिना
मंगळवार
…
घरातिल गंगाळ स्वच्छ
चिंच मिठ याने घासले धुतले
ओडोपिक पावडर ने घासले धुतले
स्वच्छ केले दोन तिनि वेळा
बोरंरिग चे पाणि याने भरून ठेवले
घरातिल तुळस आणली धुतली
गंगाळ पाणी मध्ये ठेवली
मस्त हॉल मध्ये
छोट्या टेबल वर ठेवली
मस्त घर भर तुळसी चा
वास येत आहे
हल्ली फुल ठेवतात
पण तुळस घरी चं आहे
साठी तुळस ठेवली
कित्ती स्वच्छ आहे पाणी नां
आणि गंगाळ पण
ॐ
तारिख २१ मे २०१७
वैशाख महिना
रविवार
…
पूर्वी घरी
अशा प्रकार चे मांजर रोज
दिवस भर दारात येत असे
घरी पण येत असे पण येत असे
पण मि घरी फार वेळ ठेवत नसे
पण संध्याकाळ झाली की
रोज दुध छोट्या ताटात देत असे
कशा गुबगुबीत मांजर
आहेत बघां
प्राणी पाळाव
सेवा करावी
पण त्यांची लाल अथवा केस
आपल्या घरात वां आपल्या अंग
व घर मध्ये लागू देऊ नये
याची काळजी घावी
नाही तर आपल्या शरीर मध्ये
तसे केस व वागण
निर्माण होत
असं वाचल आहे
ॐ
ओम
माजी प्रंत प्रधान राजीव गांधी
यांची पुण्यतिथी 21 मे
नमस्कार !
ज्या दिवशी ला बातमी कळली
त्या दिवसा ला आम्ही
गोंदवले येथे होतो
व कोल्हापूर येथे लाल s. t. ने यावयाला निघालो होतो
सर्व रस्ता भर शुकशुकाट होता
आज ही त्याची आठवण येते व हळहळ वाटते
ॐ शान्ति: || शान्ति : || शान्ति :||
ॐ
मोड आलेले हिरवे मूग
रात्र भर मूग पाण्यात भिजत ठेवले.
दुस-या दिवशी पाण्यातुन काढले. धुतले.
रूमालात बांधले.
सकाळी मोड आलेले चाळणीत काढले.
ॐ
तारिख २० मे २०१७
वैशाख महिना
शनिवार
…
काल शुक्रवार
मारुति ला जाऊण आले
लाटलेले थोडे पापड दिले
येतांना दुध व जिलबी आणली
सौ सखुबाई आजी व सौ गंगुबाई आजी
यांचे तयार केलेले फोटो त्यांना दिले
फोटो पाहून खूप चं चं खूप खुश व
हास्य दिसलं त्याच्या बोलण्यात
जांभळ घेतली
घरी दिवा लावला जिलबी चा नैवेद्द ठेवला
मी दोन जिलबी खाल्ली
बसं आणि काय करायचं
वास्तू तं जेथे राहतो ज्यांनी बांधली
तो दाता नसला तरी आम्ही राहतो
कित्ती सोय करून दिली आहे
आम्हाला सुखरूप राहण्याची
आज हलकं व निर्धास्त व आमचं आहे
असं सांगून आम्ही आमच्या वास्तू तं
सुखरूप आहोतं
शुभेच्छा व वास्तू ला
नमस्कार .
ॐ
तारिख १९ मे २०१७
वैशाख महिना
शुक्रवार
…
महाराष्ट्र
नेहमी चं सत्य व जागरुक असतो
ॐ
तारिख १९ मे २०१७
वैशाख महिना
शुक्रवार
…
कधि कधि
नाति निष्ठुर पणे
तोडावी लागतात
ॐ
तारिख १८ मे २०१७
वैशाख महिना
गुरुवार
…
काल संध्याकाळी
भाजी आणायला बाहेर पडले
तेथे चं आंबा विक्री चे दुकान आहे
मला पाहून या की
१०० रुपये डझन आंबे आहेत
व एक तेथील विक्री वाले जोरजोरात
१०० रुपये डझन
सांगत मोठ्ठ्याने बोलतं
मी बघू साठी गेले तर चांगले वाटले आंबे
मला भाजी चे पैसे जास्त जवळ नसणार
पण पन्नास 50 / ५० रुपये मिळाले
अर्धा डझन आंबे घेतले
पुरुष व बाई दोघं हि असतात
त्यातील बाई निं एक आंबा जास्त दिला
पन्नास रुपये मध्ये ७ / 7 आंबे दिले
काल थोडे खाले गोड आहेत
आज थोडे ठेवले तं
ॐ
तारिख १८ मे २०१७
वैशाख महिना
गुरुवार
…
पूर्वी दिवाळी तं पणत्या ची
रांगोळी काढली
पणत्या चां प्रकाश टा ई ल्स मध्ये
पण दिसतो
शुभ प्रभातं
ॐ
तारिख १७ मे २०१७
वैशाख महिना
बुधवार
…
जांभळ व करवंद
सौ सखूबाई आजी व सौ गंगूबाई आजी
कित्ती छान सुरेख नाव आहेत
आणि हो !
राहणं पण
नं ऊवारी लुगड कुंकू भरपूर
हिरवा रंग च्या बांगड्या
नाकातं चमकी
गोरा रंग
हातावर गोंदलेलं
झाडा खाली सावली तं व वारा मध्ये
कशा बसतात बघा
नाही तर आपण घरी पंखा लावून
हुष करत बसतो
बोंद्रे गावातून बस किंवा टेम्पो ने येतात
सकाळी १० / ११ वाजतां येतात
संध्याकाळ ८ पर्यंत बसतात.
तो पर्यंत सर्व माल विकला जातो
गाडी वाले चालणारे स्कूटर चालविणारे सर्व जण
थांबून भाव विचारूण किलो पेक्षा जास्त माल घेतात
जांभळ व करवंद ताजे असतात
त्यामुळे त्या त्या दिवस ला सर्व
जांभळ व करवंद विकली जातात
मी रोज त्यांच्या कडून जांभळ घे त असते
मी रोज संध्याकाळी जात असते पण आज
सकाळी चं गेले व जवळ क्यामेरा होता
भीत भीत चं विचारले फोटो काढू
एकदम खुश होऊन
मस्त बसल्या
माहिती दिली
व म्हणाल्या पेपर मध्ये द्या
मी सांगितलं काम्पुटर मध्ये लिहिते
हं हं करून बरं वाटल त्यांना
कसे फोटो आले बघू म्हणाल्या
दाखविल्रे हो हो म्हणाल्या
मला खूप छान चं वाटलं
हिशोब पण म्हणून बरोबर करतात
आणि मला विचारतात तुमच नाकातल (चमकी)
केवढ्याला कित्ती मोठ्ठी आहे.
त्यांची करवंद व जांभळ खूप खपून
त्यांची भरभराट हो वो
ॐ
तारिख १७ मे २०१७
वैशाख महिना
बुधवार
…
गवार चि भाजी
गावठी देशी गवार
भाजलेले तिळ कुट घालून
·
खमंग भाजी होते
माझ्या सौ गंगा काकू नां
खूप
आवडत असे
ॐ
तारिख १६ मे २०१७
वैशाख महिना
मंगळवार
…
K. M. T.
बसं चे तिकीट
पूर्वीमी खूप बस ने प्रवास करता असे
हल्ली थोडं चालणं थोडी रिक्षा करते
तरी पण मागच्या महिना मध्ये बसं ने
प्रवास केला बदल व चार लोकात बसता येत
सांगायचय कि पूर्वी बसं चे तिकीट कसं मिळतं
व कालं चं प्रणव बसं प्रवास करून आले
व त्यांना कसं तिकीट मिळाले
एवढं चं
पूर्वी फाडून तिकीट देत
आत्ता मशीन ने देतात.
ॐ
तारिख १५ मे २०१७
वैशाख महिना
१४ तारिख चा फोटो …
काय उन्ह मध्ये
हिरव गार शेत आहे
आणि भर उन्ह मध्ये
कसं काम धंदा करतात
बघां
ॐ
तारिख १४ मे २०१७
वैशाख महिना
रिक्षाने मी व प्रणव
प्रयाग ला जाऊन आलो
नमस्कार
Vasudha Chivate Manjusha Sumati Sudam आत्या
मला वाटलं चं कोणी तरी विचारणार
कोल्हापुर जवळ प्रयाग गाव आहे
तेथे पर्यंत पंचगंगा नदी वाहत आहे
पौंष जानेवारीत खरी गंगा ह्या नदी ला मिळते
सर्वजण त्यावेळे ला यात्रा रूप
आणून गंगा स्नान करतात
आत्ता रिक्षा व ईतर वाहन जातात
पूर्वी लाल बसेस असतं
माझ्या साडी चा रंग पण
मेंढरे यांचा सारखा चं आहे
ॐ
तारिख १४ मे २०१७
वैशाख महिना
रिक्षाने मी व प्रणव
प्रयाग ला जाऊन आलो
नमस्कार
Vasudha Chivate Manjusha Sumati Sudam आत्या
मला वाटलं चं कोणी तरी विचारणार
कोल्हापुर जवळ प्रयाग गाव आहे
तेथे पर्यंत पंचगंगा नदी वाहत आहे
पौंष जानेवारीत खरी गंगा ह्या नदी ला मिळते
सर्वजण त्यावेळे ला यात्रा रूप
आणून गंगा स्नान करतात
आत्ता रिक्षा व ईतर वाहन जातात
पूर्वी लाल बसेस असतं
ॐ
तारिख १४ मे २०१७
वैशाख महिना
रिक्षाने मी व प्रणव
प्रयाग ला जाऊन आलो
नमस्कार
Vasudha Chivate Manjusha Sumati Sudam आत्या
मला वाटलं चं कोणी तरी विचारणार
कोल्हापुर जवळ प्रयाग गाव आहे
तेथे पर्यंत पंचगंगा नदी वाहत आहे
पौंष जानेवारीत खरी गंगा ह्या नदी ला मिळते
सर्वजण त्यावेळे ला यात्रा रूप
आणून गंगा स्नान करतात
आत्ता रिक्षा व ईतर वाहन जातात
पूर्वी लाल बसेस असतं
ॐ
तारिख १४ मे २०१७
वैशाख महिना
रिक्षाने मी व प्रणव
प्रयाग ला जाऊन आलो
नमस्कार
Vasudha Chivate Manjusha Sumati Sudam आत्या
मला वाटलं चं कोणी तरी विचारणार
कोल्हापुर जवळ प्रयाग गाव आहे
तेथे पर्यंत पंचगंगा नदी वाहत आहे
पौंष जानेवारीत खरी गंगा ह्या नदी ला मिळते
सर्वजण त्यावेळे ला यात्रा रूप
आणून गंगा स्नान करतात
आत्ता रिक्षा व ईतर वाहन जातात
पूर्वी लाल बसेस असतं
ॐ
तारिख १५ मे २०१७
वैशाख महिना
सोमवार
…
सावली
आपण केलेले काम व
आपली कला
आपल्या बरोबर असते
ॐ
तारिख १४ मे २०१७
वैशाख महिना
रविवार
…
नाणी दहा १० / 10
रुपये चिं
आत्ता बंद केली गेली आहे .
परवा सुभाष दुध डेअरी वाले
यांच्या कडे दुध आणायला गेलेली
१० रुपये ची पाच नाणी 50 रुपये
घेऊन केलेली आज घेतो म्हणाले
परत १० रुपये ची नाणी आणू नका बोलले
मी म्हंटल ५ रुपये ची चालतील
तर हो म्हणाले
तसेच जांभळ बाई नां पण १० रुपये नाणं दिल
चालेल का विचारारले आधी पण कोणी तरी त्यांना
१० रुपये ची नाणी दिलेली साठी माझं
एक नाणं १० रुपये चं घेतलं
व आज चं समजलं
१० रुपये चं नाणं बंद केलं गेल आहे
आमच्या घरी १० रुपये ची नाणी
11 नाणी आहेत एकशे दहा रुपये आहेत
आज बघते कोणी घेत का नाही तर
आठवण साठी राहतिल.
ॐ
मी आई
मी
|| श्री यंत्र ||
बरोबर काढते यं
कागद कलाकृति करते
खेळ खेळते
रांगोळी मस्त काढते
अनारसे मस्त करते
कुंडी त चाफा चं रोप लावते
चाफा कुंडीत कुठे हि लावलेला दिसला नाही
शिंकाळी करते
शुभेच्छा
ॐ
तारिख १४ मे २०१७
वैशाख महिना
रविवार
MOTHER’S DAY …
आई चां दिवस
आई झाल्या बद्दल
अभिनंदन व शुभेच्छा
सोप नाही यं
असो
माझी आई
वहिनी नमस्कार
वहिनी गोड साटोरी छान करत असे
विडा चं पान ह्यावर लाल गंध याने
सूर्य चक्र काढत असे
मी पण असं करायला व
सूर्य चक्र काढायला शिकले आहे.
ॐ
तारिख १३ मे २०१७
वैशाख महिना
शनिवार
…
सावली
माणसं नां
सावली सारखी सोबत करतात व
यश मिळवून देतात
शुभेच्छा व अभिनन्दन
ॐ
तारिख १३ मे २०१७
वैशाख महिना
ब्लॉग
…
ब्लॉग चि भिती नाही
स्वतंत्र स्वत: चा असतो
पुसला जाईल का
कोणी घेईल का
कॉपी करू व शेअर करू
शकत नाही
वाचून प्रतिक्रिया अथवा
तसं लिखाण करता येते
एवढ आहे
मित्र जुळवा अथवा काढून टाका
असे पण नाही
जग भर कोणी हि वाचू शकतो
मी २०१० साल पासून ब्लॉग लिहित आहे
तपासून पहाव लागत नाही
अमेरिका .फ्रांस ईंग्लड देश मधील मला
प्रतिक्रिया आलेल्या आहेत
निर्धास्त असतं
ब्लॉग मस्त
ब्लॉग लिखाण करणारे यांचं
अभिनंदन व शुभेच्छा
ॐ
तारिख १२ मे २०१७
वैशाख महिना
सेवा ! काम !
…
MOTHER’S DAY
साठी सर्व जण
आई ची काळजी घेतात
त्या साठी लेख आहे
आमच्या आई चं
म्हतार पण
मी काही पाहिलं नाही
पण आमची मोठ्ठी बहिण व भावंड
यांनी आई चं काम व सेवा केली
बहिण जास्त लक्ष घालत असे
गावात चं राहते
त्यामुळे पटकण
केंव्हा हि आई ला भेटत असे
व लक्ष देत असे
अर्थात भावंड सौ भावजय पण करत
ते पण आई ला मानत व काम सेवा करत
मी लांब असल्या मुळे मला काही चं
सेवा व काम जमल नाही एवढ चं सांगायचं यं
आई चा दिवस साठी मोठ्ठी बहिण
आई व मुलगी चा उल्लेख केला
आमची बहिण कमल ताई व मी
ॐ
तारिख १२ मे २०१७
वैशाख महिना
निश्चय ! निश्र्चय
…
माणुस मनाचा निश्चय करतो
आपण ठरवू ते काम अथवा भेट
व कामात मनात व निश्चय
ठेवावयाला हवां
नक्की मन तसं साध्य
करून काम करून घेतं
मला असे खूप अनुभव आलेत
मला परदेश मध्ये जावायाच होत
पण माझं शिक्षण वां कला
नसल्या मुळे जाण झाल नाही जाऊन
पण मुला मुळे आले व
लेख पण छापून आणला
हल्ली खूप यात्रा कंपनी आहेत
त्या वेळेला नव्हत्या
पुस्तक व्हावं ईच्छा पण पूर्ण झाली
मुल व्हावी ईच्छा पण पूर्ण झाली
रांगोळी ची सत्कार ची ईच्छा
पूर्ण झाली
असो ईच्छा व निश्चय साध्य करतो
शक्ती असते !
ॐ
तारिख १० मे २०१७
वैशाख महिना
आई
MOTHER’S DAY
साठी लिखाण आहे
…
आपली आई तर आहे चं
आपण जेंव्हा कळ देऊन
आई होतो
ते खूप चांगल असतं
मुल मोठ्ठी झाली की
मुलाचं नावं घेऊन
हाक मारतात बोलावतात
ते जास्त चांगल वाटतं
प्रणव च्या आई व पुष्कर च्या आई
असं म्हणतात जो जवळ राहते किंवा
ज्याची जास्त ओळख असते त्या प्रमाणे
बोलावतात
पुष्कर कडे तर सर्व जण मला आई चं
म्हणतात
कांही जणांना आई क्या नामं है |
विचारतात त्यांच्या तं सांगण असतं
मी कोल्हापुर येथे वाणी दुकान व भाजी साठी जाते
तर मुलगा आला नाही आज
मुलगा याच्यात कित्ती
भरलेलं जिव्हाळा आहे पहा
सहज विचारणं बोलण
अशात चं आई दिसते.
`
माझी सौ सुनबाई पण आई चं हाक देते.
मी पूर्वी सासूबाई नां आई म्हणाले तर
मला सासूबाई म्हाणा असं सांगितलं
व मी सासूबाई चं म्हणतं
पन्नास वर्षा पूर्वी !
आई ति आई व सासूबाई ते सासूबाई
घर जोडलेली असतात
आम्ही भावंड आई ला वहिनी म्हणत
आमचे काका आत्या म्हणत ते चं नाव
पडल
व जाईल त्या गाव मध्ये माझ्या आई ला
वहिनी म्हणत वहिनी बोंड झाला
असं वेगवेगळी नाव असली तरी आई चं
रूप एकच असतं
कळ येऊन आई होणं
आई व ईतर नाव
यांना नमस्कार
ॐ
तारिख १० मे २०१७
वैशाख महिना
…
बुध्द / बुद्ध पौर्णिमा
पुष्कर कडे असतांना
बुद्ध यांची कथा रोज
थोड थोड बघत होतो
नमस्कार
आणलेले आंबे संपले
काही आंबे चिरून खाल्ले
काही रस करून खाल्ले
दही पिठीसाखर मध्ये
एक अंबा फोडो करून खाल्ला
आंबा श्रीखंड
दोन आंबे ताट याला तूप लावून
उन्ह मध्ये वाळवून
आंबा पोळी खाल्ली
आणि हो !
एक अंबा मारुती ला दिला
एक अंबा असं चं देवाला दिला
कित्ती बरं वाटतं
आंबा चां छान ऊ प यो ग
केला स्वत: व देव यांना पण
केला
ॐ
तारिख ९ मे २०१७
वैशाख महिना
मंगळवार
परवा रविवार दिवसला
त्रिंबोली देवी टेंबलाई देवी ला
गेलेली दर्शन घेतले
ओले उडीद पापड
तळलेले नैवेद्द दिला
फोटो काढू का विचारले
व फोटो काढले
निवांत बसले
बरेच भक्त दर्शन साठी आलेले
लग्न पत्रिका दिलेली दिसली
सर्व दर्शन मना सारखं वाटतं
आज पण
ॐ
ॐ Vasudha Chivate Manjusha Sumati Sudam आत्या !
हि देवी कोल्हापुर येथे गावा पासून
खूप लांब आहे डोंगर आहे तेथे आहे
आत्ता आत्ता सरळ जाता येते
पण ऊंच आहे गावातिल || श्री महालक्ष्मी देवी ||
चि मोठ्ठी बहिण पूर्वी दोन बहिणी चिं
झाली भांडण झाली मोठ्ठी बहिण रागावून
रुसून डोगर वर जाऊन बसली
नवरात्र आश्र्विनी नवरात्र ला पंचमी ला
ला गावातील पालखीने
|| श्री महालक्ष्मी ||ह्या देवी ला
भेटायला येते राग रुसवा काढते
असं म्हणतात गावातील देवी चे
दर्शन केले की ह्या देवी चे
पण कराव बहिणी नांदू दे साठी
आत्ता पण
आश्र्विन शुक्लपक्ष पंचमी ला
गावातून पालखी निघते व
तेथे जत्रा रूप असते
जास्त बस गाड्या पण सोडतात
आम्ही पण देवीला तेव्हा जातो
वर्षा तून दोन चार वेळा तरी
ह्या देवी जावे ओटी भरावी
नौवेद्द द्यावा असं सांगतात …..
नमस्कार
प्रार्थां व मंत्र पुष्पाजंली
ॐ
प्रा र्थं ना
जाणें न आवाहन वा विसर्जंन | पूजा न जाणें तव तो जनार्दंन |
जाणें कांही तुजविण ईंश्र्वरा | क्षमा करावी मज दिन पामरा || १ ||
गेलेच पाप मम दु:खहि सर्वं गेलें | दारिश्र्च सर्वही तुवां विलयासी नेलें |
संपत्ति सौख्य सगळें क्षणीं यते हाता | कारुण्यसिंधु तुजला नयनीं पाहतां || २ ||
मंत्रहीन क्रियाहीन | भक्तिहीन असे तरी ||पूजाही आदरे सेवी| पूर्ण मागोनि अंतरी ||३ ||
अपराध सहस्त्रे जी प्रत्येही घडत करीं || दास मानूनि पायांचा परमेश क्षमा करी || ४ ||
रूपा देईं जय देईं | यशा देई बघीं भरी || सौभाग्य दे सुतांते दे | पूर्ण काम मला करीं || ५ ||
ॐ
कर्पूंरारती
कर्पूरगौरा | करुणावतारा | संसारसारा | भुजगेद्रहारा |
सदा रहासी हृदयारविंदीं | भवा | भवानीसह तूज वंदी ||
ॐ
प्रार्थना
घालीन लोटांगण वंदीन चरण | डोळ्यांनी पाहीन रूप तुझें |
प्रेमें आलिंगन आनंदे पूजीन | भावे ओवाळिन म्हणे नामा || १ ||
त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बधुंश्र्च सखा त्वमेव |
त्वमेव विद्दा द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव || 2 ||
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुध्द्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् |
यद्दत्सकलं परस्मै | नारायणायेति समर्पयामि || ३ ||
अच्युत केशवं रामनारायणं कृष्णदामोदर वासुदेव हरिम् |
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे || ४ ||
हरे राम हरे राम राम राम हरे हरे | हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे || ५ ||
ॐ
मंत्रपुष्पांजली
ॐ यज्ञेन यज्ञमजन्त देवास्तानि धर्माणि प्रथामान्यासान्
ते ह नाकं महिमान: सचन्त यत्र पूर्वे साध्या: संति देवा: ||
ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे |
स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु |
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम: | ॐ स्वस्ति साम्राज्यं
भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
संमतपर्या ईस्यात् सार्वभौम: | सार्वायुष आंतादापरार्धाiत् |
पृथिव्यै समुद्रपर्यंतया एकराळिति | तदप्येष श्लोको s भिगीतो मरुत:
परिवेष्
<img src="https://vasudhalaya.files.wordpress.com/2017/05/img_67391.jpg" alt="IMG_6739[1]" width="3456" height="4608" class="alignnone size-full wp-image-26491"
ॐ
तारिख ८ मे २०१७
वैशाख महिना
ऊ न्हा ळा फळ
अंबा .फणस . जांभळ
मस्त वाटत खावयाला
व अंबा अटवून गोळा ठेवावा
मध्ये कधि तरी
अंबा गोळी सारखं खाता येतं
चांगले आंबे मिळालेतं
ॐ
तारिख ६ मे २०१७
वैशाख महिना
मि क्यामेरा वापरुन फोटो काढते
ब्याटरी चार्च करता येते
क्यामेरा मध्ये बसविता येते
सर्व लक्ष पूर्वक काम करायला
मला बरं वाटतं
Vasudha Chivate क्यामेरा मध्ये ब्याटरी असते
ति काढून क्यामेरा ची चं वायर असते
तीत ब्याटरी घालायची व
प्लग ला लावून लाल चा हिरवा दिवा येई पर्यंत
ठेवावयाची हिरवा दिवा झाला
की ब्याटरी चार्ज झालेली कळते
व क्यामेरा मध्ये घालून बंद चं झाकण असतं
ते लावून फोटो काढायचे.
प्रणव च्या मोबाईल मधून फोटो घेऊन दाखवीन
ॐ
राजश्री शाहू महाराज राजे
दिनांक ६मे १९२२रोजी निधन
ॐ राजश्री शाहू महाराज राजे
नमस्कार
Vasudha Chivate Manjusha Sumati Sudam आत्या
आणि हो राजे शाहू चां पुतळा घरी ठेवलेला
सावली दिसण्या करता उन्ह मध्ये मी फोटो काढला आहे
शताब्दी झाली तेंव्हा मी विकत आणलेला आहे
असं काम पण मी चं आठवण ठेवून करते
Like
· Reply ·
1 · 2 hrs
Vasudha Chivate
ओम राजश्री शाहू राजे
कोल्हापुर येथे गावात !
सत्कार
ॐ
तारिख ६ मे २०१७
वैशाख महिना
काल संध्याकाळी
सामान आणण्या साठी
गेलेली असतांना
ए आज्जी हाक ऐकू आली
आमच्या भागात
शाहू तलाव आहे
तेर्हे पोहोण्या करता व शिकण्या करता
मुल मुली येतात
छोट्या मुली ने हक दिली
मी थांबले तर तिची
आई म्हणाल्या
रांगोळी काढली नां
सत्कार ची रांगोळी
मस्त आठवण ठेवली
मुली ने माझी
मी हसून तिला हो संगीताल
तसेच पैठणी दिलेल्या
सौ लेकी सुना पण
भेटतात
मस्त बेष्ट काम केल तुम्ही
म्हानाल्या
दत्त मंदिर मध्ये राहतो
मी म्हंटल मी नेहानी
येते देऊळ मध्ये
अशा प्रकार ची ओळख
व अशा प्रकार ची
आठवण ठेवण
आपल्या गावात
एक प्रकार समाज मध्ये मिसळेले व
कौतुक केलेले
असलं की
आपण व गाव व देश नक्की
चांगल प्रतिष्टीत राहील
लहान व जेष्ठ लोकांनी पण
नीट काम करायला हवं
राहाण पण नीट हवं
स्वच्छ तुळसी चं पाणी सारखं
<img src="https://vasudhalaya.files.wordpress.com/2017/02/img_6308.jpg" alt="img_6308" width="4608" height="3456" class="alignnone size-full wp-image-25168"
ॐ
तारिख ५ मे २०१७
वैशाख महिना
ब्लॉगवाल्या आजीबाई
पुस्तक मध्ये
वसुधालय वसुधा
कविता छापलेली आहे
त्या माझ्या सौ भावजय आहेत
सौ देशपांडे
त्या व मी असलेला
पूर्वी चा फोटो व कविता
ॐ कोल्हापुर
वसुधालय वसुधा
कन्या यशंवत राधाबाई चि
आर्या श्री श्रीकांत चिवटे यांची
केली तिने प्रगती संगणकात केली
कात निर्मिले पुस्तक मराठी चे
शिक्षण फक्त s . s . c . चे
ज्ञान फार नाही इंग्रजी चे पण
जिद्द मनी काही करण्याचे
उचलली लेखणी हातात
लिहिले पदार्थ साधे आणि
चविष्ट कृती करून दाखविले
छायाचित्रात भाकरी भाजी आणि
धिरडी पुरण पोळी आणि साटोरी
रांगोळ्या अनेक तऱ्हेच्या आकाश दिवे
आणि शिंकाळी सणावाराची देऊन माहिती
थोरामोठ्याचां लिहिल्या कथा एक नां दोन
विषय अनेक घेतले मन त्यात छान रमविले
सोसून साऱ्या अडचणी अन् वथ्या
घdविली स्वत : ची एक वेगळी
संगणक कथा
तिला लाभो महालक्ष्मी चे आशिर्वाद
होऊ प्रगती संगणक क्षेत्रात
हिच प्रार्थना जग् मातेस
हिच प्रार्थना जग् मातेस
सौ . सुनुती रे. देशपांडे
PONDICHERRY
विले
ॐ
तारिख ५ मे २०१७
वैशाख महिना
पूर्वी एकदा
५ मे तारिख ला
मि व हे
Pondicherry तं
होतो
नमस्कार
सर्व दर्शन ध्यान
खुप चांगलं वाटलं
आश्रम मधील फोटो
नाहीत त्या वेळ चे पण
घरी काढलेले
मी व माझी सौ भावजय देशपांडे
सौ आकाश च्या आई
म्हणते मी त्यांना
फोटो वरून फोटो
काय नां अगदी
जपणूक
ॐ
तारिख ४ मे २०१७
वैशाख महिना
बटाटा पोळि
बटाटे उकडून घेतले
साल काढली
हिरवी मिरची मिठ घातले
मऊ केले
कणिक मध्ये पण
मिठ लाल तिखट
हळद तेल घालून
पाणी मध्ये तिंबले
कणिक चा लाट्या करून
बटाटा सारण घालून
लाटून तवा वर भाजले
तेल लावले दोन हि
बाजू भाजल्या
मस्त गरम गरम बटाटा पोळी
अथवा पराटा मस्त केला
ॐ
तारिख ४ मे २०१७
वैशाख महिना
काल ३ तीन तारिख ला
त्रिंबोली tem ल्बा ई देवी ला
जाऊण दर्शन घेतले
व अनारसे नैवेद्द दिला
बसले यथे खूप बरं वाटत
देव दर्शन व बसणं
Written
on मे 4, 2017