शेव व अनारसे
ॐ
तारिख ७ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष
मागील दिवाळी
शेव व अनारसे
ॐ
दिवाळी पोस्ट
दिवाळी त फराळ तयार घरी करून सर्वांना देण्याचा आनंद असतो.
दिवाळी तील फराळ पोस्ट मन पत्र देणारे, ग्यास सिलेंडर दुध वाले,
वर्तमान पत्र देणारे, रस्ता साफ करणारे सरकारी लोक
रोज काम करायला येणारी बाई सर्वांना फराळ याचे पिशवी तून देत असे मी
व ताधी आधी दहा १० रुपये देत असे पण आता पन्नास रुपये देते सर्वांना
वेगवेगळे. सर्व सजन खुश होऊन बाई नमस्कार करतात.
तसेच मारुती देऊळ पुढे लोक बसलेले असतात त्यांना पण मी
दिवाळी फराळ देते. पैसे मात्र देत नाही.
पूर्वी हे ऑफिस मध्ये असतांना सर्वांचे फराळ खात व मला पण म्हणत काही
फराळ नेतो मी पण भरपूर फराळ देत असत. मुलांचे मित्र पण घरी पूर्वी
फराळ साठी येत असतं. मी माझ्या सतार च्या क्लास च्या सर यांना फराळ च
देत असे. आमच्या फराळ याच वैशिष्ठ अनारसा असे आरे अनारसा आहे.
अगदी कौतुक याने म्हणत असतं.
मागच्या वर्षी पण मी मारुती जवळ बसणारे व वर्तमान पत्र देणारे यांना दिवाळी
भेट दिली आहे.
पूर्वी पोस्ट मन घरी पत्र आणून देत ओळखत असत. हसून बोलत बरं वाटत असे.
हल्ली ग्रीटिंग कार्ड बंद झाली दिवाळी अंक घरी य़ेण बंद झाली ह्यांच्या कविता
दिवाळी अंक मध्ये येत व अंक व भेट पण येत असे. किती मस्त उच्छाह असणारी
दिवाळी असे. आता मुले आपआपल्या घरी दिवाळी करतात.
दिवाळी पोस्ट सर्वांची आठवण येते. सर्व दिवाळी पोस्ट नां
दिवाळी शुभेच्छा
बाकि ठिक. छान.
वसुधालय.
ॐ
तारिख ७ अक्टोबर २०१७
अश्र्विन कृष्णपक्ष
शनिवार
घरी काढलेली रांगोळी
व
कोल्हापुर महालक्ष्मी देऊळ येथील
रांगोळी