आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 13, 2017

आकाश कंदील आठवण दिवाळी


तारिख १३ अक्टोबर १७
आश्र्विन कृष्णपक्ष
शुक्रवार


दिवाळी व आकाश कंदील
आठवण

एकदा काय झाल
मुल कॉलेज मध्ये होती
मी व पुष्कर ने एक
कागदी चांदणी आणली

हे व प्रणव यांनी
पताका असलेला पिवळा
रंग असलेला
आकाश कंदील आणला
आम्ही चांदणीग्यालरीत लावली
व पताका चा कंदील
हॉल मध्ये लावला
तेंव्हा खूप जण दिवाळी व
गप्पा साठी येत
हॉल च आकाश कंदील
खूप दिवस ठेवला

आणि सहज आमच्या घरी
पुणे येथे गेलोलो
तसेच
सौ अनुराधा गरुड यांना भेटण्या साठी
त्यांच्या कडे गेलोलो
आत जातांना

कोपरा मध्ये ग्यालरी त
पु. ल. देशपांडे
यांच घर पूर्वी च दिसलं
व ग्यालरीत
असा च
पिवळा रंग असलेला
आकाश कंदील दिसला

आम्हाला खूप मज्जा व आनंद
झाला आरे
आपला सारखा च
रंग व आकाश कंदील आहे

तेंव्हा पासून
आठवण
कित्ती दिवस तरी
आम्ही विकत चा
आकाश कंदील
हॉल मध्ये ठेवायचो

पाहुणे आलेले राहायला तर
पंखा लावला तर
कित्ती पताका चा
कंदील चा आवाज येतो
म्हणाले
मी
जागा बदलली

मध्यंतरी
आकाश दिवा हॉल मध्ये
लावण बंद झाल
पण मी घरी आकाश दिवा
करायला शिकले
आणि हो

हॉल मध्ये
आकाश कंदील लावायला
लागले मी

कित्ती वर वाटत आहे हॉल मध्ये
आकाश कंदील ]पाहून

बधाई

आणखी पहा

IMG_7506[1]
IMG_7509[1]

बोअरिंग च पाणी विहिरी च पाणी


तारिख १३ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष
शुक्रवार

बोअरिंग पाणी विहिरी च पाणी

कोल्हापुर येथे
आमच्या सोसायटी त
बोअरिंग चं विहिरी च
पाणी आहे
कठडा तयार केला आहे
येथे पाऊस च पाणी सांडून पडून
कित्ती छान मस्त सुंदर
शेवाळ व झुडप आली आहेत
बघां
विज मशिन ने गच्ची त
टाकीत पाणी भरले जाते
कित्ती सोय आहे नां हल्ली

पूर्वी औरंगाबाद येथे
आम्ही नळ याचे पाणी
जिना चढून भरत असत

कोल्हापूर येथे पण
सरकारी नळ आहे ते
पाणी उंच चढत नाही
ज्यांना हव असेल ते खाली जाऊन
कळशी ने जिना चढून आणतात

यंदा चांगला पाऊस झाला आहे
भरपूर पाणी साठले असणार

कोल्हापूर

आमची सोसायटी

बधाई

आणखी पहा

IMG_7505

सौ कानिटकर काकू


तारिख १३ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष
शुक्रवार


सौ कानिटकर काकू

आमच घर पुणे येथे आहे
अजून माझे भाऊजी सौ जाऊबाई
त्याची नातवंड सर्वजण आहेत
पूर्वी मी खूप वेळा पुणे येथे
आमच्या घरी जात
आमच्या घर मालकिण
सौ कानिटकर काकू

मला खूप मानायच्या
त्यांना मी कोल्हापूर येथून येणार
अस आधी कळत
सकाळी च बाग मध्ये
फुल घ्यावयाला येत
खिडकी जवळ च
वसुधा बोलावित
मी मग पदर निट घेऊन जात
व आमच्या घरी पण
सर्व थोर जेष्ठ माणस असायची
तेंव्हा
मुल काय म्हणतात चांगली दिसते स
म्हणायच्या
नंतर त्या
अनारसे पिठ घरी कुटून करत
मला हात लावायला बोलत
तराजू ने मोजत व गुळ घालून करत
आज पण त्या व त्यांचा तराजू मला दिसतो
नमस्कार काकू

मग माझ्या सौ सासूबाई पण
अनारसे पिठ करत मी च
तांदूळ कुटत
मी अनारसे पिठ करायला शिकले
माहेरी करत पण
लक्ष देऊन काम नव्हत

वर वर देखण काम करायची

अशा दिवाळी आठवणी व
थोर जण याची आठवणी

आज पण येतात
नमस्कार

बधाई

आणखी पहा

16729010_742168545959918_4796430453935572098_n
%d bloggers like this: