आपले स्वागत आहे!

 

अखिल भारतीय मराठी संबेलन
कोल्हापुर १९९२

मध्ये

श्रीकांत चिवटे
यांनी कविता म्हंटले ली

|| जरी पटका || अंक मध्ये
छापून आलेली

स्वागत कविता ६५ व्या
अखिल भारतीय मराठी संमेलन,
कोल्हापूर१९९२ ||जरीपटका||
मध्ये छापून आली आहे.

स्वागत

शारदेच्या प्रांगणात | माय मराठीचा तोरा
पंचगंगा थबकली | झुले कळस साजिरा
महालक्ष्मी निवासिनी | थोर क्षेत्र करवीर
मराठीच्या सारस्वता | गवसले गं माहेर
अष्टविद्दा चारी कला | कष्ट हाच सामवेद
रंगताना दरबार | सान थोर नाही भेद
शारदेच्या पालखीचे | सारे ऋणाईत भोई
स्वेदगंगा शिकविते | वापरावी कशी शाई
काही लिहू गाऊ गीत | चित्र अक्षर कहाणी
जीवनाचा अनुभव | शब्द ब्रह्म ये अंगणी
राजर्षीच्या स्मरणाने | आवाहन दरबारा
पासष्टाव्या संमेलना | करु मानाचा मुजरा

9055ca7785c9

यावर आपले मत नोंदवा