आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 12, 2018

सार्थ रामरक्षा / प्रतिक्रिया

सार्थ रामरक्षा

आलेली प्रतिक्रिया

 

COMMENTS ON: “रामरक्षा” (2)

 1. रामरक्षा आणि आणखी एक असे दोन मराठीत ब्लाॕग वाचले. अतिशय छान आहेत .
  मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

  संपादन

  • नमस्कार हो मी इसवी सन १२ एप्रिल २०११ साल मध्ये ब्लॉग मध्ये

   लिहिली आहे आज ती परत एकत्र केली आहे

   आपण वाचली बद्दल धन्यवाद बधाई अभिनंदन

   संपादन

प्रतिक्रिया व्यक्त करा

dsc00021copy

अमेरिका येथे ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक

अमेरिका येथील

ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक

वसुधालय

ब्लॉग वाल्या आजीबाई

IMG_20150506_192109

IMG_20150506_192056

कोल्हापुर येथील राम

कोल्हापुर येथील

|| महालक्ष्मी देवी देऊळ ||

येथील

राम देऊळ

नमस्कारम्

 

img_1778

img_18651

 

अमेरिका येथील बाग मधील रामरक्षा

 

तारिख २५ मार्च २०१८

चैत्र महिना

राम नवमी

रामरक्षा

मी अमेरिका येथे पुष्कर कडे असतांना बागेत फिरत तेथे

रामरक्षा म्हणत पुस्तक पाहून तर भारत मधील दिल्ली चे

हिंदी तून बोलत कित्ती छान पढता वाचता व

माझी रामरक्षा ते घरी घेऊन गेले व लिहून काही दिवस

नंतर मला माझी रामरक्षा परत केली

सौ सुनबाई व पुष्कर पण बरोबर असायचे

तर राम कसा त्या पेक्षा

रामरक्षा संस्कृत आहे व सार्थ मराठी आहे

त्या साठी रामरक्षा आवडते बधाई

विणकाम मी च केले आहे य

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

14433226_653893028120804_3734714329157194307_n

 

रामरक्षा व बर्कले रोड

 


तारिख १२ जून २०१७
जेष्ठ महिना
सोमवार

क्यालिफोर्निया येथे घरी येतांना

बर्कले  युनर्हसिटी रोड येथून आम्ही गेले लो

कर ने

पुष्कर कडे असतांना
आम्ही त्यांच्या बासरी वादन सर गुरुं

यांच्या कडे त्यांची बासरी कार्यक्रम ला
गेलोलो

घरी येतांना संध्याकाळ झाली
गाडी त कार मध्ये बसलो व निघालो
घरी यावयाला
घर भरपूर लाम्ब १ / २
एक दोन तास लाम्ब
आमच्या बरोबर सौ सुनबाई चे पाहुणे
सौ भावजय पण होत्या

त्यांनी संध्याकाळ झाली साठी
रामाचे श्र्लोक म्हणायला सुरु केले
संपले

नंतर मी आपली संस्कृत रामरक्षा
म्हणा याला लागली

पुढे बसलेली
खूप रामरक्षा म्हणून झाली

पण इकडे तिकडे गाड्या व ईतर लाईट पाहण्यात
मी मध्ये चं थांबले
आठवल नाही काय झालं
कळल नाही

तर पुष्कर ने पुढील रामरक्षा म्हणून दिली
मला परत
पुढची रामरक्षा म्हणून पूर्ण केली

सांगायचं की
पुष्कर पण शाळा मध्ये असतांना रामरक्षा म्हणत
व त्यांना आठवली

शिकलेलं कधी विसरलं जात नाही

आम्ही घरी आलो
देवाला नमस्कार केला
खूप बरं वाटलं मला त्या दिवस ला

पुष्कर ने माझी रामरक्षा ची रिंग
पुढे करून दिली बद्दल

पु.ल. देशपांडे यांच्या
रामरक्षा मुळे उच्चार स्वच्छ येतात
वाचले

त्यामुळे
रामरक्षा आठवण लिहिली आहे

नमस्कार

13010814_578675995642508_6029330281381026983_n

सार्थ रामरक्षा प्रतिक्रिया

आज पण १२ एप्रिल २०१८ आहे

सार्थ रामरक्षा

१२ एप्रिल २०११ वेळ ४ :२५ सकाळी

NTS ON: “सार्थ श्रीरामरक्षा” (1)

 1. सुरेख. राम नवमीच्या दिवशी ह्याची परिसमाप्ती झाली हे विशेष. अभिनंदन आणि धन्यवाद.

   

 2. धन्यवाद

 

सार्थ रामरक्षा

सार्थ रामरक्षा

 

भर्जनं भवबिजानामर्जनं सुखसंपदाम् |
तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम् ॥३६॥

रामो राजमणि: सदा विजयते
रामंरमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू
रामाय तस्मै नम: ।
रामान्नास्ति परायणं परतरं
रामस्य दासो s स्म्यहम् ।
रामे चित्तलय: सदा भवतु मे
भो राम मामुध्दर मामुद्धर ॥ ३७ ॥

रामरामेति रामेति रमे रामे मनोरमे |
सहस्त्रनामतत्तुल्यं रामनाम  वरानने ||३८||

इतिश्रीबुधकौशिकविरचितं
श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णंम् |

॥ श्रीसितारामाचन्द्रार्पणमस्तु ॥

३६) राम, राम, अशी रामनामाची गर्जना ही संसाराची बीजे भर्जन करणारी (भाजून टाकणारी), दूतांना तर्जन (भय) करणारी अशी आहे.

३७) राजश्रेष्ठ ‘राम’ नेहमी विजय पावतो. त्या रमापती (सितापती) ‘रामास’ मी भजतो. ‘रामाने’ राक्षसांची सेना मारली, त्या ‘रामाला’ माझा नमस्कार असो. मला ‘रामाहून’ दुसरा कोणी श्रेष्ठ वाटत नाही. मी ‘रामाचा’ दास आहे. माझ्या चित्ताचा लय नेहमी ‘रामाच्या ठायी’ होवो. हे ‘रामा’, माझा तू उध्दार कर !

३८) शिव पार्वतीला सांगतात – हे सुवदने, राम, राम, राम, राम, अशा नामोच्चाराने मी मनाला आनंद देणाऱ्या श्रीरामाच्या ठायी रममाण होतो. श्रीरामाचे नाव हे (विष्णुच्या) सहस्त्रनामाशी बरोबरी करणारे आहे.

याप्रमाणे बुधकौशिक ऋषींनी रचिलेले
श्रीरामरक्षास्तोत्र समाप्त झाले.
ते श्रीसीता-रामाचंद्राच्या चरणी अर्पण असो !

|| श्री राम जय राम जयजय राम ||

सार्थ श्रीरामरक्षा

दक्षिणे लक्ष्मणो यस्य
वामे तु जनकात्मजा |
पुरतो मारुतिर्यस्य
तं वन्दे रघुनन्दनम् ॥३१॥

लोकाभिरामं रणर धीरं रणर डग.धीरं
राजीवनेत्रं रघुवंशनाथम् |
कारुण्यरुपं करुणाकरं तं
श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्दे ||३२ ||

मनोगवं मारुततुल्यवेगं ।
जितेद्रियं भुध्दिमतां

बुद्धीमातं वरिष्ठम्
वातात्मजं वानरयूथमुख्यं ।
श्रीरामदूतं शरणं प्रपद्दे ॥ ३३॥

कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्
आरुह्य कविताशाखां
वन्दे वाल्मीकिकोकिलम्॥ ३४॥

आपदामहर्तारं दातारं सर्वसंपदाम् |
लोकाभिरामं श्रीरामं
भूयो भूयो नमाम्यहम् ॥३५॥

३१) ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे आणि डाव्या बाजूला जनकतनया सीतादेवी आहे व ज्याच्यापुढे मारुति उभा आहे, त्या रघुनंदनाला मी वंदन करतो.

३२) लोकांना आनंद देणारा, रणांगणांत धैर्य धरणारा, कमलाप्रमाणे नेत्र असलेला, रघुवंशाचा अधिपती व दयेची मूर्ति असा जो करुणासागर श्रीरामचंद्र त्याला मी शरण आलो आहे.

३३) मारुतिस्तुति – मनाप्रमाणे वेगाने गमन करणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान् आपली इंद्रिये जिंकून स्वाधीन ठेवणारा, बुध्दिमंतांत श्रेष्ठ आणि वानरसमुदायाचा मुख्य अशा वायुपुत्र श्रीरामदूत हनुमंताला मी शरण आलो आहे.

३४) वाल्मीकिवंदन – कवितेच्या फांदीवर बसून, “राम रामा” आशा गोड गोड अक्षरांचे मधुर गुंजन करणाऱ्या वाल्मीकिरुपी कोकिळाला मी वंदन करतो

३५) रामवंदन – आपत्तींचा नाश करणारा, सर्व संपत्ति देणारा, व लोकांना आनंद देणारा, असा जो श्रीराम त्याला मी पुन: पुन: नमस्कार करतो.

|| श्री राम जय राम जयजय राम ||

सार्थ श्रीरामरक्षा

रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं
सीतापतिं सुन्दरम्

काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं
विप्रप्रियं धार्मिकम् |
राजेन्र्दं सत्यसन्धं  दशरथतनयं
श्यामलं शान्तमूर्तिम् |
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं
राघवं रावणारिम् ॥२६॥

रामाय रामभद्राय
रामचन्द्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय
सीताया: पतये नम: ॥ २७ ॥

श्रीराम राम रघुनन्दन  राम राम |
श्रीराम राम भरताग्रज राम राम |
श्रीराम राम रणकर्कश राम राम |
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥ २८ ||

श्रीरामचन्द्रचणौ मनसा स्मरामि |
श्रीरामचन्द्रचरचौ  वचसा गृणामि |
श्रीरानचन्द्रचरणौ  शिरसा नमामि |
श्रीरामचन्द्रचरणौ  शरणं प्रपद्दे ॥ २९ ॥

माता रामो मत्पिता रामचन्द्र: |
स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र: |
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं
जाने नैव जाने न जाने ॥ ३० ॥

२६)लक्ष्मणाचा ज्येष्ठ भ्राता,रघुकुलश्रेष्ठ, सितेचा पति सुंदर, ककुत्स्थकुलोत्पन्न, दयासागर, सद्गुणांचा निधी ब्राह्मण ज्याला प्रिय आहेत असा, धार्मिक, राजेंद्र, सत्यप्रतिज्ञ दशरथपुत्र, सावळ्या ‘ वर्णाचा,शांतमूर्ति, लोकांना आनंद देणारा, रघुकुलाला तिलकाप्रमाणे शोभणारा आणि रावणाचा शत्रु जो राघव श्रीराम, त्याला मी वंदन करतो.

२७) राम, रामभद्र, रामचंद्र, वेधस् रघुनाथ, नाथ, अशी ज्याची नावे आहेत त्या सितापतीला माझा नमस्कार असो.

२८) हे रघुकुलनंदन श्रीरामा, हे भरताच्या ज्येष्ठ बंधु श्रीरामा, हे रणांगणांत कठोरपणा करणाऱ्या श्रीरामा, रामा, तू आमचा रक्षणकर्ता हो |

२९) मी श्रिरामचंद्राच्या चरणांचे मनाने स्मरण करतो. मी श्रीरामचंद्राच्या चरणांचे वाणीने स्तवन करतो. मी श्रीरामचंद्राच्या चरणांना मस्तकाने नमन करतो. मी श्रीरामचंद्राच्या चरणी शरण आलो आहे.

३०) माझी माता व माझा पिता रामचंद्र आहे.माझा स्वामी व माझा मित्र रामचंद्र आहे. फार काय, माझे सर्वस्वच हा दयाळु रामचंद्र आहे. दुसऱ्या कोणाला मी जाणता नाही; अगदी जाणता नाही.

|| श्री राम जय राम जयजय ||

सार्थ श्रीरामरक्षा‏

संनध्द: कवची खड्गी चापबाणधरो
युवा | गच्छन् मनोरथो s स्माकं राम:
पातु सलक्ष्मण: ॥२१॥

रामो दाशरथि: शूरो
लक्ष्मणानुचरो बली |
काकुत्स्थ: पुरुष: पूर्ण:
कौसल्येयो रघूत्तम: ॥२२॥

वेदान्तवेद्दो यज्ञेश: पुराणपुरुषोत्तम:
जानकीवल्लभ: श्रीमानप्रमेयपराक्रम: ॥ २३ ॥

इत्येतानि जपन् नित्यं|

मध्दक्त : श्रद्धयान्विता 😐
अश्र्वमेधाधिकं पुण्यं
संप्राप्नोति  न संशय: ॥ २४ ॥

रामं दुर्वालश्यामं
पद्माक्षं पीतवाससम्
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न
ते संसारिणो नर: ॥ २५ ॥

२१) निरंतर सज्ज असलेला, अंगात कवच (चिलखत) घातलेला, हाती खड्ग आणि धनुष्यबाण धारण करणारा, आमचा मूर्तिमंत मनोरथच की काय असा, लक्ष्मणासह गमन करणारा तरुण राम आमचे रक्षण करो.

२२ – २३ – २४) आनंद देणारा, दररथाचा पुत्र, शूर लक्ष्मण ज्याचा सेवक आहे असा, बलवान, ककुत्स्थकुलोत्पन्न, महापुरुष, पुर्नब्रह्म, कौसल्यातनय, रघूत्तम, वेदांतशास्त्राने, ज्ञेय, यज्ञांचा स्वामी, पुराणपुरुषोत्तम, जानकिचा प्रिय, वैभव संपन्न, अतुल पराक्रमी, अशा या नावांचा श्रध्दापूर्वक नेहमी जप करणाऱ्या माझ्या भक्ताला अश्र्वमेध यज्ञाच्या पुण्याहून अधिक पुण्य लाभते, यात संशय नाही. (असे शंकराचे अभिवचन आहे) .

२५) दुर्वेच्या पानाप्रमाणे श्यामवर्णाचा, कमलनेत्र आणि पितांबर परिधान करणारा अशा रामाची या दिव्य नावांनी जे मनुष्य स्तुति करितात, ते जन्ममरणाच्या संसारातून सुटतात.

|| श्री राम जय राम जयजय राम ||

सार्थ श्रीरामरक्षा‏

आराम: कल्पवृक्षाणां  विराम:
सकलापदाम् | अभिरामस्त्रिलोकानां
राम: श्रीमान् स न: प्रभु: ॥१६॥

तरुणौ रुपसंपनौ सुकुमारौ
महाबलौ  | पुण्डरीकविशालाक्षौ
चिरकृष्णाजिनाम्बरौ ॥१७ ॥

फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ
ब्रह्मचारिणौ | पुत्रौ दशरथस्यैतौ
भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ १८ ॥

शरण्यौ सर्वत्त्वानां श्रेष्ठौ
सर्वधनुष्मताम् |रक्ष: कुलनिहन्तारौ
त्रायेतां नो रघुत्तमौ ||१९||

आत्तसज्यधनुषाविषुस्पृशावक्षया
शुगणीषसड्गिनौ | रक्षणाय —
मम रामलक्ष्मणावग्रत:
पथि सदैव गच्छताम् ॥ २० ॥

१६) रामस्तुति – श्रीराम हा कल्पवृक्षांचा जणू सुंदर बगीचाच आहे; सर्व आपत्ती घालविणारा व त्रैलोक्यांत  मनोहर असा तो श्रीमान् राम आमचा प्रभु आहे.

१७-१८ -१९) वयाने तरुण, रूपवान् सुकुमार, अतिशय बलवान्, कमलपत्राप्रमाणे परिधान करणारे, कंदमूलफले भक्षण करणारे,जितेंद्रिय, तवस्वी, ब्रह्मचारी, सर्व प्राण्यांचे रक्षण करणारे, सर्व धनुर्धारांमध्ये श्रेष्ठ, राक्षसांच्या कुलाचा संहार करणारे व रघुकुलांतील प्रमुख असे दशरथाचे पुत्र, राम-लक्ष्मण हे दोघे बंधू आमचे रक्षण करोत.

२०) सज्ज धनुष्ये धारण करणारे बाणांना हस्तस्पर्श करणारे, व अक्षय्य बाणांचे भाते बाळगणारे राम- लक्ष्मण माझ्या रक्षणाकरितां मार्गामध्ये नेहमी पुढे चालोत.

|| श्री राम जय राम जयजय राम ||

एतां रामबलोपेतां
रक्षां य: सुकृती पठेत्
स चिरायु : सुखी पुत्री
विजयी विनयी भवेत् ॥ १०॥

पातालभूतलव्योम

चारिण shछद्मचारिण:|
न द्रष्टुमपि शत्कास्ते
रक्षितं रामनामभि: ॥११॥

रामेति रामभद्रेति
रामचन्द्रेति वा स्मरन् |
नरो न लिप्यते पापैर्भुक्ति
मुक्तिं च विन्दति ॥१२॥

जगज्जेत्रैकमन्त्रेण रामानामाभिरक्षितम् |
य: कण्ठे धारयेत्तस्य
करस्था : सर्वसिध्दय: १३||

वज्रप ञ्जरनामेदं  यो रामकवचं  स्मरेत् ।
अव्याहताज्ञ:  सर्वत्र लभते
जयमाग्ड.लम् ॥ १४ ॥

आदिष्टवान्  यथा स्वप्ने
रामरक्षामिमां हर: |
तथा लिखितवान् प्रात:
प्रभुध्दो  प्रबुद्धो भुधकौशिक: ॥१५ ॥

१०) फलश्रुति – याप्रमाणे रामाच्या सामर्थ्याने युत्क असलेल्या या रामक्षेचे जो पुण्यवान् मनुष्य पठण करील, तो दिर्घायुषी, सुखी, पुत्रवान्, सर्व कार्यात विजय मिळविणारा आणि विनायासाम्पांना असा होईल.

११) या रामनामांनी रक्षण केलेल्या मनुष्याला पाताळ, भूमी किंवा आकाशात संचार करणारे कपटी लोक डोळ्यांनी पाहूही शकता नाहीत.

१२) राम,रामभद्र किंवा रामचंद्र अशा नावांनी श्रीरामाचे स्मरण करणारा माणूस केव्हाही पापांनी लिप्त होत नाही व त्याला अनेक सुखोपभाग मिळून शेवटी मोक्ष मिळतो.

१३) सर्व जगाला जींकणारा मुख्य मंत्र जो रामनाम, त्यामंत्राने अभिरक्षित – मंतरलेला पदार्थ (ताईत इत्यादी) जो आपल्या गळ्यात धारण करतो, त्याला सर्व सिद्धी सहज हस्तगत होतात.

१४) इंद्राच्या वज्राचा पिंजरा जसा अत्यंत संरक्षक, तसे हे रामकवच – रामरक्षास्तोत्र असल्यामुळे यालाही वज्रपंजर असे नाव आहे.याचे जो स्मरण करतो, त्याची आज्ञा अबाधित, सर्वत्र मानली जातणि त्याला सर्व ठिकाणी ज्या मिळून नेहमी त्याचे कल्याण होते.

१५) अशी ही रामरक्षा भगवान् शंकरांनी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात जशी सांगितली, तशीच ती सकाळी जागे झाल्यावर त्यांनी लिहून ठेवली.

|| श्री राम जय राम जयराम ||

सार्थ श्रीरामरक्षा

कौसल्येयो घ्शौ पातु
विश्र्वामित्रप्रिय: श्रुती |
घ्राणं पातु मखत्राता
मुखं सौमित्रिवत्सल : || ५ ||

जिह्हां विद्दानिधि: पातु
कण्ठं भरतवन्दित: |
स्कन्धौ दिव्यायुध: पातु
भुजौ भग्नेशकार्मुक: ॥ ६ ॥

करौ सीतापति:; पातु
ह्रदयं जामदग्न्यजित्।
मध्यं पातु खरध्वंसी
नाभिं जाम्बवदाश्रय: ॥ ७ ॥|

सुग्रीवेश: कटी पातु
सक्थिनी हनुमत्प्रभु: |
ऊरु रघुत्तम: पातु
रक्ष: कुलविनाशकृत् ॥ ८ ॥

जानुनी सेतुकृत् पातु
जग्डे. दशमुखान्तक: ।
पादौ बिभीषणश्रीद :
पातु रामो s खिलं वपु: ॥ ९ ॥

५) कौसल्याराणीचा पुत्र राम माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करो. विश्र्वामित्र ऋषींचा आवडता
शिष्य असा राम माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करो. (विश्रवामित्राच्या) यज्ञाचे रक्षण करणारा
राम माझ्या नाकाचे रक्षण करो. बंधु लक्ष्मणावर प्रेम करणारा राम माझ्या मुखाचे रक्षण करो.

६) सर्व विद्दा धारण करणारा राम माझ्या जिभेचे रक्षण करो. भारताने ज्याला वंदना केले आहे
असा राम माझ्या कंठाचे रक्षण करो.दिव्या अशी शस्त्रे ज्याच्यापाशी आहेत असा राम माझ्या
दोन्ही खांद्दांचे रक्षण करो. शिवधनुष्याचा (सीतास्वयंवरप्रसंगी) ज्याने भंग केला आहे असा
राम माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करो.

७) सितेचा पति राम माझ्या हातांचे रक्षण करो.परशुरामाला जिंकणारा राम माझ्या हृदयाचे
रक्षण करो. खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारा रामा माझ्या शरीराच्या मध्यभागाचे
रक्षण करो. जांबवानाला आश्रय देणारा राम माझ्या नाभीचे – बेंबीचे रक्षण करो.

८) सिग्रीवाचा स्वामी राम माझ्या कमरेचे रक्षण करो.हनुमंताचा प्रभु राम माझ्या दोन्ही
जंघांचे रक्षण करो.राक्षसकुलाचा विनाश करणारा रघुकुलश्रेष्ठ राम माझ्या दोन्ही
मांड्यांचे रक्षण करो.

९) समुद्रावर सेतू बांधणारा राम माझ्या दोन्ही गुडघ्यांचे रक्षण करो. दशमुखी रावणाचा
नाश करणारा राम माझ्या दोन्ही पायांच्या पोटऱ्यांचे रक्षण करो.बिभीषणाला
राजलक्ष्मी देणारा राम माझ्या दोन्ही पावलांचे रक्षण करो आणि सर्वांना आनंद
देणारा श्रीराम प्रभू माझ्या सर्व शरीराचे रक्षण करो.

|| श्री राम जय राम जयजय राम ||

सार्थ श्रीरामरक्षा


श्रीगणेशाय नम: ।
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य ।
बुधकौशिकऋषि: ।
श्रीसीतारामचन्द्रो देवता ।
अनुष्टुप् छन्द : । सिता शक्ति: ।
श्रीमध्दनुमान् कीलकम्।
श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोग: ।

अथ ध्यानम् ।

ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं
बध्दपद्मासनस्थम् ।

पीतं वासोवसानं
नवकमलदलस्पर्धिनेत्रं  प्रसन्नम्

वामा ड.का रुधसिता

मुखकमलमिलल्लोचं

नीरदाभम् नानालड. कारदिप्तं

दधतमुरुजाटामण्डनं रामचन्द्रम् ॥

इति ध्यानम् ।

चरितं रघुनाथस्य
शतकोटिप्रविस्तरम् |
एकैकमक्षरं पुंसां
महापातकनाशनाशम्॥ १॥

ध्यात्वा नीलोत्पलश्यामं
रामं राजिएवलोचनम् |
जानकीलक्ष्मणोपेतं
जटामुकुटमण्डितम् ॥२॥

सासितुणधनुर्बाणपाणिं
नक्तंचरान्तकम्
स्वलीलया जगत् त्रातु  –
माविर्भुमजं विभुम् || ३ ||

रामरक्षां पठेत् प्राज्ञ:
पापघ्नीं सर्वकामदाम् |
शिरो मे राघव: पातु
भालं दशरथात्मज: || ४ ||

|| श्री राम जय राम जय जय राम ||

श्रीरामरक्षास्तोत्राचा  अर्थ

ज्याचे हात गुढघ्यापर्यंत  लांब आहेत  व ज्याने धनुष्य-बाण  (हातात) धारण केली आहेत, जो बध्दद्मासनात  बसला आहे, ज्याने पिवळे वस्त्र , (पितांबर) परिधान केले आहे,ज्याचे  डोळे ताज्या कमळाच्या पाकळीप्रमाणे  सुंदर आहोत  व जो प्रसन्न असून  डाव्या  मांडीवर  बसलेल्या सितेच्या मुखकमलकडे  ज्याची दृष्टी लागलेली आहे, पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे (श्यामवर्णाची) ज्याची कांती आहे, जो अनेक प्रकारच्या अलमकारांनी सुशोभित आहे, जो मोथे जटामंडल  धारण करणारा आहे, तया प्रभु  श्रीरामचंद्राचे  (प्रारंभी) ध्यान करावे.

१) श्रीरघुनाथाचे (रामचंद्राचे) चरित्र शंभर कोटि श्र्लोकांइतके  विस्तृत  आहे व त्यातील एकेक  अक्षरसुध्दां मनुष्याच्या मोथामोठ्या पापांचा नाश करणारे  असे  आहे

२-३) निलकलाप्रमाणे  ज्याचा श्यामवर्ण  आहे व कलासाराखे  दीर्घ आणि प्रफुल्ल असे  ज्याचे डोळे आहेत, ज्याच्यासन्निध  सिता व लक्ष्मण  आहे, जटांच्या  मुकुतामुळे जो सुशोभित  दिसत आहे, ज्याच्या  एका हाती  खड्ग , पाथिला  बाणांचा भाता  व दुसऱ्या हाती धनुष्यबाण  आहे व जो राक्षसांचा  नाश करणारा  आहे; खरोखर  जन्मरहित  व व्यापक असूनही  जो परमेश्र्वर. जगाचे रक्षण  करण्याकरिता सहज लीलेने रामरुपाने  अवतीर्ण  घालेला  आहे, आशा प्रभूचे ध्यान करुन पातकांचा नाश करनाऱ्या  व सर्व कामना  पुरविणाऱ्या  या रामरक्षास्तोत्राचे सुज्ञ  माणसाने  पठण करावे.

४ ) सुविख्व्यात  रघुराजाच्या  वंषांत  जन्मलेला  राम माझ्या  मस्तकाचे  रक्षण करो. दशरथराजाचा  पुत्र  राम माझ्या  कपाळाचे  रक्षण करो.

|| श्री राम जय राम जय जय राम ||

13010814_578675995642508_6029330281381026983_n

%d bloggers like this: