आपले स्वागत आहे!

Archive for जून 30, 2018

आजीबाई च घड्याळ

आजीबाई च घड्याळ

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते

“अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,”
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
“बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !”

ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता !
“आली ओटिवरी उन्हे बघ!” म्हणे आजी, “दहा वाजले !
जा जा लौकर !” कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.

खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले, “खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !”

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
“अर्धी रात्र कि रे” म्हणे उलटली, “गोष्टी पुरे ! जा पडा !’
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा

सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !

केशवकुमार

See More

एका पोष्ट वाचली त्यातील कॉपी पेष्ट आहे
Vasudha Chivate आम्ही
१९६७ साली कोल्हापूर येथे आलो
तर घरात घड्याळ नव्हत ह्यांच हातातलं घड्याळ
हे घेऊन जात
अंगण मध्ये झाड होत तेथील उन्ह पाहून
मी कित्ती वाजले   काम करत
मंतर घड्याळ भिंतीला लावलेलं
नुसता काटा फिरणार आणल
untitled

ब्लॉगवाल्या आजीबाई अन्नपूर्णा स्तोत्र दोन पुस्तक


दोन पुस्तक
ब्लॉगवाल्या आजीबाई
अन्नपूर्णा स्तोत्र

धारवाडी साड्या कलकत्ता
साड्या चांगल्या असतात
पातळ जाड मऊ

हल्ली कॉटन धारवाडी खण
मिळतच नाहीत

तारिख ३० जुन २०१८
निज जष्ठ कृष्णपक्ष

See More

IMG_20150506_192109
35164837_1023750284468408_2521767546512736256_n

शुभेच्छा अभिनंदन


रंगोली रांगोळी ने रांगोळी
तारिख ३० जून २०१८
निज जेष्ठ कृष्णपक्ष

शुभेच्छा अभिनंदन
ब्लॉगवाल्या आजीबाई

 

IMG_0086[1]

 

%d bloggers like this: