फुल याची वेणी
ॐ
तारिख ३१ ऑगष्ट २०१८.
श्रावण कृष्णपक्ष.
शुक्रवार.
शेवंती फुल वेणी दोरात बांधून केली.
फुल गुंफुन केलेली वेणी.
मी स्वत: वेण्या गुंफल्या.
ॐ
तारिख ३१ ऑगष्ट २०१८.
श्रावण कृष्णपक्ष.
शुक्रवार.
शेवंती फुल वेणी दोरात बांधून केली.
फुल गुंफुन केलेली वेणी.
मी स्वत: वेण्या गुंफल्या.
ॐ
तारिख ३१ ऑगष्ट २०१८
श्रावण महिना कृष्णपक्ष
मेथी भाजी ची दशमी
काल मेथी च्या दशमी केल्या.
एक जुडी,पेंडी मेथी आणली १० रुपये ला.
निवडून धुतली. विळीने चिरली
पाते ल्यात घातली.
ज्वारी चे पिठ हरबरा पिठ अंदाजाने घातले,
हिरवी मिरची वाटलेली घातली.मिठ, हळद लिंबू रस घातला.
पाणी मध्ये भिजवून गोळा केला.
थापवून लोखंडी तवा त भाजले तेल लावले
लिंबू मुळे हिरवी मिरची मुळे चव छान आली.
ॐ
तारिख ३० ऑगष्ट २०१८.
श्रावण कृष्णपक्ष. गुरुवार
ब्लॉग वाल्या आजीबाई.चं
घरी केले ले मेतकुट भात. साखर भात.
ॐ
तारिख २८ ऑगष्ट २०१८
श्रावण महिना बुधवार
बुधब्रहस्पति ऋषी वशिष्ठ ऋषी
यांनी दिवाळी त धनत्रयोदशी ला
|| श्री यंत्र || तयार केल व पूजा केली.
आज श्रावन / श्रावण बुधवार. बुधब्रहस्पती चां वार
साठी || श्री यंत्र पूजा ||
ॐ
तारिख २९ ऑगष्ट २०१८.
श्रावण महिना.
ब्लॉग वाल्या आजीबाई चं!
हात खंडा पदार्थ.
अनारसे. साटोरी.
ॐ
तारिख २९ ऑगष्ट २०१८.
श्रावण कृष्णपक्ष बुधवार.
धान्य पूजा.
उपवास याच धान्य पूजा.
ॐ
तारीख २९ ऑगष्ट २०१८.
श्रावण महिना.कृष्णपक्ष बुधवार.
काकडी ची भाजी.
एक काकडी पाच रुपये ला आणली.
मी एकदम खूप आणून ठेवत नाही.
जस रोज लागेल तस आणत असते.
धुतली.साला सगट विळीने
बसून बारिक चिरली फोडी केल्या.
एक टम्याटो चिरला.कोथिंबीर कडीपत्ता चिरला.
सर्व लोखंडी कढई त घातले पाणी घातले.शिजवू दिले.
भाजलेले शेंगदाणे मिक्सर मधून तेल सुटे पर्यंत बारीक केले.
ते काकडी भाजीत घातले हिरवी मिरची वाटलेली घातली.
मीठ हळद घातले शिजवू दिले.
साटोरी चे तूप राहिलेले भाजीत घातले छान काकडी भाजी केली.
ॐ
तारिख २८ ऑगष्ट २०१८
श्रावण कृष्णपक्ष तिसरा मंगळवार
नथ ! मोहरणी ला च चमकी म्हणतात.
भारत महाराष्ट याच सवाष्ण लेण. याच संस्कृती.
वैभव. शान. ठसा. आहे य.
नमस्कार
ॐ
तारिख २८ ऑगष्ट २०१८
श्रावण मंगळवार
ब्लॉगवाल्या आजीबाई.
पोळी चा कुस्करा
.
दोन गरम पोळी घेतल्या.
हाताने च कुस्करा बारीक केल्या.
कच्चा कांदा, कोथिंबीर. लाल तिखट.
लिंबू रस घातला.
मिठ हळद आणि कच्च तेल सर्व घालून
कालविले. एकत्र केले.
कच्च कांदा व कच्च तेल असल्या मुळे
अशा कुस्करा पोळी ला चव गोड येते.
ॐ
फुल किंवा मुग याच माहादेव रूप बनवतो ना.
ते आपल्या बोटांना स्पर्श केला जातो
आणि दिवस भर ते आपल्या मनात
शरीर मध्ये राहत दिवस भर.
चांगल त्यात आपण गुंगून जातो.
दुसरे विचार येत नाही त.
कोणाचा त्रास आपल्याला होत नाही.
किंवा कोणता हि पदार्थ आपण केला ना
कोणता हि कागद काम असो कोणती काम याची क्रिया
आपल्या शरीर मध्ये गुंतून जाते व आपण दिवस भर
त्यात राहून शरीर व मन छान उच्छाह ने राहत
एक रूप होत.
देवा च वाचन पूजा सुद्धा करताना पण एकरुप आपण होतो
ॐ
तारिख २७ ऑगष्ट २०१८.
श्रावण कृष्णपक्ष सोमवार.
तिसरा सोमवार हिरवे मुग चा महादेव.
हिरवे मुग महादेव ला देतात.
पूर्वी मी महादेव ला व्हावयाची नाही
थोडे मुग घेऊन गुरुजी ना देत असत.
महादेव ला पांढरी फुल आवडतात.
फुल किंवा मुग याच माहादेव रूप बनवतो ना.
ते आपल्या बोटांना स्पर्श केला जातो
आणि दिवस भर ते आपल्या मनात
शरीर मध्ये राहत दिवस भर.
चांगल त्यात आपण गुंगून जातो.
दुसरे विचार येत नाही त.
कोणाचा त्रास आपल्याला होत नाही.
ॐ
करंजी व मोदक.
बहिण व भाऊ.
असतात.
बहिण च लग्न होत.
दोन घराण नांदू दे.
करंजी केली कि मोदक करतात.
मोदक केला कि करंजी करतात.
शुभेच्छा
शुख खोबर व गूळ सारण. मैदा ची तळून
करंजी व मोदक
ॐ
तारिख २६ ऑगष्ट २०१८
श्रावण शुक्लपक्ष
नारळी पौर्णिमा
मी नुकत च
तारिख २१ मे २०१८
जेष्ठ अधिक महिना त
अरबी समुद्र जुहू चौपाटी
अरबी समुद्र स्नान व पूजा केले ली
समुद्र नमस्कार
ॐ
काय आहे
R. Y. देशपाण्डे. च सौ सुनीति रे. देशपाण्डे.
डॉ S. Y. देशपाण्डे.
यांची पुस्तक तयार आहे/
कित्ती दिवस मी जपून ठेवली आहेत .
तर हेवा नाही बरोबरी पण नाही.
पण आपण पण काही तरी करू शकतो.
एक प्रकारे मन जिद्द घडवून आणलेलं
माझ पुस्तक
वसुधालय ब्लॉग वाल्या आजीबाई
पुस्तक तयार आहे.
जळगाव पत्रकार किशोर कुलकर्णी यांनी
जळगाव येथे च छापलेले पुस्तक
आणि मला
ब्लॉग वाल्या आजीबाई छान नाव दिल आहे.
एक पुरस्कार आणि आजीबाई पण
किशोर कुलकर्णी शुभेच्छा अभिनंदन.
ॐ
राखी पौर्णिमा
सख्ख बहिण भावंड तर असतात च !
पण जिव्हाळा चे घरोबा चे पण बहिण भाऊ असतात.
तसे च चुलत भाऊ केदार देशपांडे आणि आनंद बेदरकर.
माझ्या ७५ वय ला पण भेटतात विचार पूस करतात.
खूप बर वाटत मला !’
राखू राखी !पौर्णिमा च्या शुभेच्छा.
ॐ
तारिख २६ ऑगष्ट २०१८
श्रावण पौर्णिमा
राखी पौर्णिमा
राखी पौर्णिमा ला
बहिण माहेरी जाते व भाऊ बीज ला
भाऊ बहिण च्या घरी येतो
राजपूत मध्ये योद्धा लढाई साठी
भाऊ निघाला लेला असतो तर
त्याच रक्षण शुभ होऊ दे
सुखरूप घरी येऊ दे साठी
बहिण गंडा राखी बांधते.ओवाळते
आणि दिवाळी त माहेर
आई ने दिला दिवाळी चा फराळ
चा डबा घेऊन भाऊ बहिण कडे येतो
बहिण कडे जातो
दोन हि सण च
पण रीत वेगळी. गाठी भेटी ची
आज राखी पौर्णिमा तर माझ्या आमच्या घरी माझे भाऊ
R. Y. Deshpande आणि DO S.Y. Deshpande
यांची पुस्तक आहेत
कित्ती छान भेट आठवण आहे माझ्या घरी.
राखी पौर्णिमा च्या शुभेच्छा
ॐ
तारिख २५ ऑगष्ट २०१८.
श्रावण शुक्लपक्ष शनिवार.
ब्लॉग वाल्या आजीबाई.
साटोरी !
आज मुंज मुलगा ला जेवायला बोलावून
श्रावण शनिवार जेवण नैवेद्द करतात
मी आज साटोरी केली
आमच्या शेजारी मुला ला
त्यांच्या घरी साटोरी दिली.
हल्ली घरी बोलावत नाही मी.
अस नेवेद्द देते !
ओम
गहू चा रवा घेतला गूळ किसून घेतला.
अंदाज प्रमाणे थोड सुक खोबर किसून
मिक्सर मधुन काढल . सर्व एकत्र केल.
कळत न कळत पाणी हात लावला.
सकाळी च केले चार पाच तास
तसच झाकून ठेवले.मैदा मिठ तूप घालून
पाणी मध्ये भिजवून ठेवला.
सर्व काम केली.
मैदा त साटोरी सारण भरून लाटून
सादुक तूप मध्ये एक एक तळली. साटोरी.
बारिक ग्यास करून छान साटोरी तळली.
तळतांना तूप याचा खमंग वास येत असे
साटोरी मना सारखी झाली
मला छान वाटत आहे.
आत्ता मारुती ला पण साटोरी देते.
अजून उष्टी केली नाही.
मन अगदी तृप्त वाटत
छान साटोरी केली गेली बद्दल.
माझी आई छान साटोरी करत असे.
ॐ
कित्ति सुन्दर व स्वच्छ विन काम आहे ना!
अशा वस्तु मुद्दाम घ्याव्यात.
त्यांचा रोजगार चालु राहतो.
दारावर पण आवाज देउन विकयला
मुलांना काखेत घेउन
विकायला येणाऱ्या बाया असतात.
ॐ
श्रावन / श्रावण शुक्रवार
पोट ची मुल तर आहेत च पण
वसुधालय ब्लॉग मध्ये
छान छान प्रतिक्रिया Like करतात.
मुल सारख त्याच फोटो आहेत दिसतात.
त्यांना श्रावण शुक्रवार च्या शुभेच्छा. अभिनंदन.
इतर वाचक यांना पण शुभेच्छा. अभिनंदन
ॐ
तारिख २४ ऑगष्ट २०१८.
श्रावण शुक्रवार.
मी ना दहावी पास आहे त्या काळ ची H.S.C.
डिग्री अस खूप शिक्षण नाही.
पण ना मी सतार शिकले.
तर बेळगाव तेथे स्पर्धात उत्तेजन साठी कप मिळाला.
रांगोळी काढली तर सत्कार शाल व श्रीफळ मिळाल.
अमेरिका येथे पुष्कर कडे जाऊन आले तर लेख लिहीला .
सकाळ वर्तमान पत्र ने छापला.
वसुधालय ब्लॉग लिहित आहे तर जळगाव येथील
पत्रकार किशोर कुलकणी यांनी लेख लिहिला. कि मन भरून येत
आणि ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक तयार केल.
शिंकाळी केली खूप जन यांना करून दिली त्याची आठवण.
अमेरिका येथे टोप्या विणून भेट दिल्या.
त्यांना माझी आठवण येते.
महालक्ष्मी देऊळ मध्ये रांगोळी काढण.
तांब भांडी स्वच्छ कारण पुरण पोळी करण.
घरातील स्वत: केले ल काम.
वाढ दिवस लिहून लोकाच्या आठवणी ठेवते.
अस बर च काम मी केले ली.
आठवल णा कि मन भरून येत.
आपल काम. आणि जन लोक मध्ये मिसळ ण.
कित्ती सहज काम केल मी.
याच मला हलक तृप्त. उच्छाह. वाटतो.
मी जे जगते महोच्छव ने जगते.
सर्व लिहायचं कारण कि
शुक्रवार ज्युती ची पुजा करतात.
मुल ना ओवाळून मोठ्ठ तर करतात च आणि
आपली एक ठेवण ज्युती ठेवते
तसं माझं काम झाल आहे.
याच तृप्तता.हलक पणा.
ॐ
तारीख २३ ऑगष्ट २०१८.
श्रावण शुक्लपक्ष गुरुवार .
प्रदोष.
पेशवाई छोटी छोटी चांदी ची भांडी
मी डिसेंबर १८ साल पासून
दोन हि प्रदोष करीत आहे
आज प्रदोष
रात्री च साबुदाणा भिजवून ठेवला.
शेंगदाणे भाजून सोलून ठेवले.
काल बटाटे, हिरवी मिरची,लिंब आणली.
सकाळी सर्व आवरून बटाटे उकडले.
गार केले.साल काढली सुरीने चिरले.
तूप मध्ये जिरे घालून फोडणी केली.
बटाटे घातले सकाळी मिरची व शेंगदाणे
मिक्सर मधून काढलेले साबुदाणा त घातले
मिठ घातले वाफ आणली साबुदाणा खिचडी ला
लिंबू रस घातला मस्त
पोट भर खिचडी चवी ने खाल्ली.
तृप्त खाण आणि मन!
ॐ
तारिख २३ ऑगष्ट २०१८.
श्रावण महिना गुरुवार.
ब्लॉगवाल्या आजीबाई
एक पोष्ट वाचली.
नाशिक मध्ये पेशवाई तांब पितळ भांडी विकत मिळतात.
तर मला खूप बरं वाटलं
कोल्हापूर येथे पण तांब, पितळ भांडी मिळतात.
आणि हो! कोल्हापूर घरी आमच्या घरी रोज वापरणारी
तांब भांडी आहेत.गंगाळ, कोल्हापूर कळशी ,
ताह्मण, पितळी घंटा देवात टांगलेली.
कित्ती सहज पण रोज ची भांडी कित्ती छान स्वच्छ आहेत.
मी स्वत: चिंच मिठ ने घासते आणि
नंतर ओडोपिक पावडर ने स्वच्छ करते
मला णा अस काम करायला आवडत.
मन दिवस भर हलक शान्त वाटत
आरे ! झाल आपल्या कडून स्वच्छ काम .
ॐ
श्रावण बुधवार धान्य पूजा
काळा मसाला
तारिख२२ ऑगष्ट २०१८
ब्लॉग वाल्या आजीबाई
ॐ
आज सकाळी तारिख २२ ऑगष्ट २०१८
श्रावण महिना
WordPress वसुधालय
You’ve posted 36 days in a row on वसुधालय! Keep up the good work.
यांनी मला माहिती पत्रक दिल आहे.
मला छान वाटत आहे.
आज मी दिवस भर आनंदी मनांत हसत उच्छाह ने राहणार आहे य!
ॐ
तारिख २२ ऑगष्ट २०१८.
श्रावण बुधवार
दहा रुपये ला पाना सगट मुळा आणला.
मुळा ची पान याच चिरून हिरवे मुग डाळ घालून दलिया ची खिचडी केली.
मुळा धपाटी
मुळा किसून त्यात ज्वारी चे पिठ हरबरा पिठ घातले.
मिठ, लाल तिखट, हळद, कच्चा तेल घातले.
मुळा किसलेला मध्ये च सर्व भिजविले. जास्त पाणी नाही लावले.
थापून लोखंडी तवा त तेल लावून दोन हि बाजूने भाजले.
मस्त चव आली आणि गोड चव पिठ मुळा ची चव आली.
ॐ
श्रावण मंगळवार.
तारिख २१ ऑगष्ट २०१८.
भेठी गाठी योग.
गाठी भेठी
माझी मामी बहिण ची मुलगी.
मध्ये जी मुलगी आहे.
ती मामी बहिण ची मुलगी
.
तिच्या पहिला वाढ दिवस ला
आम्ही बरेच जण
मामी बहिण च्या घरी गेले लो.
हि मुलगी चा पहिला वाढ दिवस.
तर ती आत्ता डिसेंबर मध्ये
कार्यात भेटली तिला सौ सून पण आहे.
कशा गाठी भेठी जुळतात व परत भेटतात
याच छान वाटत
शुभेच्छा अभिनंदन
ॐ
मंगळागौर.
श्रावण महिना.
मंगळवार.
तारिख २१ ऑगष्ट २०१८.
ब्लॉग वाल्या आजीबाई.
ॐ
शनिवार ला प्रणव यांनी घरी नारळ आणलेला.
मि नंतर नारळ खोवुन रंवा तुप मध्ये भाजला.
साखर पाक केला व रवा नारळ लाडु केले त.
खुप छान खमंग गोड झाले लाडू.
मि चव पाहिली.
नैवेद्द साठी काहि लाडू मारुति ला दिले.
गोड केले ला पदार्थ मि जास्त खात नाहि
त्यामुळे मारुति ला जास्त गोड पदार्थ दिला जातो.
आपोआप अन्नदान व नैवेद्द होत.
ॐ
तारिख १९ ऑगष्ट २०१८
मुल फुट बॉल खेळतांना घेतलेली
छाया चित्र
मी काल सहज छाया चित्र घेतली
आणि नंतर फेस बुक मध्ये समजल
आज छाया चित्र दिन . दिवस आहे य
मन आणि योगायोग
नेहमी ची छाया चित्र काढणारी सहज घडलं
याचा आनंद
ॐ
तारिख २० ऑगष्ट २०१८
कौस्तुभ देशपांडे यांचा
वाढ दिवस आहे.
भाच्चा आहे .
औरंगाबाद येथील
मी घेतलेलं छाया चित्र .
शुभेच्छा !
ॐ
तारिख १९ ऑगष्ट २०१८
जागतिक छायाचित्र दिन दिवस
शुभेच्छा
मी घेतलेले छायाचित्र
श्री क्षेत्र गाणगापूर येथील
कित्ती लांब चा सावली
चा आणि टांगे वाले
पण बसलेले आहे फोटो
१५ ऑगष्ट साजरा चा
जिलबी उच्छाह महोच्छव चा फोटो
कधी माती ची चूल हल्ली
पाहण्यात नाही लाल माती चा फोटो
सर्व कला छायाचित्र मी स्वत:
घेतले आहेत यांचा आनंद उच्छाह महोच्छव
ॐ
तारिख २० ऑगष्ट २०१८
कमल देशपांडे
माझी सख्खी बहिण
यांचा वाढ दिवस आहे
खुप खूप शुभेच्छा
डोंगरी रिमांड होम मुंबई येथील शिक्षिका
ओम
तारिख २० ऑगष्ट २०१८
पूर्वी चे पंत प्रधान राजीव गांधी
यांचा वाढ दिवस असतो जन्म दिवस
शुभेच्छा
ॐ
तारिख १९ ऑगष्ट २०१८
श्रावण रविवार
सूर्य पूजा
विडा च पान मधील सूर्य पूजा
पूजा पण आहे आणि कला पण आहे
नमस्कार
ॐ
तारिख १९ ऑगष्ट २०१८.
श्रावण महिना रविवार.
व्रत पूर्ण होण्याची एक शक्ती आपल्या जवळ असते.
ती शक्ती असली तर च व्रत पूर्ण होत नाही तर नाही
व्रत पूर्ण होत
ती शक्ती पण मिळवावी लागते
मी जे व्रत आत्ता पर्यंत केली
ती चांगली सुखरूप पार पार पडली.
नमस्कार.
व्रत पूजा किंवा वैकल्य.
कोणताही महिना त करतात.
पूजा किंवा काही नियम करून
ते पूर्ण करण्याच व्रत करतात.
आपण जे व्रत करतो किंवा नियम करतो,
ते नियम व व्रत याच नक्की च
आपल्या शरीर याला व मन याला चांगल असत.
मनाला चांगल असतं.
आपण त्या कामात गुंगून जातो.
आरे आज अजून व्रत पुजा व्हावयाची आहे
त्याची तयारी करण्यात वेळ चांगला जातो
वेळ व काम करण्यात व व्रत करण्यात,
वेळ गेला कि शरीर मध्ये पसरून,
आपले विचार दुसरी कडे जात नाहीत.
आपण जे व्रत करतो ते चांगल करतो.
त्यामुळे शरीर व मन चांगल राहत.
आणि त्यामुळे आपण जगतो ते चांगल घडत.
मारुती ला जाणे चालत जाणे
तेथील भक्त भेटणे समुदाय मध्ये राहील जात
एकट असलो तरी आणि आपल व्रत पण होत.
असे किती तरी व्रत पूजा करता येतात.
अनारसा वाण देणे त्यासाठी
किती तयारी करावी लागते त्यात छान वेळ जातो
आणि खाण्यास दिल्याच आनंद तृप्त मन होत.
तसेच श्रावण मधील शुक्रवार पुरण पोळी च पण
आपण पुरण पोळी करण्यात व जेवायला देण्यास एक
समाधान असत ते खूप असत.
एखादी रांगोळी, दिवा लावणे, अस छोट छोट व्रत पण
मन भरून उच्छाह येतो शरीर व मन याला.
नवरात्र मध्ये देवी ला जाणे तेथे रांगोळी काढणे
खूप च आपल काम आणि देव पूजा
आणि सामाजिक काम पण होत
खूप जण बघतात याचा आनंद मिळतो.
साठी व्रत करावी त आणि शरीर आणि मन काम
निट राहण्या साठी उपयोग होतो.
आज श्रावण रविवार आदित्य राणूबाई च व्रत पूजा
सूर्य नारायण ची पूजा व्रत नमस्कार
अनारसा व्रत. आत्या सासूबाई! ब्लॉग वाल्या आजीबाई
ॐ
मारुति नारळ व्रत पूर्ण केल.
आणि कोल्हापुर येथे आल्या नंतर
नर्सोबा वाडी ला रिक्षा ने जाऊन आले
याची तृप्तता
एवढ सर्व होण घडण कठीण
पण माझ्या कडून व्रत पूर्ण केले गेले
याच मारुती व नर्सोबा वाडी ला
श्रेय त्यांनी करून घेतलं
नमस्कार
माणूस जस असेल तस
राहण्याची सवय करतो
अमेरिका येथे गाडी कार तर
कोल्हापूर येथे रिक्षा तर रिक्षा
आहे ते चांगल मानत मन!
ॐ
मारुति ला दर शनिवार ला
नारळ दिल्याच व्रत पूर्ण केल्या चि तृप्तता.
आडी च तिन महिने लागतात
व्रत सलग व्रत करण्यास
मि ते पूर्ण केल याची तृप्तता.
अमेरिका येथे
पैठण! एकनाथ संत गाव चा पैठणी पैठण
नेसलेली .
ॐ
शनिवार २ / ३ वर्षा पूर्वी
दर शनिवार ला मारुती ला नारळ देण्याच व्रत केले आहे
तिन महिने लागतात.
आणि मी अमेरिका येथे होते तर तेथे मला देऊळ मध्ये
सौ सुनबाई पुष्कर नारळ आणून घेऊन जावयाचे
तेथे खूप लांब देऊळ पण गाडीतून वेळ काढून नेत
दर्शन मारुती साठी आणि माझा व्रत पूर्ण केल
नर्सोबा वाडी येथे गुरुजीं नां माझी अडचण सांगितली तर
नर्सोबा वाडी येथील गुरुजीं नि सांगितले
कि शनिवार ला नारळ द्या त्यामुळे मी व्रत केले.
व्रत पूर्ण झाल
नंतर मी कोल्हापूर येथे आले तर
नर्सोबावाडी ला रिक्षा करून जाऊन आले
श्रावण शनिवार : शनिवार मारूती चा वार .
तसेच श्रीनृसिंह चा वार प्रल्हाद याचा वार.
शनिवार ला शनि ला व मारूती देवळात तेल घालतात.
तसेच शनि ची पत्री रुई ची पत्री चा हार घालतात.
मुंजा मुलगा जेवणास बोलावतात.
गोड खायला जेवन देऊन त्याला दक्षिणा देतात.
प्रल्हाद वडील यांना सगळीकडे देव आहे.
लाकडी खांबात पण देव आहे.
व लाकडी खांबातून देव येतो.
देवावर श्रध्दा भक्ती ठेवली की मानासारखं होत. घडत.
लहान मुलांच पण मोठ्या मानसानीं ऐकायला हव.
मुलाचं सांगण आई व वडील यांनी ऐकायला हव.
ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.
आम्ही हे व मी शनीला तेल सात वर्ष दर शनिवारला
तेल घातलं आहे. शाहूपुरीत असतांना
मी आत्ता सुध्दा मारुती ला शनिवार च दर्शन घेते
नारळ देत नाही पण घरी काही
स्वंयपाक केले ला असेल तो नेवेद्द देते.
मारुरी ला नमस्कार
ॐ
तारिख १७ ऑगष्ट २०१८.
श्रावण शुक्रवार
मास्टर शरद चिवटे.
भाऊजी.
जन्म दिवस वाढ दिवस च्या शुभेच्छा !
वसुधा वहिनी ब्लॉग वाल्या आजीबाई
फेस बुक मुळे सर्व समजत !
जवळिक निर्माण होत आहे !
भेटी कमी झाल्या नां आत्ता अस माहिती होत आहे.
असो बाकि ठिक.
Sharad Chivate Thanks, it is nice to receive greetings from you
मास्टर शरद चिवटे
ब्लॉग वाल्या आजीबाई
ॐ
तारिख १७ ऑगष्ट २०१८
श्रावण शुक्रवार.
ज्युती चा कागद लावतात.
पूजा करतात पुरण पोळी करतात.
सवाष्ण जेवण करतात ओटी भरतात.
घरातील मुलांना पुरण दिवा करून ओवाळतात.
संध्याकाळी सवाष्ण बोलावून
दुध फुटाणे देतात ओटी भरतात
मन लावून श्रावण शुक्रवार करत्तात.
ॐ
तारिख १६ ऑगष्ट २०१८ ला सारख
अटलजी च्या तब्येत बद्दल बातमी ऐकायची
अटल जी १५ ऑगष्ट करून गेले.
आणि पुरण पोळी खाऊन गेले .
नमस्कार
काल श्रावण गुरुवार होता.
औरंगाबाद येथून माझ्या सौ मामी बहिण चा मुलगा,
कोल्हापूर येथे आला तर मी
गुरुवार ला श्रावण शुक्रवार ऐवजी
गुरुवार ला पुरण पोळी केली.
आणि काही पुरण पोळी भाच्चा ला औरंगाबाद दिली.
तसे च शेजारी पण पुरण पोळी दिली.
गाई ला पण पुरण दिल.
आपण जे काम करतो ते खाण सर्वां न पर्यंत जात.
मी पुरण पोळी केली तेंव्हा
पूर्व पंतप्रधान अटल जी वाजपयी होते
त्यांना पण
श्रावण पोळी खाण्यास मिळाली .
तुम्ही म्हणणार अस कस ते तर काही बरे नव्हते.
तस नसत आपण जे खान करतो ते सर्वा पर्यंत जात
श्रावण महिना श्रावण पोळी
शुक्रवार केला छान वाटत मला.
सहज पुरण पोळी केली पण
बरं वाटत मन याला
ॐ
तारिख १६ ऑगष्ट २०१८
श्रावण महिना
गुरुवार
ज्युती चा कागद मधील
पण हयाग्रिवोत्पत्ति पूजा
हयाग्रिवोत्पत्ति अन्वाधान
यांची पूजा करतात
हत्ती
ॐ
तारिख १६ ऑगष्ट २०१८
श्रावण महिना
गुरुवार
हयाग्रिवोत्पत्ति अन्वाधान
यांची पूजा करतात
हत्ती
ॐ
ब्लॉग वाल्या आजीबाई
रविवार ला तारिख १२ ऑगष्ट ला
ईतर ब्लॉग मुळे आज लिहित आहे य.
घरी नारळ खोबर हिरवी मिरची होति व कोथिंबीर पण होती
तर मिठ घालून चटणी केली.
.
बटाटे उकडले.सॉस पण आहे तर १० रुपये चा ब्रेड आणला.
बटाटा साल काढून लाल तिखट घालून मिठ घालून बटाटा भाजी केली.
ब्रेड तवा तापवून भाजून घेतले.
खोबर चटणी लावली.सॉस लावला बटाटा भाजी घातली.
मस्त ब्रेड स्यांड विच केले भरपूर चविने खाल्ले
ब्रेड भाजल्या मुळे चव मस्त आली
ॐ
श्रावण महिना
नागपंचमी
मी आज दलिया ची खिचडी केली.
काल च सर्व भाजी चिरून ठेवली
दुध पिशवी काल कापून दुध तापून ठेवले.
नाग खडू ने काढला पूजा केली
भावा नां फोन केला
‘माहेरी.
छान नाग पंचमी साजरी केली
उच्छव केला
महोच्छव ने जगते.
व. पु.काळे सांगतात
महोच्छव करा.
ओम
तारिख१५ ऑगष्ट २०१८
हाय टेष्ट मधन ताजी ताजी
जिलबी पण आणली.
५० रुपये ची आणली य
ॐ
१५ ऑगष्ट
शाळा आठवण !
मुली चिं शाळा सरकारी शाळा !
युनी फॉर्म नव्हते.
सकाळी ७ सात वाजता
शाळा मध्ये सर्वजण जमत.
तिन तिन मुली चिं लाईन करत
फत्ते मैदान मध्ये जमत.
खूप शाळा आलेल्या असत.
सगळ मैदान भरत ( भारत )
झेंडा वंदन होत. भाषण होत
एक १ वाजायचा.
नंतर सर्व जमले ल्या विद्दार्थी यांना
एक एक १ बिस्कीट मिळत असे.
कित्ती आनंद त्या बिस्कीट चा असे
आत्ता पुडा जरी बिस्कीट चा
खाल्ला तरी
त्या बिस्कीट ची आठवण येते.
नंतर काही मैत्रिणी घेऊन
घरी जाण्यास निघत आम्ही
खूप भूक लागलेली असे
पण
आपण झेंडा वंदन ला जाऊन आलो
याच च
जास्त वाटत असे दिवस भर
जय भारत ! जय हिंद !
आणि आज
तारिख १५ ऑगष्ट २०१८ ला
ब्लॉग वाल्या आजीबाई निं घरी
झेंडा वंदन केले य.
बिंब लेल असत. शरीरात ! मनात.
जय भारत ! जय हिंद !