आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 10, 2018

आषाढ कृष्णपक्ष शिवरात्र दिवा पूजा


ब्लॉगवाल्या आजीबाई !
आषाढ कृष्णपक्ष शिवरात्र.
नामदेव पुण्य तिथी

दुपारी बसल्या बसल्या दोन खडू घेतले.
निळा आणि गुलाबी.
टिपके दिले रेषा जोडल्या.
वाटलं दिवा लावावा. दिवा लावला.
गोड खाऊ ठेवला पाणी ठेवलं
वाटलं ताट मध्ये ठेवाव.
ताट घेतलं घंटा घेतली.
सर्व ठेवून क्यामेरा आणला.
इकडून तिकडून उभ राहून रांगोळी चा
फोटो घेतला.
छान आषाढ दिवा व्रत रांगोळी केली.
मन काम केल्यान हलक वाटतं य.

तारिख १० ऑगष्ट २०१८

38820856_1086484191528350_8792674653442146304_n

संत नामदेव


संत नामदेव पुण्यतिथी !
आषाढ कृष्णपक्ष शिवरात्र.
नमस्कार .
ब्लॉग वाल्या आजीबाई .

श्री नामदेव गाथा
परिशिष्ट ‘ ब ‘
अप्रकाशित अभंग
परिसा
भागवत

[ ५४८ ]
आषाढ शुध्द एकादशी | नामा विणवी विठ्ठलासी |
आज्ञा द्दावी वो मजसि | समाधी विश्रांती लागीं || १ ||
आयुष्य कळसासिं आलें | अभंग सिद्धी (शिध्दी) नेले |
ज्ञानेश्वर संगती घडलें | तीर्थ मिसें जगद्रोध्हरण || २ ||
जन्मा आलियाचें कृत्य | जना लावाये सुपंथ |
विठ्ठल मंत्र त्रिभुवनांत | जग जानत महिमा हे || ३ ||
सर्व सिद्धी मनोरथ | तुझेनि कृपें पावलों समस्त
म्हणे परीस भागवत | नामा नाम जपतसे || ४ ||

thumbnail_IMG_0349[1]

संत नामदेव पुण्य तिथी आषाढ कृष्णपक्ष शिवरात्र


आषाढ कृष्णपक्ष शिवरात्र
संत नामदेव पुण्यतिथि
नमस्कार ॐ
संत नामदेव

संत नामदेव विठ्ठल भक्त होते
संत नामदेव व संत ज्ञानेश्र्वर ज्ञानेश्वर एकत्र तीर्थ यॆथेला निखाले होते
आणसी गया प्रयाग असे फिरत आवंढा नागनाथ येथे आले शंकर यांचे
स्थान आहे येथे समता नामदेव यांनी कीर्तन करायचे ठरविले ईश्र्वर
चरणी सेवा करायचे ठरविले
महादेव यांना वंदना करून कीर्तन याला सुरुवात केली
पुष्कळ लोक आले होते कीर्तन त लोक ऐकण्यात गुंग न गेले झाले
एवढ्या तकांही ब्राह्मण आत आले व त्यांनी समता नामदेव यांना कीर्तन
करण्यास थांबविले लोक काय हरकत आहे विठ्ठल काय महादेव काय एकच
देव आहे ब्राह्मण म्हणाले विठ्ठल च्या दारी जाऊन विठ्ठल याचे काय गोडवे
गायचे ते गां ब्राह्मण ऐकानात व लोक ऐकेनात
देऊळ याच्या मागच्या बाजूला जाऊन खुशाल कीर्तन करा असे ब्राह्मण यांनी
सांगितले
संत नामदेव यांनी ब्राह्मण यांना नमस्कार केला व संत नामदेव मागच्या बाजूला
देऊळ येथे कीर्तन करू लागले लोक पण तेथे आले
कीर्तन करतां करतां नामदेव इतके तल्लीन झाले !की देऊळ च फिरले विठ्ठल ]

भक्ती
नाआषाढ मदेव यांची वाढली कि नामदेव यांची आर्ततेची हाक ऐकून
देऊळ पूर्व दिशा असलेले नामदेव यांच्या कडे बाजूला झाले देव शंकर यांनी
नामदेव यांच्या कडे समोर येऊन ठाकले राहिले आता सुध्दा फिरलेले देऊळ आहे तसे आहे
ब्राह्मण यांना शंकर यांची पूजा केल्या नंतर कांही गडबड आहे वाटले व शंकर यांचे देऊळ फिरले समजले
नंतर ब्राह्मण पण समता नामदेव यांच्या विठ्ठल भक्त कीर्तन याला बसले .

untitled

आषाढ शिवरात्र महिना दिवा व्रत


आषाढ महिना दिवा व्रत

ब्लॉग वाल्या आजीबाई .
आषाढ कृष्णपक्ष शिवरात्र.
आषाढ महिना दिवा व्रत.

काल प्रदोष सुटण्या साठी.
बेसन पिठ तूप मध्ये भाजले.
गूळ घातला.खमंग.
गोड गोड खाण्यास केले .
खूप च गूळ मुळे खमंग चव आली.

38672510_1086195564890546_2936882870179856384_n

दलिया खिचडी / गहू रवा खिचडी


ब्लॉग वाल्या आजीबाई.
दलिया खिचडी.
वाटीने गहू रवा घेतला.
वाटीने हिरवे मुग फोडलेले घेतले.
दोन टम्याटो चिरले. कोथिंबीर.
हिरवी मिरची मिठ वाटलेलं. हळद .
तेल मोहरी ची फोडणी केली.
टम्याटो. हिरवी मिरची कोथिंबीर
परतून घेतले.
दलिया मुग डाळ घातली.
पाणी भरपूर घातले.शिजवू दिले.
पाणी पाहून शिट्टी १ दिली.
मस्त
दलिया ,गहू रवा मुग खिचडी केली

आषाढ प्रदोष तारिख ९ ऑगष्ट २०१८

पुष्कर कडे असा दलिया खिचडी नेहमी खूप खात असे मी
.

38800220_1085547198288716_1546410877664624640_n

%d bloggers like this: