आपले स्वागत आहे!


तारिख ३ ऑक्टोबर २०१८
पक्ष पंधर वाडा भाद्रपद कृष्णपक्ष
अविधवा नवमी !

आम्ही कोल्हापूर येथे १९६७ साल ला आलो.
शाहूपुरी तिसरी गल्ली येथे
वागळे यांच्या वाडा मध्ये राहत होतो.
पिवळा चाफा च झाड होत,
त्यांच दुसर लग्न केले ल होत.

अस चं भाद्रपद कृष्णपक्ष
पक्ष पंधर वाडा अविधवा नवमी

आदल्या दिवस ला वागळे च्या
सौ बाई मला म्हणाल्या
उद्या आमच्या कडे जेवायला याल का ?
मी पटकन हो म्हटलं

आणि अविधवा नवमी ला
वागळे कडे जेवायला गेले

स्वत: पुरुष उभे राहिले
पाटावर बसायला सांगितले
स्वत: जेवण वाकून वाढल

त्यांना मी जेवले याच खूप
बर वाटलेलं दिसलं.
घरी आले तर पुणे येथून
सौ सासूबाई व बाबा आलेले

मला वाटलं मला अस जेवण जेवले
रागाव तिल काही बोलले नाही

आपण जो पटकण जो निर्णय घेतो
त्याचा आनंद कित्ती छान मिळतो

वागळे खूप तृप्त होऊन मला वाढत होते
त्यांच्या कृतीत कामात दिसत होत

तृप्त करण आपल काम याच
आपल्या ला पण तृप्त बर वाटत

वागळे नमस्कार !

IMG_0370[1]

यावर आपले मत नोंदवा