आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 4, 2018

कडवे डाळ आमटी !


तारिख ४ ऑक्टोबर २०१८
भादेअपद कृष्णपक्ष
पक्ष पंधर वाडा दशमी !

कडवे वाल डाळ आमटी !

कडवे वाल कुकर मधून शिजवून घेतले.
सुक खोबर मिक्सर मधून काढलेले घातले.
शेंगदाणे तेल मोहरी फोडणी केली.
त्यात शिजलेले कडवे वाल घातले
हळद, मिठ , लाल तिखट घातले.
परत उकळू दिले.

मस्त कडवे वाल डाळ याची आमटी केली.

IMG_0822[1]
img_7685

ब्रह्मचैतन्य महाराज


तारिख ४ ऑक्टोबर २०१८
भाद्रपद कृष्णपक्ष

पक्ष पंधर वाडा दशमी श्राध्द

श्री ब्रह्मचैतन्य महाराज
श्री गोंदवलेकर महाराज
नमस्कार

मी १९६६ साल ला प्रथम गोंदवले येथे गेले ली.
दर्शन घेतले.जेवण प्रसाद घेतला.
त्या वेळे ला वाट्या भांडी
भक्त लोक घासून विसळून ठेवत.
मी अस काम केल मला त्या वेळेला
खूप बर वाटलं आपण सेवा केल्याची.

त्यावेळेला मोठ्ठा हॉल होता
शेणा न सारवलेलं होता.
तेथेच धान्य भाजी असे.

राहण्या साठी खोल्या सारवलेल्या होत्या.
खूप छान बर वाटलं आणि
गुरुं च्या येथे वास्तव्य केल्याच.

नंतर एकदा माझी बहिण कमल ताई बरोबर
मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्थी ला
माझ्या वाढ दिवस जन्म दिवस ला तेथे गेले लो
प्रसाद खाल्लां.

खूप वेळा ब्रह्मचैतन्य यांची समाधी दर्शन केले मी!

आत्ता आत्ता खूप बदल श्री गोंदवले येथे झाला आहे.
असो बाकि ठिक.

नमस्कार !

samadhi
dscf2611

%d bloggers like this: