पोकळा तूर डाळ भाजी आमटी
ॐ
तारिख ९ ऑक्टोबर २०१८.
भाद्रपद कृष्णपक्ष.
पोकळा तूर डाळ भाजी !
पोकळा १० दहा रुपये ला पेंडी जुडी आणली.
निवडली.धुतली.विळीने चिरली.
कुकर मध्ये भाजी घातली तूर डाळ अंदाजे घातली
धुतले सर्व. पाणी घातले. चार शिट्टी दिल्या त.
गार कुकर केला.लोखंडी कढई त शेंगदाणे तेल मोहरी ची
फोडणी केली.
त्यात शिजलेली पोकळा भाजी तूर डाळ घातले.
मिठ लाल तिखट हळद घातले.
उकळू दिले
मस्त पोकळा भाजी आमटी केली.